आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंथदेवतांशी लग्न लावून लैंगिक अत्याचार:गरोदर राहिल्यास भीक मागायला सोडून देतात; वाचा, काय आहे मंदिरांमधील देवदासी प्रथा

मनीषा भल्ला, कोप्पल, कर्नाटक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवदासी. हे नाव आपण सर्वांनीच ऐकले असेलच. काहींनी कथेत तर काहींनी चित्रपटात. देवदासी म्हणजे देवांच्या तथाकथित गुलाम ज्यांना धर्माच्या नावाखाली लैंगिक गुलाम म्हणून ठेवले जाते. ती म्हातारी झाल्यावर तीला भीक मागायला सोडून दिले जाते. आश्चर्यचकित होऊ नका ही प्रथा राजे-सम्राटांच्या काळातील नाही, आजही ती सुरू आहे.

आज पंथमधील आमच्या रिपोर्टर मनीषा भल्ला हेच सत्य तुमच्या समोर आणत आहे…

देवदासींचे केंद्र म्हणजेच उत्तर कर्नाटकातील कोप्पल जिल्हा. हा जिल्हा बंगरूळू पासून सुमारे 400 किमी अंतरावर आहे. पौर्णिमेच्या रात्री आणि चंद्रप्रकाशात स्नान करून, हुलगेम्मा देवीचे मंदिर भाविकांनी खचाखच भरलेले असते. हुदो, हुदो... श्लोकाचे शब्द कानावर तरंगत होते. या श्लोकाचे पठण करणार्‍या प्रत्येक तिसर्‍या स्त्रीच्या गळ्यात पांढर्‍या आणि लाल मोत्यांची माळ म्हणजेच मणिमला असते. हातात हिरव्या बांगड्या आणि पातळ चांदीचे कडे असते.

त्या दिवे प्रत्वलीत करत आहेत. आणि त्यांच्या हातात बांबूची टोपली म्हणजेच दूरडी आहे. ज्याला इथले लोक पडलगी असे म्हणतात. त्यामध्ये हळद-कुंकू, धान्य, भाजीपाला, अगरबत्ती, धूप, सुपारी, नागिलीचे पान, केळी आणि दक्षिणा ठेवली जाते. पडलगीमध्ये ठेवलेल्या वस्तू ते देवीला अर्पण करत आहेत. मंदिरात उपस्थित असलेल्या इतर लोकांपेक्षा त्यांची ओळख वेगळी आहे. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला विचारले असता या महिला देवदासी असल्याचे कळते.

गळ्यात मणिमाळ घातलेली ही 22 वर्षीय महिला 3 वर्षांपूर्वी देवदासी झाली आहे. मणिमाला हे देवदासींचे मंगळसूत्र आहे.
गळ्यात मणिमाळ घातलेली ही 22 वर्षीय महिला 3 वर्षांपूर्वी देवदासी झाली आहे. मणिमाला हे देवदासींचे मंगळसूत्र आहे.

पौर्णिमेच्या रात्रीची त्यांना विशेष वाट असतात. आपल्या देवीला प्रसन्न करण्यासाठी त्या या मंदिरात येतात.

मंदिरात इकडे तिकडे पाहिले. 22 वर्षीय बसम्मा मंदिरात पूजा करत आहेत. कारण विचारल्यावर त्या म्हणतात, मी तीन वर्षांपूर्वी देवदासी झाली आहे. म्हातारपणी आधार मिळावा त्यासाठी आई-वडिलांनी मला देवदासी बनवले. तेव्हापासून मी येथे भीक मागून जगत आहे.

येथून 15 किलोमीटर चालत गेल्यावर विजयनगर जिल्ह्यातील उक्करकेरी गाव लागते. याला देवदासींचे केंद्र म्हणजेच बालेकिल्ला म्हणतात. अरुंद गल्ल्यातून देवदासी लक्ष्मीच्या घरी पोहोचले. केवळ एका व्यक्तीला झोपता येईल एवढीच झोपडी, जिथे ती तिच्या पाच मुलांसह राहते. आंघोळ, खाणे, झोपणे सर्व काही एकाच झोपडीत. जमिनीत छोटा खड्डा खणून त्यांनी चटणी कुटण्याचा जुगाड करुन ठेवला होता.

