आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Dvm originals
 • Work from home Increases Employee Stress By 20 Per Cent, Tata Salt Light Survey Of Employees In 10 Metro Cities

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:‘वर्क फ्रॉम होम’मुळे नोकरदारांचा ताण 20 टक्के वाढला, टाटा साॅल्ट लाइट संस्थेने देशातील 10 महानगरांत केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

मंगेश फल्ले | पुणे8 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • घरून काम करताना का वाढतोेय ताण?

ऑनलाइन क्लाससाठी मुलांची आवराआवर, कुटुंबाची व्यवस्था केल्यानंतर बॉसने दिलेला प्रोजेक्ट पूर्ण करायला बसताच कधी वीज गुल होते तर कधी नेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. ऑफिस नियमित सुरू असताना ८ तास केली जाणारी नोकरी आता १२ तासांपेक्षा अधिक होत आहे. कधी सकाळी तर कधी रात्री उशिरा ऑनलाइन मीटिंग, प्रोजेक्ट करावे लागत असल्याने वर्क फ्रॉम होम करणाऱ्या प्रोफेशनल्सचा ताण २० टक्के अधिक वाढला आहे. हा निष्कर्ष पुण्यातील टाटा साॅल्ट लाइट या संस्थेतर्फे काढण्यात आला. संस्थेने देशातील १० महानगरांत विविध क्षेत्रांत वर्क फ्राॅम हाेम करणाऱ्या प्रत्येकी २०० नाेकरदारांचे सर्वेक्षण केले.

काेराेनाचा प्रसार हाेण्याच्या भीतीने मार्च महिन्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्राॅम हाेम’ची सुविधा देण्यात आली. मागील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ घरी बसून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक व शारीरिक आराेग्यावर याचा विपरीत परिणाम हाेऊ लागला आहे. अनेक वर्षांपासूनचा दिनक्रम बदलून आता आॅफिसचे कामकाज आणि घरातील कामे अशी दुहेरी कसरत करावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण अधिक वाढला आहे. शिवाय काम पूर्ण करण्यासाठी तासन््तास एकाच ठिकाणी बसून शारीरिक हालचालीसही मर्यादा आल्या आहेत. सर्वेक्षणादरम्यान राग आणि तणाव निर्माण हाेण्यामागे कुठली कारणे आहेत याचा शोध घेण्यात आला.

घरून काम करताना का वाढताेय ताण?

 • याेग्य वायफाय, नेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही
 • सतत स्क्रीनसमाेर बसून कंटाळवाणे वाटते
 • अचानक इंटरनेट बंद पडते, फाेनची चार्जिंग संपते
 • फाेनवर स्पष्ट आवाज येत नाही
 • सुटीच्या दिवशी काम देण्यात येते
 • तातडीचे विषय सांगून रात्री उशिरापर्यंत काम करण्यास सांगितले जाते
 • वर्किंग वुमेन्सकडून कुटुंब व ऑफिसच्या अपेक्षा वाढल्याने त्यांच्यावर अधिक ताण आहे.

जीवनशैली सकारात्मक ठेवा

आराेग्याला अपायकारक पदार्थ खाणे, बैठे काम यामुळे मधुमेह, हृदयविकार असे वेगवेगळे आजार हाेऊ शकतात. आपली जीवनशैली सकारात्मक ठेवण्यासाठी पारंपरिक भारतीय पदार्थांचा जेवणात समावेश करा. घरी करता येतील अशा प्रकारचे व्यायम दरराेज करा, सहा ते आठ तास शांत झाेप घ्या, घरून काम करताना अधूनमधून जागेवरून उठणे, थाेडेफार चालणे, कामाला बसतानाची याेग्य पद्धत अशा प्रकारचे बदल करा. - कविता देवगण, टाटा न्यूट्रिशन तज्ज्ञ.

अतिरिक्त कामे वाढली

घरून काम करताना शारीरिक थकवा कमी झाला, पण मानसिक थकवा वाढला. मुलीच्या ऑनलाइन क्लासकडे लक्ष देणे, होम वर्क करून घेणे, शिक्षकांच्या सूचनांकडे लक्ष देणे ही अतिरिक्त कामे वाढली. सकाळी उशिरा कामाला लागल्यामुळे रात्री अतिरिक्त वेळ द्यावा लागतो. शिवाय पाहुणे मंडळी व इतर दैनंदिन कामांमुळे चिडचिडेपणा वाढला आहे. - आर्या पुंगशे, आयटी प्रोफेशनल, पुणे.

बातम्या आणखी आहेत...