आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Women's Day Special Survey Equality, Respect Supreme; More Than 90% Of Men And Women Agree On Two Things In A Woman's Mind

महिला दिन विशेष:समानता, आदर सर्वोच्च स्थानी; स्त्रीच्या मनातील दोन बाबींवर 90% हून अधिक स्त्री-पुरुषांचे एकमत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्त्री व पुरुषांचे विचार समान ...तरीही समाजात असमानता का?

स्त्री ही गृहिणी असो की नोकरदार, तिच्या आयुष्यातील प्रत्येक्ष क्षण तिची मुलं, कुटुंब आणि स्वकीयांसाठी समर्पित असतो. महिलादिनी प्रथमच भास्करने महिलांना विचारले की, देश-विदेशात, समाज आणि कुटुंबाकडून ५ सर्वात मोठ्या अपेक्षा काय व ५ सर्वात मोठ्या चिंता कोणत्या आहेत. आम्ही पुरुषांना विचारले की, महिलांच्या भल्यासाठी सर्वात महत्त्वाची ५ पावले कोणती असावीत.

आमचा उद्देश केवळ स्त्रियांच्या चांगल्या आयुष्यावर लोकांची मते अजमावणे नव्हते. या मुद्द्यावर पुरुष व स्त्रियांच्या विचारातील फरकही पाहू इच्छित होतो. निष्कर्ष आशादायक आहेत. ९२% महिलांची सर्वात मोठी अपेक्षा रोजगाराच्या समान संधी व सर्वात मोठी चिंता घर-समाजाचा आदर प्राप्त करणे आहे. ९५% पुरुषांनीही मान्य केले की, समानता , आदरच महिलांचे आयुष्य सुधारू शकतो.

स्त्री-पुरुषांच्या विचारातील ही समानता सामाजिक व्यवहारात दिसत नाही, हे आश्चर्यकारक आहे. समानता आणि आदरभावाचा दृष्टिकोन समाजात पाझरल्यास स्त्रीची प्रगती कोण रोखू शकेल? सर्वेक्षणातील स्त्रियांचे स्पष्ट विचार समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचवण्याचा दैनिक भास्करचा प्रयत्न आहे.

महिला सर्व्हे : स्त्रीकडूनच जाणून घ्या...काय आहे तिची ‘मन की बात’
5 सर्वात मोठ्या अपेक्षा: समानता, शिक्षण, आरोग्य, पैसा, समृद्धी

स्त्रीची प्रत्येक अपेक्षा, प्रत्येक स्वप्नासोबत कुटुंबाच्या प्रगतीशी जोडलेली दिसते. स्वत:साठी जास्त अधिकार व आर्थिक स्वातंत्र्य तिला हवे आहे. तिला कौटुंबिक आरोग्य व समृद्धीही पाहिजे.

1. समानता ही सर्वात मोठी अपेक्षा
मला बरोबरीचा हक्क मिळावा...स्वत:चे भविष्य घडवण्यासाठी केवळ नोकरीच्या संधीतच नव्हे तर कार्यालय, घर-समाज प्रत्येक ठिकाणी मला कमी लेखू नये.

2. शिक्षणच यशाची शिडी
मला/माझ्या मुलांना, शिक्षणाची पूर्ण संधी मिळावी. समाजाने हे समजून घ्यावे की, मुलींचे शिक्षण जास्त आवश्यक आहे. चांगल्या शिक्षणातून माझे/मुलांचे आयुष्य सुखकर होईल.

3. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करणे स्वप्नवत
मी माझ्या स्वप्नांची किंमत स्वत: उचलू इच्छिते. कुणावर अवलंबून राहू नये,यासाठी माझे स्वस्त:चे बँक बॅलन्स असावे. माझे निर्णय स्वत: घेण्याचे स्वातंत्र्य मिळावे.

4. कौटुंबिक समृद्धी आवश्यक
माझे कुटुंब समृद्ध राहावे. पतीला नोकरीत त्रास नसावा आणि मुलांचे शिक्षण चांगले व्हावे. सर्वांची प्रगती व्हावी, सर्व एकोप्याने राहावीत. कुटुंबात दुफळी होऊ नये.

5. सर्व निरोगी, कुणाला आजारपण नको
देश आणि जगाची महारोगराईतून सुटका व्हावी. माझी मुले सुरक्षित राहावीत. माझे कुटुंब निरोगी राहावे, कुणावरही कधी त्रासदायक आजारपण ओढवू नये.

