आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट समानतेची:पुरुषांचे कमावत्या स्त्रीविषयीचे विचार बाटलीबंद सोड्यासारखे असतात, झाकण उघडताच उसळी मारतात

लेखिका : मृदुलिका झा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत पाणगळ सुरू होती. तेव्हा गुगलमध्ये काम करणाऱ्या सुंदर महिलांनी कीबोर्डवर टकटक करणारी आपली लांबढगळ बोटे थाबंविली व कंपनीविरोधात बंड पुकारले. त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने काम करुनही आपल्याला त्यांच्यापेक्षा कमी वेतन मिळत असल्याचा आरोप केला. त्या केवळ 3 महिला होत्या. पण, त्यांनी ज्या कंपनी विरोधात हे बोलण्याचे धाडस केले ती जगातील काही मोजक्या ताकदवान कंपन्यांपैकी एक होती.

गुगल आरोप फेटाळत राहिली. पण, या महिला एखाद्या पिसाळलेल्या हत्तीसारख्या तोडफोड करत राहिल्या. अखेर तब्बल 5 वर्षांनी गुगलला थोडीफार असमानता झाल्याचे मान्य करावे लागले. आता कंपनीला खटला भरणाऱ्या महिलांसह 15 हजार महिला कर्मचाऱ्यांना 118 दशलक्ष डॉलर्सहून अधिकची भरपाई द्यावी लागेल. त्या आनंदी आहेत. कारण, त्यांनी एवढ्या स्वस्तात पुढील अनेक वर्षांपर्यंत जगातील कोट्यवधी नोकरदार महिलांची अन्यायातून सुटका केली होती.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने महिलांना केवळ नुकसान भरपाई दिली. यापुढे पुरुषांसारखा पगार देण्याची ग्वाही दिली नाही.

गुगलला ही चलाखी संस्कारांतून मिळाली. 16 वे शतक अस्ताला जात होते, तेव्हा महिला कामासाठी घराबाहेर पडत होत्या. त्या अंग मोडून काम करत. उदाहरणार्थ, रोज सकाळी ताजे ब्रेड तयार करणे, मोसमी फळे गोळा करणे, घराची स्वच्छता किंवा श्रीमंत घरांतील महिलांचे कपडे किंवा केस सावरण्याचे काम. खूप झाले तर त्यांच्या मुलांना दूध पाजणे व पियानो वाजवण्याचे कामही त्या करत. या महिला दरमहा, वर्षानुवर्षे काम करत गेल्या, पण किरकोळ गरजांसाठी त्यांना पतीच्या तोंडाकडे पहावे लागत होते.

यामागील मुख्य कारण महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी मिळणारे वेतन त्यांच्या पतीला मिळत होते. हा ब्रिटीश कायदा होता. त्याची तत्काळ नकल गुलाम देशांनीही केली. अशा प्रकारे जगभरातील लाखो महिला पैशांविना काम करत होत्या.

प्रत्यक्षात त्या आपल्या पतीची संपत्ती होत्या. एखादा जमिनीचा तुकडा किंवा पाळीव प्राण्यासारख्या. त्यांचे एकच काम होते पुरुष व श्रीमंतांची मर्जी राखणे. बायकाही याच श्रेणीत येतात. पाळीव प्राण्यांकडे जसे स्वतःचे काहीच नसते तशीच गत महिलांची होती. त्या घरात बसल्या काय किंवा बाहेर नोकरीला गेल्या काय त्याने काहीही फरक पडत नव्हता.

स्त्रिया तशाही 'दुय्यम कमावणाऱ्या' असतात. म्हणजे, त्या आपल्या जोडीदाराच्या तुलनेत किरकोळ पैसे कमावतात. हे आम्ही नाही, तर सर्च इंजिन म्हणते. गुगलवर हे शब्द टाकताच महिलांविषयी नरम-गरम संवाद असणारे शेकडो आर्टिक धडाधड खूलतात. त्या टाइमपाससाठी काम करतात. आपल्या घामाच्या पैशांतून सुगंधी द्रव्य व कपडे खरेदी करतात. एखाद्यावेळी मित्र-परिवारासाठी भेटवस्तू आणतात. एवढ्यावरच त्यांचा पैसा कपड्यावर पडलेल्या अत्तरासारखा उडून जातो.

