आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी कुटुंबच फक्त काँग्रेस:​​सोनियांना आव्हान देणाऱ्यांना मिळाला पराभव, अखेर का कुणी काँग्रेसमध्ये गांधी घराण्याचे वर्चस्व नाही मोडू शकले

लेखक: अक्षय बाजपेयी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) म्हणजेच काँग्रेसची सर्वोच्च संस्था यांची शनिवारी बैठक पार पडली. मात्र बैठकीतून काहीही ठोस बाहेर आलेले दिसत नाही. सोनिया गांधी पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत पक्षाच्या अध्यक्ष म्हणून कायम राहतील.

म्हणजेच, यूपी, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवामध्ये काँग्रेस सोनियांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल, कारण या 5 राज्यांमध्ये 2022 च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये निवडणुका होण्याचा अंदाज आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशात पुढील वर्षाच्या शेवटी निवडणुका आहेत.

गांधी कुटुंबाला आव्हान देणारे कोणी नाही
तज्ज्ञांचे मानने आहेत की, गांधी कुटुंबाला थेट आव्हान देण्यासाठी काँग्रेसमध्ये कोणीही नाही. याआधी, ज्यांनी कोणी हा प्रयत्न केला, त्यांनी त्यांच्या तोंडचे खाल्ले. राजेश पायलट पासून जितेंद्र प्रसादपर्यंत, संघटनेत निवडणुका लढवल्या पण त्यांचा दारूण पराभव झाला. म्हणूनच हे निश्चित आहे की येणाऱ्या काळात फक्त राहुल गांधींनाच काँग्रेसचे अध्यक्ष बनवले जाईल.

आणि जर 5 पैकी 2 राज्यांमध्ये काँग्रेसने सरकार बनवले तर गांधी कुटुंबावरील लक्ष्य कमी होऊ शकते. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई म्हणतात, "पंजाबमध्ये ज्या प्रकारे नेतृत्व बदलण्यात आले आहे, तिथे विजय झाला तर जे आता टीका करत आहेत ते विरुद्ध बाजूने असतील."

7 पैकी फक्त पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार
पुढील वर्षी ज्या 7 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तेथे 951 विधानसभेच्या जागा आहेत आणि या सर्वांमध्ये सध्या काँग्रेसकडे एकूण 203 आमदार आहेत. या सातपैकी पंजाब हे एकमेव राज्य आहे जिथे काँग्रेस सत्तेत आहे, पण पक्षातही खूप उलथापालथ आहे.

यूपीत सर्वात मोठे आव्हान, येथे फक्त 7 आमदार आहेत
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पूर्ण भर देत आहे. लखीमपूर हिंसाचारानंतर प्रियांका आणि राहुल गांधी रस्त्यावर दिसले. मात्र, येथे 403 जागांपैकी काँग्रेसकडे सध्या केवळ 7 जागा आहेत. गुजरातमध्ये 182 पैकी 66 जागा काँग्रेसकडे आहेत. त्याचप्रमाणे पंजाबमधील 117 पैकी 80 जागांवर आणि हिमाचल प्रदेशमधील 68 पैकी 19 जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत.

जर 5 राज्यांमध्ये ते शून्यावर आले तर नेतृत्वाला थेट लक्ष्य केले जाईल
किडवाई म्हणतात, जर पुढील वर्षी निवडणुका होणाऱ्या 5 राज्यांमध्ये काँग्रेस शून्यावर आली तर केंद्रीय नेतृत्व थेट निशाण्याखाली येईल. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता असे दिसते की, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये पक्षाची सत्ता येऊ शकते.

गोव्यातही निवडणूक समीकरणे बदलत आहेत कारण प्रादेशिक पक्षांबरोबरच ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेसही सर्व जागांवर लढणार आहे. अशा परिस्थितीत ते काही मते कमी करू शकतात. यातून कोणाला फायदा होतो आणि हानी होते हे पाहावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...