आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॅचलर्स, सिंगलहूड, सोलोगमी, सिंगल वूमन असे शब्द आता ट्रेंडिंग होत आहेत. या सर्व ट्रेंडमध्ये युवकांचे सिंगल राहणेही वाढत आहे. युवकांचा लग्नाविषयी मोहभंग होत आहे. आता लग्नगाठ तरुण पिढीला बंधन का वाटत आहे? मुलींमध्येही सिंगल राहण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. युवकांची सिंगल राहण्याची विचारसरणी आई-वडिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जपानसारख्या देशात सरकारसाठी हे चिंतेचे कारण ठरत आहे.
युवकांचे लग्नावरून मन उडणे समाजातील चर्चेचा विषय आहे. या ट्रेंडविषयी युवकांची सिंगल शेमिंगही खूप होत आहे. यापूर्वी समजून घेणे गरजेचे आहे की ही टर्म कोणत्या विचारसरणीतून आली आहे.
युवकांनी सेटल न झाल्याने होते 'सिंगल शेमिंग'
'बॉडी शेमिंग' हा शब्द तुमच्या कानावर कधीतरी आला असेलच. यात कोणत्याही व्यक्तीला त्याच्या शरीराचा आकार आणि वजनामुळे कमी लेखले जाते. समाजात महिलांसोबत हे जास्त होते.
आता या टोमण्यांत एक नवा शब्द जोडला गेला आहे. 'सिंगल शेमिंग'. कोणतेही लग्न किंवा कौटुंबिक समारंभात महिला आणि नातेवाईक सिंगल मुलगा किंवा मुलगी दिसताच लग्न न करण्याचे कारण विचारू लागतात. अरे तु अजून लग्न केले नाही? बघ त्याला मुले झाली. लग्न करून घे, नाहीतर चांगला मुलगा मिळणे कठीण होईल. एकूणच तुम्हाला लग्न न करणे आणि सिंगल राहिल्यावर दिला जाणारा सल्ला 'सिंगल शेमिंग' असते.
2011 च्या जनगणनेनुसार भारतात 7.14 कोटी सिंगल वूमन आहेत. यात अविवाहित, विधवा, घटस्फोटीत सर्वांचा समावेश आहे. वर्ष 2001 मध्ये ही संख्या 5.12 कोटी होती. 2001 ते 2011 दरम्यान हे प्रमाण 40 टक्क्यांनी वाढले.
मुली आता विचार करतात की, 'लग्नानंतर त्यांना काय मिळत आहे'
'स्टेटस सिंगल' कम्युनिटीच्या संस्थापक श्रीमई पियू कुंडूंनी देशाच्या शहरांतील महिलांच्या लग्नाविषयी बदलत्या विचारसरणीवर स्टेटस सिंगल नावाने पुस्तकही लिहिले आहे. यात त्या म्हणतात की, महिला आता स्वतःच्या निर्णयाने आणि परिस्थिती दोन्हींमुळे सिंगल राहणे पसंत करत आहेत. मुलींची सहनशक्ती आधीपेक्षा कमी झाली आहे. कारण त्या पिढ्यानपिढ्यांपासून सुरू असलेला त्रास, जो त्यांनी आपल्या आसपासच्या महिलांना झेलताना पाहिले आहे, ते त्यांना कळू लागले आहे आणि त्या स्थितीतून जाण्याची त्यांची इच्छा नाही. स्टेटस सिंगल कम्युनिटीसोबत विधवा, घटस्फोटित, अविवाहित शहरी मुली आणि महिला जोडलेल्या आहेत. त्या सांगतात की या घटकाला लग्न करायचे नाही किंवा पुन्हा लग्नबंधनात अडकायचे नाही. याचे कारण लग्नानंतर त्यांच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या, असमानता सहन करू शकत नाही. महिलांना हेही वाटते की बिग फॅट इंडियन वेडिंगचा परिणाम महिनाभर चांगला राहतो. नंतर जीवन दैनंदिन कामे आणि जबाबदाऱ्यांनी भरून जाते. सामान्य लोकांना वाटते की विवाहित जोडप्यांत खूप रोमान्स होतो. पण लग्नानंतर सेक्स केवळ एक ड्युटी बनून जाते. नंतर मूल जन्माला घातल्यावर त्याच्या संगोपनाची जबाबदारीही महिलेवर येते.
