आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूकनामा:कमला हॅरिस इतिहास घडवतील?

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमा श्रीराम

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून ही निवडणूक अनेक अर्थाने लक्षणीय ठरणार आहे. एक तर डोनाल्ड ट्रम यांच्यासाठी ही निवडणूक जड जाण्याची चिन्हे आहेत तर डेमोक्रटिक पक्षाने उपाध्यक्षपदासाठी महिला उमेदवार मैदानात उतरवली आहे. ही एक ऐतिहासिक घटना ठरेल. कारण उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या भारतीय-आफ्रिकी वंशाच्या आहेत. त्या जर विजयी झाल्या तर अमेरिकेत निश्चितच इतिहास घडणार आहे.

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून ही निवडणूक अनेक अर्थाने लक्षणीय ठरणार आहे. एक तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही निवडणूक जड जाण्याची चिन्हे आहेत तर डेमोक्रटिक पक्षाने उपाध्यक्षपदासाठी महिला उमेदवार मैदानात उतरवली आहे. ही एक ऐतिहासिक घटना ठरेल. कारण उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या भारतीय-आफ्रिकी वंशाच्या आहेत. त्या जर विजयी झाल्या तर अमेरिकेत निश्चितच इतिहास घडणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या महिलांना राजकीय क्षेत्रात अनेक संकटाचा सामना करावा लागलेला आहे. भारतात महिलांना मतदानाचा अधिकार सहज मिळाला पण अमेरिकन महिलांना त्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. १९२० मध्ये महिलांना हा अधिकार मिळाला. पण तेव्हाही आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या महिलांना फारसे अधिकार नव्हतेच. १९६०च्या दशकात या महिलांनी नागरी अधिकारासाठी संघटित होण्याचा प्रयत्न सुरु केले. अशा मोठ्या संघर्षानंतर आता या महिला मोक्याच्या अनेक पदावर विराजमान आहेत. अनेक मोठ्या शहराचे प्रमुखपद म्हणजे महापौरपदावर महिला आहेत. अटलांटा, शिकागो, सन फ्रान्सिको या शहराच्या महापौर महिला आहेत. अनेक शहराचे पोलीस प्रमुखपद या महिला सांभाळत आहेत. कधी काळी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत साधा मतदानाचा अधिकार नसलेल्या समुहातील एक महिला आता थेट अमेरिकेचे दुसऱ्या क्रमांकाचे पद मिळविण्याच्या स्पर्धेत उतरली आहे. ही बाब लक्षणीयच नव्हे तर ऐतिहासिक समजली पाहिजे. यावेळी कमला विजयी झाल्या तर कदाचित त्याच पुढील राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असतील. याचे कारण म्हणजे सध्याचे या पदाचे उमेदवार बायडेन यांनी आपण दुसरी टर्म लढणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. कारण त्यांचे वय. सध्या ते ७८ वर्षाचे आहेत.त्यामुळे २०२४ च्या प्रचारात कमला यांच्याकडेच मोठी जबाबदारी असणार आहे. कमलांचा जन्म कॅलिफोर्नियातल्या ओकलंडचा. त्यांचे आईवडील दोघेही स्थलांतरित. आईचा जन्म भारतातला आणि वडिलांचा जमैकातला. कमला लहान असतानाच त्यांचे पालक विभक्त झाले आणि त्यानंतर त्यांची आई श्यामला गोपालन हॅरिस यांनी कमला आणि माया या लेकींना वाढवलं. श्यामला या कॅन्सर संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या होत्या. तर कमला यांचे वडील अर्थतज्ज्ञ आहेत. कमला डेमाक्रँट पक्षाच्या नेत्या आहेत आणि आजवरची त्यांची कारकिर्द नजरेत भरणारी आहे. कॉलिफोर्नियाचे अॅटर्नी जनरल हे पद त्यांनी सांभाळले आहे. त्यानंतर त्या सिनेटर म्हणून निवडून आल्या. सिनेटर म्हणून त्यांनी नजरेत भरणारे काम केले. मानवी अधिकाराबाबत त्यांची मते अतिशय स्पष्ट आहेत. मोदी सरकारने ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरी जनतेसाठी त्यांनी आवाज उठवला होता. काश्मीरी जनतेच्या मानवी अधिकाराचे संरक्षण झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती. अशा अनेक विषयावर त्यांची मते अतिशय स्पष्ट आहेत, या पूर्वी आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या महिलांनी अमेरिकेची निवडणूक लढवली होती, पण त्या स्वतंत्र उमेदवार होत्या. प्रमुख पक्षाची उमेदवारी मिळवण्याचा मान कमला यांचाच आहे. ज्या देशात आजवर कधीच महिला राष्ट्राध्यक्ष झालेली नाही त्या देशात एक भारतीय-आफ्रिकन-अमेरिकन वंशाची महिला या पदासाठी मैदानात असणे ही केवळ अमेरिकेसाठी नाही तर जगाच्या राजकारणासाठी, सांस्कृतिक आंदोलनासाठी उज्वल घटना ठरणार आहे. २००८ मध्ये बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. हा एक इतिहास होता अमोरिकन समाजासाठी. प्रदीर्घ इतिहास असलेल्या अमेरिकन जनतेसाठी ओबामा यांची निवड लक्षणीय घटना होती. ओबामा यांनी त्यांची निवड सार्थ ठरवली. आता कमला यांना जर विजय मिळाला तर अमेरिकन जनतेच्या समजदारीचे जगभर कौतुक तर होईलच पण जगावर एक सकारात्मक परिणाम करणारी ही घटना ठरेल.

