आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:WHO च्या मुख्य वैज्ञानिक म्हणाल्या - भारतात कोरोना एंडेमिक स्थितीत पोहोचला; म्हणजे देशात कोरोना नष्ट झाला का? तिसऱ्या लाटेचे काय होईल? जाणून घ्या

जयदेव सिंहएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • WHO च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणतात की भारतातील कोरोना प्रसाराने आता एंडेमिक स्थितीमध्ये प्रवेश केला आहे.

कोरोना भारतात अशा टप्प्यावर पोहोचू शकतो जिथून तो साथीच्या रोगाऐवजी एंडेमिक म्हणजे स्थािनक रोग बनू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणतात की, भारतातील कोरोना प्रसाराने आता एंडेमिक स्थितीमध्ये प्रवेश केला आहे. म्हणजेच आता त्याच्या प्रसाराचा दर पूर्वीपेक्षा खूपच मंदावला किंवा कमी झाला आहे. एंडेमिक स्टेजचा अर्थ असा मुळीच नाही की, आता भारतात कोरोना संपण्याच्या मार्गावर आहे. तर त्याऐवजी डब्ल्यूएचओ असे संकेत देत आहे की, सध्या कोरोना अशा एका स्थितीत आहे जो कधीही संपणार नाही.

एखाद्या रोगाचा स्थानिक स्वरूपाचा अर्थ काय आहे? कोरोनाच्या एंडेमिक स्टेजचा भारत आणि जगासाठी काय अर्थ आहे? आता नवीन प्रकरणे असतील, परंतु साथीसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही का? अनेक तज्ज्ञ तिसऱ्या लाटेबद्दल सांगत असलेल्या भीतीचे काय होईल? धोकादायक व्हेरिएंट समोर आल्यास काय? या सर्व प्रश्नांवर, आम्ही महामारी तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांच्याशी बातचीत
केली. जाणून घेऊया ...

एखाद्या रोगाची एंडेमिक स्टेज म्हणजे नेमके काय?

जेव्हा एखादा नवीन रोग येतो आणि तो एका छोट्या भागात असतो तेव्हा त्याला आउटब्रेक म्हणतात. उदाहरणार्थ, जेव्हा कोविड -19 पहिल्यांदा वुहानमध्ये आला, तेव्हा तो उद्रेकाचा टप्पा होता. जेव्हा जानेवारी 2020 पासून थायलंड आणि इतर देशांमध्ये त्याचा प्रसार सुरू झाला, तेव्हा कोरोना एपिडेमिक स्टेजमध्ये होता. 11 मार्च 2020 पूर्वी कोरोना एपिडेमिक स्टेजमध्ये होता. 11 मार्च रोजी डब्ल्यूएचओने याला महामारी घोषित केली. म्हणजेच तो जागतिक महामारीच्या टप्प्यावर आला आहे.

हे टप्पे रोगाची तीव्रता दर्शवत नाहीत. रोगाचा टप्पा कोणत्या भागात पसरला आहे ते सांगते. जेव्हा लोकसंख्येमध्ये नैसर्गिक संसर्ग आणि लसीकरणाद्वारे हर्ड इम्युनिटी येते, तेव्हा रोगाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि तो एंडेमिक स्टेजमध्ये येतो. या परिस्थितीत, विषाणूचे सर्कुलेशन नियंत्रणात येते, परंतु रोग मुळापासून संपत नाही. बहुतेक रोग एंडेमिक स्टेजमध्ये जातात. उदाहरणार्थ, मलेरिया, डेंग्यू, गोवर यासारखे आजार भारतात एंडेमिक स्टेजमध्ये आहेत.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या मते, एखादा रोग एंडेमिक स्टेज तेव्हा मानला जातो जेव्हा त्याची उपस्थिती कायमस्वरूपी असते आणि प्रसार सामान्य होतो. अशा परिस्थितीत, साथीचा प्रभाव काही लोक किंवा विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित होतो. यासह, विषाणू देखील कमकुवत झालेला असतो. या व्यतिरिक्त, लोक त्या रोगासह जगणे देखील शिकतात.

2020 मध्ये सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, जेव्हा एखादी महामारी एंडेमिक स्टेजवर येते, तेव्हा त्याला रोखण्याची जबाबदारी सरकारांकडून सामान्य लोकांकडे वळते. मात्र रोगाच्या एंडेमिक स्टेजमध्ये प्रकरणांची संख्या निश्चित केली जाऊ शकत नाही. वेगवेगळ्या भागातील लोकसंख्येनुसार, एंडेमिक स्टेजमध्ये येणा-या प्रकरणांची संख्या वेगळी असू शकते. म्हणजेच, जर 200 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात दैनंदिन प्रकरणांची संख्या 200 असेल, तर ती रोगाची एंडेमिक स्टेज मानली जाते, तर ज्या देशाची लोकसंख्या 2 कोटी आहे, तिथे ही संख्या आणखी कमी असेल.

तर कोरोनाने खरंच एंडेमिक स्टेजमध्ये प्रवेश केला आहे का?
सध्या जग महामारीच्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीत, कोरोना भारतामध्ये एंडेमिक अवस्थेत आहे असे म्हणणे फार घाईचे आहे. जोपर्यंत जग महामारीमध्ये आहे, तोपर्यंत सर्व देशांना धोका आहे. जेव्हा डब्ल्यूएचओ जगातून साथीचा अंत झाल्याचे घोषित करेल, तेव्हाच आपण विश्वास ठेवला पाहिजे की हा रोग स्थानिक टप्प्यावर आला आहे.