लक्ष्मीची मुलगी जया म्हणते, 'एखादा जोरदार पाऊस झाला की, झोपडीत पाणी शिरते. काय खावे, कुठे राहावे हेच कळत नाही. तुम्हीच सांगा, आम्ही मरायचं का?

डोळ्यात पाणी आणत जया म्हणते, 'आमची अशी अवस्था झाली आहे की, आम्हाला आमच्या वडिलांचे नावही माहित नाही. ज्याला माहीती आहे, तो भीतीने नाव सांगणार नाही, कारण एकतर तो पंडित किंवा गावचा प्रमुख किंवा कोणीतरी गुंड असेल. ज्याने आईला एखाद्या वस्तूसारखे भोगून घेतले आणि मन भरल्यावर निघून गेला.

या छायाचित्रात लक्ष्मी तिच्या मुलीसोबत दिसत आहे. ती म्हणते की, सरकार मला दरमहा 1500 रुपये देते. आजच्या महागाईत तेवढ्यात काय होते, तुम्हीच सांगा.
या छायाचित्रात लक्ष्मी तिच्या मुलीसोबत दिसत आहे. ती म्हणते की, सरकार मला दरमहा 1500 रुपये देते. आजच्या महागाईत तेवढ्यात काय होते, तुम्हीच सांगा.

तिथून पुढे गेल्यावर हलक्या हिरव्या रंगाच्या साडीत घराच्या बाहेर बसलेली उलिम्मा दिसली. वय सुमारे 50 वर्षे. ती म्हणते आम्ही 6 बहिणी होतो. दोघांना त्यांच्या पालकांनी देवदासी बनवले आणि चौघींची लग्ने झाली. माझा पुजारी माझ्यासोबत तीन वर्षे राहिला. त्याच्यासोबत माझी दोन मुलं होती. त्यानंतर तो मला सोडून गेला.

मी कसे जगलो हे फक्त मला माहीत आहे. जंगलातून 50-50 किलो लाकूड आणायचे. त्यांचे गठ्ठे बनवून शहरात विकायचे. एका दिवसात जास्तीत जास्त दहा रुपये मिळत होते.

अनेकदा तर मुलांना उपाशी झोपावे लागत होते. भीक मागून जगावे लागले. देवदासी झाल्यामुळे मला जे दुःख झाले ते कोणत्याही स्त्रीला मिळू नये. देवदासी हा या पृथ्वीवरचा सर्वात मोठा शाप आहे.

उल्लिमा म्हणते- देवदासी ही घराची प्रमुख असते, ती घरातील मुलगा असते, पण वास्तव हे आहे की, देवदासी शूद्र आहोत. उच्चवर्णीय पुरुष आमच्यासोबत हवा तोपर्यंत संबंध ठेवतात. एकदा आम्ही गरोदर झालो की, पुन्हा ते तोंड दाखवत नाहीत. ते आपल्या मुलांना भेटायलाही येत नाही.

उलेम्मा म्हणतात की, आमचे नशीबच खराब आहे की, याला आम्ही शोषणही म्हणू शकत नाही, कारण धर्माच्या नावाखाली देवदासींना तिच्या पुजाऱ्यासोबत राहावेच लागते.
उलेम्मा म्हणतात की, आमचे नशीबच खराब आहे की, याला आम्ही शोषणही म्हणू शकत नाही, कारण धर्माच्या नावाखाली देवदासींना तिच्या पुजाऱ्यासोबत राहावेच लागते.

