आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सरन्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू असतानाच भाजीवाल्याचा पुकारा - ‘आलू ले लो...भिंडी ले लो...प्याज ले लो’!

पवनकुमार | नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वोच्च न्यायालयात ऑनलाइन सुनावणीदरम्यान निर्माण झाली अजब स्थिती

कोरोनामुळे सर्वोच्च न्यायालयात व्हिडिआे कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्यांची सुनावणी होत आहे. ऑनलाइन सुनावणीदरम्यान बहुतांश वकील घर, कार्यालय व कारमध्ये बसून युक्तिवाद करत आहेत. त्यामुळे अनेक किस्से घडताना पाहायला मिळत आहेत. त्यातून गंभीर प्रकरणांच्या सुनावणीचा नूर अगदी पालटून जातोय. मंगळवारी असाच एक किस्सा समोर आला.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू हाेती. अनेक वकील कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सहभागी होती. त्या वेळी एक वकील युक्तिवाद मांडत होते. तेव्हाच अन्य एका वकिलाच्या पार्श्वभूमीवर आवाज येतो -‘आलू ले लो....भिंडी ले लो....प्याज ले लो..’ हे ऐकून वकील व जज हसू लागले. एक वकील घरातील ज्या खोलीत बसले होते त्यांच्याजवळच भाजीविक्रेता मोठ्या आवाजात भाजी विकत होता. यादरम्यान सरन्यायाधीशांनी विचारले - हा आवाज कोणत्या वकिलाच्या बॅकग्राउंडचा येतोय? त्यावर काेणी काही बोलले नाही. मग सरन्यायाधीशांनी स्टाफला युक्तिवाद करणारे वकील वगळता सर्व वकिलांना म्यूट करण्यास सांगितले. त्यानंतर प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू झाली. दुसरीकडे देशभरात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टिम लागू करण्याच्या मागणीवरून एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याचे वकील गालिब-कबीर यांचे नाव एेकून सरन्यायाधीश बोबडे चकित होत म्हणाले, ‘गालिबही आणि कबीरही. अरे वा! तुमचे नाव रंजक आहे. असो. काय म्हणणे आहे ते सांगा.’ पण पुढे कोर्टाने या सुनावणीला नकार दिला व सरकारकडे जाण्याची सूचना केली.

जज म्हणाले, माइकजवळ या. वकील : कोर्टापासून अर्धा किमीवर असून आता पोहोचतो..

न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली पीठासमक्ष मंगळवारी बारावी कंपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. यादरम्यान जजला वकील विवेक तनखा यांचा आवाज नीटपणे ऐकू येत नव्हता. त्यावर ते म्हणाले, माइक जवळ घ्या. तनखा उत्तरले : ‘माय लॉर्ड, अर्धा किमीवर आहे. आता पोहोचतोच..’

बातम्या आणखी आहेत...