आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरकोण आहेत सेंट्रल व्हिस्टाचे डिझायनर बिमल पटेल?:बालपणी व्हायचे होते शास्त्रज्ञ; आता रिडेव्हलपमेंटचे मास्टर आर्किटेक्ट...

लेखक: नीरज सिंह18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, वाराणसीतील काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर, अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि पुरीतील जगन्नाथ मंदिराचे मास्टर प्लॅनिंग – भारताच्या सांस्कृतिक आणि शहरी लँडस्केपची ही सर्व प्रतीके भलेही भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये असतील, पण त्यांचा मास्टर आर्किटेक्ट एकच आहे - बिमल पटेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नव्या इमारतीच्या डिझाईनची जबाबदारीही पटेल यांच्या HCP डिझाईन या कंपनीकडे सोपवली आहे.

सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचे मास्टर आर्किटेक्ट बिमल पटेल कोण आहेत, ते इतर कोणत्या मोठ्या प्रोजेक्ट्सशी जोडलेले आहेत हे आपण आजच्या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेणार आहोत...

सर्वप्रथम, त्याच्याशी संबंधित प्रकल्पांबद्दल...

1. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प

ऑगस्ट २०२१, दुपारची वेळ होती. बिमल पटेल काही पत्रकार आणि विचारवंतांना सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाविषयी सांगत होते. यादरम्यान, त्यांनी त्यांना फुटपाथकडे बोट करत दाखवले, जेथे कामगार आयताकृती आकारात गुलाबी फरशा लावत होते.

इथून इंडिया गेटपर्यंत हे टाईल्स एका सरळ रेषेत दिसावे यासाठी ते अतिशय व्यवस्थित लावावे लागणार आहेत. टाइल्समधून इतक्या दूरपर्यंत सरळ रेघ काढणे हे अवघड काम आहे, पण अशी कारागिरी हेच तर आपले काम असल्याचे पटेल सांगतात.

एका वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ सप्टेंबर रोजी या सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूचे उद्घाटन केले आहे. ते आता सर्वसामान्यांसाठीही खुले करण्यात आले आहे. बिमल पटेल हे कर्तव्य पथच्या सरळ रेघेवर तर खूश आहेतच, पण त्यांचे विरोधकही त्यांच्या कामाचे कौतुक करत आहेत.

संसदेचीटाटांनाबिमलप्रकल्पासाठी
संसदेचीटाटांनाबिमलप्रकल्पासाठी

2. अहमदाबादचा साबरमती रिव्हर फ्रंट

अहमदाबादच्या साबरमती रिव्हर फ्रंटचे डिझाईनही आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केले आहे. 2011 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पाला देश-विदेशातून सुमारे 24 पुरस्कार मिळाले आहेत. या प्रकल्पांतर्गत सुमारे चौदाशे कोटी रुपये खर्चून नदीकाठावरील 10.4 किमी लांबीचा पट्टा विकसित करण्यात आला आहे.

गुजरातमधीलकाठावररिव्हरफ्रंट
गुजरातमधीलकाठावररिव्हरफ्रंट

3. काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रोजेक्ट

बिमल पटेल यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पाचेही डिझाईन केले आहे. या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 मार्च 2019 रोजी करण्यात आली. जे सुमारे 5 लाख स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. आता काशी विश्वनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांना अरुंद रस्त्यांवरून जावे लागणार नाही. कॉरिडॉर बांधल्यानंतर कॉरिडॉरमधून थेट गंगा घाटातून बाबा विश्वनाथांचे दर्शन घेता येऊ शकते. त्याची एकूण किंमत 900 कोटी रुपये आहे.

विभागलेला
विभागलेला

याशिवाय बिमल पटेल यांनी गांधीनगरमधील सेंट्रल व्हिस्टा, गुजरात हायकोर्ट, हैदराबादमधील आगा खान अकादमी, मुंबईतील अमूल डेअरी, आयआयएम अहमदाबाद, आयआयटी जोधपूर या इमारतींचे डिझाईनही केले आहे.

त्यांची कंपनी HCP ही अहमदाबादमधील गांधी आश्रमाच्या पुनर्विकास प्रकल्पावरही काम करत आहे. त्यावर थेट पीएमओकडून लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय बिमल पटेल यांची कंपनी मोदी सरकारच्या अनेक भव्य प्रकल्पांशी जोडलेली आहे.

आता जाणून घ्या बिमल पटेल यांच्याबद्दल...

बिमल पटेल यांना लहानपणापासून व्हायचे होते शास्त्रज्ञ...

बिमल हसमुख पटेल यांचा जन्म 31 ऑगस्ट 1961 रोजी गुजरातमध्ये झाला. त्यांनी सेंट झेवियर्स शाळेत शिक्षण घेतले. लहानपणी त्यांना शास्त्रज्ञ व्हायचे होते, परंतु शाळेतील शिक्षकांनी त्यांना सामाजिक आणि राष्ट्रीय विकासाविषयी विचार करण्याची प्रेरणा दिली.