विवाहित बहिणी घरी आल्यावर त्यांची खूप काळजी घेतली जाते. त्यांना बांगड्या, कपडे घेतले जातात. आम्हाला फक्त या चार भिंतीत राहायचे आहे. कुठेही जाता येत नाही. कधीकधी इतरांना जोड्यांमध्ये पाहून मला खूप वाईट वाटते.

या गावातील 65 वर्षीय पार्वती सांगतात की, वयाच्या दहाव्या वर्षी मला देवदासी बनवण्यात आले. माझ्या पुजाऱ्याला दोन मुली आणि एक मुलगा झाला. मोठा झाल्यावर माझा मुलगा मला सोडून गेला. मी दोन्ही मुलींचे कसेतरी लग्न केले. आता या घरात मी एकटीच राहते.

पुजाऱ्याकडून कधीही आर्थिक मदत मिळाली नाही. तो माझ्याच कमाईने मजा मारायला निघून जायचा. उदरनिर्वाहासाठी मी एकतर भाजीपाला विकायचे किंवा शेतात काम करायचे. मुलांच्या जन्मापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतचा खर्च मी उचलला आहे.

पुरोहित वारल्यावर मी त्यांच्या घरी गेले. तर त्याच्या घरच्यांनी मला घरात येऊ दिले नाही.

अनेक महिलांना लहान वयातच देवदासी बनवले जाते. एका अहवालानुसार, अशा सुमारे 20% महिला आहेत ज्या वयाच्या 18 व्या वर्षांच्या आधीच देवदासी झाल्या आहेत. - फाइल फोटो
अनेक महिलांना लहान वयातच देवदासी बनवले जाते. एका अहवालानुसार, अशा सुमारे 20% महिला आहेत ज्या वयाच्या 18 व्या वर्षांच्या आधीच देवदासी झाल्या आहेत. - फाइल फोटो

कर्नाटक राज्य देवदासी महिडेयारा विमोचना संघाच्या प्रदेश उपाध्यक्षा के. नागरतना सांगतात की, दक्षिण भारतात शेकडो स्थानिक देवी आहेत, ज्यांच्या नावाने मुलींना देवदासी बनवल्या जाते. त्यांच्यामध्ये तीन प्रमुख देवी आहेत. हुलगीम्मा, येलम्मा आणि होसुरम्मा. या तिघी बहिणी आहेत.

देवदासींचे वय निश्चित नाही. पाच वर्षांची मुलगी देवदासी होऊ शकते आणि दहा वर्षांची सुद्धा. देवदासी झालेल्या मुली फक्त दलित कुटुंबातील असतात.

त्यांना कायम सौभाग्यवती मानले जाते. ती पार्वतीची बहीण आणि भगवान शिवाची दुसरी पत्नी असल्याचेही म्हटले जाते. लग्नात सर्वप्रथम पाच देवदासींना भोजन दिले जाते. आजही दरवर्षी उचिंगिम्मा मंदिरात उत्सव असतो, तिथे देवदासींच्या अंगावर फक्त कडुलिंबाची पाने बांधून त्यांना देवीच्या रथासोबत चालावे लागते.

सुरुवातीला नवस पूर्ण झाल्यावर देवदासी बनवले जात, नंतर दबाव टाकून बनवायला झाली सुरुवात

ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू असल्याचे दलित हकुगढ समिति शोषण मुक्ति संघाचे तालुका प्रमुख सत्यमूर्ती सांगतात. इथल्या मियाजखेरी गावात एक काळ असा होता की कोणतीही मुलगी जन्माला आली की तीला देवदासी व्हावं लागायचं.

गावातील प्रमुख, प्रधान किंवा कोणत्याही दबंग व्यक्तीचे एखाद्या मुलीवर प्रेम झाले की, तो आपल्या चेल्यांच्या माध्यमातून तिच्या कुटुंबावर देवदासी होण्यासाठी दबाव आणतो. तुमच्या घरातील संकटे संपतील, तुमच्या या मुलीला देवदासी बनवा, अशी भीती ते त्या कुटुंबाला दाखवतात.

