आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Taking Pictures Is Prohibited In Muslim Areas, Even Diwali Was Not Celebrated Due To Burning Of Houses

ग्राउंड रिपोर्टखिदिरपूरमध्ये हिंदू अद्याप घरी परतले नाहीत:मुस्लिम भागात फोटो काढण्यास मनाई, घरे जाळल्याने दिवाळीही केली नाही

अक्षय बाजपेयी/सुकुमारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकात्यातील खिदिरपूर… हे ठिकाण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयापासून सुमारे 7 किमी अंतरावर आहे. एस्प्लेनेड भागात भाजप कार्यालयापासून त्याचे अंतर 2 किमी असेल. मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या भागात सुमारे 15% हिंदू राहतात.

खिदिरपूरमध्ये 8 आणि 9 ऑक्टोबरला हिंसाचार झाला होता. यामुळे येथे राहणारे हिंदू इतके घाबरले आहेत की, काही अद्यापही आपल्या घरी परतले नाहीत. काही परतले असले तरी, काहीही बोलण्याचे धाडस करत नाहीत. मिलाद उन नबी आणि कोजागरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण प्रकरण जातीयवादी बनले आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या प्रकरणाचा तपास करत आहे. दिव्य मराठी नेटवर्कच्या टीमने दोन दिवस परिसरात फिरून ग्राउंड रिपोर्ट करत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

फोटो क्लिक करण्यास मनाई, संपूर्ण परिसरात फौजफाटा

खिदिरपूरमधील मोमीनपूर आणि इक्बालपूरमध्ये सर्वाधिक हिंसाचार झाला. त्याचे केंद्र कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CMRI) थांबा ते मयूरभंज दरम्यानचे क्षेत्र होते. इथे पोहोचल्यावर काही मुलं आमचा पाठलाग करू लागली. रस्त्यात चहाचे दुकान दिसले की, तिथेच उभे राहिलो.

आम्ही दुकानदाराला भुकैलासचे लोकेशन विचारले. येथे त्या रात्री अनेक घरांची तोडफोड करण्यात आली होती. भुकैलासचे नाव ऐकताच आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांच्या नजरा आमच्यावर खिळल्या.

म्हटले, चला पुढे जाऊन परिसराचे काही फोटो काढण्याचा प्रयत्न करूया. हे पाहून दुकानदाराने आम्हाला फोटो काढू नका म्हणून अडवले. तो म्हणाला की, सध्या येथे फोटो काढण्यास मनाई आहे.

चर्चा केल्यानंतर कळले की 9 ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचारापासून कोलकाता पोलिसांची रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आली आहे. गणवेशासोबतच साध्या वेशातील लोकही साध्या गणवेशात फिरत आहेत. प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

कोणीही सोशल मीडियावर शेअर करून पुन्हा हिंसाचाराचे वातावरण निर्माण करू नये, यासाठी फोटो काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. आमच्या स्रोताद्वारे, आम्ही त्याच भागात राहणाऱ्या मुलांना रस्त्यांची, इमारतींची काही छायाचित्रे क्लिक करण्यास सांगितले. बाइक चालवत तीन मुलांनी आमच्यासाठी काही फोटो क्लिक केले.

आम्ही अनेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही बोलायला तयार नव्हते. हिंसाचाराचे सर्वाधिक बळी हिंदू ठरले आहेत. कुणाचे घर जाळले. कुणाच्या घराची तोडफोड झाली, बाईकही फोडल्या.

90% हिंदू यूपी-बिहारमधील रहिवासी

या भागात राहणारे 90% हिंदू यूपी-बिहारमधील आहेत. बहुतेकजण व्यवसायाने ड्रायव्हर असून तीन-चार पिढ्यांपासून येथे राहत आहेत. त्यात रवी कुमार आणि शंभू यादव यांचाही समावेश आहे. या दोघांनी फोटो आणि व्हिडिओ काढण्यास नकार दिला, पण काही चर्चा केली. म्हणाले- आम्ही वॉर्ड क्रमांक 13 मध्ये राहतो. आमच्या ओळखिची 4 ते 5 कुटुंबे अजूनही परतली नाहीत.

9 ऑक्टोबर रोजी कोजागरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री हिंदूंच्या घरावर अचानक हल्ला करण्यात आला. हा हल्ला कोणी केला हे कळू शकले नाही, पण ते दुसऱ्या समाजाचे लोक होते. हिंसाचार होत असताना वीज गेली. कित्येक तास ना पोलिस आले ना वीज. ते घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्या फोडत होते. खिडकीतून आगीचे गोळे आत टाकले जात होते. बॉम्बचे आवाज येत होते.

हा स्लम लोकसंख्येचा परिसर आहे. प्रत्येकजण रोज कमावणारा आहे. हिंसाचाराने इतके नुकसान झाले की लोकांनी दिवाळीही साजरी केली नाही. पोलिसांची उपस्थिती असूनही सर्वांच्या मनात त्या रात्रीची भीती आहे.

