आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Womens Day The Woman Is Changing ... The Picture Is Also Changing: 4 Ground Reports Of Change In Thought And Culture

महिला दिन विशेष:स्त्री बदलत आहे... चित्रही बदलत आहे : विचार आणि संस्कृतीतील बदलाचे 4 ग्राउंड रिपोर्ट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
केरळमध्ये तळागाळात महिलाच महिलांच्या आरोग्याची निगराणी करतात. आशा कार्यकर्त्या गावोगावी घरोघरी जाऊन महिलांच्या आरोग्याची नोंद घेत असतात. - Divya Marathi
केरळमध्ये तळागाळात महिलाच महिलांच्या आरोग्याची निगराणी करतात. आशा कार्यकर्त्या गावोगावी घरोघरी जाऊन महिलांच्या आरोग्याची नोंद घेत असतात.

केरळ : येथील महिलांचे आरोग्य सर्वात निरोगी, कारण समाजरचनेत स्त्रीच्या आरोग्याला दिले महत्त्व
के.ए. शाजी | तिरुवनंतपुरम

भारतात कोरोना विषाणू संसर्गाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. तेव्हा देशातील पहिल्या अलगीकरण कक्षात एक ज्येष्ठ महिला कोरोना रुग्णांची शुश्रूषा करणारी आणि स्वत: आजाराच्या जाळ्यात ओढली गेलेली परिचारिका रेशमा मोहनदास सध्याही महारोगराईच्या दुसऱ्या लाटेतही आघाडीवर कर्तव्य बजावत आहे. राज्याचा आरोग्याचा चांगला पाया ठरलेल्या रेशमा आणि तिच्यासारख्या लाखो परिचारिका केरळचा असा चेहरा आहे. मात्र, राज्याचे आरोग्यदायी चित्र आण विशेषत: येथील महिलांच्या चांगल्या आरोग्याची पाळेमुळे काळाच्या खूप आधी खोलवर दबली आहे. सार्वजनिक आरोग्याचे तज्ज्ञ डॉ. एस.एस. लाल म्हणाले, केरळमध्ये महिलांच्या चांगल्या आरोग्याचे श्रेय सर्व राजकीय पक्षांना देऊ इच्छितो. मात्र, याचे खरे कारण येथील सामाजिक चळवळीला आहे. येथे समाज आणि विशेषत: महिला आरोग्य सुधारणेबाबत सजग आहेत. आजही कुटुंबात आजी सर्वांच्या आरोग्याबाबत जागरूक असते. त्यांच्या मदतीसाठी दूर्गम भागांपर्यंत विस्तारलेली सार्वजनिक आरोग्याची रचना आहे. ज्यात ६००० डॉक्टर्ससह १५,००० आरोग्य कर्मचारी आहेत. मद्रास पेसीडेन्सीचा भाग राहिलेले त्रावणकोर, कोच्ची आणि कोझिकोड साम्राज्य मिळून सध्याचे केरळ आकारास आले.

राजेशाहीपासून येथील समाजरचनेत स्त्री आरोग्य महत्त्वाचा भाग राहिला आहे. १९५० च्या दशकात केरळ पहिले राज्य होते, जिथे शुभारंभानंतर कुटुंब नियोजन कार्यक्रम गांभीर्याने लागू केला होता. १९५० ते १९६१ दरम्यान छोट्याशा राज्यात ७० कुटुंब नियोजन केंद्र सुरू झाले होते आणि यापैकी ५३ मध्ये नसबंदीची सुविधा होती. १९७० पासून १९७३ दरम्यान येथील स्वत: पुढे येत सामूहिक नसबंदी मेळाव्यात भाग घेतला. सध्या अपत्य संख्या आणि पहिल्या प्रसूतीच्या वयात केरळ उर्वरित राज्यांपेक्षा सुस्थितीत आहे. राजेशाहीच्या काळापासूनच स्त्री शिक्षण आणि त्यांच्या आरोग्याप्रति समाजाची सजगता दिसली.

तिरुवनंतपुरम येथील सेंटर फॉर डेव्हलपमेंटल स्टडीजच्या वरिष्ठ प्रा. व संशोधक जे. देविका म्हणाल्या, येथून शहरासमान तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर आरोग्याचा आराखडा तयार झाला. १९९६ मध्ये घटना दुरुस्तीनंतर विकेंद्रीकरण धोरण स्वीकारण्यात आले तेव्हा केरळनेच त्याची गांभीर्याने अंमलबजावणी केली. येथे जनता, विशेषत: महिलांची भूमिका प्रशासन, राजकारण आणि धोरणकर्त्यात वाढली. त्या वेळच्या बदलाचा परिणाम म्हणून सध्या राज्याच्या आरोग्य बजेटचा एक तृतीयांश हिस्सा स्थानिक आरोग्य केंद्रांना जातो.