देवदासी परंपरा फक्त दक्षिण भारतातच का?

डॉ. अमित वर्मा म्हणतात की, देवदासी परंपरा उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये अधिक रुजत गेली. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे परकीय आक्रमकांचे उत्तर भारतात सतत येणे. त्यांनी मंदिरांचे खूप नुकसान केले. अशा परिस्थितीत दक्षिण भारतात मंदिर संस्कृती ज्या प्रमाणात विकसित झाली तशी उत्तर भारतात होऊ शकली नाही.

दक्षिण भारतातील मंदिरे पूजेबरोबरच संस्कृती, कला, नृत्य, अर्थ आणि न्याय यांची केंद्रे असायची. भरतनाट्यम, कथ्थक या नृत्यांचा उगम मंदिरांतून झाला. या मंदिरांतून देवदासी परंपराही उदयास आली.

सुरुवातीला देवदासींची स्थिती खूप मजबूत असायची. समाजात त्यांना मान होता. तेव्हा देवदासींचे दोन प्रकार होते. एक ज्या नृत्य करत होत्या आणि दुसऱ्या ज्या मंदिराची देखभाल करायच्या.

अमित वर्मा सांगतात की, पूर्वी लोक जास्त मुलांना जन्म देत असत, पण आजारपणामुळे आणि योग्य उपचारांच्या अभावामुळे फारच कमी मुले जगत होती.

अशा स्थितीत त्यांचे आई-वडील मंदिरात जाऊन नवस बोलू लागले की, माझा मुलगा जिवंत राहिला तर एका मुलीला देवदासी बनवेल. अशा प्रकारे ही परंपरा चालू राहिली. आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर लोक कुटुंबातील मुलीला देवदासी बनवू लागले.

ही देवदासींची मुले आहेत. त्यांचे जीवनही काही कमी वेदनादायक नाही. वडील नसल्यामुळे ही मुले अभ्यासापासूनही वंचित राहत आहेत.
ही देवदासींची मुले आहेत. त्यांचे जीवनही काही कमी वेदनादायक नाही. वडील नसल्यामुळे ही मुले अभ्यासापासूनही वंचित राहत आहेत.

दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये यासाठी देवदासी समर्पणाचा भव्य उत्सव होत असे. अविवाहित मुलीचा विवाह मंदिरातील देवतेशी होत असे. यानंतर त्यांना मंदिराच्या सेवेसाठी ठेवण्यात येत होते. त्या बदल्यात त्यांना काही आर्थिक मदत मिळत होती.

प्रत्येक देवदासीसाठी मंदिरात पुजारी असत. देवतेशी पुनर्मिलन करण्याच्या नावाखाली ते देवदासींशी संबंध प्रस्थापित करत होते. हळूहळू तिची आर्थिक स्थिती खालावत गेली आणि तिला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी वेश्याव्यवसाय करायला लावला गेला. दबंग आणि प्रभावशाली लोकांनी जबरदस्तीने आपल्या आवडीच्या मुलींना देवदासी बनवायला सुरुवात केली.

देवदासींची वेगवेगळी नावे, कुठे महारी तर मुठे राजादासी

देवदासींचा ग्रूप. यातील अनेकांच्या पुजाऱ्याचा एकतर मृत्यू झाला किंवा तो सोडून निघून गेला आहे. उदरनिर्वाहासाठी या सर्व भिक्षा मागतात.
देवदासींचा ग्रूप. यातील अनेकांच्या पुजाऱ्याचा एकतर मृत्यू झाला किंवा तो सोडून निघून गेला आहे. उदरनिर्वाहासाठी या सर्व भिक्षा मागतात.

दक्षिण भारतातील विविध भागात देवदासींना वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. ओडिशामध्ये, यांना महारी म्हणजेच महान नारी म्हटले जाते. म्हणजे अशी स्त्री जी तीच्या वासनांवर नियंत्रण ठेवू शकते.

