आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघराच्या मुख्य प्रवेशद्वाराला नेहमीच आतून टाळे लावलेले असायचे. पण, त्यावेळी ते खूले राहिले. माझी 7 वर्षीय मुलगी पियाली बेपत्ता झाली. रस्त्यावर इकडे-तिकडे भान हरपून पळताना मी तिला कायमचे गमावले असे वाटत होते.
काही मिनिटे झाली असतील...किंवा काही वर्ष! ती एका जीप चालकाकडे आढळली. त्यावेळी तिच्या कपाळाचे चुंबण घेताना मी स्वतःला वचन दिले की, यापुढे ती केव्हाच एकटी राहणार नाही. पियालीच्या एका अतिरिक्त गुणसूत्राने मला काहीसे जास्त आई बनवले.
1985 साली रायपूर एक छोटे शहर होते. डॉक्टरांनी त्याला डाऊन सिंड्रोम असल्याचे सांगितल्यावर तो कुजबुजत होता. कदाचित तो काहीतरी लपवू पाहत होता. मी सर्व ऐकले. पण, मला त्यातील काहीच समजले नाही. जेव्हा समजले तेव्हा त्यावर विश्वास बसला नाही. कुरळे केस व फुगलेल्या गालांची माझी मुलगी सामान्यच होती. तिला कोणतीच समस्या नव्हती. पण, हे सत्य नव्हते. पियाली स्पेशल मुलगी होती. शहरातील 23 वर्षांच्या माझ्यासारख्या आईसाठी अशा मुलीला सांभाळणे सोपी गोष्ट नव्हती.
फोनवरून येणारा मीता मुखर्जीचा आवाज स्थिर आहे, तसा तो वर्षानुवर्षांच्या सवयीतून आला होता. आपल्या मृत मुलीची आठवण काढत त्या धायमोकलून रडत नाहीत. केवळ आठवण काढतात. त्या म्हणतात -तिला स्कुटीवर बसता येत नव्हते. स्वतःला सांभाळता येत नव्हते. मी ड्रायव्हिंग शिकली. आता कारच्या चावली स्पर्श करताच ह्रदयात कळ येते. पावसाच कारचे नाचणारे वायपर पाहून ती किती खूश झाली असती हे आठवते.
23 व्या वर्षी आई झाले. पियालीला छातीशी कवटाळताना आकाश ठेंगणे होत होते. मी थकले होते. पण, तेवढेच जेवढी एखादी नवी आई थकते. त्यानंतर एकेदिवशी माझी सासू म्हणाली -ही नॉर्मल वाटत नाही. मी घाबरले. तसेच त्याकडे दुर्लक्ष केले. होय, माझी मुलगी सामान्य का असेल. ती माझ्यासाठी असामान्य आहे, अशी खूनगाठ मी माझ्या मनाला बाधली होती. त्यानंतर तिला डाऊन सिंड्रोम असल्याचे कळले. या आजारात मुलांत 21 वे गुणसूत्र अतिरिक्त निर्माण होते.
छत्तीसगडचे रायपूर तेव्हा आतासारखे मोठे नव्हते. रुग्णालय होते. पण, मोठ्या आजारांसाठी. मुलांच्या एक्स्ट्रा क्रोमोसोमसाठी कुणाकडेही वेळ नव्हता. आम्ही दुसऱ्या शहरांत व राज्यांत पळू लागलो. मुंबईला गेलो. देशीवरील विश्वास हटला तर परदेशी डॉक्टरांची भेट घेतली. सर्वजण म्हणाले -पियाली खूप सुंदर आहे. पण, विशेष मुलगी आहे. आम्ही घरी परतलो.
आता मला माझ्या मुलीसाठी वेगळे स्वप्न निवडायचे होते. ती मोठी होऊन डॉक्टर किंवा इंजिनिअर होणार नव्हती. घरातील इतर मुलांसारखी म्यूझिशिअनही होणार नव्हती. पण, ती माझी मुलगी नेहमीच राहील. मी आता उपचार सोडून पूर्णतः तिच्यात बुडाले. ही केव्हाच सोपी गोष्ट नव्हती.
