आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Who Is Hibatullah Akhundzada | Afghanistan New President Hibatullah Akhundzada Complete Profile In Hindi, Birth, Life, Ideology, Family

अफगाणचा नवा प्रमुख:क्रूर निकालांसाठी कुप्रसिद्ध असलेला तालिबान्यांचा न्यायाधीश बनला अफगाणिस्तानचा नवा राष्ट्राध्यक्ष! वाचा, हिब्तुल्लाह अखुंदझादाबद्दल सर्वच

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी हिब्तुल्लाह अखुंदझादाला नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले आहे. त्यालाच तालिबानने आमिर अल मोमिनीन असे संबोधले आहे. हिब्तुल्लाह या अरबी शब्दाचा अर्थ ईश्वरीय वरदान असा होता. पण, अफगाणिस्तानच्या नवीन राष्ट्राध्यक्ष पदाचा दावेदार हिब्तुल्लाह अखुंदझादा अतिशय क्रूर असा तालिबानी कमांडर आहे. एकेकाळी त्यानेच हत्या आणि अनैतिक संबंध ठेवणाऱ्यांना ठार मारण्याचे फतवे काढले आहेत. एवढेच नव्हे, तर चोरी केल्यास हात कापण्याचे आदेश सुद्धा त्याने दिले आहेत.

इमामचा मुलगा हिब्तुल्लाह
हिब्तुल्लाह अखुंदझादाचा जन्म 1961 मध्ये अफगाणिस्तानच्याच कंधार प्रांतातील पंजवई येथे झाला होता. नूरजई आदिवासी समुदायात जन्मलेल्या हिब्तुल्लाचे वडील मुल्ला मोहम्मद अखुंद एक इस्लामिक स्कॉलर होते. ते आपल्या गावातील मशीदीत इमाम होते. हिब्तुल्लाच्या वडिलांकडे स्वतःची जमीन किंवा संपत्ती असे काहीच नव्हते. मशीदीतून मिळणाऱ्या थोड्या फार दानातून त्याचे घर चालायचे. हिब्तुल्लाहचे शिक्षण त्याच्या वडिलाच्या अधिपत्याखालीच झाले.

अमेरिकेच्या पाठिंब्यावर सोव्हिएत रशियाच्या विरोधात लढला
1980 च्या सुरुवातीला अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियाचे (सध्याचा रशिया) सैनिक घुसले होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली अफगाणिस्तान सरकार चालत होते. या दरम्यान, सरकार आणि लष्कराच्या विरोधात काहींनी बंड पुकारला. तेच मुजाहिद्दीन होते. या मुजाहिद्दीनना अमेरिका आणि पाकिस्तानने मदत केली होती. याच दरम्यान, हिब्तुल्लाह अखुंदझादाचे कुटुंबीय पाकिस्तानच्या क्वेटा येथे गेले आणि हिब्तुल्लाहने शस्त्र हाती घेतले.

1989 पर्यंत सोव्हिएत रशियाने आपल्या सैनिकांना परत बोलावले. यानंतर सोव्हिएत विरोधात लढलेले बंडखोर विभागले गेले आणि आपसातच गृहयुद्ध सुरू झाले. त्यामध्ये मुल्ला उमरचा देखील समावेश होता. मुल्ला उमर तालिबानचा संस्थापक होता. त्यानेच पश्तूनी युवकांना एकत्रित आणून तालिबानची स्थापना केली होती. हिब्तुल्लाह अखुंदझादा त्याच तरुणांपैकी एक होता.

अखुंदझादाच्या मदरशात शिकत होते 1 लाख तालिबान
1996 मध्ये तालिबानच्या अख्त्यारीत अफगाणिस्तान सरकार स्थापित झाले. त्यावेळी अखुंदझादा याला फराह प्रांतातील धार्मिक विभागाची जबाबदारी मिळाली. त्यानंतर तो कंधारला गेला. या ठिकाणी एका मदरशात मौलवी बनला. हा मदरसा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर चालवत होता. तसेच येथे 1 लाख तालिबानी कट्टरवादाचे ट्रेनिंग घेत होते.

तालिबानींची सत्ता असतानाच हिब्तुल्लाह याला इस्लामिक अमिरात अफगाणिस्तानमध्ये शरिया कोर्टाचा चीफ जस्टिस करण्यात आले. चीफ जस्टिस असताना अखुंदझादाने अनेकांना क्रूर शिक्षा सुनावल्या होत्या. यात हत्या आणि अनैतिक संबंधांसाठी ठार मारण्याचे तर चोरीसाठी थेट हात कापून टाकण्याच्या आदेशांचा समावेश होता. फतवे जारी करताना मुल्ला उमर आणि मुल्ला मंसूर हे दोघेही तालिबानचे प्रमुख अखुंदझादा याचेच सल्ले घेत होते.

अमेरिकेचे सैनिक अफगाणिस्तानात घुसले तेव्हा...
7 ऑक्टोबर 2001 रोजी अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला. सर्वच तालिबानी नेते आणि समर्थक विखुरले गेले. काही नेते ठार मारण्यात आले. तर काहींनी पाकिस्तानात शरण घेतली. या दरम्यान हिब्तुल्लाह अखुंदझादा अफगाणिस्तानातच होता. त्यावेळी अखुंदझादाने प्रवासच केला नाही.

2012 मध्ये हल्ल्यातून बचावला
हिब्तुल्लाह अखुंदझादाच्या एका समर्थकाने न्यूयॉर्क टाइम्सला 2012 मध्ये घडलेला प्रसंग सांगितला. त्यावेळी हिब्तुल्लाह याला ठार मारण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. त्या काळात हा विद्यार्थी क्वेटा येथील मदरशात शिकवत होता, तेव्हा एक विद्यार्थी जागेवरून उठला आणि हिब्तुल्लाहवर बंदूक रोखली. पण, बंदूक चाललीच नाही.

मुल्ला मंसूरच्या खात्म्यानंतर बनला तालिबानचा चीफ कमांडर
तालिबानचा संस्थापक मुल्ला मोहंमद उमर याचा 2013 आजारपणामुळे मृत्यू झाला. त्याच्यानंतर हकीमुल्लाह मसूदने तालिबानचे नेतृत्व केले. 2013 मध्येच त्याला ड्रोन हल्ल्यात ठार मारण्यात आले. 2015 मध्ये तालिबानने मुल्ला मंसूरला आपला नेता म्हणून निवडले. पण, 2016 मध्ये मुल्ला मंसूर सुद्धा ड्रोन हल्ल्यात मारला गेला. 25 मे 2016 रोजी तालिबानने आपल्या नवीन नेत्यासाठी हिब्तुल्लाह अखुंदझादाचे नाव पुढे केले.

मुलाने केला होता आत्मघातकी हल्ला
तालिबानचा प्रवक्ता राहिलेल्या युसूफ अहमदीने सांगितले होते, की 20 जुलै 2017 रोजी हिब्तुल्लाह अखुंदझादाचा मुलगा अब्दुर्रहमानने आत्मघातकी हल्ला केला होता. अफगाणिस्तानच्या लष्करी तळावर हल्ल्यासाठी गेला असताना त्याने स्वतःला उडवले होते. ऑगस्ट 2019 मध्ये अखुंदझादाचा भाऊ हाफिज अहमदुल्लाह सुद्धा एका बॉम्बस्फोटात ठार झाला होता. या बॉम्बस्फोटात त्याच्या कुटुंबियांनी इतर सदस्य सुद्धा मारले गेले होते.

बातम्या आणखी आहेत...