महिला आता हे बघत आहेत की लग्नात त्यांना काय मिळत आहे? सामाजिक सुरक्षेपेक्षाही त्या भावनिक सुरक्षा आणि शारीरिक तृप्तीला प्राधान्य देत आहेत. आपल्या पायांवर उभे राहिल्याने त्या आपल्या आवडीचे नाते निवडतात. याविषयी त्या आता कचरत नाही. सिंगल स्टेटसच्या महिला प्रत्येक विषयावर त्यांचे मत स्वतः बनवतात आणि त्यावर कायम राहतात. जे त्यांचे व्यक्तिमत्व मजबूत बनवते. हेच कारण आहे की, लग्नासारख्या व्यवस्थेला त्या रिजेक्ट करत आहेत. मुली रिथिंक आणि रिजेक्ट मोडमध्ये आहेत.
मुली सिंगलहूडच्या दिशेने का जात आहेत?
गेल्या वर्षी जुलैमध्ये मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेन्टेशनचा एक अहवाल आला. यात सांगण्यात आले की देशात अविवाहित युवकांची संख्या वाढली आहे. 2011 मध्ये अविवाहित युवकांचे प्रमाण 17.2 टक्के होते. 2019 मध्ये ते वाढून 23 टक्के झाले. तर विवाहापासून कायम दूर राहण्याची इच्छा असलेल्या पुरुषांची टक्केवारी 2011 मध्ये 20.8 टक्के होते. ते आता 26.1 टक्के झाले आहे. महिलांमध्येही ही टक्केवारी वेगाने वाढली आहे. कधीही विवाह न करण्याचा विचार असलेल्या महिला 2011 मध्ये 13.5 टक्के होत्या. 2019 पर्यंत त्या 19.9 टक्के झाल्या.
दोन दशकांत भारतात घटस्फोट घेऊन सिंगल राहणे पसंत करत आहेत महिला
गेल्या वर्षी केरळ हायकोर्टाने घटस्फोटाच्या एका याचिकेवर सुनावणी करताना म्हटले की, युझ अँड थ्रो संस्कृतीने लग्न आणि नात्यांवर वाईट परिणाम केला आहे. कोर्टाने हेही म्हटले, हल्लीचे युवक आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढत आहेत. आधी वाईफ (WIFE) चा अर्थ Wise Investment For Ever असायचा. आजची युवा पिढी याच्याकडे Worry Invited For Ever या दृष्टीने पाहते.
अशीच स्थिती शेजारील पाकिस्तानचीही आहे. तिथे आता पुरुषांच्या तुलनेत महिला घटस्फोटासाठी पुढाकार घेत आहेत. 2019 मधील गॅलप आणि गिलानीच्या एका सर्व्हेत तिथल्या लोकांनी मान्य केले की, एका दशकात घटस्फोटाची प्रकरणे 58 टक्क्यांनी वाढली आहेत. वाढत्या प्रकरणांमुळे परिस्थिती अशी आले की तिथल्या कौटुंबिक कोर्ट आणि न्यायाधीशांची संख्या वाढवली जात आहे.
अमेरिकन सोशोलॉजी असोसिएशनच्या संशोधनाशिवाय अनेक संशोधनांचा हा दावा आहे की अमेरिकेतील 70 टक्के घटस्फोटाच्या प्रकरणांत महिला पुढाकार घेतात.
शिक्षण, करिअर आणि स्वतःच्या मनानुसार जीवन जगण्याला मुलींचे प्राधान्य
श्रीमई सांगतात, चित्र कधीपासून आणि कसे बदलायला लागले हे समजून घेणे गरजेचे आहे. जुन्या काळात मुली विवाहाच्या आधी वडील आणि विवाहानंतर पतीवर अवलंबून असायच्या. शिकलेल्या मुली आपल्या अधिकारांविषयी जागृत झाल्या आहेत. आता त्या शिक्षण, करिअर आणि आपल्या मनाने जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात. आपल्या देशात लग्नानंतर मुलींचे जीवन 360 अंशांत बदलते. मुली आता तो दबाव आणि वेदनादायी विवाहात अडकू इच्छित नाही.