पती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते. ते नेहमीच शहराबाहेर असतात. मी एकटी मुलीला सांभाळत होते. अनेकदा अपघात होता-होता वाचले. पियाली तेव्हा तीन-एक वर्षांची होती. तिने खेळताना एक गोळी गिळली. मी तिला घेऊन डॉक्टरांकडे पळाले. रस्त्यात अनेक देवांना याचना केली. मी चांगली आई होऊ शकले नाही, असा दोषही स्वतःला दिला.
जगातील प्रत्येक आई केव्हा न केव्हा स्वतःला दोष देते. पण, स्पेशल मुलाच्या आईच्या बाबतीत हे नेहमीच होते. जेव्हा मूल दुसऱ्या मुलांसारखे धावू शकत नाही, शाळेत जाऊ शकत नाही, वयाच्या 10 व्या वर्षीही ठीकपणे जेवण करता येत नाही तेव्हा त्या त्यासाठी स्वतःला जबाबदार मानतात. मीताचा आवाज मला हजार किलोमीटरहूनही स्पष्टपणे ऐकू येत नाही.
औषधी आलमारीच्या सर्वात वरच्या कप्प्यात गेली. दरवाजाचे कुलूप आतून बंद राहू लागले. बाथरुमची कुंडी काढली. घरातील जवळपास सर्वच टोकदार वस्तू काढून टाकण्यात आल्या. आता माझी मुलगी सुरक्षित होती, पण नाही! लोकांच्या टोकदार नजरांशी मला मोठा संघर्ष करावा लागला. पियालीला घेऊन कुठेही गेले, तर लोक माझ्याकडे टोकदार नजरेने पाहत. रस्त्याने गेले तर फिरून पाहत. जेवणारे लोक जेवण सोडून माझ्याकडे पाहत.
एकेदिवशी पियालीने विचारले -आई, सर्वजण मलाच का पाहतात? मी वेळ मारुन नेली. म्हणाले, तू गोड बाहुलीसारखी दिसतेस. ‘खोटे बोलू नको आई. मला डाऊन सिंड्रोम आहे. त्यामुळे सर्वजण पाहतात.’ पियाली थेट म्हणाली. मी पाहतच राहिले. तिला सर्व समजत होते. आपण इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत, हे तिला माहिती होते. ती आमच्या गोष्टी ऐकत होती. सर्वकाही मनात ठेवत होती. अजून काही असतं तर पियालीच्या या आठवणीने हसलो असतो, पण या प्रकरणावर अश्रू अनेक तास थांबले नाही.
मुलगी मोठी होत असताना आई मुक्त होते. पण, मी जखडत गेले. पियालीला मासिक पाळी आली तो दिवस आजही विसरता येत नाही. एखादा अचानक अपघात घडावा असा. आम्ही एका कौटुंबिक सोहळ्यासाठी जबलपूरला गेलो होतो. पियाला डान्सची आवड होती. ती डीजेवर बेभानपणे नाचत होती. अचानक ती खाली आली व मला ओढत बाजूला नेले. माझे खालचे कपडे ओले झाल्याचे तिने माझ्या कानात सांगितले. आम्ही बाथरूम गेलो. तेव्हा तिचे कपडे रक्ताने लाल झाले होते. मला काही समजण्यापूर्वीच पियाली रडत होती. काहीतरी झाले यामुळे ती घाबरली होती. तेव्हा मी भींतीवर कॅलेंडर टांगले व त्यावर लाल खुना काढल्या. हे खुना पियालीपेक्षा माझ्यासाठी महत्वाच्या होत्या. वाढते शरीर व नाजूक मनाच्या माझ्या मुलीपुढे केव्हाही लज्जास्पद स्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्या माझ्यासाठी महत्वाच्या होत्या.
