आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Whether Trump Becomes President Again Or Biden Is Elected, Neither The US Nor India Benefits; Both Tend To China: John Bolton

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक:ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले किंवा बायडेन यांची निवड झाली तरी, ना अमेरिकेला फायदा, ना भारताला; दोघांचाही कल चीनकडेच : जॉन बोल्टन

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प हे तर खोटारडे-ट्रम्प प्रशासनात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले जॉन बोल्टन यांची टिप्पणी
  • मोदींशी ट्रम्प आणि अमेरिका यांचे संबंध कसे आहेत याबाबत जॉन बोल्टन सांगतात की...

ट्रम्प येवोत की बायडेन, भारत-अमेरिका संबंधांत काहीही बदल होणार नाही. दोन्हीही पक्षांचे चीनशी भक्कम व्यावसायिक संबंध राहिलेले आहेत.’ हे म्हणणे आहे ट्रम्प प्रशासनात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले जॉन बोल्टन यांचे. ‘दैनिक भास्कर’च्या रितेश शुक्लांनी त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या चर्चेचा संपादित भाग...

> कोण राष्ट्राध्यक्ष होईल, असे वाटते?

मी ट्रम्प किंवा बायडेन यांच्यापैकी कोणालाही मत देणार नाही. राष्ट्राध्यक्ष कोणीही झाले तरी अमेरिकेला काहीही फायदा होणार नाही.

> ... ट्रम्प वा बायडेन आल्याने भारताशी असलेल्या संबंधात काय फरक पडेल?

बायडेन जिंकले तर ओबामांचे धोरण लागू होईल. ओबामा राजवटीत चीनशी संबंधांना प्राधान्य होते. ट्रम्प यांच्या राजवटीतही तीच स्थिती आहे. कोरोना काळात ट्रम्प चीनविरोधात बोलत असले तरी ते निवडणुकीपुरते आहे. ते जिंकले तर हाँगकाँग किंवा भारताबाबत काय होत आहे याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही, असे ते जिनपिंग यांना सांगू शकतात. चीनने मनाजोगता व्यापार करावा हीच त्यांची एकमेव अट असेल. ट्रम्प खोटारडे आहेत. त्यामुळे कोणीही राष्ट्राध्यक्ष झाले तरी भारताशी संबंध चांगले होण्याची शक्यता नाही.

> ट्रम्प खोटारडे आहेत हे कशावरून?

ट्रम्प यांना सर्वाधिक आनंद शक्तिशाली लोकांसोबत फोटो काढण्याने होतो. अमेरिकेचे हित जपण्यापेक्षा ते पुतीन, शी जिनपिंग आणि किम जोंग यांच्यासोबत फोटो-ऑप करून जास्त खुश होतात. राष्ट्रीय हित कशात आहे हे समजण्यासाठी असलेली वृत्तीही त्यांच्याकडे नाही.

> ट्रम्प राष्ट्रीय व व्यावसायिक हित यात फरक करत नाहीत, असा आरोप होतो?

एका किश्श्यातून ते समजून घेता येऊ शकते. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या बैठकीत गुप्तचर संस्थांचे अधिकारी जगातील हॉटस्पॉट्स, इस्लामिक दहशतवाद, आण्विक नि:शस्त्रीकरण यावर चर्चा करत होते. ट्रम्पही ती एेकत होते. तेवढ्यात त्यांची मुलगी इव्हांका आली आणि बैठक कुटुंबाच्या व्यवसायाच्या चर्चेत रूपांतरित झाली.

> भारत-अमेरिकेच्या संबंधांत मोठी प्रगती का होत नाही?

अमेरिकी लोकांना भारतीयांबद्दल आस्था आहे. पण इतिहास पाहिल्यास अमेरिकेचा कल चीनकडेच जास्त राहिला. चीनचा कल रशियाकडे राहू नये हे त्याचे कारण . त्यामुळे चीनसोबत आर्थिक संबंध मजबूत होत गेले. आता चीनची लष्करी ताकद वाढत असल्याने त्या देशाकडे आव्हान म्हणून पाहण्यात येऊ लागले. दुसरीकडे भारताचे रशियाशी संबंध चांगले राहिले आहेत. आता भविष्यात ते कसे विकसित होतात, याकडे लक्ष लागलेले असेलच. मात्र, इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताची भूमिका महत्त्वाची आहे याची जाणीव अमेरिकेला आहे. मोदी आल्यानंतर अमेरिकेकडे सुवर्णसंधी होती, पण ट्रम्प यांनी ती साधली नाही. जपानचे पंतप्रधान अॅबे यांच्यामुळे भारताशी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा होत होती. त्यासाठी मोदी यांनी अॅबे यांचे आभारही मानलेले आहेत.

> मोदींशी ट्रम्प आणि अमेरिका यांचे संबंध कसे आहेत?

मोदी वैयक्तिक संंबंध राष्ट्रीय संबंधांच्या आड येऊ देत नाहीत. वैयक्तिक संबंधांतून राष्ट्रहित साधत असेल तर चांगलेच. मोदी हे जाणतात, पण ट्रम्प यांच्याकडे ती समज नाही. त्यामुळे दोन्ही देशांत सरकारी चर्चा खूप झाल्या, पण साध्य काहीच झाले नाही. कुठलाही मोठा करार होऊ शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...