आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमृतसरमधील अकाली फुला सिंग बुर्ज गुरुद्वारामध्ये मोठ्याप्रमाणात धावपळ सुरू आहे. शीख समाज त्यांचे सहावे गुरु हरगोविंद सिंग यांचा 'बंदी छोड दिवस' साजरा करत आहेत. जवळपासचे रस्ते ब्लॉक आहेत. कडक बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. घोड्याच्या टापेचा आवाज घुमतोय, ढोल वाजत आहेत. बोले सो निहाल, सतश्री अकाल, राज करेगा खालसा आकी रहे न कोय… अशा घोषणा दिल्या जात आहेत. विशेष निळ्या रंगांचे चोंगे आणि मोठी पग म्हणजेच पगडी घातलेले शीख तलवारबाजी करत आहेत. हे आहेत निहंग शीख.
हे तेच निहंग आहेत ज्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ तंबाखू चोळणाऱ्या एका तरुणाला अडवून वाद घालून त्याची हत्या केली. गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनादरम्यानही या निहंगांनी एका माणसाची हत्या करून त्याचा मृतदेह बॅरिकेडवर लटकवला होता. कमी-अधिक प्रमाणात निहंगांबाबत हे चित्र पंजाब सोडून इतर ठिकाणी लोकांच्या मनात येते, पण हा एक छोटासा पैलू आहे.
आज दिव्य मराठीच्या पंथ या मालिकेत आम्ही तुम्हाला निहंगांची संपूर्ण कहाणी सांगत आहोत...
दिवाळीचा दुसरा दिवस. सकाळची अरदास अर्थात प्रार्थनेनंतर घोड्यावर स्वार झालेला निहंगांचा एक गट गुरुद्वारापासून 13 किमी अंतरावर असलेल्या रेल्वे मैदानावर पोहोचतो. येथे घोड्यावर बसवलेले निहंग आपले करतब म्हणजे पराक्रम दाखवतात. एक निहंग तीन ते चार घोड्यांवर स्वार होता, तोही डोळे मिटून. त्यांना पाहण्यासाठी देशभरातून लोक जमले आहेत. संध्याकाळी 7 वाजता निहंगांचा जत्था गुरुद्वाराकडे रवाना होतो. त्यानंतर निहंग आपले काम सुरू करतात.
निहंग हे एक प्रकारे शीख धर्माच्या रक्षणासाठी बनवलेले सैन्य आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी शीखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांनी त्यांचा पाया रचला होता. आजही सैन्याप्रमाणे ते छावणी तयार करुनच राहतात. आणि रेजिमेंटमध्ये विभागलेले आहेत. त्यांची सर्वात मोठी रेजिमेंट शिरोमणी अकाली बुड्ढा दल आहे. त्यांच्या प्रमुखाला जत्थेदार म्हणतात.
बाबा बलबीर सिंग हे 14 वे जत्थेदार आहेत. ते म्हणतात की, निहंग म्हणजे संस्कृतमध्ये निर्भय आणि शुद्ध. पर्शियनमध्ये याचा अर्थ मगर आणि तलवार असा होतो. हा एक संप्रदाय आहे ज्याचा बानी म्हणजे बोली आणि बाणा म्हणजे पोशाख इतर शिखांपेक्षा वेगळा आहे. त्यांचे जेवण आणि आंघोळही वेगळी असते. त्यांचा राहण्याचे कोणतेच ठिकाण नसते.
ते अखंडपणे चालू आहे. त्यामुळे त्यांना चक्रधारी असेही म्हणतात. ही गुरूंची 'लाडली फौज' आहे. जगात या पंथाचे दहा लाखांहून अधिक शीख आहेत, ज्यामध्ये प्रत्येक जातीचे लोक आहेत. त्यांच्या देशभरात 700 हून अधिक छावण्या आहेत. निहंग त्यांच्या तळांना छावणी म्हणतात. तिथेच त्यांचा गुरुद्वारा देखील असतो.
रात्री री 12:30 वाजता होते, निहंगांची सकाळ
रात्री 12:30 वा. अचानक गुरुद्वारात ढोल वाजतो. कारण विचारल्यावर कळाले की निहंगांची सकाळ झाली आहे. त्यांना जागे करण्यासाठी ढोल वाजवला जातो. झोपेतून उठल्यानंतर निहंग त्यांच्या दैनंदिन विधी उरकतात. ते नेहमी पूर्वीप्रमाणेच दातांची स्वच्छता करतात, कधीच टूथपेस्ट वापरत नाही. केस धुण्यासाठी शाम्पूऐवजी रीठा वापरतात.