हैदराबाद : महिला उद्योजकांसाठी वेगळे इन्क्युबेशन सेंटर फक्त इथेच
मनीषा भल्ला | हैदराबादहून

ज्युबिली हिल्स या हैदराबादच्या पॉश परिसरातील आपल्या आलिशान बंगल्याच्या दिवाणखान्यात बसलेल्या उद्योजक राधा राणी ठामपणे सांगतात की, ‘काही वर्षांपूर्वी तुम्ही एसटीडी बूथवरून फोन करत असत तेव्ही त्याचे बिल देणाऱ्या मशीन्स मी तयार केलेल्या होत्या. नाणे टाकून तुम्ही फोन करत असत ते फोनही मीच केलेले होते. देशातील बहुतांश मीटर्स, स्वाइप मशीन्स आणि बायोमेट्रिक यंत्रणा माझ्या कंपनीने डिझाइन केलेली आहे.’

हैदराबाद शहरात यशस्वी आणि कोट्यधीश उद्योजक केवळ राधा राणीच नाहीत. सुई, शिलाई, बांगड्यांपासून जहाज, विमान, कृषी उत्पादनांचेही सुटे भाग महिला तयार करत आहेत, डिझाइन करत आहेत, विकत आहेत. अलीकडेच आलेल्या १०० श्रीमंत आणि यशस्वी महिलांबाबतच्या अहवालात सर्वाधिक १४ महिला आंध्र प्रदेश-तेलंगणातील आणि त्यातील ११ हैदराबादेतील आहेत. देशात सर्वाधिक श्रीमंत आणि मोठ्या संख्येने उद्योजक महिला हैदराबादेतील असण्याचे कारण काय? पहिली गोष्ट म्हणजे महिला उद्योजकांना विकसित करण्यासह त्यांना संधी देण्यासाठी ‘वी हब’ हे वेगळे इन्क्युबेशन सेंटर स्थापन करणारे तेलंगण हे देशातील पहिले राज्य आहे. येथील वी हबच्या सीईओ दीप्ती रावुला सांगतात की, याची अनेक कारणे आहेत. येथे महिलांना घरातील निर्णयांत सहभागी केले जाते आणि शिक्षण-नोकरीत बरोबरीचा दर्जा आहे.

स्वतःची जागा नसलेल्या महिलांसाठी वी हबमध्ये खुर्ची, टेबल व इंटरनेटसह काॅम्प्युटरसाठी फक्त ५००० रु. महिना आकारला जातो. सध्या ३५०० महिला जोडलेल्या आहेत. वी हब महिलांना नेटवर्किंग, मार्केटिंग आणि कॅपिटलसाठी मदत करते.

बंगाल : बालपणापासून मुली घरी व बाहेर सक्रिय, स्वतः निर्णय घेतात
सोमा नंदी | कोलकाता

अनेक दशकांपासून प. बंगालमध्ये राजकीय हिंसा झालेली पाहायला मिळते. परंतु, राजकारणात महिलांचा आवाजही तितकाच जुना आहे. जाग्योसेनी मंडल याही त्या आवाजातील एक आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार बंगालमधील प्रत्येक आंदोलनात महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे. स्वातंत्र्यसंग्रामापासून नक्षल चळवळीपर्यंत. समाजशास्त्रज्ञ सुस्मिता बॅनर्जींच्या म्हणण्यानुसार, महिलांना घराबाहेर पडून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणारी येथील संस्कृती हे याचे मूळ कारण आहे.

