आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Winter Sweater Side Effects; Sleeping In Woollen Clothes | Health Risk Explained | Heart Attack | Health Tips

कामाची गोष्टस्वेटर-मोजे घालून झोपल्यास येईल अटॅक:हृदय आणि मेंदू काम करणार नाही; झटके देखील येण्याची शक्यता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही लोक थंडीपासून वाचण्यासाठी लोकरीचे कपडे घालून झोपतात. यामुळे थंडीपासून आराम मिळतो, पण आरोग्याला हानी पोहोचते.

लोकरीचे कपडे घालून झोपणे का धोकादायक आहे, यामुळे आपल्या आरोग्याचे काय नुकसान होऊ शकते, हे आज कामाची गोष्टमधून जाणून घेणार आहोत.

प्रश्न: स्वेटर घालून झोपणे हानिकारक का आहे?

उत्तरः स्वेटर घालून झोपल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. हे लोकरेच्या गुणवत्तेमुळे होते. वास्तविक लोकर हा उष्णतेचा खराब वाहक आहे. म्हणजेच लोकर हे उष्णता रोधक आहे. ते त्याच्या तंतूंमध्ये मोठ्या प्रमाणात हवा अडकवते. या कारणामुळे आपल्या शरीरात निर्माण होणारी उष्णता बंद होते आणि बाहेर पडत नाही. अशा प्रकारे आपण सर्दी टाळतो, परंतु त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

प्रश्न: गरम कपडे टाळण्यासाठी काय करता येईल?

उत्तरः अशा गरम कपड्यांमुळे होणारी हानी टाळा...

  • त्वचेवर खाज सुटली किंवा पुरळ उठत असेल तर स्क्रॅच किंवा खाजवू नका.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने कोणतेही लोशन लावा.
  • खूप गरम पाण्याने आंघोळ करू नका, साबण लावू नका.
  • फक्त नैसर्गिक रंगाचे कपडे खरेदी करा.
  • बेडवर मऊ टॉय आणि सिंथेटिक फॅब्रिकच्या वस्तू ठेवू नका.
  • स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या.

प्रश्न : स्वेटर किंवा उबदार कपडे घातल्याने झोप का मोडते?

उत्तर : चांगल्या झोपेसाठी शरीराचे तापमान राखावे लागते. उबदार कपडे घालताच हे शक्य होत नाही. स्वेटर घातल्याने शरीराचे तापमान आतमध्ये अडकते. त्यामुळे रात्री अस्वस्थता जाणवते. यामुळे सकाळी थकवा जाणवतो.

प्रश्न: मग झोपताना लोकरी टोपी घालू नये?

उत्तरः हिवाळ्यात लोकरीची टोपी घालून झोपू नये. टोपी घातल्याने केसांचे सर्वाधिक नुकसान होते. यामुळे टाळूला खाज सुटू शकते आणि केसांचे फॉलिकल्स ब्लॉक होऊ शकतात. यामुळे टाळूमध्ये संसर्ग होऊ शकतो. घट्ट लोकरीची टोपी घातल्याने टाळूमध्ये तेल साठते ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

झोपताना टोपी घालायची असेल तर...

  • कापसाची टोपी घाला.
  • धुतलेली टोपी घाला.
  • टोपी खूप घट्ट नसावी.
  • जर मुलांनी टोपी घातली असेल तर लक्षात ठेवा की, झोपताना त्याचे डोळे आणि नाक टोपीने झाकले जाऊ नये.

प्रश्न: घोंगडीने किंवा चादरीने डोके झाकून झोपणे देखील हानिकारक असू शकते का?

उत्तरः घोंगडीने डोके झाकून झोपल्याने खोलीतील ताजे ऑक्सिजन मिळत नाही. ब्लँकेटच्या आत असलेला ऑक्सिजन श्वासातून आपण घेत राहतो. जेव्हा ब्लँकेटमध्ये ऑक्सिजनची कमतरता होते तेव्हा फक्त अशुद्ध हवा शरीरात जाऊ लागते. त्यामुळे सर्व अवयवांमध्ये रक्ताभिसरण नीट होत नाही.

याशिवाय डोके ब्लँकेटने झाकून झोपल्याने खालील समस्या उद्भवू शकतात.