त्यांचे वडील हसमुख पटेल हे देखील आर्किटेक्ट होते. यामुळे त्यांनी बारावीनंतर आर्किटेक्चरची निवड केली आणि CEPT विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत अव्वल ठरले. आर्किटेक्चरमध्ये डिप्लोमा केल्यानंतर, त्यांनी आर्किटेक्चरमध्ये मास्टर्स, सिटी प्लॅनिंगमध्ये मास्टर्स आणि बर्कले युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातून सिटी अँड रीजनल प्लॅनिंगमध्ये पीएचडी मिळवली.

HCP डिझाईन कंपनी 40 लोकांसह सुरू झाली, आज 300 हून अधिक लोक काम करतात

बिमलअॅन्डमॅनेजमेन्टलिमिटेडचेव्यवस्थापकीयसंचालक
बिमलअॅन्डमॅनेजमेन्टलिमिटेडचेव्यवस्थापकीयसंचालक

1960 मध्ये बिमल पटेल यांचे वडील हसमुख पटेल यांनी अहमदाबादमधील एका छोट्या खोलीत डिझाईन फर्म HCP डिझाईनची सुरूवात केली होती. HCP डिझाईन कंपनीत सुरुवातीला फक्त 40 लोक होते. आज कंपनीच्या अहमदाबाद, दिल्ली आणि पुणे येथील कार्यालयांमध्ये 300 हून अधिक लोक काम करतात.

1990 मध्ये पटेल आपल्या वडिलांसोबत अहमदाबादमध्ये काम करायला लागले. त्यांचा पहिला प्रकल्प अहमदाबादमधील उद्योजकता विकास संस्थेसाठी डिझाईन करण्याचा होता.

बिमल यांना वास्तुविशारद क्षेत्रात 35 वर्षांचा अनुभव आहे. बिमल पटेल यांना वास्तुविशारद क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये 2019 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये जागतिक वास्तुकला पुरस्कार, 2002 मध्ये शहरी नियोजन आणि डिझाईनमधील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान राष्ट्रीय पुरस्कार, 1998 मध्ये UN सेंटर फॉर ह्युमन सेटलमेंट्स अवॉर्ड ऑफ एक्सलन्स या पुरस्कारांचा समावेश आहे.

कोविंदस्वीकारतानाबिमल
कोविंदस्वीकारतानाबिमल

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाशी जोडल्यानंतर टीकेलाही सामोरे जावे लागले

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या डिझाईनसाठी बिमल पटेल यांची निवड झाल्यानंतर त्यांना विरोधकांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले. विरोधक आणि काही संघटना त्यांना मोदींचे आर्किटेक्ट म्हणतात.

1995 मध्ये मोदींच्याही आधी सीजी रोड प्रकल्प बिमल पटेल यांना मिळाला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष सुरेंद्र पटेल यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती.

त्यानंतर साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्पासाठी बिमल पटेल यांची निवड करण्यात आली. रिव्हरफ्रंट प्रकल्पावरील त्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन मोदींनी त्यांच्याकडून कांकरिया लेक फ्रंटचा पुनर्विकासही करून घेतला.

जाता जाता नवीन संसद भवनाच्या डिझाईनबद्दल जाणून घ्या...

नवे संसद भवन नाचणारा मोर आणि कमळासारखे दिसेल

सुमारे 100 वर्षांनंतर संसदेची नवीन इमारत बांधली जाणार आहे. बिमल पटेल यांनी लोकसभेला नाचणाऱ्या मोराचा आकार दिला आहे. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षीही आहे. राज्यसभेची थीम कमळ आहे. कमळ हे आपले राष्ट्रीय फूल असून भाजपचे निवडणूक चिन्ह आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विजयी खासदार नवीन संसद भवनात बसतील अशी अपेक्षा आहे.

नवी संसद स्थापन करण्याची गरज का होती? या प्रश्‍नावर पटेल सांगतात की, संसदेची इमारत आता जुनी झाली असून, अनेक ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे. एअर कंडिशनर, दृकश्राव्य यंत्रणा, वायुवीजन आणि वीज अशा अनेक गोष्टींमध्ये बदल आवश्यक आहेत.

त्याच वेळी, राज्यसभा आणि लोकसभेत बसण्याच्या क्षमतेने कमाल पातळी गाठली आहे. त्यामुळे नवीन इमारतीची गरज आहे. मंत्रालयांची कार्यालयेही दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. नवीन बांधकाम करताना सर्व मंत्रालये एकाच ठिकाणी असावीत यालाही प्राधान्य दिले जात आहे.

भवनभवनालाइमारतींमध्येआसनक्षमता
भवनभवनालाइमारतींमध्येआसनक्षमता

नवीन आणि जुन्या इमारतींना डायमंड लूक मिळेल

या संपूर्ण प्रकल्पात जुन्या इमारतीच्या दोन्ही बाजूला त्रिकोणी आकारात दोन इमारती बांधल्या जाणार आहेत. जुन्या संसद भवनाचा आकार गोल आहे, तर नवीन संसदेचा आकार त्रिकोणी असेल. यामुळे नवीन आणि जुन्या इमारतींना एकत्रितपणे पाहिल्यास ते डायमंड लूकप्रमाणे दिसेल.

बातम्या आणखी आहेत...