आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Woman Vs Man Gender Gap; Domestic Violence Behind Make Up | International Women Day | Domestic Violence

गोष्ट बरोबरीचीमहिला पार्टीसाठी नटतात हे अर्धसत्य:बंद खोलीतील पतीची मारहाण लपवायलाही मेकअप करावा लागतो

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. हा योगायोगच होता की दोन दिवस आधीच एक नामवंत आणि यशस्वी महिला उद्योजिकेचे महिला दिनाविषयी विचार ऐकायला मिळाले.

प्रश्नाच्या उत्तरात त्या प्रश्न विचारत राहिल्या - आपण आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा करतो का. आपण पुरूष असणे सेलिब्रेट करतो का, त्याचा उत्सव साजरा करतो का. जर पुरुषांसाठी कोणताही दिवस नाही, तर महिलांसाठीच का. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा अर्थ आहे की आपण महिलांना कमजोर आणि मागास समजतो.

त्यांच्या या वाक्यावर खूप टाळ्या वाजल्या आणि गमतीची गोष्ट म्हणजे टाळ्या वाजवणारे बहुतांश पुरूषच होते. महिला थोड्या संभ्रमित आणि अचंबित होत्या की त्यांना कळत नव्हत की त्यांनी कोणत्या बाजूने असावे. त्या पुरुषांच्या बाजूने, जे हे मानत आहेत की महिलांना सर्व अधिकार आणि समानता मिळाली आहे की त्या तथ्याच्या बाजूने जे त्यांच्या जीवनाचे वास्तव आहे.

मागे आणि एकटे पडण्याच्या भीतीने, कमजोर मानले जाण्याच्या भीतीने, समूहात सामील न केले जाण्याच्या भीतीने अखेर त्या सर्व टाळ्या वाजवायला लागल्या. मात्र टाळ्या वाजवताना विचार करत होत्या की हे कधी आणि केव्हा झाले की त्या शेकडो वर्षांपासूनच्या मागास स्थितीतून निघून पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहिल्या.

कारण सत्य तर हे आहे की त्यांच्यापैकी 80 टक्के महिलांना आपल्या वडिलांच्या संपत्तीत कोणताही वाटा मिळाला नाही. संपूर्ण जमीन-संपत्ती, घर, बँकेतील शिल्लक आणि कुटुंबाच्या व्यवसायाचे उत्तराधिकारी त्यांचे भाऊच होते. (कुणी असेल तर जमीन आणि संपत्तीची आकडेवारी तपासून घ्या.)

अनेक वर्षे नोकरी, कार्यालयात चांगले काम केल्यानंतरही प्रमुख, सीईओ, एडिटर त्या बनू शकल्या नाही. नेतृत्वाच्या भूमिकेत नेहमी पुरूष होते आणि आजही आहेत.

महिलांनी घरातून निघून नोकरी करणे आणि घराच्या अर्थव्यवस्थेत योगदान द्यायला सुरुवात केली, मात्र घरातील कामांची जबाबदारी, मुलांच्या देखभालीची जबाबदारी, केअर गिव्हींगच्या जबाबदारीतून ती सुटली नाही.

पुरुषांच्या एकाधिकारशाहीच्या जागेत महिलांना किरकोळ वाटा मिळाला. मात्र स्त्रियांच्या एकाधिकार असलेल्या जागेत पुरुषांनी एक दिवस नाष्टा बनवून आणि एक दिवस मुलांना सांभाळून महान पुरुष झाल्याचा शिक्का मिळवला.

पुरुषांनी फक्त थोडा भलेपणा दाखवायची गरज असते आणि संपूर्ण समाज त्याला महानतेचे प्रमाणपत्र देण्यासाठी उडी घेतो. महिला आपली हाडे गाळून सेवा करू दे, काम करू दे, पण कुणीही हे म्हणत नाही की ती किती महान आहे. ती तर फक्त आपले काम करत आहे.

दैनंदिन जीवनाची ही कहाणी तर बदलली नव्हती, युएन वुमन, वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे आकडेही बदलले नाही. आश्चर्य म्हणजे काळानुसार ते वाढत आहे. हिंसेचा आलेखही वाढतच आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते की जगात प्रत्येक तिसरी महिला आपल्या आयुष्यात कधीतरी पुरूषाकडून बलात्कार आणि हिंसाचाराला बळी ठरते. दर चौथ्या मिनिटाला जगात एखादी स्त्री पुरूषाच्या हातून मार खात असते.