दोन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा माझा एक पुरुष सहकारी बोलता-बोलता म्हणाला -‘तुम्हा मुलींना नोकरीची काय गरज! तू वाटेल तेव्हा काम सोडून जगभर फिरू शकतेस! तो मॉडर्न होता. सुशिक्षित होता. परदेशात जाऊन आला. प्रेम व लिव्ह-इननंतर लग्न केले. रंगात आल्यानंतर तो ओपन रिलेशनशिप सारखी चर्चाही करत होता. पण, कमावत्या महिलांविषयीचे त्याचे विचार बाटलीबंद सोड्यासारखे होते. ते झाकन उघडताच उसळून बाहेर पडत.

2018 मध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचा एक जेंडर गॅपचा एक अहवाल आला होता. 149 देशांच्या या रिपोर्टमध्ये भारत 108 व्या क्रमांकावर होता. अर्थात आपल्याकडेही एकसमान कामासाठी महिलांना पुरुषापेक्षा कमी पैसे मिळतात. महिला कितीही शिकलेली असली, कितीही मेहनती असली, तरी एकदा तुम्ही जेंडर कॉलममध्ये फीमेल भरले की तुमचे श्रेष्ठत्व आपोआपच कमी होते. महिला असणे तुमची पहिली अपात्रता आहे.

किस्सा इथेच संपत नाही. हाइव्हचे एक संशोधन सांगते की, महिला कार्यालयातील आपल्या पुरुष सहकाऱ्यांहून 10 टक्के जास्त कष्ट करतात. त्यांना काम जमत नाही किंवा त्या उशिराने शिकतात हे यामागील कारण नाही. खरे कारण त्यांच्यावर टाकण्यात येणाऱ्या अतिरिक्त बोजाचे आहे. त्यांच्या माथी मूळ कामासह नॉन-प्रमोटेबल टास्कही मारले जाते. असे काम ज्याचा उल्लेख त्या आपल्या रिझ्यूमेमध्ये करू शकत नाहीत किंवा ज्यामुळे त्यांना बढतीही मिळत नाही.

उदाहरणार्थ नव्याने भरती होणाऱ्या सहकाऱ्यांना कॉफी मशीनपर्यंत घेऊन जाणे, कार्यालयाचे नियम समजावणे, आजारी सहकाऱ्याची मदत करणे किंवा तणावात असलेल्या टीमचे सांत्वन करणे. दीपावली-होळीला रांगोळी काढणे व मिठाईची लिस्ट तयार करण्याचे कामही तिच्या अंगावर पडते.

या अनावश्यक कामांसह त्यांना कार्यालयीनही कामही करावे लागते. त्या रिसर्चही करतात. प्रेझेंटेशनही तयार करतात. पण, बोर्ड रुममध्ये जाताच चित्र बदलते. त्यांना कोपऱ्यातील एखाद्या खुर्चीवर बसून शांतपणे आपले सादरीकरण पुरुष सहकारी कसा सादर करत आहे हे पहावे लागते. या सहकाऱ्याचे सादरीकरण तयार करण्यात कोणतेही योगदान नसते हे विशेष.

समानतेचा अधिकार देणाऱ्या देशांतच अव्वल क्रमांकावर असणाऱ्या नेदरलँडने नुकताच एक अभ्यास केला. पेरेंटल लीव्ह रिफॉर्म अँड लॉन्ग-रन अर्निंग्स….’नामक या शोधनिबंधातून महिला वेतनाच्या बाबतीत पुरुषंच्या मागे का पडतात हे समजावण्यात आले आहे. त्याचे निष्कर्ष थक्क करणारे आहेत. पेड लिव्हनंतरही मुलांच्या जन्मानंतर वडील सुट्टी घेण्यास घाबरतात. कारण, त्यांना सुट्टी घेतल्यास कार्यालयातील प्रतिष्ठा कमी होण्याची भीती असते.

ऑस्ट्रेलियात तर स्थिती अधिकच वाईट आहे. तिथे प्राथमिक काळजी घेणाऱ्या सेक्शनमध्ये केवळ आईचेच नाव असते. यामुळे पुरुषांना रडणारी मुले व आजारी मातांना घरी सोडून आरामात कार्यालयात जाता येते. ही स्थिती कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक व्यवसायात व भागात आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते, 2277 साली पुरुष व महिलांना समान कामासाठी समान वेतन मिळेल. तब्बल अडीचशे वर्षांनंतर. पण, यासाठी कोरोनासारखी एखादी महामारी किंवा युद्ध न होण्याची प्रमुख अट आहे.

बातम्या आणखी आहेत...