आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Wear A Mask At Home; Corona Virus Second Wave News | Know Why India’s Covid 19 Task Force Advised Wear Mask At Home

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारचा सल्ला:आता घरातही मास्क वापरण्याची वेळ आली; कोविड टास्क फोर्सने का दिला असा सल्ला? आणि तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इतर देशांनी असा सल्ला दिला का? सरकारच्या सल्ल्यास शास्त्रीय आधार काय?

देशात कोरोनाची सुनामीप्रमाणेच दुसरी लाट आल्याने सरकारने प्रथमच नागरिकांना घरात सुद्धा मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. देशातील कोविड-19 टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. वीके पॉल यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की आता घरात सुद्धा मास्क लावण्याची वेळ आली आहे. कुणालाही घरात बोलवू नका. तसेच स्वतः सुद्धा अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका.

सरकारने कोरोनाच्या रेकॉर्ड ब्रेक आकड्यानंतर प्रथमच कोरोनाची भयावह परिस्थिती मान्य केली आहे. तरीही अद्याप याला कम्युनिटी स्प्रेड अर्थात सामुदायिक प्रसार म्हटलेले नाही. घरात मास्क लावण्याचा सल्ला सरकारने का दिला? तसेच यासंदर्भातील इतर प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...

Q. घरात मास्क लावण्याचा सल्ला का?
डॉ. वीके पाल यांच्या मते, कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. घरातील एखाद्या सदस्याला कोरोनाची लागण झाल्यास त्याचा पत्ता देखील लागत नाही. कोरोनाची लक्षणे दिसेपर्यंत किंवा चाचणीचा अहवाल येईपर्यंत घरातील इतर लोक संक्रमित होत आहेत. दुसरे कारण म्हणजे, अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सुद्धा त्याची लक्षणे दिसत नाहीत. अशात घरातील इतरांना संक्रमणाचा धोका आहे. कित्येक लोक घरातून बाहेरही न पडता संक्रमित होत आहेत. त्यामुळेच सरकारने घरात मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे.

Q. हा सल्ला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच का देण्यात आला?
कोरोना संक्रमितांना मोठ्या प्रमाणात श्वसनाचा त्रास होच आहे. सोबतच, इतर गंभीर लक्षणे सुद्धा दिसत आहेत. लाखो लोक सध्या रुग्णालयांमध्ये भरती आहेत. ऑक्सीजन बेडच्या तुटवड्याने अख्ख्या सरकार आणि प्रशासनाला हादरवून सोडले आहे. अशात मास्क वापरल्यास कोरोनापासून वाचता येते. तसेच इतरांना सुद्धा सुरक्षित ठेवता येते. कोरोनाचा धोका लहान मुले, आजारी आणि वृद्धांना अधिक आहे. त्यांना सुरक्षित ठेवण्यच्या हेतून हा सल्ला देण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेत अख्खे कुटुंब संक्रमित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मास्कच्या वापरातून कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येईल.

Q. सरकारने अशा स्वरुपाचा सल्ला देण्यामागे काही अभ्यास आहे का?
होय. मास्कच्या वापराचे फायदे नुकतेच अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहेत. सरकारने हा सल्ला देताना संशोधनाचा आधार घेतला आहे. उत्तर कॅरोलिनाच्या डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसने सांगितले की दोन जणांमध्ये 6 फुटांचे अंतर असेल आणि मास्क घातला असेल तर एकमेकांपासून कोरोना फैलावण्याची शक्यता शून्य टक्के असते.

Q. इतर कुठल्या देशाने घरात मास्क लावण्याचा सल्ला दिला?
इतर देशांनी हुबेहूब असाच सल्ला दिला नाही. पण, अमेरिकेत देण्यात आलेला सल्ला अशाच स्वरुपाचा आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने जारी केलेल्या सल्ल्यानुसार एखादी व्यक्ती जी तुमच्यासोबत राहत नाही तरी घरात आहे, अशात घरातील लोकांनी घरात मास्क लावायला हवा. त्यातही अशा परिस्थितीत प्रामुख्याने वयोवृद्ध लोकांना घरात मास्क लावणे आवश्यक आहे. अर्थातच बाहेरील व्यक्ती घरात आल्यास वयोवृद्ध, आजारी आणि लहान मुलांनी घरात मास्कचा वापर करावा.

Q. वेग-वेगळ्या मास्कचा प्रभाव वेग-वेगळा असतो का?
होय, वेग-वेगळ्या मास्कचा प्रभाव वेग-वेगळा असतो. जगभरात अशा स्वरुपाचे संशोधन झाले आहेत. अनेक संशोधनात वॉल्व नसलेले N95 सर्वात प्रभावी ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

Q. मास्क लावण्याच्या फायद्यांना संशोधनाचा आधार आहे का?
बीजिंगमध्ये झालेल्या एका कौटुंबिक सर्वेक्षणाचा अहवाल ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यासाठी निवडला गेला. यामध्ये घरात राहणाऱ्या लोकांनी मास्क घातल्यास कोरोनाच्या फैलावाची शक्यता 79% कमी होत असल्याचे दिसून आले. या सर्वेक्षणात 124 कुटुंबातील 335 सदस्यांना समाविष्ट करण्यात आले. घरांमध्ये कोरोना फैलावाचा धोका बाहेरच्या तुलनेत 18 पट अधिक आहे. कारण घरात एखादी व्यक्ती संक्रमित झाल्यास ती घरातील प्रत्येक व्यक्तीच्या खूप जवळच्या संपर्कात असते. अशात इतर सदस्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता बळावते. अशात मास्क लावल्यास संक्रमणाचा धोका 79% कमी होतो.

​​​​​​Q. सरकारने काय काय सल्ले दिले?
सरकारने होम आयसोलेशनमध्ये घेतल्या जाणाऱ्या औषधींबद्दलची माहिती दिली आहे. घरात राहून आयुर मेक्टिन, हायड्रोक्सीक्लोरोक्विन घेतले जाऊ शकते. सोबतच, 5 दिवसांपेक्षा जास्त दिवस खोकला राहिल्यास ब्यूडेनेसाइड सुद्धा घेता येईल. हे नाकातून दिल्या जाणारे औषध आहे. हे औषध पॅरासिटामॉलसोबत घेतले जाते.

बातम्या आणखी आहेत...