5 सर्वात मोठ्या चिंता : आदर, सुरक्षा, हुंडा, महागाई व संधी
आदरासह स्त्रीची सर्वात मोठी चिंता सुरक्षेची आहे. गुन्हेगारांपासूनच नव्हे तर तिला हुंडा-कौटुंबिक हिंसाचारापासून सुरक्षा हवी. गृहिणींची चिंता म्हणजे, अर्थव्यवस्थेत योगदान देऊन मिळत काही नाही.

1. स्त्री सन्मान सर्वात आवश्यक
मला माझ्या कुटुंबात व समाजात आदर कधी मिळेल. मी घरात काम करो की नोकरी करत असू, प्रत्येक ठिकाणी माझा योग्य सन्मान होत नाही. अखेर लोकांचा दृष्टिकोन कधी बदलणार.

2. सुरक्षा ही स्त्रीची दुसरी चिंता
मी/माझ्या मुलीस कधी सुरक्षित वाटेल. रात्री मी रस्त्यावर असुरक्षित आहे तर घरात आपल्या लोकांतही सुरक्षित कुठे आहे. मुलींबाबत होणाऱ्या गुन्ह्यांना आळा कधी बसेल.

3. हुंड्याच्या राक्षसाची अद्यापही चिंता
हुंड्याची प्रथा कधी संपणार. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे कधी थांबतील. निरोगी विवाहाचा अर्थ समाजाला कधी कळणार. मला/ मुलीला हुंडा नाकारणारा जोडीदार कधी मिळेल.

4. अखेर महागाई कधी कमी होईल
स्वयंपाकाच्या गॅसची किंमत कधी कमी होईल. पेट्रोल-डिझेलपासून भाज्यापर्यंत भाववाढ होत आहे. महागाई कधी कमी होईल. मी आपला घरखर्च कसा चालवू.

5. गृहिणींना सुविधा का नाहीत
मी गृहिणी आहे, मला बँकेकडून कर्जासारखी सुविधा का मिळत नाही. सरकार नोकऱ्यांचे आश्वासन देते, मात्र २४ तास काम करणाऱ्या गृहिणींना अर्थसंकल्पातून काय मिळते.

पुरुषही याच विचाराचे
पुरुष सर्व्हे : महिलांच्या सुखकर स्थितीसाठी पुरुषांच्या दृष्टिकोनातून आवश्यक ५ बाबी-

महिलांच्या सुखकर स्थितीबाबत पुरुषांचे विचार हे महिलांप्रमाणेच आहेत, हे एक सुखद आश्चर्य आहे. पुरुषही समानता, हक्क, सुरक्षा, शिक्षणाला प्रोत्साहन आणि हुंड्यासारख्या सामाजिक कुप्रथा संपण्यावर भर देत आहेत.

1. समानतेची संधी देणे सर्वात आवश्यक
नोकऱ्यांत समान संधीपासून वडिलोपार्जित संपत्तीत महिलांना समान हक्क देणे सर्वात आवश्यक आहे. यासाठी सरकारने कायद्यासोबत त्याची कडक अंमलबजावणीही करावी.

2. महिलांच्या सुरक्षेसाठी आदर आवश्यक
अत्याचाराच्या गुन्ह्यांवर कठोर कायदे व्हावेत. सर्वात आवश्यक पुरुषांचा दृष्टिकोन बदलणे. प्रत्येक महिलेचा आदर करण्यास मुलांना लहानपणापासून शिकवले पाहिजे. यातून बदल शक्य.

3. मुलींचे उच्च शिक्षण सक्तीचे
सरकारने प्रत्येक मुलीसाठी उच्च शिक्षण सक्तीचे केले पाहिजे. प्रत्येक मुलगी शिकल्यास आपल्या हक्कांबाबत जागरूक होईल. शिक्षणातूनच स्त्रीची प्रगती शक्य आहे.

4. सामाजिक कुप्रथांना अटकाव गरजेचा
हुंडा प्रथा किंवा स्त्रीभ्रूण हत्या यासारख्या सामाजिक कुप्रथा समाजाने स्वत: रोखल्या पाहिजेत. या कुप्रथाच महिलांच्या शत्रू आहेत. त्या हटवल्यावरच महिला सुरक्षित होतील.

5. आपले आयुष्य निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे
प्रत्येक महिलेस आपले शिक्षण, करिअर आणि जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे. लहानपणापासून घरी व बाहेर प्रत्येक ठिकाणी आदर मिळावा. तिने स्वत:चे निर्णय घ्यावेत.

भास्कर सर्व्हे : ५५३१ महिला व ५५४८ पुरुषांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला... महिलांनी २५७९ वेळा "संधी' शब्द लिहिला, पुरुषांनी १४३१ वेळा लिहिला "हक्क' शब्द

बातम्या आणखी आहेत...