खिदिरपूरला पोलिसांनी चारही बाजूंनी घेरलेले आहे. अनेक ठिकाणी कँप लावलेले आहेत. गणवेश आणि साध्या वेशातही पोलिस फिरत आहेत. अज्ञात लोकांची चौकशी सुरू आहे. इक्बालपूर-मोमीनपूर हिंसाचाराचे कव्हरेज करणारे पत्रकार मानव गुहा यांना पोलिसांनी 15 ऑक्टोबरला अटक केली होती. दोन आठवडे पोलिस कोठडी आणि एक आठवडा कारागृहात राहिल्यानंतर गुहा यांना जामीन मिळाला.

एकतर्फी बातम्या दाखवल्याबद्दल त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य प्रवाहातील माध्यमे मौन बाळगून असल्याचे त्यांनी दिव्य मराठी नेटवर्कला सांगितले. त्यांनी घटनेचे काही मूळ व्हिडिओ दाखवले होते. पोलिस अधिकारी असेही सांगत आहेत की, काही लोकांनी हिंसाचार घडवून आणला आहे, परंतु ते आपली ओळख उघड करू इच्छित नाहीत.

भाजप नेत्यावर धार्मिक ध्वज हटवल्याचा आरोप

यादरम्यान आम्ही खिदिरपूर स्कूल ऑफ फिजिकल कल्चर (KSOPC) येथे पोहोचलो. जिम आणि बॉक्सिंगचे हे केंद्र इक्बालपूर पोलिस ठाण्यापासून सुमारे 700 मीटर अंतरावर आहे. येथे प्रत्येक समाजातील हिंदू, शीख, मुस्लिम विद्यार्थी कोचिंगसाठी येतात. त्यांना किमान 100 रुपये शुल्क देऊन प्रशिक्षण दिले जाते. येथील अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत.

हे केंद्र राष्ट्रीय बॉक्सर मेहराजुद्दीन अहमद चालवतात. त्यांना चीना भाई म्हणतात. अनेक वर्षांपासून येथेच वास्तव्यास असलेले चिनाभाई सांगतात की, बबलू चौधरी नावाच्या भाजपच्या नेत्याने पैगंबराचा झेंडा ओढून काढला आणि हातात घेत फिरत होता. यामुळे हिंसाचार अधिक वेगाने भडकला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना 10 ऑक्टोबरला हिंसाचारग्रस्त भागात जायचे होते, मात्र त्यांना थांबवण्यात आले. भाजप खासदार डॉ.सुकांत मजुमदार यांना वाटेत अटक करण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर वातावरण बिघडवल्याचा आरोप केला.

ध्वज फाडल्याच्या अफवेनंतर वातावरण बिघडले

कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलाद-उन-नबीला लावण्यात आलेला ध्वज फाडल्याच्या अफवेनंतर हिंसाचार सुरू झाला. मयूरभंज आणि भुकैलास रोड येथून सुरुवात झाली. येथे जमावाने दुकाने, टॅक्सी, दुचाकींची तोडफोड केली. अनेक घरांना आग लावली गेली.

दुसऱ्या दिवशी जमावाने इक्बालपूर पोलिसस ठाण्याला घेराव घातला. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दोन आयपीएस अधिकाऱ्यांसह नऊ पोलिस जखमी झाले.

हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर, अनेक लोकांशी, पोलिस अधिकारी आणि सूत्रांशी बोलल्यानंतर आमच्या तपासात काही मुद्दे समोर आले, आम्ही तुम्हाला क्रमशः सांगत आहोत…

  • डाव्या आघाडी सरकारमधील मंत्री कलीमुद्दीन शम्स यांचा मुलगा तृणमूल काँग्रेसचा वॉर्ड अध्यक्ष नाझिमुद्दीन शम्स बबलू चौधरीच्या सुटकेसाठी इक्बालपूर पोलीस ठाण्यात पोहोचला होता. चौधरी हा मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सर्वसामान्यांमध्ये शम्स यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे.
  • बहुतेक लोकांना पूर्वीप्रमाणेच शांतता हवी आहे आणि राजकीय गटांच्या भ्रामक मोहिमेमुळे वातावरण बिघडले आहे असे त्यांचे मत आहे. दोघांमध्ये काही साम्य असल्याने काही लोकांनी मिलाद उन नबीच्या ध्वजाचा पाकिस्तानचा ध्वज म्हणून प्रचार केला.
  • स्थानिक आमदार आणि ममता सरकारमधील शक्तिशाली मंत्री फिरहाद हकीम यांची जुनी मुलाखतही त्यांना मोमीनपूरला मिनी पाकिस्तान बनवायचा आहे असा चुकीचा अर्थ घेऊन व्हायरल झाली.
  • मिलाद-उन-नबीचा झेंडा घेऊन एका गटाने अल्पसंख्याक लोकसंख्येला हुसकावून लावण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना लक्ष्य करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...