  • कार्बन डायऑक्साइड चेहऱ्यावर जमा होऊ लागतो. त्यामुळे मानसिक आणि वर्तणुकीत बदल दिसून येतात.
  • त्याचा सर्वात वाईट परिणाम फुफ्फुसावर होतो. फुफ्फुसे संकुचित होऊ लागतात. म्हणजेच, फुफ्फुसातील गॅस एक्सचेंजचे काम योग्यरित्या पूर्ण होत नाही. यामुळे दमा, सुस्ती, स्मृतिभ्रंश आणि वारंवार डोकेदुखी होऊ शकते.
  • डोके झाकून झोपल्याने गुदमरल्यासारखे होऊ शकते. थंडीच्या दिवसात व्हेंटिलेशन व्यवस्थित नसते आणि खिडक्याही बंद असतात. हे आरोग्यासाठी चांगले नाही.
  • पुरेसा ऑक्सिजन नसताना अपस्माराचा झटका येऊ शकतो.

प्रश्न: हिवाळ्यात पाय थंड होतात, म्हणून मोजे घालून झोपतात. यात काय अडचण असू शकते?

उत्तरः हिवाळ्यात मोजे आणि हातमोजे घालून झोपणे हानिकारक आहे कारण…

  • लोकर थंडीपासून संरक्षण करते परंतु ते घाम शोषू शकत नाही.
  • त्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात.
  • हात आणि पायांमध्ये अ‍ॅलर्जी होवू शकते.
  • रक्ताभिसरणातही समस्या होवू शकते.
  • खूप घट्ट मोजे घातल्याने रक्तप्रवाहात समस्या निर्माण होतात. याचा हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
  • जास्त गरम झाल्याने रात्री अस्वस्थता येते.
  • जर तुम्ही दिवसभर घातलेले मोजे घालून झोपत असाल तर त्वचेची अ‍ॅलर्जी होऊ शकते.

प्रश्न: मी सुती मोजे घालून झोपू शकतो का?

उत्तरः कापासाचे मोजे लोकरीच्या मोज्यांपेक्षा चांगले आहेत. कापूस हे श्वास घेण्यायोग्य फॅब्रिक आहे जे रात्री परिधान करून झोपल्यास नुकसान होणार नाही. फक्त लक्षात ठेवा की, जास्त घट्ट मोजे घालू नका आणि स्वच्छतेची काळजी घ्या.

प्रश्न: उबदार मोजे आणि स्वेटरने अ‍ॅलर्जी का होते?

उत्तर: काही लोकांना निकृष्ट दर्जाचे लोकर आणि सिंथेटिक मिक्स बनवलेले स्वेटर, शाल इत्यादींची अ‍ॅलर्जी असते. हे असे लोक आहेत ज्यांना आधीच अ‍ॅलर्जीची समस्या आहे.

  • हे केवळ स्वेटरनेच नाही तर ब्लँकेट आणि मऊ खेळण्यांनी देखील होईल. या समस्येला क्लोदिंग डर्मेटाइटिस (कपडे त्वचारोग) देखील म्हणतात. तुमचे शरीर तुम्ही परिधान केलेले किंवा वापरलेल्या कपड्यांमधील तंतू, रंग किंवा इतर रसायनांवर प्रतिक्रिया देते तेव्हा, असे होते.
  • कधी कधी गरम कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा डिटर्जंटची अ‍ॅलर्जी असते. कपडे एकदा सुगंधी आणि रसायनमुक्त डिटर्जंटने धुण्याचा प्रयत्न करा. यानंतर, जर अ‍ॅलर्जीची लक्षणे दिसली नाहीत तर याचा अर्थ असा होतो की, तुमची अ‍ॅलर्जी डिटर्जंटपासूनच होती.

प्रश्‍न : उबदार कपडे घालून झोपल्‍याने होणार्‍या अपस्माराची सविस्तर माहिती सांगा, त्याची लक्षणे काय आहेत?

उत्तर: अपस्मार किंवा एपिलेप्सी हा मज्जासंस्थेचा विकार आहे. हा विकार अनेक रोगांमुळे होऊ शकतो. यामध्ये मेंदूतील काही समस्यांमुळे व्यक्तीला झटके येऊ लागतात.

पिलेप्सीची लक्षणे खालील प्रमाणे...