या पूर्वी रिपब्लिकन पक्षाने एंजेल जॉय हा आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या महिलेला उमेदवारी दिली होती. फ्लोरिडा प्रातांतील ही महिला धार्मिक मुलतत्ववादी विचाराची होती. रिपब्लिकन पक्षात नवीन भरती करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण त्यांना यश मिळाले नाही. १९७२ मध्ये आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या अध्यक्षीय उमेदवार शेर्ली चिशहोल्म यांना मोठा अनुभव होता. सार्वजनिक जीवनात त्यांची कारकिर्द चांगली होती. त्यांनी नागरी अधिकार आणि गरिबीवर भर दिला होता. पण त्यांना यश मिळाले नाही. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इलिनोस सेन, कॉरोल मोस्ली आणि आता कमला हॅरिस यांना सार्वजिनिक जीवनात थोडेफार तरी यश मिळालेले आहे. मागच्यावेळी कमला यांना संधी मिळाली नव्हती पण आता २०२० मध्ये त्यांना पक्षाने ही संधी दिलेली आहे. अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी देशातही आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या महिलांसाठी सर्व काही सहज सोपे नाही. फक्त राजकारणात नाही तर इतर क्षेत्रातही आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या महिलांना संघर्ष करावा लागतो. आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या महिला उमेदवारांना निवडणुकीत प्रचारासाठी निधी जमविणे अवघड जाते. दुसरीकडे प्रसारमाध्यमेही त्यांची उमेदवारी गंभीरपणे घेत नाहीत. इथेही त्यांना वेगळा संघर्ष करावाच लागतो. आतापर्यंत आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या महिला उमेदवारांना अमेरिकन मतदारांनी फारसा पाठिंबा दिलेला नाही. आपल्या सारखे न दिसणारे कोणी व्हाईट हाऊसमध्ये गेलेले अजूनही अमेरिकन समाजाला आवडत नाही. ही मानसिकता अजूनही बदलेली नाही. बराक ओबामाच्या हाताखाली दोन टर्म जॉय बायडेन यांनी काम केले होते. त्यांना जाणीव आहे की कमला यांची त्यांना विजयी होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. शिवाय जर ते जिंकले तर सरकार चालवण्यासाठीही कमला यांचा अनुभव महत्वाचा ठरणार आहे. अमेरिका केवळ गोऱ्यांची नाही, तिचा विकास केवळ गोऱ्यांमुळे झालेला नाही. स्थलांतरितांनीच वसवलेला हा देश, तेव्हा मूळचे कोण नि उपरे कोण हा प्रश्नच उद्भवत नाही. तरी तो तसा निर्माण केला जातो.. राजकारणाचे अनेक कांगोरे असलेल्या अमेरिकेत ही एक वेगळी संधी समजली पाहिजे. जर बायडेन दुसरी टर्म लढणार नसतील, जसे अमरिकन समाजात मानले जात आहे, तर कमला यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्या अमेरिकेचा एक वेगळा इतिहास लिहीतील. त्यांची ही वाटचाल आफ्रिकन-अमेरिकन आणि गोऱ्या लोकांसाठी, जगासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

संपर्क - ९८१९३८७८८६

बातम्या आणखी आहेत...