हे असे समजून घ्या की जितक्या महिलांना तुम्ही तुमच्या आयुष्यात ओळखतात, त्यापैकी प्रत्येक तिसऱ्या मुलीने आपल्या आयुष्यात हिंसेचा सामना केला आहे. खूप शक्यता आहे, काल रात्री घरात मार खाल्ला असेल आणि आज कार्यालयात मेकअप लावून आपल्या जखमा लपवत असेल.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो वाले सांगत आहेत की 2021 मध्ये 6589 मुलींची त्यांच्याच जवळच्यांनी हत्या केली. जवळचे म्हणजे पती, प्रियकर, वडील, भाऊ इत्यादी.

तरीही तुम्हाला वाटते की स्त्री-पुरुषात आता कोणताही फऱक नाही राहिला. सर्व समानता मिळाली आहे. आणि आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची गरज नाही, तर ती तुमची बौद्धिक दिवाळखोरी आहे.

सत्य तर हे आहे की आजही पूर्ण जगात पुरूष महिलांपेक्षा 40 पट जास्त पैसे कमावतात. अनपेड लेबरमध्ये महिलांचा वाटा 80 टक्के आहे. म्हणजेच ज्या महिला प्रेमाच्या नावे दिवसरात्र राबतात आणि त्याचा त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही.

जगातील 78 टक्के संपत्ती कार्यालयांतील कागदांवर पुरुषांच्या नावे आहेत. भारताच्या त्या राज्यांतही जिथे शेतात मेहनत स्त्री करते, पण मालकी हक्क पुरुषाचा असतो. जगातील असंघटित क्षेत्रात 70 टक्के लो पेड नोकऱ्या महिला करतात.

एकूणच महिला ती सर्व कामे करतात ज्यांचे श्रेय त्यांना मिळत नाही. ज्याचा पैसा त्यांना मिळत नाही. मिळत असल्यास पुरुषांच्या तुलनेत खूप कमी मिळतो. तरीही आपल्याला वाटते की आपण इंटरनॅशनल वुमन्स डे साजरा करण्याची गरज नाही. आता सुवर्णयुग आले आहे.

या संपूर्ण नॅरेटिव्हमध्ये तुम्हाला माहिती आहे का की आपला देश आणि समाजातील सर्वात मोठे संकट काय आहे. संकट हे नाही की महिला वंचित आहेत, मागास आहेत. संकट हे आहे की या देशातील महान बुद्धिजीवी वर्ग हे सत्य स्वीकारण्यास तयार नाही.

तुम्ही तुमच्या आसपास कोणत्याही मध्यमवर्गीय पुरुषाला एकदा या असमानतेविषयी बोलून बघा. प्रत्येक जण नाकारत राहतो. दावा करतो की या सर्व शतकांपूर्वीच्या गोष्टी आहेत. आता जग बदलले आहे.

जग कसे बदलेल, जेव्हा आपण सत्य स्वीकारणारच नसू. आपण आजार स्वीकारणारच नसू तर डॉक्टरकडे जाऊन उपचार कधी घेणार. आणि आजार बराही कसा होणार.

एक जुनी म्हण आहे ना, की झोपलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला काय जागे करणार.

तसे तर हे एक जागतिक संकट आहे. मात्र आपल्या देशातील सांस्कृतिक संकट खूप जास्त आहे की आपण नकारात जगत आहोत. आपण महिलांना समाजात, आयुष्यात, घरात, काम, कार्यालय आणि राजकारणात समान जागा देऊ शकत नाही आहोत. कारण आपण हे मान्य करण्यास तयार नाही की त्यांना समान जागा मिळालेली नाही.

अडचण ही नाही की असमानता दूर होत नाही. अडचण ही आहे की असमानता आपण स्वीकारायला तयार नाही. म्हणूनच आपण यावर उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवतो की आंतरराष्ट्रीय महिला दिनाची काही गरज नाही.

आपल्याला आंतरराष्ट्रीय महिला दिनाची गरज आहे. शेकडो वेळा ओरडून ओरडून हे सांगण्याची गरज आहे की आपल्याला याची गरज आहे. आपल्याला हे सांगण्याची गरज आहे की आजार आहे आणि उपचारांची गरज आहे. कुणी बोलत नसेल तर किमान महिलांनी तरी बोलण्याची खूप गरज आहे.

अखेर वडिलांच्या संपत्तीत मुलगी आपला अधिकार तर मागेलच. मुलालाच संपूर्ण संपत्ती थाळीत सजवून दिली जाणार नाही.

गोष्ट बरोबरीची सीरिजमधील ही बातमीही वाचा...

इंटरनेटवर महिला लिहा:बलात्काराच्या बातम्या अशा दिसतील, जसे की महिला या माणूस नसून एखादा क्राईम सीन आहे

बातम्या आणखी आहेत...