आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅलप वर्ल्ड पोलने 2012 ते 2021 दरम्यान एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये असे दिसून आले की जगभरातील महिलांना पुरुषांपेक्षा 6 टक्के जास्त राग येतो. भारत आणि पाकिस्तानमधील महिलांना जगातील इतर महिलांच्या तुलनेत दुप्पट राग येतो.
आज कामाच्या गोष्टीत आपण जाणून घेणार आहोत की महिलांमध्ये तणाव आणि राग येण्याचे कारण काय आहे? राग न्याय्य आहे की त्याचे काही दुष्परिणाम आहेत? राग व्यक्त करण्याचा योग्य मार्ग कोणता असू शकतो आणि संतप्त मन कसे शांत करावे?
प्रश्न 1- महिलांमध्ये अचानकच राग का वाढला?
उत्तर- तसे, महिलांना आधीपासूनच राग येतो. महिला कमी शिकलेल्या होत्या. कुटुंबातील पुरुषांवर अवलंबून होत्या. यामुळे त्यांना आपला राग उघडपणे व्यक्त करता येत नव्हता. व्यक्त होणाऱ्या महिलांबद्दल समाजाचे चांगले मत नव्हते.
आज परिस्थिती वेगळी आहे. गेल्या काही दशकांत महिलांनी शिक्षण घेतले, नोकरीसाठी घराबाहेर पडल्या आणि स्वावलंबी झाल्या. यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला. त्यांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे. यामुळेच आता स्त्रियांना आपल्या रागाच्या भावनेविषयी अपराधी वाटत नाहीत तर त्या व्यक्त होतात.
प्रश्न 2- नोकरी केल्याने महिलांना राग येतो का?
उत्तर- नाही, यामागील कारण नोकरी नसून असमानता आहे. आज महिलांना घराबाहेर स्वातंत्र्याची अनुभूती होते. पण घरी पुन्हा त्याच पुरुषप्रधान वातावरणाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत महिलांना राग येणे स्वाभाविक आहे.
ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर पुरुष पूर्णपणे रिलॅक्स होतात. पण स्त्रिया नेहमी घाईत दिसतील. कारण घरी गेल्यावर काय स्वयंपाक करायचा, मुलांचा अभ्यास होणार की नाही, याची चिंता त्यांना असते. या दुहेरी जबाबदारीमुळे त्या चिडतात आणि त्यांना राग यायला लागतो.
प्रश्न 3- वरील क्रिएटिव्हमध्ये बॉर्डर लाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा उल्लेख केला आहे, ते काय आहे?
उत्तर- खाली लिहिलेल्या मुद्द्यांवरून समजून घ्या...
प्रश्न 4- माणसांमध्ये रागाची भावना का निर्माण झाली?
उत्तर- लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर या 3 कारणांमुळे मानवामध्ये रागाची भावना निर्माण झाली-
प्रश्न 5- राग आणि तणावामुळे काय नुकसान होते?
उत्तर- रागामुळे केवळ मानसिक नुकसान होत नाही तर शरीराचेही नुकसान होते.
शारीरिक प्रभाव
मानसिक प्रभाव
प्रश्न 6- राग व्यक्त न केल्याने काय नुकसान होते?
उत्तर- पुरुषांनी राग व्यक्त केला तर तो न्याय्य आहे. तर महिलांच्या संतापाकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करण्यात आले. महिला जेव्हा कधी राग करायच्या तेव्हा त्यांना लज्जित करण्यात आले आणि सांगितले गेले की स्त्रिया असे करत नाहीत. त्यामुळे बहुतांश महिलांना राग व्यक्त करता येत नव्हता. त्यामुळे अनेकदा बघायला मिळते की, महिला राग आल्यावर रडतात.
राग व्यक्त करता न येणे ठीक नाही. यामुळे तणाव, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. याशिवाय निद्रानाश, चिंता आणि नैराश्य देखील होऊ शकते. जे लोक त्यांचा राग दीर्घकाळ धरून ठेवतात त्यांना नशील्या पदार्थांचा वापर, अति प्रमाणात खाण्यााच विकार किंवा त्यांचे वर्तन अधिक खर्चिक होऊ शकते.
प्रश्न 7- एखादी गोष्ट योग्य नाही, तुम्हाला त्यात सुधारणा करायची आहे पण कोणी ऐकत नाही. त्याचा राग येणार हे स्वाभाविक आहे. रागावून स्वतःचे नुकसान करण्यापेक्षा निषेध कसा नोंदवावा?
उत्तर- 'तु नेहमी असेच करतो...' ऐवजी 'मला राग येतोय कारण...' अशी वाक्ये वापरा. असे केल्याने समोरच्या व्यक्तीला आणि तुम्हाला रागाचे खरे कारण कळेल.
प्रश्न 8- रागावलेल्या मनाला तुम्ही कसे शांत करू शकता?