हा रीठा लोखंडी कढईत उकळला जातो. काही कारणास्तव रीठा नीट उकळता येत नसेल तर त्याऐवजी दह्याने केस धुतले जातता. मसाजसाठी देशी तूप किंवा मोहरीचे तेल वापरले जाते.
थोड्या वेळाने पुन्हा ढोल वाजले. सर्व निहंग दरबार साहिबला हजेरी लावतात. जिथे गुरबानी पठण केली जाते. कीर्तन, कथा, अरदास करता करता सकाळचे दहा वाजतात. त्यानंतर सर्व निहंग नाश्ता करतात.
निहंग लोखंडी भांड्यातच जेवण करतात
बाबा हरजित सिंग हे निहंगांच्या 'तरना दला'चे जत्थेदार आहेत. ते म्हणतात की, 'न्याहारीनंतर निहंग सैनिकांप्रमाणे त्यांच्या कामाला लागतात. कोणी घोड्याची काळजी घेतात, कोणी हत्तीची काळजी घेतात, तर काहींची ड्युटी लंगरात असते. लंगर म्हणजे सामूहिक स्वयंपाकघर. त्यांचे अन्न एका मोठ्या लोखंडी कढईत शिजवले जाते आणि हा प्रसाद लोखंडी भांड्यात दिला जातो. शीख धर्मात, प्रसाद स्वीकारणे आणि सामूहिक स्वयंपाकघरात म्हणजेच लंगरमध्ये एकत्र भोजन करणे याला प्रसाद छंकना म्हणतात.
दुपारनंतर शस्त्रास्त्र आणि घोडेस्वारीचा सराव सुरू होतो. नवीन निहंग आणि लहान मुलांना प्रशिक्षण दिले जाते. संध्याकाळी पुन्हा दिवाण सजवला जातो. कथा-कीर्तन आणि गुरु ग्रंथसाहिबचे पठण केले जाते. यानंतर सर्वांना प्रसाद दिला जातो. त्यानंतर रात्री लंगरासाठी ढोल वाजवले जातात. निहंग एका ठिकाणी थांबत नसल्याने ढोल वाजवून दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाची घोषणा केली जाते.
यानंतर माझी भेट जत्थेदार बाबा चरणदास यांच्या सोबत झाली. त्यांनी सांगितले की, आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसांनी बोकड कापला जातो. हा बोकड ज्यांची मनोकामना पूर्ण झाली अशा भक्तांनी अर्पण केलेला असतो.
बकरा कापण्याआधीही एक अरदास असते, ज्यामध्ये प्रार्थना केली जाते की, आम्ही बकरीला मोक्ष देत आहोत जेणेकरून पुढील जन्म माणूस म्हणून मिळावा. क्षणार्धात बोकड कापला जातो. नंतर ते लोखंडी भांड्यात शिजवून सर्वांना दिले जाते. याला महाप्रसाद म्हणतात.
एखाद्या सरकारसारखी त्यांची सत्ता असते, प्रत्येकाची कामे विभागलेली असतात
शिरोमणी अकाली बुड्ढा दल ही निहंग फौजांची सर्वात मोठी रेजिमेंट आहे. त्यांच्या प्रमुखाला जत्थेदार म्हणतात. या दल व्यतिरीक्त वेगवेगळ्या नावाने दल काम करतात. सध्या देशभरात जवळपास 14 प्रमुख दल आहेत. हे सर्व शिरोमणी अकाली बुड्ढा दलाच्या अंतर्गत काम करतात.
बाबा बलबीर सिंग हे सध्या शिरोमणी अकाली बुड्ढा दलाचे प्रमुख आहेत. ते म्हणतात की जत्थेदाराचा दर्जा हा एखाद्या पंतप्रधानासारखा असतो. प्रत्येक विभागाला काही ना काही जबाबदारी असते. ज्या प्रमाणे सरकारमध्ये वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री असतात, त्याच प्रमाणे
निहंगांचा खर्च गुरुद्वारांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधून केला जातो. बाबा हरजित सिंग सांगतात की, मोठ्या गुरुद्वारातून एका महिन्यात 10 लाख रुपये जमा होतात. तर छोट्या गुरुद्वारांमधून काही हजार रुपये मिळतात. याशिवाय विविध ठिकाणी निहंगांच्या जमिनी आणि दुकाने आहेत. त्यांच्यातूनही चांगली रक्कम जमा होते.
