आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘रसिक’ मान्यता:‘रसिक शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’मध्ये तुमचे स्वागत आहे !

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुमच्या शॉर्टफिल्मला ‘दिव्य मराठी’मार्फत मिळेल ‘रसिक’ मान्यता
  • तुम्ही लिहिलेली निर्मितीची कहाणीही लाखो लोकांपर्यंत पोहोचेल

सन्मित्र,

अलीकडे नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अथवा कार्यक्रमांप्रमाणेच शॉर्टफिल्मचीही चर्चा होते आहे. कमी वेळात, किमान साधनांच्या बळावर मोठा आशय मांडण्याची कमाल अशा ‘लघु’पटांनी करून दाखवली आहे. सर्जनशीलतेला नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने अनेक चांगल्या शॉर्टफिल्म तयार होत आहेत. माध्यमे आणि समाजमाध्यमांतून त्या काही प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत जातात. पण, अनेक दर्जेदार शॉर्टफिल्म लोकांना पाहायला मिळत नाहीत आणि त्यांच्या निर्मितीमागची गोष्टही त्यांना कधी वाचायला मिळत नाही. हे दोन्ही उद्देश साध्य करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ घेऊन येत आहे ‘रसिक शॉर्टफिल्म फेस्टिव्हल!’

तुम्ही बनवलेल्या / दिग्दर्शित केलेल्या मराठी भाषेतील शॉर्टफिल्मला आमचा हा पुढाकार सर्वार्थाने ‘रसिक’मान्यता मिळवून देईल. तुमच्याकडून आलेल्या शॉर्टफिल्ममधून प्रख्यात दिग्दर्शक आणि तज्ज्ञ परीक्षकांचे पॅनल ५० फिल्म निवडेल. त्यांचा समावेश फेस्टिव्हलमध्ये करण्यात येईल. अंतिम फेरीत येणाऱ्या शॉर्टफिल्मना पुरस्काराने गौरवण्यात येईल. शिवाय, निवडलेल्या ५० शॉर्टफिल्मच्या दिग्दर्शकांना आम्ही त्यांच्या या निर्मितीची गोष्ट लोकांना सांगण्याचीही संधी देऊ. शॉर्टफिल्ममागील विचार अथवा संकल्पना, कथेचे वेगळेपण, पात्रांची निवड, संगीताचा वापर आणि फिल्ममधून दिला गेलेला संदेश वा मिळणारा निखळ आनंद... अशा साऱ्या पैलूंनी सजलेली ही कहाणी आम्ही ‘रसिक’मधून लाखो वाचकांपर्यंत पोहोचवू.

...तर मग चला, तुमची शॉर्टफिल्म आम्हाला पाठवा आणि ‘दिव्य मराठी’च्या रसिक शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये आपला सहभाग निश्चित करा.

सहभागासाठी : प्रवेश शुल्क, वय, विषयाची अट नाही

तुम्ही फक्त इतकेच करा

स्वत:चे नाव, पत्ता, मोबाइल नंबर आणि आपल्या शॉर्टफिल्मची थोडक्यात माहिती लिहा. फिल्म अॅटॅच करून आम्हाला rasikfest@dbcorp.in या मेल आयडीवर (गुगल ड्राइव्हच्या माध्यमातून ) पाठवा.

शॉर्टफिल्म पाठवण्याची मुदत
३१ जानेवारी २०२१

निवडक शॉर्टफिल्मची घोषणा

फेब्रुवारीमध्ये

निर्मितीची पहिली कहाणी

मार्चमध्ये

बातम्या आणखी आहेत...