आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला दिन विशेष:21 अद्‌भुत महिला, ज्यांनी जिंकण्याची जिद्द दाखवली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२०२० चे वर्ष. जग थांबलेले होते तेव्हा महिला आघाडीवर होत्या. घरात, कार्यालयांत...गृहिणी, कुठे नर्स, कुठे शिक्षकाच्या रूपात, तर कुठे वैज्ञानिकांच्या रूपात आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत होत्या. ‘दिव्य मराठी’ला असे वाटते की, जगातील प्रत्येक स्त्री अद्भुत आहे. कोणत्या ना कोणत्या रूपात त्या आदर्श उदाहरण आहेत....आपल्याला प्रेरणा देणाऱ्या अशा २१ भारतीय महिलांविषयी आज महिला दिनानिमित्त ...!

भव्या लाल : नासाच्या नव्या प्रमुख, अमेरिकन अंतराळ मोहिमेचे कार्य
भारतात जन्मललेल्या, वाढलेल्या भव्या लाल जगातल्या सर्वात मोठ्या अंतराळ संस्था नासाच्या मुख्य कार्यवाहक आहेत. त्या नासाच्या कामाची रणनीती ठरवतील. सध्याच्या दिवसात त्या रोज १० ते १४ तास काम करत आहेत. त्यांचा प्रत्येक दिवस फोनवर दीर्घ वेळ सुरू असणाऱ्या बैठकीत जात आहे.

कसे केले - भव्या यांचे शालेय शिक्षण भारतात झाले. १२ वी नंतर न्यूक्लिअर इंजिनिअरिंगसाठी अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये गेल्या. त्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. ‘एमआयटी’मध्ये त्यांचे पहिले वर्ष इंग्रजी शिकण्यात गेले. नंतर त्यांनी तिथूनच तंत्रज्ञान व धोरण प्रवाह विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. द जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरण व लोकप्रशासनात पीएच.डी. केली. जगातील टॉप जर्नल्समध्ये ५० हून अधिक पेपर प्रसिद्ध झाले आहेत.

किशोरी पेडणेेकर : मुंबईच्या महापौर नर्स, नर्स होत कोरोनाशी लढले युद्ध
एप्रिल २०२० मध्ये मुंबई कोरोनाची लाट तीव्र होती तेव्हा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर नायर रुग्णालयात नर्सची जबाबदारी सांभाळण्यासाठी पोहोचल्या होत्या. ५७ वर्षांचे वय असल्यामुळे किशोरी दोन दिवसच नोकरी करू शकल्या, पण त्यांच्या सेवाभावाने इतरांना प्रेरणा दिली.

कसे केले - १९९२ मध्ये शिवसेनेत येण्यापूर्वी किशोरी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये एक दशकापेक्षा जास्त काळ नर्स होत्या. मुंबईच्या ७७ व्या महापौर असलेल्या किशोरी सकाळी ८ पासून रात्री २ वाजेपर्यंत काम करतात. त्या म्हणतात की, त्यांचे प्राधान्य शहर स्वच्छ व सुरक्षित करण्यास असेल. मुंबई महापालिकेला प्रसारमाध्यमांशी बोलायचे असेल किंवा शिवसेनेची बाजू मांडायची असेल तेव्हा किशोरी याच पक्षाचा आवडता चेहरा असतो.

आर्या राजेंद्रन : सर्वात तरुण महापौर : महिला सुरक्षेला प्रथम प्राधान्य
डिसेंबर २०२० मध्ये केरळची राजधानी तिरुवनंतपुरमच्या महापौर झाल्या. त्या देशातील सर्वात तरुण महापौर आहेत. माकपच्या या नेत्याचे प्रथम प्राधान्य आपले शहर महिलांसाठी सुरक्षित बनवणे आहे. स्वच्छतेबाबतीतही त्यांना नवे मानक त्यांना स्थापन करायचे आहे.

कसे केले - आर्या यांचे मध्यमवर्गीय कुटुंब भाड्याच्या घरात राहते. वडील इलेक्ट्रिशियन, आई एलआयसी एजंट आहे. आर्या केरळ राज्य समितीच्या सदस्य आहेत. ही समिती स्थानिक प्रशासनाचे सामूहिक स्वयंपाकघर, संकटकालीन औषधोपचार, जनजागृती उपक्रम राबवण्यात मदत करते. पालिका निवडणुकीत त्यांनी कॉँग्रेसच्या विरोधकाला ५४९ मतांनी पराभूत केले. पक्षाने ज्येष्ठ नेते ६५ वर्षीय जमीला श्रीधरन यांच्याऐवजी आर्या यांची महापौरपदी निवड केली.

दिव्या गोकुलनाथ : एज्युकेशन इनोव्हेटर, सर्वात मोठे शैक्षणिक अ‍ॅप दिले
बायजूज लर्निंग अॅपच्या सहसंस्थापक दिव्या गोकुलनाथ फक्त ३४ वर्षांच्या आहेत. फोर्ब्ज इंडियाच्या २०२० च्या श्रीमंताच्या यादीमध्ये पती बायजू रवींद्रन यांच्यासह त्या ४६ व्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती २२.३ हजार कोटी रुपये आहे. अॅप लॉँच केल्यानंतर फक्त सहा वर्षांत त्यांनी हे स्थान पटकावले आहे.

कसे केले - पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी दिव्या यांना परदेशात जायची इच्छा होती. त्यासाठी ‘जीआरई’ पास होणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी बायजू रवींद्रन यांचे क्लासेस सुरू केले. परीक्षेनंतर रवींद्रन यांनी अध्यापनात येण्याचा सल्ला दिला. दिव्या तेव्हा २१ वर्षांच्या होत्या. त्यांनी रवींद्रन यांच्या क्लासमध्ये शिकवणे सुरू केले. पण, बहुतांश विद्यार्थी त्यांच्या वयाचे होते. त्यांच्यापेक्षा मोठे दिसावे म्हणून त्या साडी नेसायच्या. ‘जीआरई’ पास होऊनही त्यांनी अमेरिकेला न जाण्याचा निर्णय घेतला.

