आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Why Did Virat Kohli Resign From The Captaincy? Will India Adopt Universal Captaincy Formulae? Know All About It.

एक्सप्लेनर:केवळ कामाचा ताण कमी करण्यासाठी विराट कोहलीने कर्णधारपद सोडले? भारतात किती यशस्वी होणार कॅप्टनसीचा युनिव्हर्सल फॉर्मुला,याविषयी जाणून घ्या A to Z

जयदेव सिंहएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • याविषयी जाणून घेऊया सविस्तर...

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी एक ट्विट करत टी -20 विश्वचषकानंतर टी -20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आपल्या कामाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे कोहलीने सांगितले. कोहली मर्यादित षटकांच्या सामन्यातील कर्णधारपदावरून पायउतार होईल अशी बऱ्याच दिवसांपासून शक्यता वर्तवली जात होती. मे महिन्यातच निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी संकेत दिले होते की, कोहली इंग्लंड दौऱ्यानंतर रोहित शर्माला मर्यादित षटकांच्या सामन्यातील कर्णधारपद देऊ शकतो. तसेच भारतीय क्रिकेट संघात लवकरच वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असतील अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती.

विराटने ट्विटरवर एक पत्र शेअर करत कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली. तीन दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये विराटने टी -20 संघाचे कर्णधारपद सोडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी बीसीसीआयने या वृत्तांचे खंडन केले होते, परंतु गुरुवारी विराटने हे वृत्त खरे असल्याचे सिद्ध केले.

अखेर, विराटने कर्णधारपद सोडताना आपल्या पत्रात काय सांगितले? विराटने कर्णधारपद सोडण्याचे कारण काय? देशात कधीकधी वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार होते? जगातील कोणत्या देशांमध्ये सध्या वेगवेगळ्या फॉरमॅटचे वेगवेगळे कर्णधार आहेत? Split Captaincy (कर्णधारपद विभाजन) चा ट्रेंड, ही पद्धत किती यशस्वी आहे? याविषयी जाणून घेऊया सविस्तर...

विराटने आपल्या पत्रात काय म्हटले?
विराट कोहली पत्रात म्हणतो, “फक्त भारतीय संघामध्ये सहभागी व्हायचीच नाही, तर भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मला मिळाली यासाठी मी स्वत:ला सुदैवी समजतो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून मला पाठिंबा आणि मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी धन्यवाद करतो. संघातील सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि आमच्या विजयासाठी प्रार्थना करणारा प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो. आपल्यावर असणारा ताण समजून घेणे फार महत्त्वाचे असते. आणि गेल्या 8 ते 9 वर्षांपासून भारतीय क्रिकेट टीमसाठी तिन्ही प्रकारांमध्ये (टी 20 , कसोटी, एकदिवसीय) आणि गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सातत्याने कर्णधारपद सांभाळताना मला आता वाटू लागले आहे की, मी स्वत:ला वेळ द्यायला हवा. जेणेकरून एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांमध्ये मी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार राहीन. टी-20 संघाचा कर्णधार म्हणून मी शक्य ते सगळे काही संघाला दिले आहे. एक फलंदाज म्हणून यापुढेही मी ते करत राहणार आहे.”

सगळ्यांशी चर्चा करूनच निर्णय
सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचे विराट सांगतो. “अर्थात, या निर्णयापर्यंत येण्यासाठी बराच काळ लागला. माझ्या जवळच्या व्यक्तींशी, रवीभाई, रोहित यांच्याशी खूप सारी चर्चा केली आहे. त्यानंतर मी या निर्णयापर्यंत आलो आहे की ऑक्टोबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मी टी-20 संघाचा कर्णधार म्हणून पायउतार होणार आहे. माझ्या निर्णयाविषयी मी बीसीसीआयचे सचिव जय शाह, अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समितीच्या इतर सर्व सदस्यांसोबत बोललो आहे. भारतीय क्रिकेट आणि भारतीय संघाची सेवा मी अशीच करत राहीन.”

कर्णधारपद सोडण्याची प्रमुख कारणे कोणती?

