आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थेट भाष्य:चिनी सैन्याच्या माघारीमध्ये कोण जिंकले, कोण हरले?

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही आघाड्यांवर आव्हानांचा सामना कसा करता येईल, याविषयी व्यूहात्मक पर्यायांवर चर्चा व्हावी

लडाखमधील पेंगाँग त्सोमधून चिनी आणि भारतीय सैन्याने माघार घेतली आहे. दोन्ही बाजूंच्या कोअर कमांडरमध्ये चर्चा होणार आहे. हे नवे पर्व आहे. तणाव संपण्याची आशा दिसते आहे. आता हाही विचार करावा लागेल की कोण जिंकले अन् कोण हरले? आपले नॉर्दर्न आर्मी कमांडर लेफ्ट. जन. वाय. के. जोशी यांनी पूर्वीच सांगितले होते की, भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. भारतीय तुकड्या उत्तर तटावरून पर्वतारोहण करून “फिंगर्स’वर कशा पोहोचल्या याबद्दलही जास्त माहिती मिळत नव्हती. तेथून चिनी सैन्यावर नजर ठेवणे भारताला शक्य होणार होते. गेल्या वर्षी २९-३० ऑगस्टला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ अंतर्गत केलेली कारवाई संतुलित म्हणता येईल.

‘फिंगर्स’च्या उंचीवर झालेल्या चकमकींबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. मात्र, तोपर्यंत तीन गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. पहिली म्हणजे, भारतीय सैन्य माघार घेणार नाही. दुसरी म्हणजे, दोन्ही देशांना तणाव एवढा वाढवायचा नव्हता की युद्धाची वेळ येईल. तिसरी गोष्ट, ही एकमेकांना नामोहरम करण्याची लढाई होती. आपल्या जागेवर कोण कायम राहतो, हे पाहण्याची जणू स्पर्धाच. वास्तविक दोन्ही देश आपल्या जागेवर कायम राहिले. त्यानंतरच चीनने नरमाई स्वीकारली. त्यासाठी इतरही गोष्टीही कारणीभूत आहेत. आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक आघाडीवरची पावले, ‘क्वाड’ची उभारणी आणि बायडेन यांचा पाठिंबा. चीनमुळे त्रासलेल्या समूहांची एकीही त्यापैकीच. तणाव संपवण्याचा विषय येतो, तेव्हा अनेकदा दोन्ही देशांनी आशा दाखवून गुंगारा दिला. त्यामुळे शांततेची भविष्यवाणी करणे कठीणच आहे. आपण भौैगोलिक धोरणाच्या आधारावर मात्र विश्लेषण करू शकतो. गेल्या वर्षी चीन लडाखमध्ये आपल्या उंबरठ्यापर्यंत का आला? कलम ३७० रद्द करणे आणि लडाख केंद्रशासित राज्य बनल्यानंतर भारताला हिंदी महासागरातून हटवण्याचा चीनचा इरादा असावा. या नव्या शीतयुद्धात अमेरिकेच्या जास्त जवळ जाण्यापासून आपल्याला रोखणे, हाही हेतू असू शकतो. मात्र, या साऱ्यातून चीनने खरेच काय मिळवले? सध्या परिस्थिती अशी आहे की भारत अमेरिकेचे समर्थन असलेल्या चीनविरोधी गोटात आहे. भारत आणि इतर तीन देश-अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया “क्वाड’बाबत अधिक कटिबद्ध वाटतात.

आता अशा गोष्टीवर येऊ ज्याबाबत जास्त स्पष्टता नाही. भारताच्या रणनीतीवर या माघारीचा किती प्रभाव पडेल? चीनची २०१३ ची रणनीती त्याचे इरादे स्पष्ट करते. ९० च्या दशकातील आर्थिक उसळीनंतर भारत स्वत:ला एक शक्तिशाली देश मानतो, अशी चीनची धारणा आहे. हिंदी महासागरात आपला दबादबा असावा, असे त्याला वाटते. भारत आपल्या भूसीमांबद्दल निश्चिंत आहे. पीएलएच्या लडाखमधील घुसखोरीनंतर ही धारणा बदलली आहे का? जमिनीवर लढताना भारताचा धोका अजून संपलेला नाही, हे तर चीन आपल्याला दाखवून देत नाही ना? चीनला हा संदेश द्यायचा असेल तर तो यशस्वी झाला आहे. मात्र, यासाठी तो इतके धाडस करेल, असे वाटत नाही.

आता काही जुन्या गोष्टींवर परत येऊ. भारताला चीन आणि पाकिस्तानच्या रणनीतीमध्ये अडकण्यापासून वाचावे लागेल. मात्र, प्रश्न असा की हे कसे शक्य आहे? यापैकी एकासोबतचे काही वाद तरी आपल्याला सोडवावे लागतील. त्यासाठी आपल्या मागच्या सरकारांनी अनेकदा गांभीर्याने प्रयत्न केले. मात्र, आपल्यापेक्षा कमकुवत देशांसोबतच्या काही गोष्टी सोडवणे जास्त तर्कशुद्ध असते. पण, आजवर हे शक्य झाले नाही. आता आणखी एक संकट आहे. मोदी सरकार सर्व धोरणांकडे निवडणुकीच्या दृष्टीतूनच पाहते. असे असेल तर पाकिस्तानसोबत शत्रुत्व कायम ठेवणेच सरकारला सोयीचे वाटेल. पाकिस्तान आणि दहशतवाद या दोन गोष्टी म्हणजे निवडणुकीतील ध्रुवीकरणाचे उत्तम हत्यार आहे. या मूळ मुद्द्यावर मोदी सरकारने विचार करण्याची गरज आहे. सरकार देशांतर्गत राजकीय गरजांच्या दबावात रणनीतीचे पर्याय मर्यादित करेल? की ही परिस्थिती बदलण्यासाठी आत्मविश्वास दाखवेल? असे वाटते की सरकार आणखी काहीतरी धाडसी पाऊल उचलेल आणि आधी चीनचा बंदोबस्त करेल. पण त्या वेळी आपल्याला हे माहीत असेल, की या सौद्यात कुणाचं पारडं जड आहे. एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’ Twitter@ShekharGupta शेखर गुप्ता

बातम्या आणखी आहेत...