आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर आता डेल्टा प्लसचा धोका, या नवीन व्हेरिएंटबद्दल जाणून घ्या सर्व काही

आबिद खानएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेल्टा प्लस म्हणजे काय? जाणून घ्या याविषयी सविस्तर...

देश कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून सावरत असताना आता आणखी एका नवीन संकटाने डोकेवर काढले आहे. कोरोनाच्या ज्या स्ट्रेनमुळे देशात दुसरी लाट आली होती, त्या स्ट्रेनमध्ये झालेल्या नवीन बदलांमुळे आता तो अधिक प्राणघातक झाला आहे. या नवीन स्ट्रेनला डेल्टा प्लस असे नाव देण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की, डेल्टा प्लसचा मूळ विषाणूपेक्षा दुप्पट वेगाने प्रसार होऊ शकतो. भारतात या नवीन स्ट्रेनच्या 51 घटनांची पुष्टी झाली आहे, त्यानंतर सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

हा नवीन स्ट्रेन काय आहे? तो किती प्राणघातक आहे? त्याची लक्षणे कोणती आहेत? आणि त्या विरूद्ध लस किती प्रभावी आहे? चला जाणून घेऊया...

डेल्टा प्लस म्हणजे काय?
प्रत्येक विषाणू स्वत:ला मजबूत बनवण्यासाठी आपली मूलभूत रचना बदलत असतो. हे बदल नंतर व्हायरसच्या नवीन रूपास जन्म देतात. कोरोना विषाणूने बर्‍याच वेळा स्वतःला बदलले आहे, ज्याला आपण वेगवेगळ्या व्हेरिएंटच्या नावाने ओळखतो.

भारतात कोरोना व्हायरसचा डबल म्युटेंट स्ट्रेन मिळाला होता. ज्याला डेल्टा असे नाव देण्यात आले. या डेल्टामध्ये बदल झाल्यानंतर नवीन व्हायरस तयार झाला आला असून त्याचे नाव डेल्टा प्लस आहे. याला AY.1 आणि B.1.617.2.1 असेही संबोधले जात आहे.

डेल्टा प्लस संक्रमित रूग्णांमध्ये कोणती लक्षणे पाहिली जातात?
दुस-या लाटेदरम्यान कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये जी लक्षणे दिसून आली, त्याच्याशी साधर्म्य साधणारी लक्षणेच डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये आढळली आहे. यामध्ये खोकला, सर्दी, अतिसार, ताप, डोकेदुखी, खाज सुटणे, छातीत दुखणे, चव नसणे आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी सर्व लक्षणे समाविष्ट आहेत. डेल्टा प्लस संक्रमित रूग्णांमध्ये सध्या ओटीपोटात दुखणे, भूक न लागणे यासारखी नवीन लक्षणे देखील दिसून येत आहेत.

आतापर्यंत देशात कुठे-कुठे प्रकरणे समोर आली आहेत?
आरोग्य मंत्रालयाने देशभरात 45 हजार नमुन्यांची चाचणी केली असून त्यामध्ये 48 डेल्टा प्रकरणांची पुष्टी झाली आहे. डेल्टा प्लसची प्रकरणे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, राजस्थान, कर्नाटक, हरियाणा आणि जम्मूमध्ये नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 20 प्रकरणे आढळली आहेत. यानंतर महाराष्ट्र सरकारने अनेक शहरांमध्ये लॉकडाउनचे नियम कठोर केले आहेत.

इतर व्हेरिएंटपेक्षा किती भिन्न आणि धोकादायक आहे डेल्टा प्लस

  • कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये झालेल्या म्युटेशनला K417N हे नाव देण्यात आले आहे. हे म्युटेशन कोरोना विषाणूच्या बीटा आणि गामा व्हेरिएंटमध्येही आढळले होते. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनाइझेशन (NTAGI) चे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा म्हणतात की, डेल्टा प्लस व्हेरिएंट उर्वरित कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने फुफ्फुसांपर्यंत पोचते.
  • आरोग्य मंत्रालयाने राज्यांना इशारा दिला आहे की, डेल्टा प्लस व्हेरिएंट वेगाने पसरू शकतो. फुफ्फुसांना अधिक संसर्ग होऊ शकतो. मोनोक्लोनलनेही अँटीबॉडी ट्रीटमेंट ड्रगविरूद्ध प्रतिकार विकसित केला आहे. हे कॉकटेल दोन अँटीबॉडीजचे मिश्रण आहे ज्याचा कोरोनावर समान प्रभाव आहे. तसेच, हे डेल्टा व्हेरिएंटपेक्षा 60% वेगाने पसरू शकते.
  • डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, डेल्टा प्लस मूळ विषाणूपेक्षा कमीतकमी 2 पट वेगाने पसरू शकतो. याचा अर्थ असा आहे की, या बदलांमुळे व्हायरल लोड जास्त असेल, यामुळे फुफ्फुसांना सहज नुकसान होऊ शकते आणि आपण 2 ऐवजी 4 लोकांना संक्रमित करू शकता.

