आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:जागतिक आरोग्य संघटनेकडून ओमायक्रॉनवर नवीन इशारा, WHO ने सांगितले ओमायक्रॉनने मोठा धोका कसा?

अभिषेक पाण्डेयएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने नवीन इशारा जारी केला आहे. ओमायक्रॉनविरोधात निष्काळजीपणा केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला होता. आता हाच व्हेरिएंट भारतासह तब्बल 59 देशांमध्ये पसरला आहे.

जागतिक आरोग्य संघटना WHO ने ओमायक्रॉन संदर्भात कोणता इशारा दिला आहे हे सविस्तर जाणून घेऊ...

 • जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक महामारी विज्ञान रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की ओमायक्रॉन जगातील 55 पेक्षा अधिक देशांमध्ये पोहोचला असून त्याचा फैलाव आणखी झपाट्याने होणार असल्याची शक्यता आहे.
 • ओमायक्रॉनची प्रकरणे अशाच पद्धतीने वाढत गेल्यास जगभरात रुग्णालयात भरती करण्याचे प्रमाण वाढू शकते. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार या व्हायरसचा धोका कमी दिसून येत असला तरीही याचा फैलावण्याचा वेग वाढल्यास कोरोनाग्रस्तांच्या रुग्णालयात भरतीचे प्रमाण वाढू शकते.
 • 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या व्हेरिएंटला 26 नोव्हेंबर रोजीच व्हेरिएंट ऑफ कंसर्न घोषित करण्यात आले. त्याचवेळी संपूर्ण जगाला सावध राहण्याचा इशारा देण्यात आला.

ओमायक्रॉनचा उपचार वेळखाऊ ठरू शकतो

 • जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे, या व्हेरिएंटपासून कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा कोरोना रुग्णांसाठी जीवघेणा ठरू शकतो.
 • या व्हेरिएंटने रुग्णांचा मृत्यू होत नाही. तरीही त्यांना कोविडपासून पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागू शकतो. कोविडनंतरही त्यांना काही समस्या उद्भवू शकतात.
 • ओमायक्रॉन व्हेरिएंट संक्रमितांमध्ये कोरोनापासून बरे झाल्यानंतरही काही त्रास होऊ शकतात. त्यामध्ये लक्षणे कमी असतील पण त्याने माणूस अशक्त होऊ शकतो. या व्हेरिएंटवरील अभ्यास सध्या शेवटच्या टप्प्यात आहे.

नैसर्गिक रोग प्रतिकारक क्षमता कमी होऊ शकते

 • ओमायक्रॉनच्या प्राथमिक अभ्यासानुसार यात री-इन्फेक्शनचा धोका अधिक आहे. यावर सविस्तर अभ्यासाचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही.
 • ओमायक्रॉनच्या आतापर्यंतच्या डेटानुसार हा व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत कमी लक्षणे देणारा आहे. याचा संपूर्ण अहवाल येण्यासाठी एक ते दोन आठवडे लागतील.
 • री-इन्फेक्शनवर बोलताना आरोग्य संघटेने सांगितले की ओमायक्रॉनच्या म्युटेशन क्षमतेमुळे मानवी शरीरातील अँटीबॉडी तयार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे, हा व्हेरिएंट नॅचरल इम्युनिटी कमी करू शकतो.

व्हॅक्सीन आणि ओमायक्रॉनवर WHO चे मत काय?

ओमायक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनम्ये 30 पेक्षा अधिक म्युटेशन झाले आहेत. अशात सध्या उपलब्ध असलेल्या व्हॅक्सीन निरुपयोगी ठरू शकतात. ओमायक्रॉनवर व्हॅक्सीन कसा परिणाम करते यावर सविस्तर आकडेवारी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. तरीही ओमायक्रॉनचे म्युटेशन अधिक असल्याने आरोग्य संघटनेने हा इशारा दिला. यासोबतच, सध्या उपलब्ध असलेले व्हॅक्सीन ओमायक्रॉनवर कसा परिणाम करतात यावर अधिकाधिक विश्लेषणाची गरज आहे. त्यावरूनच एखादा अतिरिक्त डोस उपयोगी आहे की नाही हे स्पष्ट होईल.

ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी काय करावे?

 • जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार जगभरात कुठल्याही देशांमध्ये त्यातही प्रामुख्याने जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवावा.
 • ओमायक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजनाचा सक्तीने अवलंब करावा. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा प्रयोग इत्यादींचा समावेश आहे.
 • सर्व देशांच्या सरकारांनी चेसिंग, टेस्टिंग आणि सीक्वेन्सिंग यावर भर द्यायला हवा. सॅम्पलचे रिपोर्ट्स आंतरराष्ट्रीय समुदायासोबत शेअर करावे.
 • सर्वांनीच गर्दीच्या ठिकाणांपासून दूरच राहावे. मास्क वापरावा, हात वारंवार साबणाने धुवावे, शक्य असल्यास हवेशीर जागीच लोकांच्या भेटी घ्या.
 • जितके शक्य होईल तितक्या लोकांनी लवकरात लवकर आपल्या व्हॅक्सीनचे दोन्ही डोस पूर्ण करावे.
बातम्या आणखी आहेत...