आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टजिममध्ये आला राजू श्रीवास्तवला अटॅक:तरुण असो किंवा 50 वर्षांवरील व्यक्ती, जिमला जाणाऱ्या प्रत्येकाने अशी घ्यावी काळजी...

अलिशा सिन्हा2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

58 वर्षीय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना 10 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रेडमिलवर धावत असताना त्यांच्या छातीत कळ आली व ते खाली कोसळले.

आता त्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. त्यांच्या हृदयाच्या एका मोठ्या भागात 100% ब्लॉकेज आढळलेत. ते सध्या ICUमध्ये आहेत.

आजच्या कामाच्या बातमीत आपण 50 वर्षांहून अधिक वयाचे व्यक्ती, तरुण व प्रेग्नेंसीची प्लॅनिंग करणाऱ्या महिलांनी जिममध्ये किंवा घरी व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी हे पाहणार आहोत...

यासंबंधीच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देत आहेत बंसल हार्ट सेंटरचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. मनोज बंसल, क्रॉसफिट जिमचे मालक -सेलिब्रेटी ट्रेन सतीश कुमार व वडोदऱ्याचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विकास आनंद पटेल.

एका निरोगी व्यक्तीने दररोज किती वेळ व्यायाम करावा?

घरी...

 • किमान 45 मिनिटे व्यायाम करावा.
 • सर्वाच चांगला व्यायाम पायी चालण्याचा आहे.
 • आठवड्यात किमान 3 दिवस पायी चालावे.
 • पायी चालताना धाप लागणार नाही एवढा वेग ठेवावा.
 • तुमच्या सोबत चालणार्‍या व्यक्तीशी बोलता यावे असा वेग ठेवावा.

जिममध्ये...

 • जिममध्ये वेळ नाही, तुम्ही कसा व्यायाम करता, हे महत्वाचे असते.
 • तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार व्यायाम केला पाहिजे.
 • दुसऱ्यांकडे पाहून एक्सायटेड होऊ नका. हळूहळू आपल्या क्षमता वाढवा.
 • श्वासोश्वास वाढणार नाही किंवा धाप लागणार नाही, एवढाच व्यायाम करा.

सोर्स - डॉ. मनोज बंसल, कार्डियोलॉजिस्ट, बंसल हार्ट सेंटर, साउथ तुकोगंज, इंदूर

जिममध्ये व्यायाम करणाऱ्या बहुतांश लोकांना वाटते की, त्यांचे बीपी व कॉलेस्ट्रॉलची पातळी ठीक आहे, त्यांना कोणतीही अडचण नाही. पण असे नाही. डॉक्टर बंसल म्हणतात की, बहुतांश लोकांना हृदयाची समस्या त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळते. म्हणजे, हे जेनेटिक प्रॉब्लम असू शकतो. याशिवाय आपली खराब लाइफस्टाइलही हार्ट अटॅकला कारणीभूत ठरू शकते.

प्रश्न - खराब लाइफस्टाइलचा अर्थ काय, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात व अटॅकचा धोका वाढतो?
उत्तर -
सद्यस्थितीत लोकांकडे कामाचा दबाव खूप आहे. त्याचा थेट प्रभाव त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर पडतो. ते खूप जास्त स्ट्रेस घेतात, त्याचा थेट संबंध हृदयाशी असतो.

सातत्याने ताण घेणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची भिती असते. स्ट्रेस व सवयीमुळे लोकांना धुम्रपान व ड्रिंक करण्याची सवय लागू शकते. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. तसेच अटॅकचीही भिती वाढते.

प्रश्न -कोणत्या वयातील लोकांना असतो बीपी किंवा उच्च कॉलेस्ट्रॉलचा धोका, ज्यामुळे हार्ट अटॅकची शक्यता वाढते?
उत्तर -
व्यायाम फिजिओलॉजिस्ट मायकल जॉयनर यांच्या माहितीनुसार, वाढत्या वयासोबत उच्च रक्तदाब व हाय कॉलेस्ट्रॉलची धोका वाढतो. त्यामुळे 35 वर्षांनंतर नियमित तपासणी करणे गरजेचे असते.

घरातच व्यायाम करणाऱ्या नागरिकांना डॉ. मनोज बंसल यांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्या अशा...

हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी 50 वर्षाहून जास्त वयाच्या लोकांनी व्यायाम व डायटची अशी काळजी घ्यावी...

 • योग व प्राणायामाला आपल्या आयुष्याचा भाग बनवा.
 • हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी योग करणे अत्यंत महत्वाचे आहे.
 • मसल्स बनवण्यासाठी तासंतास घाम गाळून का. हे धोकादायक ठरू शकते.
 • वॉकसह सूर्य नमस्कार केल्याने खूप फायदा होतो.
 • संतुलित आहार घ्या. तेल-तूप कमी खा, पण टोटल बंद करू नका.
 • केवळ प्रोटीन असणाऱ्या गोष्टींचे सेवन करू नका, कार्बोहायड्रेट असणाऱ्या गोष्टीही खा.
 • झटकन वजन कमी करण्याच्या भानगडीत पडू नका.
 • शरीर हायड्रेट ठेवा. किमान 3-4 लीटर दररोज पाणी प्या.

आता चर्चा करूया 50 वर्षाहून जास्त वय असणाऱ्या पण घराऐवजी जिममध्ये व्यायाम करणाऱ्या लोकांची... त्यांच्यासाठी सेलिब्रिटी ट्रेनर व क्रॉसफिट जिमचे ओनर सतीश कुमार यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. खालच्या ग्राफिक्समध्ये वाचा-

तरुणही टीव्ही व मोबाइलवर सेलिब्रिटीजना पाहून मसल्स तयार करण्यासाठी जिममध्ये तासंतास व्यायाम करतात. अनेक प्रकारची औषधीही घेतात. त्यामुळे खाली दिलेल्या गोष्टी लक्षपूर्वक वाचा...