उत्तर- राग येणे सामान्य आहे आणि ते व्यक्त करण्यात काही गैर नाही. जेव्हा राग मर्यादेपलीकडे जातो तेव्हा समस्या उद्भवते. जर तुम्हाला काही काळ असे वाटत असेल की तुम्हाला जास्त राग येऊ लागला आहे. याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत काही गोष्टींकडे लक्ष देणे सुरू करा. जसे…
आता काही परिस्थितींमधून राग हाताळण्याचा योग्य मार्ग समजून घेऊ. जेणेकरून राग तुमच्यावर वरचढ ठरणार नाही आणि मानसिक शांती खराब न करता, तुम्ही तुमचे म्हणणे देखील मांडू शकाल.
परिस्थिती 1- माझे पती दररोज अंघोळीनंतर ओला टॉवेल बेडवर ठेवतात. मी अनेकदा सांगितले आहे. कोणताही परिणाम होत नाही. या गोष्टीचा राग येतो, त्याला काही फरक पडत नाही, त्याला कसे सामोरे जावे?
उत्तर- पती हे सवयीमुळे करतात. सवय सुधारण्याचे दोन मार्ग आहेत - पुरस्कार आणि शिक्षा. नवऱ्याने पलंगावर टॉवेल ठेवताच तुम्ही त्याच्यासमोर तो तिथून उचलून चिडचिड करत सुकायला टाकतात. याने त्याला काहीही फरक पडत नाही. त्याचे काम तुम्हीच करतात. उलट तुमचा राग वाढतो.
काय करावे- आठवडाभर तो ओला टॉवेल तुमचा नवरा पलंगावर ज्या बाजूने झोपतो त्याच्या बाजूला ठेवा. हवे असल्यास त्यांचे एक-दोन इस्त्री केलेले कपडेही तिथे ठेवता येतील. यामुळे पतीला हे समजेल की बेडवर टॉवेल ठेवणे योग्य नाही.
परिस्थिती 2: वारंवार मारहाण करूनही मुले अभ्यासाला बसत नाहीत, हे मी अनेकदा समजावून सांगितले आहे. ते रोज सॉरी म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच करतात. आता काय करू, मला राग येतो. कसे नियंत्रित करावे?
उत्तर- मुलांना मारहाण करू नका. त्यामुळे मुले धीट होतात. आपण काहीही केले तरी मार खावा लागेल असे त्यांना वाटू लागते. थोड्या वेळानंतर सर्व काही सामान्य होईल. म्हणूनच तुम्ही समजून घ्यायला हवे की, मारल्याने तुमचा राग वाढेल मुलांचा नाही.
काय करावे- मुलांशी मैत्री करा. ते अभ्यास करत असताना तुम्ही फोनचा वापर कमी करावा. त्यांच्याबरोबर खेळा, हँग आउट करा, उद्यानात जा. त्यांना कळेल की मम्मी फक्त मारत नाही, ती खेळते आणि फिरवतेही. मग ते सहज तुमच्या सल्ल्यानुसार अभ्यासाला बसतील. तुम्ही त्यांना बक्षिसे देखील देऊ शकता.
परिस्थिती 3 - मी कितीही प्रयत्न केले तरी माझ्या सासूबाई माझ्या कामातील उणीव शोधण्याचा कोणता तरी मार्ग शोधतातच. हे कसे हाताळू?
उत्तर- येथे हे समजून घेणे आवश्यक आहे की 60-70 वर्षे वयाच्या व्यक्तीने त्याच्या सवयी तयार केल्या आहेत आणि त्याला त्या बदलायच्या नाही. अशा परिस्थितीत सासू-सासऱ्यांशी कितीही भांडण केले किंवा समजावून सांगितले तरी त्यांना बदलणे अवघड असते. यामुळे तुम्हाला फक्त राग येईल आणि मानसिक शांतता भंग पावेल.
काय करावे- दिवसभर सासूकडे लक्ष देऊ नका. फक्त तुमचे जे काम आहे ते करा. जाणूनबुजून किंवा त्यांना त्रास देण्यासाठी कोणतीही चूक करू नका. यानंतर स्वतःसाठी सकारात्मक विचार करा. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत भावना शेअर करा. वाद टाळा कारण त्याचा काहीही परिणाम होणार नाही.
परिस्थिती 4 - ऑफिसमध्ये माझ्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा एखादा पुरुष कर्मचारी तेच काम करतो तेव्हा त्याचे कौतुक केले जाते. अशी विषमता पाहून निराशा येते. काय करायचं?
उत्तर- कार्यालयातील पुरुष कर्मचारी महिलांना चांगली वागणूक देत नाहीत किंवा त्यांच्या कामाला प्राधान्य देत नाहीत. त्यांच्या विचारसरणीमुळे ते हे करतात. वर्षानुवर्षे तयार झालेली ही विचारसरणी बदलणे कठीण आहे.
काय करावे - वाद घालून उपयोग होणार नाही. तुमच्या कामाचे श्रेय इतरांना देऊ नका. जोपर्यंत ते खूप गंभीर नाही तोपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करा. जर गोष्ट मर्यादेपलीकडे गेली असेल तर मोठ्या आवाजात आपली बाजू मांडा, गरज पडल्यास योग्य ठिकाणी तक्रार करा.
जाता-जाता
भारतातील महिला दुप्पट रागीट(पूर्ण बातमी वाचा)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.