कर्नाटकात त्यांना राजदासी, जोगथी आणि देवदासी म्हणतात. यांना महाराष्ट्रात मुरली, भाविन म्हटले जाते. तामिळनाडूमध्ये चेन्नाविडू, कन्निगेयर, निथियाकल्याणी, रूद्रा दासी, मणिकट्टर म्हटले जाते. तर आंध्र प्रदेश मध्ये भोगम, बासवी, सनि, देवाली, कलावंथाला म्हटले जाते. तर केरळ मध्ये चक्यार, कुडिकय्यर असे म्हणतात.

सरकारने बंदी घातली, तरी कर्नाटकातच त्यांची संख्या 70 हजारांहून अधिक

  • कर्नाटक सरकारने 1982 मध्ये आणि आंध्र प्रदेश सरकारने 1988 मध्ये ही प्रथा बेकायदेशीर ठरवली.
  • राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 2013 मध्ये अहवाल दिला की देशात अजूनही 4,50,000 देवदासी आहेत.
  • न्यायमूर्ती रघुनाथ राव यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाच्या आकडेवारीनुसार, एकट्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात 80,000 देवदासिया आहेत.
  • कर्नाटकातील सरकारी सर्वेक्षणानुसार राज्यात एकूण 46,000 देवदासी आहेत. सरकारने केवळ 45 वर्षांवरील देवदासींचीच गणना केली होती.
  • कर्नाटक राज्य देवदासी महिदयारा विमोचना संघानुसार त्यांची संख्या 70,000 आहे.
  • सरकारकडून 1500 रुपये मिळतात आणि रेशनमध्ये फक्त तांदूळ मिळतो. बाकीचे खाद्यपदार्थ त्यांना स्वतःच्या पैशातून आणावे लागतात.

मी अमित वर्मा यांना विचारले की, सरकारने बंदी घातली आहे, मग ही प्रथा का फोफावत आहे… यावर ते म्हणतात – हुंडाबंदी कायदा झाल्यानंतरही लोक हुंडा घेतात तशीच ही प्रथा सुरू आहे. बलात्काराविरोधात कायदा आहे, पण रोजच बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडत आहेत. कायदा होऊनही बालविवाह थांबलेले नाहीत. देवदासी पद्धतीचेही असेच आहे.तिची मुळे खूप खोल आहेत.

'पंथ'च्या पहिल्या भागात पारशी अंत्यसंस्काराची कथा होती, एकदा नक्की वाचा...

पारशी लोक प्रियजनांच्या मृतदेहाला हातही लावत नाहीत:9 फूट अंतरावरून दर्शन; मृतदेहात सैतान आहे का? तेही कुत्रा ठरवतो

मी दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्टेशनवर आहे. इथून बाहेर पडल्यावर मी मरीन ड्राइव्हला पोहोचते. तिथून समुद्राच्या पलीकडे कोपऱ्यात घनदाट जंगल दिसते. गाडीने तिथे पोहोचायला 20 मिनिटे लागली. मलबार हिल्सवर 55 एकरांवर पसरलेले हे जंगल कित्तेक वर्ष जुने आहे. ही डुंगरवाडी आहे. म्हणजे पारशी व्यक्तीच्या मृत्यूनंतरचे शेवटचे सांसारिक पद.

पारशी व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या आधी त्याचा मृतदेह येथे ठेवला जातो. येथून अरुंद रस्त्यावरून सुमारे 10 किलोमीटर चालत गेल्यावर भेटते - दखमा म्हणजेच टॉवर्स ऑफ सायलेन्स. जाळण्याऐवजी, गाडून टाकण्याऐवजी किंवा पाण्यात टाकण्याऐवजी, पारशी लोक मृतदेह गिधाडांना खाण्यासाठी टॉवर्स ऑफ सायलेन्समध्ये ठेवतात. असे का वाचा...

बातम्या आणखी आहेत...