केवळ श्रावण महिन्यातच तोडली जातात गांजाची पाने, तीच वर्षभर वापरतात
निहंग शीख भांगला शहीदी देग म्हणतात. गांजाची पाने केवळ श्रावण महिन्यातच खुडली जातात आणि नंतर ती वाळवून ठेवली जातात. ही भांगाची पाने काळी मिरी, बदाम आणि ड्रायफ्रूट्समध्ये मिसळून सरबत सारखे पेय बनवले जाते. निहंग सकाळी चार वाजता आणि संध्याकाळी चार वाजता ते पितात. ते पिण्यापूर्वी अरदासही करावी लागते.
निहंग ट्रेनमध्ये मोफत प्रवास करतात
निहंग देशात कुठेही ट्रेनने मोफत प्रवास करू शकतात. वास्तविक ही 1952 सालची घटना आहे. जत्थेदार महेंद्रसिंग ननकाना यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांची भेट घेतली. पंडित नेहरू त्यांना म्हणाले की, निहंगांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे आम्ही तुमच्यासासाठी काय करू शकतो, हे सांगा.
बाबा महेंद्र सिंह म्हणाले की, निहंग गरीब आहेत, त्यांच्याकडे जमीन आणि मालमत्ता नाही, त्यांना त्यांच्या गुरूंच्या भेटीला जाण्यासाठी भाडे माफ करा. तेव्हापासून निहंगांचे भाडे माफ करण्यात आले.
ब्राह्मणांना पीपल आणि शेळीला आकाशपरी म्हणतात निहंग
निहंगांची स्वतःची खास बोली भाषा आहे. यामागे देखील एक रंजक किस्सा आहे. वास्तविक गुरू गोविंद सिंग यांच्या सैन्याने मुघलांवर हल्ला करण्याची योजना आखली की, ती योजना कुठूनतरी फुटत होती. यामुळे त्यांच्या सैन्याचा पराभव होत होता. यावर मात करण्यासाठी निहंग शिखांनी आपला नवीन शब्दसंग्रह तयार केला. यात 600 हून अधिक शब्द आहेत. आजही निहंग शीख हीच भाषा वापरतात.
उदाहरणार्थ, पिंपळाला ब्राह्मण, मारामारीला सेवा करने, जनेऊला जूंआ की पींघ, इंजिनला तेजा सिंग, एकला सव्वा लाख, दिव्यांगाला चुचाला सिंग, एक डोळा असलेल्याला सुजाखा, लोखंडाला सर्वलोह, रुपयाला छिल्लड, पगडीला दस्तार, बसला नकवड्डी, मोटारसायकलला फटफट, नळाला दसनंबरिया, बकरीला आकाशपरी म्हणतात.
मरणाऱ्याला असवारा करना, रजाईला अफलातून, रात्रीला अंजनी, सगाला सब्जपला, झाडूला सुंदरी, लिंगाला हन्ना, हातांना कट्टा, कोंबड्याला काजी, लंगोटला खिसकू, चिलमला खोती, राखेला खंड, गुंग्या-बहिल्याला गुप्ता, युद्धाला घलूघारा, सूईला चलाकण, जहाजाला गड्डा, जहाज चढण्याला अमृतपान करके सजना, मुसलमानला तुरक, दिवसाला प्रकाश सिंह, रात्रीला अंजनी, म्हणतात.
प्रसादाला गफा, डाळीला भाजा, मीठाला सरवरस, साखरेला चुप, गुळाला सिरजुड, मिरचीला कडाकी, वांग्याला बटेरा, बटाट्याला अंडे, माश्याना जलतोरी, चन्याला बादाम, दूधाला समुद्र, दह्याला जक्का, घीला पंजवा, कारल्याला तीतर, चाकूला कोतवाल, बोरांना खजूर, मलाईला गूदड, दारुला गंगाजल, पीठाला चूना, मिठाला चौथा, तेलाला छेंवा, हलव्याच्या प्रसादाला पंजामृत म्हणतात.
त्यांच्या भाषेमधील आणखी एक गोडवा पाहा....
तुम्ही म्हणाल - मुलगा फेटा बांधत आहे. निहंग म्हणतील - भुचंगी दस्तर सजवत आहे.
शिखांच्या 10 व्या गुरूंनी अमृत जल पाजून रचला होता निहंग सैन्याचा पाया
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.