जे कोहलीने सांगितले: कोहलीने आपल्या पत्रात स्पष्ट केले की त्याला कामाचा ताण कमी करायचा आहे. कोहली फक्त टी -20 चे कर्णधारपद सोडत आहे पण तो एक फलंदाज म्हणून खेळत राहील. विराट कोहली तीनही फॉरमॅटचा कर्णधार झाल्यापासून टीम इंडियाने आतापर्यंत 67 टी -20 सामने खेळले आहेत. यापैकी फक्त 45 सामान्यात कोहली संघाचा भाग आहे. म्हणजेच, 33% सामन्यांमध्ये कोहलीला विश्रांती देण्यात आली. कर्णधारपद सोडल्यानंतर हा आकडा आणखी वाढू शकतो.

कोहलीने काय सांगितले नाही: कोहली मर्यादित षटकांच्या सामन्यांत संघाला कोणतेही मोठे विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. दुसरीकडे, उपकर्णधार रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा काळजीवाहू कर्णधार म्हणून रेकॉर्ड शानदार आहे. 2020 मध्ये जेव्हा रोहितने 5 व्या वेळी मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले, तेव्हा अनेक तज्ज्ञांनी रोहितला मर्यादित षटकांतील सामन्यांचे कर्णधारपद देण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव झाल्यानंतर याची मागणी पुन्हा जोर धरु लागली. गेल्या दोन वर्षांपासून फलंदाज म्हणून कोहलीची कामगिरी खराब आहे. त्याच्यावर कर्णधारपदाचा दबाव आहे. 2016 ते 2018 दरम्यान कोहली त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. या दरम्यान त्याने बहुतेक कसोटी सामन्यांचे कर्णधारपद भूषवले. तो धोनीच्या नेतृत्वात वनडे आणि टी -20 मध्ये खेळत होता.

भारतात कधी कधी वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार होते?
देशात वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार असण्याची प्रथा सर्वप्रथम 2007 च्या टी -20 विश्वचषकापासून सुरू झाली. 2007 च्या टी -20 विश्वचषकापासून कर्णधार राहुल द्रविडसह सर्व
वरिष्ठ खेळाडू बाजुला झाले. धोनीला कर्णधार बनवले गेले आणि भारताने विश्वचषकही जिंकला. विजयानंतर देशात परतल्यानंतर धोनीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीही कर्णधार बनवण्यात आले. धोनीला आता कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. बीसीसीआयने राहुल द्रविडच्या जागी अनिल कुंबळेला कसोटी संघाचा नवीन कर्णधार केले. कुंबळेने 10 कसोटींमध्ये संघाचे नेतृत्व केले. ही पहिलीच वेळ होती जेव्हा वनडे आणि टी -20 चे कर्णधार आणि कसोटीचा कर्णधार वेगळा होता. मात्र, या काळात कुंबळे फक्त कसोटी खेळत असे. धोनी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत होता. तो कसोटीत उपकर्णधारच्या भूमिकेत होता. कुंबळेच्या निवृत्तीनंतर नोव्हेंबर 2008 मध्ये धोनी तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार झाला.

सात वर्षांनंतर पुन्हा एकदा देशात दोन कर्णधारांचे युग आले आहे. 2014 डिसेंबर महिन्यातील ही गोष्ट आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. सीरिजच्या मध्यभागी धोनीने कर्णधारपद सोडत कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. कोहलीला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले. तर धोनीने वनडे आणि टी -20 चे कर्णधारपद सांभाळले. जानेवारी 2017 मध्ये धोनीने वनडे आणि टी -20 चे कर्णधारपदही सोडले. पण तो या दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळत राहिला. तेव्हापासून विराट तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार आहे.

सात वर्षांनंतर पुन्हा एकदा टीम इंडियाला वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार मिळतील. यावेळी कसोटी आणि वनडे मध्ये एक कर्णधार असेल आणि टी -20 चा वेगळा. संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा या शर्यतीत आघाडीवर आहे.