 • मसल्स लवकर बनवण्यासाठी स्टेरॉयडचा वापर खूप वाढला, हे टाळा.
 • डायटिशियनच्या सल्लानुसार डायट घ्या. घाईच्या चक्करमध्ये एक्स्ट्रा सोर्स किवा औषधी बिल्कुल घेऊ नका.
 • हळू-हळू व्यायाम करण्याची क्षमता वाढवा. एकदम हेवी वर्कआउट केल्याने त्याचे शरीरावर वाईट परिणाम पडू शकतात.
 • जिममध्ये दुसऱ्यांसोबत स्पर्धा केली तर त्याचे स्वतःला नुकसान भोगावे लागेल. त्यामुळे क्षमतेनुसारच व्यायाम करा.
 • ट्रेनर जेवढे आठवडे किंवा महिन्यात तुमचे उद्दीष्ट साध्य करण्याचा सल्ला देतात, तो मान्य करा.

आता गोष्ट लग्न झालेल्या, अपत्याची प्लॅनिंग करणाऱ्या पण वय 40 हून कमी असणाऱ्या महिलांची. त्यांनी खाली दिलेल्या गोष्टी वाचाव्या...

 • प्रेग्नेंसीची प्लॅनिंग करणाऱ्या महिलांना वॉकिंग सर्वात सर्वात चांगला व्यायाम आहे.
 • अशा महिलांनी दररोज किमान 4-50 मिनिटे नियमित वॉक करावा.
 • वॉक करण्याचा वेग हळूहळू वाढवता येईल. यामुळे फिटनेसही हळूहळू वाढेल.
 • बीपी व शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी रेग्युलर चेकअप करावे व संतुलित डायट घ्यावा.

प्रश्न -जिम असो वा घर, बहुतांश लोकांच्या शरीरात अटॅक येण्यापूर्वी काही लक्षणे दिसून येतात. त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. ती कोणती लक्षणे असतात?

उत्तर - हार्ट अटॅक येण्यापूर्वी आठवडाभर अगोदर जवळपास एक तृतीयांश लोकांच्या शरीरात काही लक्षणे दिसून येतात. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याकडे गांभिर्याने लक्ष दिले तर स्थिती सांभाळता येऊ शकते.
यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या स्पोर्ट्स कार्डिओलॉजिस्टचे संचालक जोनाथन ए. ड्रेजनर यांच्यानुसार अशी लक्षणे आढळल्यानंतर तत्काळ डॉक्टरांकडे गेले पाहिजे-

 • श्वास घेण्यास त्रास
 • छातीत वेदना
 • जास्त थकवा

प्रश्न - काही लोकांना पूर्वीपासून हृदयाशी संबंधित आजार असतात, त्यांनी जिममध्ये जावे काय?
उत्तर -
असे लोक जिमला जात असतील तर त्यांनी जास्त वर्कआउट करू नये. वडोदऱ्याचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विकास आनंद पटेल यांच्या माहितीनुसार, हृदयाशी संबंदित आजार असणाऱ्या लोकांनी जास्त हेवी वर्कआउट केल्याने हृदयावर दबाव येण्याची भीती असते. हा दबाव हार्ट अटॅकचेही कारण ठरू शकते.

जाता-जाता खाली दिलेल्या काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया भोपाळच्या फ्लॅश फिटनेस क्लबमध्ये जिम ट्रेनर प्रताप शुभम सिंह यांच्याकडून...

प्रश्न -हाय बीपीच्या रुग्णांनी जिममध्ये जावे की नाही? हो तर कोणता व्यायाम करणे टाळावे?
उत्तर -
जाऊ शकतात, यात काहीही समस्या नाही. पण त्यांनी व्यायाम करताना रेस्टिंग टाइम जास्त घ्यावा. हृदयावर दबाव येईल किंवा धाप लागेल असा व्यायाम करू नये. हेवी वर्कआउट पूर्णपणे टाळावा.

प्रश्न - डायबिटीस असणाऱ्यांनी जिमिंग करावी काय?
उत्तर -
बिल्कुल करता येईल. पण डायबिटीजच्या पेशंटचे वर्कआउट शेड्यूल पूर्णतः वेगळे असते. जिम ट्रेनरने ही गोष्ट लक्षात घेऊन शेड्यूल व डायट चार्ट तयार करावा.

प्रश्न -जिम जाण्याचे एखादे योग्य वय असते का?
उत्तर -
असे काही नाही. लोक विचार करतात की, 18 वर्षांनंतर जावे. पण 12-13 वर्षांच्या वयातही जिमला जाता येईल. केवळ जिममध्ये आपले वय व क्षमतेनुसार व्यायाम करावा.

आज गल्लोग्ली जिम सुरू झालेत. त्यामुळे कोणत्याही जिममध्ये गेले तर सर्वप्रथम तेथील ट्रेनर सर्टिफाइड आहे किंवा नाही हे पहावे.

प्रश्न -50 वर्षाहून अधिकच्या लोकांनी जिमला जावे की नाही?
उत्तर -
जाऊ शकता. पण त्यांनी आपल्या आरोग्याशी संबंधित सर्वच गोष्टी जिम ट्रेनरला सांगाव्यात. उदा. बॅक पेन, गुडघ्यातील वेदना, आणखी काही.

या सर्व गोष्टींची काळजी घेऊन वर्कआउट करावा लागेल. हेवी वर्कआउट व अन्य प्रकारची कोणतीही औषधी घेणे टाळावे.

बातम्या आणखी आहेत...