आपल्या पुरुषप्रधान समाजात महिलांची स्थिती कशी आहे, ते तुम्ही राष्ट्रीय महिला आयोगाच्या एका अहवालातून समजून घ्या. आयोगाच्या पोर्टलवर गेल्या वर्षात दाखल झालेल्या तक्रारींपैकी 31 टक्के महिलांनी सन्मानासह जीवन जगण्याच्या अधिकारानुसार तक्रार दाखल केली होती.
महिला घड्याळाच्या काट्याप्रमाणे 24 तास फिरू इच्छित नाही
डेटिंग अॅप बम्बलने सिंगल वूमन्सचा एक सर्व्हे केला होता. यात 81 टक्के महिलांनी सिंगल राहण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले होते. बम्बलच्या या सर्व्हेत 39 टक्के महिलांनी मानले की दबावात राहण्याच्या अनुभवामुळे त्यांची लग्न करण्याची इच्छा नाही. सिंगल राहणे त्यांना अनेक चिंतांपासून मुक्त करते. तुम्ही या दबावात नसता की लवकर उठावे लागेल, उशीरा घरी जाण्याबद्दल विचार करावा लागेल, किंवा आज काय जेवण बनवायचे? महिलांना आता घड्याळाच्या काट्याप्रमाणे 24 तास फिरू इच्छित नाही. पन्डेमिकदरम्यान असेच झाले होते. महिला जितके काम करतात, त्यांना त्याच्या दुप्पट काम करावे लागत होते. तर पुरुषांवर मात्र हा दबाव नव्हता.
विवाहाविषयी भारतात काय बदलले आहे?
गेल्या काही वर्षांत युवकांचा लग्नाविषयी मोहभंग झाला आहे. आता त्यांच्या जीवनाच्या प्लॅनिंगमध्ये लग्न दूर-दूरपर्यंत दिसत नाही. दीनदयाल उपाध्याय विद्यापीठ, गोरखपूरमधील समाजशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक दीपेंद्र मोहन सिंह सांगतात, युवकांचा लग्नाविषयी मोहभंग होण्यामागे सर्वात मोठे कारण योग्य जीवनसाथी न मिळण्याची भीती आहे. सोबत आर्थिक असुरक्षितताही. युवक लग्नाऐवजी डेटिंग आणि लिव्ह इन रिलेशनशीपला पसंती देत आहेत.
अलिकडेच देशात सोलोगमीची प्रकरणेही समोर आली आहेत. हल्लीच्या युगात वैवाहिक नात्यांत जबाबदाऱ्यांऐवजी अधिकारांवर जास्त भर आहे. जेव्हा जबाबदाऱ्यांची गोष्ट येते तेव्हा दोघेही कचरतात आणि आपल्या अधिकारांविषयी जास्त प्रखर होतात. हल्लीच्या स्थितीत पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढला आहे. युवक आपला खिसा पाहून गरजा आधी पूर्ण करू इच्छितात. म्हणूनच ते लग्नाच्या ओझ्यापासून दूर राहू इच्छितात. ते आपल्या भावनिक आणि शारीरिक गरजा लग्नाशिवाय पूर्ण करतात.
वाईट लग्नात राहण्याचे कारण काय आहे?
मिझोराममध्ये धर्म परिवर्तन, नोकरीमुळे प्रवास, पश्चिम बंगालमध्ये कौटुंबिक हिंसाचार, परित्याग, गुजरातमध्ये धोका आणि हुंडा ही घटस्फोटाची मुख्य कारणे आहेत. तर उत्तर भारतातील राज्यांत घटस्फोटाची प्रकरणे कमी बघायला मिळतात. युपी, बिहार, राजस्थान, हरियाणात लग्न कसेही असले तरी ओढले जाते आणि घटस्फोटापासून वाचले जाते. विशेषतः महिला. यामागे सर्वात मोठे कारण पुरुषप्रधान संस्कृती हे आहे. महिलांचे स्वतःच्या पायावर उभे नसणे आणि कोणताही पाठिंबा न मिळणेही त्यांना वाईट लग्नात राहण्यात मजबूर करते. एनसीडब्ल्यूचा 2022 चा अहवाल सांगतो की त्यांच्या पोर्टलवर महिलांकडून मिळणाऱ्या तक्रारींपैकी अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजेच 55 टक्के युपीतील, 10 टक्के दिल्ली आणि 5 टक्के तक्रारी महाराष्ट्रातून होत्या. युपीत महिलांनी भलेही सर्वाधिक तक्रारी असतील, मात्र घटस्फोटाचे प्रमाण त्यांच्यात कमी आहे.