एंडेमिक स्टेजवर आल्यावर काय होते?
एंडेमिक स्थिती म्हणजे विषाणू सदैव तिथेच राहतो पण कमी प्रमाणात. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर एंडेमिक स्थिती अशी असते की, ज्यामध्ये देशातील मोठी लोकसंख्या ही त्या व्हायरस सोबत जगायला शिकते किंवा त्यांना याची सवय होते. याच्या विरोधात एपिडेमिक स्थिती असते, ज्यामध्ये मोठ्या लोकसंख्येवर व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त होत असून त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते.

तर हा आजार सामान्य सर्दी-खोकल्यासारखा असेल का?
हे आता सांगणे खूप लवकर आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये सायन्स मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात तीन गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे या विषाणूने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याचे म्युटेशन वाढत आहे. हे वेगाने प्रसारित होत आहे, परंतु तरीही त्याची प्रसारण क्षमता गोवर सारख्या विषाणूंपेक्षा एक तृतीयांश आहे. अशा परिस्थितीत, त्याची नवीन रूपे अधिक प्रसारित होऊ शकतात.

दुसरे म्हणजे, ज्या प्रकारचे पॅटर्न हा विषाणू दाखवत आहे, अशी भीती आहे की दहा वर्षांनंतर त्याचे रुपांतर पुर्णतः नवीन व्हायरस झाले असेल.

तिसरी गोष्ट अशी असू शकते की, येणाऱ्या काळात लसीच्या दोन व्हेरिएंटची आवश्यकता असू शकेल. अशा परिस्थितीत, हे सांगणे फार लवकर आहे की, येत्या काही वर्षांमध्ये कोरोना विषाणू सामान्य सर्दी-खोकल्यासारखा असेल. इतर अनेक कोरोना विषाणू सध्या लोकांमध्ये आहेत, परंतु ते गंभीर आजार निर्माण करत नाहीत.

एंडेमिक स्टेजबद्दल बोलत असताना हर्ड इम्युनिटी येत आहे का?

अजून असा टप्पा आलेला नाही. जी लस दिली जात आहे ती व्हायरस मुळापासून नाहीसा करत नाही. हे केवळ गंभीर आजारापासून संरक्षण करते. लसीमुळे संसर्ग कमी होत नाही. लसीकरण केलेल्या लोकांना फक्त गंभीर आजार होणार नाही. लसीकरण करण्याचा अर्थ म्हणजे रोग पुन्हा पसरल्यास बहुतेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही.

हर्ड इम्युनिटी तेव्हा येईल जेव्हा कमीतकमी 85% लोकांमध्ये प्रतिकारशक्ती येईल. देशातील एकूण प्रौढ लोकसंख्या 60%आहे. अशा परिस्थितीत, जरी देशातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण केले गेले, तरी हर्ड इम्युनिटी निर्माण होणार नाही. तशीदेखीललसीची प्रभावीता 80%आहे. अशा परिस्थितीत हर्ड इम्युनिटी मिळवणे खूप कठीण आहे. त्यामुळे आपण कोरोना विषाणूविरूद्ध हर्ड इम्युनिटीचा विचार करू शकत नाही. सध्या जगात साथीचा रोग सुरू आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात भारतात तिसरी लाट येऊ शकते. हे नक्कीच आहे की जितक्या अधिक लोकांना नैसर्गिक संसर्ग आणि लसीकरण असेल तितकी त्याची तीव्रता कमी होईल.

याचा भारत आणि जगासाठी काय अर्थ आहे?

आतापर्यंत मानवांना संक्रमित करणाऱ्या कोरानासारख्या 7 विषाणूंची नोंद झाली आहे. यापैकी फक्त तीन SARS, MERS आणि सध्याचा विषाणू SARS-CoV-2 गंभीर आहेत. हे तीन विषाणू केवळ संक्रमित व्यक्तीला गंभीर आजारी बनवत नाहीत, तर यामुळे संक्रमित व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. SARS मध्ये मृत्यूदर 10%होता, तर MERS मध्ये मृत्यू दर सुमारे 35% होता. त्याच वेळी सध्याच्या SARS-CoV-2 विषाणूचा मृत्यू दर 2%च्या जवळ आहे.

या तीनपैकी फक्त SARS-CoV-2 सध्या जगभरातील लोकांना प्रभावित करत आहे. हा परिणाम काही वर्षे राहू शकतो. त्याच वेळी, चीनमधून जगात पसरलेला SARS आणि सौदी अरेबियामधून पसरलेला MERS आता स्थानिक पातळीवर आहे. SARS चे शेवटचे प्रकरण 2003 मध्ये नोंदवले गेले होते. त्याच वेळी, MERS ची प्रकरणे अजूनही येत आहेत.

एंडेमिक स्टेज आल्यानंतर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची गरज भासणार नाही का?

हे आता सांगणे खूप घाईचे ठरेल. एंडेमिक स्टेजवर पोहोचल्यानंतरही जे लोक गंभीर आजारातून बरे झाले आहेत, वृद्ध, इत्यादींना या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...