आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • 'When There Is No Criminal Record Against The Brother, Even If He Is Declared A Terrorist, Hope For Justice': Khwaja Yunus Brother Demand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:‘भावाविरुद्ध कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसताना, त्याला दहशतवादी ठरवले, तरी न्यायाची आशा’

परभणी (प्रवीण देशपांडे)9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्वाजा युनूस - Divya Marathi
ख्वाजा युनूस
  • ख्वाजा युनूसचा भाऊ ख्वाजा हुसेन यांने व्यक्त केली भाबडी अपेक्षा

‘बचपन से पढाई मैं सबसे आगे रहनेवाला युनूस इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअर बनके दुबई में अच्छी पोस्ट पर काम कर रहा था। एक महिने की छुट्टियाँ लेकर आया था। एेसे युनूस पर ना ही कोई एन-सी दाखल थी, ना ही उसका कोई क्रिमिनल रिकार्ड था। फिर भी पुलिसवालों को घाटकोपर बॉम्ब ब्लास्ट में आरोपी चाहिये था। तो युनूस को उसके दोस्तों के साथ आरोपी बना लिया गया। अभी इन्साफ की उम्मीद है। अल्ला जानता है, ख्वाजा दहशतगर्द नहीं था। नेक बंदा था।

ख्वाजा युनूसचे मोठे बंधू हुसेन आजही १८ वर्षांपूर्वीची ‘ती’ घटना आठवताना रडतात. त्यांच्या डोळ्यात भीती आणि काळजी दाटून येते. माझा भाऊ दहशतवादी नव्हता. त्याला खोट्या प्रकरणात फसवले गेले. त्याला मारले. त्याचा खून केला गेला. त्याला मारणाऱ्या पोलिसांना पुन्हा सरकार सेवेत कसे घेऊ शकते? असे सांगताना हुसेन यांच्या चेहऱ्यावरचा संताप स्पष्ट दिसत होता.

घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील ख्वाजा युनूसच्या कोठडीतील मृत्युप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या चार पोलिसांना राज्य सरकारने पुन्हा सेवेत रुजू करून घेतले आहे. सरकारच्या या निर्णयावर ख्वाजाची आई आशिया बेगम आणि मोठा भाऊ हुसेन यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच अजूनही न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे ते सांगतात.

कट रचूनच संपवले :

ख्वाजा युनूसचे भाऊ हुसेन यांनी युनूसला पवई गुन्हे शाखेने २४ डिसेंबर २००२ ला त्याच्या चार मित्रांसह ताब्यात घेतल्यानंतर ७ जानेवारीला तो फरार झाल्याचे जाहीर केले. परंतु यादरम्यान आपण त्याला कोठडीत असताना भेटण्यास गेल्यानंतर त्याचा प्रचंड छळ होत असल्याचे दिसून आले. स्वतःच्या पायावरदेखील तो उभा राहू शकत नव्हता. दोन कॉन्स्टेबलच्या मदतीने त्याला उभे केले जात होते. त्यामुळे युनूसचा पळून जाण्याचा प्रश्‍नच नव्हता. डॉ. मतीन यांची प्रत्यक्षदर्शी साक्ष व त्याआधारे दाखल झालेला एफआयआर पोलिसांचा हा नियोजनबद्ध कट असल्याचेच दिसून येते. या आपल्या दाव्यावर आजही हुसेन ठाम आहेत.

चिखलदरात झाली अटक

परभणीतील बाल विद्या मंदिरात शिक्षण झालेला युनूस अभ्यासात अत्यंत हुशार होता. १९९८ मध्ये औरंगाबादमधून त्याने इन्स्ट्रूमेंटेशन शाखेत इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर लगेचच तो दुबईत एका कंपनीत चांगल्या पदावर रुजूही झाला होता. त्याचे मित्रही उच्चशिक्षित होते. २००२ मध्ये एक महिन्याच्या सुटीवर युनूस भारतात परतला होता. तत्पूर्वीच घाटकोपरचा बॉम्बस्फोट घडला. युनूस हा आपल्या मित्रांसोबत चिखलदरा येथे फिरण्यास गेला असता तेथेच पोलिसांनी त्याला या प्रकरणात अटक केली.

सुुप्रीम कोर्टात दाद मागणार

ख्वाजाला कट करून मारले आहे. नियोजनबध्दरीत्या पोलिसांनी बॉम्बस्फोटात अडकवत त्याचा प्रचंड छळ करीत कोठडीत त्याला जिवे मारले. त्याचे इतर साथीदार २००४ मध्ये सुटलेही. मात्र, ज्यांच्यावर आरोप आहेत त्या चार कर्मचाऱ्यांवर खटला सुरू असताना त्यांना सेवेत रुजू करून घेतले जात आहे. याविरोधात मी सुप्रीम कोर्टात न्याय मागणार आहे. - आशिया बेगम, युनूसची आई.

बातम्या आणखी आहेत...