Split Captaincy (कर्णधारपद विभाजन) वर तज्ज्ञ काय म्हणतात?
यावर्षी मे महिन्यात माजी यष्टीरक्षक आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी कसोटी आणि मर्यादित षटकांमध्ये स्वतंत्र कर्णधारांची बाजू मांडली होती. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रोहित शर्माला लवकरच कर्णधारपदाची संधी मिळू शकते असे किरण मोरे यांनी म्हटले होते. भारतीय क्रिकेट संघात लवकरच वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असतील अशी शक्यताही किरण मोरे यांनी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले होते की, “भारतातही हा फॉरमॅट यशस्वी होईल. वरिष्ठ खेळाडूंना भारतीय संघाच्या भविष्याबद्दल काय वाटते हे महत्वाचे आहे. तिन्ही संघाचे नेतृत्व करत चांगली कामगिरीदेखील करणे विराटसाठी सहज बाब नाही. पण प्रत्येक फॉरमॅटमध्ये नेतृत्व करताना चांगली कामगिरी करत विजय मिळवणे याबद्दल मी त्याला श्रेयदेखील देतो, पण मला वाटते ती वेळ येईल जेव्हा विराट कोहली रोहितला नेतृत्व करु दे असे सांगेल,” असे किरण मोरे म्हणाले आहेत. माजी सिलेक्टर मदन लाल यांनीही कर्णधारपद विभाजन ही चांगली कल्पना असल्याचे म्हटले होते.

तर माजी कर्णधार कपिल देव या संकल्पनेच्या विरोधात होते. कपिल यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये म्हटले होते की, एका कंपनीचे दोन मुख्य कार्यकारी अधिकारी असू शकत नाहीत. ते म्हणाले की, आपल्या संस्कृतीत असे होऊ शकत नाही. याचे कारण स्पष्ट करताना कपिल म्हणाले होते की, आपली तीनही फॉरमॅटमध्ये 70 ते 80% टीम समान आहे. अशा परिस्थितीत टीमच्या लोकांना वेगळ्या कर्णधारपदाचा सिद्धांत आणि विचार आवडणार नाही.

जगातील कोणत्या देशांकडे सध्या वेगवेगळ्या फॉरमॅटचे वेगवेगळे कर्णधार आहेत?
आयसीसीमध्ये 12 पूर्णवेळ सदस्य आहेत. म्हणजेच ते देश जे कसोटी, टी 20, एकदिवसीय या तीनही फॉरमॅटमध्ये खेळतात. यापैकी 7 देशांमध्ये सध्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या कॅप्टनचा ट्रेंड आहे. ज्या तीन देशांत तीनही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार आहे, त्यात भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. त्याचबरोबर आयर्लंड आणि झिम्बाब्वेसाठी कसोटीत शेवटचे कर्णधार असलेले विल्यम पोर्टरफिल्ड आणि बँडन टेलर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

या देशांमध्ये हे प्रयोग किती यशस्वी झाले आहेत?

सध्याचा वन डे वर्ल्ड चॅम्पिअन इंग्लंड आणि टी -20 चॅम्पियन वेस्ट इंडीजकडे वेगवेगळ्या फॉरमॅटचे वेगवेगळे कर्णधार आहेत. 2018 मध्ये टेम्परिंग स्कँडलनंतर ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय टी 20 चे कर्णधारपद एरॉन फिंचकडे आहे आणि टीम पेन कसोटीत संघाचा कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी आणि एकदिवसीय, टी -20 चे कर्णधार वेगळे आहेत.

बाबर आझम सध्या तीनही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार आहे, पण सहा महिन्यांपूर्वीपर्यंत तिथेही वेगवेगळ्या फॉरमॅटचे कर्णधार वेगळे होते. बांगलादेशकडे सध्या तीनही फॉरमॅटमध्ये तीन वेगवेगळे कर्णधार आहेत.

काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, स्प्लिट कॅपटन्सीची पद्धत यशस्वी होणार की नाही हे टीम कल्चरवर अवलंबून असते. त्याच वेळी, बहुतेक तज्ज्ञ सध्याच्या परिस्थितीत ही क्रिकेटची गरज असल्याचे सांगतात. सध्याच्या काळात दोन-तीन सर्वात यशस्वी संघ आहेत ते म्हणजे भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड. यापैकी दोन संघांमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार आहे. तर न्यूझीलंड त्यांचा कर्णधार केन विलियम्सनला विश्रांती मिळावी म्हणून टॉम लाथम आणि टिम साउथीला मर्यादित षटकांच्या सामन्यात अनेक मालिकांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सोपवतो.

बातम्या आणखी आहेत...