जवळपास 10 वर्षांनंतर पियालीला छोटी बहीण झाली. नॉर्मल. पण, अडचणी वाढल्या. तिला मोठ्या बहिणीसारखे व्हायचे होते. पियालीला पाहून तिचीही शाळेत जायची इच्छा होत नव्हती. शाळेत जात नव्हती. गृहपाठाचा विषय निघाला की रडायची. जेवताना मुद्दाम अन्न फेकून द्यायची. मोठी बहीण तिची रोल मॉडेल होती. ही मुलगीही स्पेशल आहे काय या प्रश्नाने माझा जीव कासाविस झाला होता.
दुसरीकडे, पियालीही मोठी होत होती. टीव्हीवर गाणी पहायची, कपल्सला प्रेम करताना पहायची तर स्वतःच हसायची. तिच्यासोबत मीही हसायचे. पण, मेंदू प्रत्येकवेळी सावध करायचा. दुसऱ्या मुली प्रेम करु शकतात. लग्नही करु शकतात. पण माझी मुलगी नाही. तिच्या 21 व्या अतिरिक्त गुणसूत्रामुळे तिला प्रेम करण्याची सूट दिली नव्हती.
मीता हसत आठवते. एकदा एका मुलाने तिला सीनेस्टाइलने प्रपोज केले. तो सुद्धा डाऊन होता. पियाली घरी आली, तेव्हा ती खूप आनंदी होती. वारंवार माझ्या गळ्याला पडत होती. कोणताही आडपडदा न ठेवता तो माझा बॉयफ्रेंड असल्याचे सांगत होती. अनेक दिवसांपर्यंत हे सुरू होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना याचा विसर पडला. पियाली विसरली. पण, मी विसरू शकले नाही.
जवळपास 30 मिनिटे संवाद साधल्यानतंर मीताचा कंठ दाटून आला होता. त्या सांगतात -गतवर्षी प्रथम पियालीचे पप्पा व छोट्या मुलीला कोरोना झाला. त्यानंतर मला संसर्ग झाला. आम्ही पियालीला एका खोलीत बंद केले. येथूनच चुकीचे घडत गेले. प्रत्येकवेळी हसणारी-बागडणारी माझी मुलगी अचानक शांत झाली. मी ग्लोव्ह्ज घालून अन्नाचे ताट वाढले तर ती मागे हटली. तो एकटक पाहत होती. ती माझ्या गळ्याला पडली नाही असे तेव्हा प्रथमच घडले होते.
त्यानंतर मला तिला छातीला कवटाळण्याची संधीही मिळाली नाही. ती पॉझिटीव्ह आली. घाईगडबडीत रुग्णालयात पोहोचले, तर जेवढ्या वेगाने तिने मला आई होणे शिकवले, तेवढ्याच वेगाने ती मला सोडूनही गेले. आयसीयूतीने निघालेले तिचे शरीर बॉडीबॅगमध्ये बंद होते. माझी पियाली शेवटच्या दिवशी कशी दिसत होती, हे मला पाहताही आले नाही.
प्रदिर्घ शांततेनंतर आवाज येतो -ती जाऊन वर्ष झाले. काही दिवसांपूर्वीच मी तिची आलमारी उघडली. त्यात एकेक करुन 22 घाघरा-चोळी आढळले. तेवढेच ड्रेस. तेवढेच दागिणे व पर्स. पियालीला नटणे आवडत होते. प्रत्येक कपड्यासोबत मॅचिंग दागिणे मिळाले नाही तर ती तोंड फुगवून बसत होती. आणून दिले तर संपूर्ण घरात बागडत होती.
आता त्या कपडे-दागिण्यांचे काय करणार? मुलींना देईल. सर्व? नाही. एखाद दुसरा सोडून. जो पियालीने पहिल्यांदा घातला होता किंवा तो जेव्हा तिने पहिल्यांदा डान्स करताना घातला होता. तिच्या वस्तूंना स्पर्श केल्यानंतर ती आसपास असल्याचे मला वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.