डेल्टा प्लस विरूद्ध लस किती प्रभावी आहे?

  • WHOने म्हटल्यानुसार, सध्या वापरल्या जाणा-या या लसी डेल्टा प्लसमुळे होणारे गंभीर संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी आहेत, परंतु विषाणूदेखील या लसविरूद्ध लढायला स्वतःला तयार करत आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या अहवालानुसार, भारतात दिल्या जाणा-या लसी डेल्टा प्लस विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रभावी आहेत. संघटनेने जगभरातील डेल्टा व्हेरिएंटच्या 160 घटनांची जीनोम सीक्वेन्सिंग केली होती, त्यापैकी 8 हे भारतातील होते. अहवालात म्हटले आहे की, डेल्टा व्हेरियंटविरूद्ध लस पहिल्या डोसनंतर 80% आणि दुस-या डोसनंतर 96% प्रभावी आहे.
  • मध्य प्रदेशात डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे दोन मृत्यू झाले आहेत. या दोन्ही लोकांनी लसीचा एक डोसही घेतला नव्हता. तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, जर या लोकांनी ही लस घेतली असती तर कदाचित त्यांना इतके गंभीर संक्रमण झाले नसते.
  • आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले आहे की, भारतात लोकांना देण्यात येणारी लस विषाणूच्या अल्फा, बीटा आणि डेल्टा विरूद्ध प्रभावी आहे, परंतु डेल्टा प्लसविरूद्ध ते किती प्रभावी आहे हे जाणून घेण्यासाठी अभ्यास केला जात आहे.

ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनादेखील डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका आहे का?
मे महिन्यात राजस्थानमधील एका 65 वर्षाची महिलेला डेल्टा प्लसची लागण झाली होती. आरोग्य कर्मचा-यांच्या म्हणण्यानुसार या महिलेला लसीचे दोन्ही डोस मिळाले होते. यासोबतच या महिलेला यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती आणि ती त्यातून बरी देखील झाली होती. या केसच्या आधारे असे म्हणता येईल की, डेल्टा प्लस व्हेरिएंट लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना संक्रमित करतो. मात्र त्यांच्यामध्ये गंभीर लक्षणांचा धोका कमी असेल.

डेल्टा-प्लस व्हेरिएंटबद्दल काळजी करण्याची काही गरज आहे का?

  • याक्षणी नाही. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्हीके पॉल म्हणतात की, आतापर्यंत डेल्टा-प्लस व्हेरिएंट भारतात व्हेरिएंट ऑफ कंसर्न बनला नाहीये. शिवाय डब्ल्यूएचओने व्हीओसीच्या यादीमध्ये त्याला समाविष्ट केलेले नाही. भारतात केवळ तो आढळून आला आहे. त्याच आधारावर याची नोंद ग्लोबल डेटा सिस्टमला केली गेली आहे.
  • परंतु दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी गेल्या आठवड्यात एका टीव्ही चॅनेलला सांगितले की, आपण या विषाणुकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. व्हायरसचे रुप बदलत चालले आहे, हे आपण समजले पाहिजे. हा विषाणू जिवंत राहून जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करु शकतो. यूकेकडून आपण धडे घेतले पाहिजेत, जिथे अनलॉक होताच नवीन प्रकरणे समोर येत आहेत. डेल्टा व्हेरिएंट​​​​​​​ आणि त्याचे नवीन रुप लोकांवर परिणाम करत आहे. काळजी घेतली गेली नाही तर डेल्टा प्लस व्हेरिएंट आपल्यासाठीही चिंतेचे कारण बनू शकतो. त्यामुळे भारताने यूकेकडून धडा घ्यायला हवा.

लसीकरण हाच एकमेव उपाय आहे
डेल्टा प्लसबद्दल सध्या जास्त माहिती उपलब्ध नाही. या कारणास्तव, जगभरात वेगवेगळे अभ्यास केले जात आहेत. प्राथमिक निकालात हे उघड झाले आहे की, व्हायरस स्वतः बदलत असला तरी,
संसर्ग टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लस हाच आहे. WHOने स्पष्ट केले आहे की, लस विषाणू संसर्गास प्रतिबंधित करू शकत नाही परंतु रुग्णाला गंभीर लक्षणे आणि मृत्यूपासून वाचवू शकते.

बातम्या आणखी आहेत...