देशात केवळ प. बंगालमध्ये सध्या महिला मुख्यमंत्री आहे. देशात एकाच राज्यातील सर्वाधिक ११ महिला खासदार पश्चिम बंगालातील आहेत. टीएमसी खासदार याचे श्रेय ममता बॅनर्जींना देताना म्हणतात की, पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर दीदींनी २०११ मध्ये पंचायत निवडणुकीत महिलांना ५०% आरक्षण दिले होते. यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आला. भाजपच्या राज्यसभा खासदार रूपा गांगुली सांगतात की, येथे लिंगाधारित भेदभाव अजिबात नाही. येथे महिला घराबाहेरही सक्रिय आहेत. काँग्रेसच्या नेत्या कृष्णा देबनात सांगतात की, पश्चिम बंगालात महिला आपल्या अधिकारांबाबत खूप जागरूक आहेत. निवडणूक आयोगानुसार प. बंगालच्या एकूण ७.३२ कोटी मतदारांपैकी ३.५९ कोटी (४९.०१%) महिला आहेत. प. बंगालच्या राजकारणात महिला स्थान निर्माण करत आहेत, याच्याशी जाधवपूर विद्यापीठातील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. पियाली सुर सहमत आहेत.

पाच दशकांपासून ट्रेड युनियनशी संबंधित असलेले सोभनदेव चटोपाध्याय म्हणतात की, अनेक महिला नेत्यांनी विद्यार्थिदशेत सुरुवात करून प्रमुख पदे मिळवली आहेत. सध्याच्या ट्रेड युनियनमध्ये मोजक्या महिला असल्याबद्दल ते खेद व्यक्त करतात.

बंगळुरू : वुमन फ्रेंडली शहर, म्हणून सर्वाधिक महिला व्यावसायिक
मनोरमा सिंह | बंगळुरू
देशात व्यावसायिक नोकरदार महिलांची भागीदारी नाममात्र असली तरी बंगळुरू या बाबतीत पुढे आहे. सरकारी आकडेवारीनुसार बंगळुरू शहराच्या मनुष्यबळात महिलांचा वाटा ३९% आहे आणि तो देशातील कोणत्याही शहराच्या तुलनेत सर्वाधिक आहे. एवढेच नाही, तर अलीकडेच आलेल्या इंडिया स्किल रिपोर्ट २०२१ नुसार नोकरीसाठी महिलांचे सर्वात आवडीचे शहर बंगळुरू आहे. इंडिया स्किल रिपोर्ट २०२१ तयार करण्यात मुख्य सहयोगी संस्था असलेल्या व्हीबोक्सच्या हेड ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज श्वेता झा सांगतात की, याची अनेक कारणे आहेत. विशेषतः या शहराची काॅस्मोपाॅलिटन संस्कृती. कर्नाटक इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान शिक्षणाचे हब आहे. देशभरातून विद्यार्थी येथे येतात. नंतर स्वाभाविकच नोकरीसाठी बंगळुरू त्यांची पहिली पसंती असते.

चांगल्या दळणवळण सुविधा, समान संधी, ग्लोबल एक्स्पोजर, आयटी सेक्टरमध्ये ऑनसाइट काम करण्याच्या संधी, वैयक्तिक स्पेस, एकट्या व नोकरदार मुलींसाठी चांगल्या व सुरक्षित सोसायट्यांमध्ये भाड्याच्या फ्लॅटची सुविधा ही महिला व मुलींना बंगळुरूकडे आकर्षित करणारी मोठी कारणे आहेत. याशिवाय येथे नोकर्यांत विविधता व संधींना तोटा नाही. जनप्रिया इंजिनिअर्स सिंडिकेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लिमिटेडचे सीओओ अँड ग्रुप सीएचआरओ नटराजन सांगतात की, येथील पूर्ण काॅर्पोरेट वातावरण जेंडर इन्क्लुझिव्ह आहे. स्त्री-पुरुष भेदभाव नाही.

बंगळुरूच्या या गोष्टी नोकरदार महिलांना आकर्षित करतात
- एनसीआरबीच्या म्हणण्यानुसार २०१९ मध्ये दिल्लीत महिलांसंबंधी १२,९०२, मुंबईत ६५१९ व बंगळुरूत ३४८६ गुन्हे घडले.
- बंगळुरूत ६२% हून जास्त लोक स्थलांतरित आहेत, त्यामुळे येथील संस्कृती वैविध्यपूर्ण आहे.
- बंगळुरू वेतनाच्या बाबतीतही चांगले शहर आहे. रँडस्टॅड इनसाइट्स सॅलरी ट्रेंड्स रिपोर्ट २०१९ नुसार बंगळुरू अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटांना अधिकाधिक वेतन प्रदान करते.
- ज्युनियर कर्मचाऱ्याची सरासरी वार्षिक सीटीसी ५.२७ लाख, मध्यम कर्मचाऱ्याची १६.४५ लाख आणि वरिष्ठांची ३५.४५ लाख आहे.

बातम्या आणखी आहेत...