अरुंधती काटजू : १५८ वर्षे जुना कायदा बदलायला लावला
समलैंगिक संबंध गुन्हे मानणारे कलम ३७७ संपवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १५८ वर्षे जुना कायदा रद्द करावा यासाठीच्या नवतेज सिंह जौर विरुद्ध भारत संघ याचिकेत त्यांनी न्यायालयात बाजू मांडली. एप्रिल २०१० मध्ये टाइम मॅगझिनने अरुंधती यांचा जगातील १०० प्रभावशाली चेहऱ्यांमध्ये समावेश केला.

कसे साध्य केले - अरुंधती सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्या भाची आहेत. २००५ मध्ये बीएएलएलबीनंतर त्यांनी ११ वर्षे वकिली केली. २०१७ मध्ये कोलंबिया लॉ स्कूलमधून एलएलएम केले. अरुंधती एलजीबीटीच्या हक्कासाठी लढतात. त्यांनी आपल्या नात्याबद्दल उघड सांगितले. २०१९ मध्ये त्यांनी मेनका गुरुस्वामी बरोबरचे नाते स्वीकारले.

रितू कारिधाल : देशाची रॉकेट महिला, चांद्रयान-२ चे लक्ष्य निश्चित केले
इस्रोमध्ये त्यांची भूमिका यंत्र डिझाइन करण्याची आहे. रितू यांनी चांद्रयान २ चे लक्ष्य कसे साध्य करायचे हे ठरवले. त्या चांद्रयान - २ मोहिमेच्या निदेशक होत्या.

कसे साध्य केले - लखनऊ येथील निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांनी अभ्यास, स्वयंप्रेरणेवर भर दिला. लहानपणापासूनच इस्रो आणि नासाशी संबंधित प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे कापून त्या जवळ ठेवायच्या. लखनऊ विद्यापीठातून त्यांनी फिजिक्समध्ये बीएस्सी व नंतर एमएस्सी केले. रितू म्हणतात, यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन गरजेचे आहे. हे शिस्तीमुळेच जमू शकते.

राधा वेंबू : जोहो मेलचेे ६ कोटी युजर्स
राधा वेंबू या स्वबळावर श्रीमंत झालेल्या महिलांपैकी एक आहेत. हुरूनच्या २०२० च्या स्वबळावर श्रीमंत झालेल्या महिलांच्या यादीत ६० व्या क्रमांकावर होत्या.

कसे साध्य केले- मद्रास उच्च न्यायालयातील स्टेनोग्राफर सम्बामूर्ती वेंबू यांची मुलगी राधा वेंबू यांना ‘अदृश्य’ सेल्फ मेड बिलेनिअर म्हटले जाते. कारण त्या प्रसारमाध्यमांपासून दूर असतात. १९९७ मध्ये आयआयटी मद्रास येथून पदवी घेतल्यानंतर २००७ मध्ये मोठा भाऊ श्रीधर वेंबू यांच्या जोहो कॉर्पोरेशनमध्ये नोकरी सुरू केली. त्यांनी कार्यभार घेतल्यानंतर कंपनीने चकित करणारी प्रगती केली. त्यात कंपनीची ४५ पेक्षा अधिक उत्पादने व प्रकल्प पाहतात. जोहोचे ६ कोटी वापरकर्ते आहेत.

मानसी जोशी : पॅरा बॅडमिंटन चॅम्पियन, कृत्रिम पायाच्या मदतीने पुनरागमन
मानसी ही पॅरा बॅडमिंटनची वर्ल्ड चॅम्पियन आहे. २०२० च्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘टाइम’कडून नेक्स्ट जनरेशन लीडरच्या यादीत समावेश.

कसे साध्य केले- वयाच्या ६व्या वर्षापासूनच मानसीने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. २०११ मध्ये ट्रक अपघाताने मानसीचे आयुष्य बदलले. जीव वाचवण्यासाठी १२ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तिचा पाय कापावा लागला. अशा अवघड परिस्थितीतही तिने खेळासोबत नाते टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला. चार महिन्यांनी कृत्रिम पाय लावून ती खेळाच्या मैदानात परतली. केले. २०१४ मध्ये एक व्यावसायिक खेळाडू बनली. गोपीचंद अकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. बार्बी कंपनीने मानसीला समर्पित एक बार्बी डॉल लाँच केली.

अपर्णा कुमार : सात सर्वोच्च शिखरे सर केली, चमोलीची बचावकर्ती
उत्तराखंडच्या चमोलीतील आपत्तीच्या बचावकार्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. सात महाद्वीपांचे सर्वोच्च शिखर चढणाऱ्या पहिल्या सरकारी अधिकारी.

कसे साध्य केले- २०१२ मध्ये ते उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे नवव्या बटालियन पीएसईमध्ये कमांडंट म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. १९९२ पर्यंत आयटीबीपीची २० हजार फूट उंची असलेले बॉर्डर आउटपोस्ट या बटालियनजवळ असायचे. या बटालियनमध्ये पर्वतारोहणात वापरलेली १९६५-७०च्या दशकातली उपकरणे पाहून त्यंाना पर्वतारोहणात रस निर्माण झाला. यानंतर त्यांनी रजा घेऊन प्रशिक्षण घेतले. कर्नाटकात जन्मलेल्या अपर्णा यांना पर्वतारोहण किंवा अॅडव्हेंचरचा कोणताही अनुभव नव्हता.

बातम्या आणखी आहेत...