आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक वाहनांमध्ये महिलांवरील लैंगिक हिंसाचार आणि असभ्यपणा रोखण्यासाठी आजूबाजूचे लोक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. जर लोकांनी बघ्याची भूमिका घेतली नाही तर महिलांना असभ्य घटनांपासून वाचवता येऊ शकते, असे देशातील पहिल्या ‘बायस्टँडर बिहेवियर सर्व्हे’ मध्ये असे समोर आले आहे.
सर्वेक्षणातील ७८.५ % महिलांनी सार्वजनिक ठिकाणी छेडछाड, शारीरिक स्पर्श यांसारख्या लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागल्याचे सांगितले. ५४.६ % लाेकांनी हिंसा राेखण्यासाठी हस्तक्षेप केला. ६७.७% लाेकम म्हणालेे की, त्यांच्या हस्तक्षेपामुळे हिंसाचार थांबला. ‘ब्रेकथ्रू’ या बिगर सरकारी संस्थेच्या सर्वेक्षणात ३८.५% लाेकांनी घटना घडताना ते मूक प्रेक्षक राहिले. कारण मदत कशी करावी हेच समजले नाही. सार्वजनिक व खासगी ठिकाणी हिंसाचाराच्या साक्षीदारांचे विचार व अनुभव जाणणे हा सर्वेक्षणाचा उद्देश होता. लाेकांनी बघ्याची भूमिका घेऊ नये म्हणून ‘इग्नोर- नाे माेर’ ही मोहीम राबवली. ब्रेकथ्रूच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोहिनी भट्टाचार्य म्हणाल्या, “महिलंनी हिंसेला वैयक्तिक न मानता सामुदायिक जबाबदारी स्वीकारावी असे आमचे उद्दिष्ट आहे. हिंसाचारासाठी दोषी ठरण्याची भीती, पोलिसांशी सामना करणे आणि कायदेशीर प्रकरणात अडकणे यांसारखी आव्हाने लाेकांना बोलण्यापासून रोखतात, असे या सर्वेक्षणात दिसून आले.
कायदेशीर कटकटीमुळे गप्प राहतात
जे पीडित आहेत ते लाेकही हस्तक्षेप करतात
काही लोक म्हणाले की, ते बाललैंगिक अत्याचार, घरगुती हिंसाचाराचे बळी ठरले आहेत, परंतु त्या वेळी त्यांना प्रतिकार करता आला नाही. त्याच्यासोबत घडलेल्या घटनेविरुद्धचा राग असल्याने त्यांनी हस्तक्षेप केला.
जागा बदलण्याच्या छाेट्या पुढाकारानेही बदल
सार्वजनिक वाहनांत महिलांसाठी जागा बदलल्यानेही घटना कमी झाल्या. पीडितेला दवाखान्यात नेणे, सुरक्षित घरी सोडणे प्रभावी ठरले. “तुम्हाला आई-बहीण नाही का?’ अशा फटकारण्याने दुर्व्यवहार थांबवण्यास मदत झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.