कोर्टाची टिप्पणी आणि तुटणाऱ्या लग्नांमागे कारण काय असू शकते, खरेच आजचे युवक जबाबदारी उचलू इच्छित नाही का?
लग्न न करण्याचे कारण कमिटमेन्ट-अॅडजस्टमेन्टमध्ये घट
गेल्या काही दिवसांत घटस्फोटाची अशी अनेक प्रकरणे चर्चेत आली ज्यात बायको जेवणात केवळ मॅगी बनवायची, पतीची जास्त सेक्सच्या इच्छा, तर कुणाला तक्रार होती की पती अंघोळ करत नाही. ही अशी कारणे आहेत, जी परस्पर समजुतीने सोडवली जाऊ शकली असती. मात्र प्रकरण कोर्टापर्यंत गेले. अशा प्रकरणांवर जामिया मिलिया इस्लामियातील सोशोलॉजीचे प्राध्यापक इम्तियाज अहमद म्हणतात की, चुकीच्या लग्नात कुणीही राहिले नाही पाहिजे. मात्र लग्न कोणत्या कारणामुळे चालते आणि ते मोडण्याचे कारण काय हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. लग्न न करण्याचे कारण आहे - कमिटमेन्ट आणि अॅडजस्टमेन्मटधील घट आणि आर्थिक स्वातंत्र्य.
जर पती-पत्नी दोघांच्याही मनात ही गोष्ट असेल की आपण एकट्याने जीवन व्यतीत करू शकतो आणि विशेषतः आर्थिक बाबतीत स्वावलंबी आहे, तर त्यांच्यासाठी लग्न ही गरज राहत नाही. हाच विचार लग्न न करण्याचेही कारण बनत आहे.
वाईट लग्नामुळे होत असलेल्या आत्महत्यांविषयीही युवकांमध्ये भीती
रिलेशनशीप कोच सिद्धार्थ एस कुमार म्हणतात की, लग्न मोठा निर्णय असतो. वाईट लग्नात कुणीही राहू इच्छित नाही, कारण लोकांना आपल्या आसपास वाईट विवाहामुळे आत्महत्येच्या घटना दिसत आहेत. ज्या त्यांना हा विचार करण्यास प्रवृत्त करतात की लग्न करावेही आणि करूही नये. करिअरमुळे त्यांच्यात आत्मविश्वास येतो की त्या एकट्या राहू शकतात. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2016-2020 पर्यंत भारतात अपघाती मृत्यू आणि आत्महत्येच्या प्रकरणांत वाईट लग्नामुळे 37 हजारहून जास्त लोकांनी आत्महत्या केली.
प्रा. अहमद सांगतात की, आधीच्या तुलनेत घटस्फोटाची प्रकरणे वाढली आहेत आणि पुढेही वाढतील. भारतात सिंगल वूमनची लोकसंख्या 7.5 कोटी आहे. हेही वाढेल. असे असूनही बिग फॅट इंडियन वेडिंगही कामय राहील.
मात्र, महिलांचा व्यक्तिवाद, आर्थिक स्वातंत्र्य, परस्पर सहनशीलतेची कमी, महिला-पुरुष दोघांतील इगो, जुन्या मान्यता आणि मूल्ये आजच्या स्थितीत टिकत नसल्याने युवकांचा लग्नाविषयी मोहभंग होत आहे. मात्र हा विचार चुकीचा आहे. हेच कारण आहे की 90 टक्के युवकांचा आजही लग्नावर विश्वास आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.