आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:देशात व्हॉट्स अॅपचे डाऊनलोड 7 दिवसांत 35% घटले, 40 लाखांवर मोबाइलवर सिग्नल-टेलिग्राम डाऊनलोड

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हॉट्सअॅपला धडा : नामांकित कंपन्यांचे एक्झिक्युटिव्हच नव्हे, छोट्या गावातील युजरनेही शोधले नवे पर्याय
  • देशात व्हॉट्सअॅपचे 40 कोटी युजर, तुमच्या डाटातून कंपनीची कमाई

व्हॉट्सअॅपने लागू केलेल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा डाव आता उलटला आहे. कंपनीने स्पष्टीकरण देऊनही युजर्स वेगाने इतर प्लॅटफॉर्मवर शिफ्ट होऊ लागले आहेत. दोन आकडेवारीतून याला पुष्टी मिळते. एक म्हणजे ६ जानेवारीला नव्या धोरणाची घोषणा झाल्यानंतर ४० लाखांहून अधिक मोबाइलवर सिग्नल (२४ लाख) आणि टेलिग्राम (१६ लाख) अॅप डाऊनलाेड झाले आहेत. टेलिग्रामने तर बुधवारी घोषणा केली की जगभरात त्यांचे डाऊनलोड ५० कोटींच्या वर गेले आहे. गेल्या ७२ तासांत जगभरातील अडीच कोटी युजर्सनी टेलिग्राम डाऊनलाेड केले आहे.

टेलिग्रामने भारताशी संबंधित आकडेवारी स्पष्ट केली नसली तरी कंपनीच्या सीईओंनी म्हटले आहे की, आशियात सर्वाधिक ३८% युजर्स वाढले आहेत. डाटा अॅनालिटिक्स एजन्सी सेन्सर टॉवरनुसार, व्हॉट्सअॅपच्या घोषणेनंतर पहिल्या आठवड्यात २.५ लाख सिग्नल अॅप डाऊनलोड झाले आहेत, तर ८८ लाख युजर्सनी सिग्नल साइन इन केले.

सेन्सर टॉवर व एपटोपियासारख्या एजन्सीनुसार, व्हॉट्सअॅपच्या डाऊनलोडमध्ये या काळात ३५% घट झाली. महिंद्रा व टाटा ग्रुपच्या चेअरमनसह वरिष्ठ अधिकारी, पेटीएम व फोन पेसारख्या कंपन्यांच्या सीईओंनी व्हॉट्सअॅपला निरोप दिला. सामान्य लोकांनीही नवे पर्याय शोधले आहेत. इंटरनेट गव्हर्नन्स एक्स्पर्ट हरीश चौधरी यांच्यानुसार, ‘अनेक छोट्या गावांतून स्मार्टफोन युजर्स टेलिग्रामवर शिफ्ट होत असल्याच्या बातम्या आहेत.’

व्हॉट्सअॅपवर दोन पुस्तके लिहिणारे सायबर लॉ एक्स्पर्ट पवन दुग्गल म्हणतात, व्हॉट्सअॅप हादरले आहे. डॅमेज कंट्रोलसाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत. नव्या पॉलिसीचा कालावधीही विचारात घेण्यासारखा आहे. केंद्र सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात डाटा प्रोटेक्शन विधेयक आणणार आहे. यात डाटा सुरक्षेच्या कठोर तरतुदी होणार होत्या. म्हणूनच व्हॉट्सअॅपने पॉलिसी बदलली असावी.

देशात व्हॉट्सअॅपचे ४० कोटी युजर, तुमच्या डाटातून कंपनीची कमाई

सायबर लॉ एक्स्पर्ट पवन दुग्गल म्हणतात, व्हॉट्सअॅपला याचे परिणाम भोगावे लागू शकतात. युजर्स डाटा सेलिंग हाच कंपनीच्या कमाईचा सर्वात मोठा मार्ग आहे. युजर बेसच जर घटू लागला तर उत्पन्नावर, पर्यायाने ब्रँडवर परिणाम होईल. सध्या भारतात ४० कोटी व्हॉट्सअॅप युजर आहेत.

बातम्या आणखी आहेत...