  • अचानक राग येणे
  • चक्कर येणे
  • एकाच जागी चकरा मारणे
  • ताप नसतानाही ताप आल्यासारखे वाटणे
  • ब्लॅकआउट किंवा स्मृती कमी होणे
  • विनाकारण स्तब्ध होणे
  • अचानक कोसळणे
  • वारंवार एकाच वर्तनाची पुनरावृत्ती करणे
  • शरीरात संवेदना जाणवणे
  • वारंवार टाळ्या वाजवणे किंवा हात चोळणे
  • चेहरा, मान आणि हातांच्या स्नायूंना वारंवार झटके बसणे
  • अचानक घाबरणे आणि बोलू न शकणे
  • स्पर्श, ऐकणे किंवा वास घेण्याच्या क्षमतेमध्ये अचानक बदल
  • अधूनमधून मूर्च्छा येणे

प्रश्न : झोपताना उबदार कपडे घातले नाहीत तर मला थंडी वाजते. त्यावर उपाय काय?

उत्तरः झोपताना साधारणपणे थंडी जाणवते. म्हणूनच खोली उबदार ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. यासाठी हीटर किंवा स्टोव्ह पेटवण्याची गरज नाही. जाड पडदे लावून आणि जमिनीवर कार्पेट टाकूनही खोली उबदार ठेवता येते.

अंथरुण उबदार राहण्यासाठी खालील प्रमाणे अनुसरण करा…

  • कापसाच्या चादरीऐवजी ब्लँकेट पसरवा.
  • तुम्ही गरम पाण्याची पिशवी घेऊन झोपू शकता.
  • हीटिंग जेल पॅकसह देखील झोपू शकते.
  • जाड गाद्या वापरा.

प्रश्न: लहान बाळे रात्री व्यवस्थितझाकून झोपतत नाही. त्याला थंडीपासून वाचवण्यासाठी उबदार कपडे घालते जातात. त्यालाही उबदार कपडे घालून झोपणे हानिकारक आहे का?

उत्तरः हिवाळ्यात झोपताना खालील प्रकारे लहान मुलांची काळजी घ्या...

  • मुलाच्या हाताकडे लक्ष द्या. त्याचे हात ब्लँकेटने झाका किंवा हातमोजे घाला.
  • उबदार कपड्यांखाली मऊ सुती कपडे घाला.
  • झोपताना मुलाचे डोके झाकून ठेवू नका.
  • जेव्हा मुल झोपत असेल तेव्हा त्याला घाम येत नाही ना ते पाहा.
  • जर झोपताना मुलाची त्वचा लाल झाली आणि तो वेगाने श्वास घेऊ लागला तर टोपी काढून टाका.
  • झोपताना मुलाला कमी कपडे घालायला लावा. जास्त कपड्यांमुळे बाळाला जीव गुदमरल्या सारखा होऊ शकतो.

कामाची गोष्टमध्ये आणखी काही लेख वाचा:

डिलिव्हरी बॉयवर पाळीव कुत्र्याचा हल्ला:तिसऱ्या मजल्यावरून मारावी लागली उडी, कुत्रा चावला तर मालक तुरुंगात

हैदराबादच्या बंजारा हिल्स भागात राहणाऱ्या शोभना यांनी स्विगीमधून जेवण ऑर्डर केले होते. डिलिव्हरी बॉय रिझवान पार्सल घेऊन पोहोचला. रिझवान शोभना यांना पार्सल देत असताना त्यांच्या जर्मन शेफर्डने अचानक त्याच्यावर हल्ला केला. पाळीव प्राण्याने अनोळखी व्यक्तीवर असा हल्ला केल्याची ही पहिलीच घटना नाही. म्हणूनच आज कामाची गोष्टमध्ये आपण समजून घेऊयात की, कुत्रा फक्त लहान मुलाप्रमाणे घरात पाळणे आवश्यक नाही तर त्याला योग्य प्रशिक्षण देणे देखील आवश्यक आहे. पूर्ण बातमी वाचा...

रात्री उशिरा दुचाकी टॅक्सी मागवली:चालक नशेत होता, रोख रकमेसाठी भांडला; तक्रार केली, 12 तास उलटूनही प्रतिसाद नाही

सध्या देशात असलेल्या सर्वच बाईक टॅक्सी महिलांची सुरक्षा, रॅश ड्रायव्हिंग, अधिक पैशांची मागणी अशा समस्यांना तोंड देत आहेत. एक ग्राहक म्हणून, सुरक्षिततेबद्दल आणि अधिकारांबाबत आपल्याकडे कोणते पर्याय आहेत, हे आम्ही कामाची गोष्ट मध्ये जाणून घेणार आहोत… पूर्ण बातमी वाचा...

बातम्या आणखी आहेत...