आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Work From Home Increased Confidence building; Stress Relieving Will Improve Work life Balance, Give You Space For New Qualities

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर ओरिजिनल:वर्क फ्रॉम होममुळे विश्वास-मनोधैर्य वाढले; तणावमुक्तीमुळे वर्क-लाइफ संतुलन सुधारेल, नव्या गुणवत्तेला मिळेल वाव

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हर्ष गोयंका (अध्यक्ष, आरपीजी समूह) - Divya Marathi
हर्ष गोयंका (अध्यक्ष, आरपीजी समूह)
  • प्रख्यात उद्योगपती हर्ष गोयंका यांचा खास ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी लेख

भविष्यात वर्क फ्रॉम होमबाबत अनेक बदल दिसतील. देशात त्याचे चित्र कसे असेल व कंपन्यांवर कसा परिणाम होईल, याबाबत सांगत अाहेत प्रख्यात उद्योगपती हर्ष गोयंका..

१९ व्या शतकापर्यंत काम हे घर आणि परिसरात केले जायचे. ऑफिसची कल्पना २० व्या शतकात प्रकटली व लवकरच ती दिनचर्येचा हिस्सा बनली. रोज सकाळी उठणे, घरून ऑफिसला जाणे व ९ से ५ वाजेदरम्यान सहकाऱ्यांसोबत काम करणे, ही कामाची व्याख्या बनली.

जागतिक पातळीवर आधुनिक डिजिटल नेटवर्कचे जाळे विस्तारल्यामुळे गेल्या काही वर्षांत टेलिकम्युनिकेशनमुळे बदल घडण्यास सुरुवात झाली. यामुळे जमीनजुमला महागत गेला. आमच्यासारख्या अनेक संस्थांनी वेळेचे बंधन तोडायला सुरुवात केली. अशा रीतीने घरून काम करण्याचा प्रघात सुरू केला. गेल्या २ महिन्यांपासून घरूनच काम होतेय. यामुळे घर व काम या दोन्हींची व्याख्या बदलली आहे.

अचानक घर हे सर्वात जवळचे व सर्वात आरामदायक कार्यालय बनले. जे या पद्धतींबाबत अनभिज्ञ होते त्यांच्यासाठी ही व्यवस्था चकित करणारी पण स्वागतार्ह ठरली. आपली कंपनी आपल्यावर इतका विश्वास ठेवते की तिला आपल्याला सुपरवाइज करण्याची गरजही भासत नाही. ही मोकळीक मानसिक स्वातंत्र्याची अनुभूती देत परस्परांतील विश्वासही वाढवत आहे.

लोक घरून काम करताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा आपुलकीची भावना वाढू लागते. यामुळे पारदर्शकता आणि अनौपचारिकता वाढते. संवादादरम्यान अचानक तुमचे खोडकर मूल टेबलाखालून डोकावते किंवा एखादा मनीम्याऊ किंवा भूभू तुमच्याशी लगट करू लागतो तो क्षण हास्यांची कारंजी उडवणारा असतो. ऑफिसला येण्या-जाण्यासाठी खर्च होणारा वेळ आता इतर कामांसाठी उपयाेगी पडू लागलाय.

आता नव्या आव्हानांचा मुकाबला करायला हवा

आपसातील मतभिन्नता दूर करण्यासाठी प्रत्यक्ष समोरासमोर केलेला संवाद अत्यंत लाभाचा ठरतो. एक स्पर्श, खांद्यावर हलकीशी थाप ही हजारो वाक्येही देणार नाही इतका फायदा करून जाते. काही प्रशासकीय अडचणीही अाहेत. उदा. सायबर सिक्युरिटी हे एक आव्हान आहे. हॅकिंगची समस्या आधीच त्रासदायक होती. आता काही व्हिडिओ कॉलिंग अॅप्सही त्यातून सुटलेले नाहीत. कंपन्या कामाच्या नव्या पद्धती अवलंबतील, त्या पुढील काळात या समस्या सोडवण्याच्या पद्धतींवर विशेष लक्ष देतील.

बातम्या आणखी आहेत...