आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोविड वॉर्डात देशभक्तीची ‘कविता’; मुलास कावीळ असताना कविता नवगिरे देताहेत घाटीत सेवा

रोशनी शिंपी | औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात 99 हून अधिक डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू

एकल पालक असतानाही घाटीतील नर्स कविता नवगिरे या कौटुंबिक अडचणींना बाजूला ठेवून मागील ५ महिन्यांपासून अविरतपणे इंटेन्सिव्ह क्रिटिकल केअर युनिटमध्ये (आसीसीयू) रुग्णसेवा देत आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कविता व त्यांच्यासारख्या असंख्य कोविड योद्ध्यांच्या देशसेवेला सलाम...

एकल माता असल्याचे कारण देत कोविड वॉर्डातून कविता यांना सहज सुटका करून घेता आली असती. किंबहुना काही दिवस सक्तीने सेवा बजावल्यानंतर सूट मिळालीदेखील. पण ती नाकारून त्यांनी कोरोना वॉर्डातच सेवा देण्याचा निर्णय घेतला आणि कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून त्या येथे सेवा देत आहेत. आयसीसीयू वॉर्डात नातेवाईक जाऊ शकत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या वेदना, दु:ख जाणून घ्यावेच लागतात. अनेकदा अशा प्रसंगांना सामोरे जाताना अश्रू रोखू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

...पण कर्तव्याला प्राधान्य

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नर्स, डॉक्टरांना त्यांच्या रहिवासी भागात त्रास दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण देवानगरीत राहणाऱ्या कविता यांना सर्वात जास्त प्रेम व आदर मिळाला. याच काळात बारावीतील मुलाला कावीळ झाली. मुलगीही घरीच होती. पण तरीही मुलांनी हिंमत हरली नाही. ते फक्त मला मन लावून काम कर, असे म्हणतात. देशसेवा सीमेवरच नाही तर या संकट काळातदेखील करता येते आणि मी तेच करतेय, असे कविता म्हणाल्या.

आम्ही सेवा १००% देताे

^पीपीई किट घालून ८ ते १० तास काम करणे सोपे नाही. आमच्यावर खूप टीका केली जाते. पण याच आयसीसीयूतून अनेक जण बरे झाले. त्याचे श्रेय कविता नवगिरे यांच्यासारख्या सेवाव्रतींना आहे. -डॉ. शोएब पटेल, आरएमओ

राज्यात ९९ डॉक्टरांचा मृत्यू

कोरोनामुळे आतापर्यंत अनेक डॉक्टर्स, नर्स बाधित झाल्या. तर राज्यात ९९ हून अधिक डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. १३०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. इतर वेळी फक्त रुग्णांची सेवा करून त्यांना बरे करण्याची जबाबदारी असते. पण, कोरोनामध्ये स्वत:ला वाचवून रुग्ण बरा करण्याचे आव्हान असल्याचे कविता यांनी या वेळी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...