आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • World First Political Murder Happened 4000 Years Ago; Vladimir Putin | First Mention Chanakya Book | Research

दिव्य मराठी रिसर्चफक्त पुतिनच राजकीय हत्या घडवत नाही:4000 वर्षांपूर्वी झाली पहिली राजकीय हत्या; चाणक्याच्या ग्रंथात पहिला उल्लेख

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक समजले जाणारे नेता पॉवेल अॅन्टोव्ह यांचा गेल्या आठवड्यात ओडिशात रहस्यमय स्थितीत मृत्यू झाला. यामुळे पुतिन यांनी आपल्या विरोधकाची हत्या केल्याची चर्चा पुन्हा व्हायला लागली.

पुतिन सत्तेच्या शीर्षस्थानी पोहोचल्यावर रशियन नेते, उद्योजक आणि प्रभावशाली व्यक्तींचे रहस्यमय मृत्यू नवे नाही. असे म्हटले जाते की, यामागे पुतिन यांच्या असॅसिनेशन स्क्वाडचा हात आहे.

मात्र तुम्हाला माहिती आहे का की, जगातील नोंदीतील पहिली राजकीय हत्या कोणती होती? आणि ती कधी झाली होती? या राजकीय हत्यांनी इतिहास कसा बदलला?

चला, आम्ही तुम्हाला सांगतो की जगात राजकीय हत्यांचा इतिहास किती जुना आहे? भारतात पहिल्यांदा केव्हा राजकीय हत्यांची सुरुवात झाली.

इजिप्तमध्ये 2291 मध्ये जगातील पहिली राजकीय हत्या

इजिप्तच्या फेरो तेतींची ही मूर्ती त्यांच्या पिरॅमिडजवळ सापडली होती. ती आज कैरोच्या संग्रहालयात ठेवलेली आहे. तेतींविषयी जास्त लिखित नोंदी उपलब्ध नाही.
इजिप्तच्या फेरो तेतींची ही मूर्ती त्यांच्या पिरॅमिडजवळ सापडली होती. ती आज कैरोच्या संग्रहालयात ठेवलेली आहे. तेतींविषयी जास्त लिखित नोंदी उपलब्ध नाही.

आजपासून सुमारे 4000 वर्षांपूर्वी जगातील पहिली राजकीय हत्या झाली होती. तथापि याच्या जास्त नोंदी उपलब्ध नाही.

इजिप्तमधील सहाव्या राज घराण्याचे पहिले फेरो(इजिप्तचे राजे) तेतींची इसवी सन पूर्व 2291 मध्ये हत्या झाली होती. तेती इसवी सन पूर्व 2323 मध्ये गादीवर विराजमान झाले होते आणि सुमारे 12 वर्षांनंतर त्यांची हत्या झाली होती.

इजिप्तचे पुरोहित आणि इतिहास मानेथोंनी त्यांचे पुस्तक एजिप्टियाकामध्ये प्राचीन इजिप्तच्या राजांची क्रोनोलॉजी नोंदवली आहे. या पुस्तकात लिहिले आहे की फेरो तेतींची हत्या करण्यात आली होती.

ही लेखी नोंदीतील पहिली राजकीय हत्या आहे. तथापि पुस्तकात याचा उल्लेख नाही की ही हत्या कुणी केली किंवा घडवून आणली? तेतींच्या हत्येनंतर उसरकारे नावाचा व्यक्ती फेरो बनला होता. मात्र 6 वर्षांनंतरच तेतींचा मुलगा पेपी-1 ने त्याला हटवून तो फेरो बनला होता. हे स्पष्ट नाही की, फेरो तेतीची हत्या उसरकारेने केली होती की नाही?

चीन आणि पर्शियातही(आजचे इराण) राजकीय हत्यांचा जुना इतिहास

इसवी सन पूर्व 300 च्या आसपासच्या या कलाकृतीत चीन शी हुआंगच्या हत्येचा प्रयत्न दाखवण्यात आला आहे. जिंगच्या हातात तलवार दिसत आहे.
इसवी सन पूर्व 300 च्या आसपासच्या या कलाकृतीत चीन शी हुआंगच्या हत्येचा प्रयत्न दाखवण्यात आला आहे. जिंगच्या हातात तलवार दिसत आहे.

आजचे इराण म्हणजेच पूर्वीच्या पर्शियात इसवी सन पूर्व 550 ते इसवी सन पूर्व 330 दरम्यान आकमानेद एम्पायरच्या सात राजांची हत्या झाली होती. या राजघराण्यात सत्ता मिळवणे आणि विरोधकांना गप्प करण्यासाठी राजकीय हत्यांचा खूप वापर झाला होता.

चीनमध्ये इसवी सन पूर्व 500 मध्ये सैन्य धोरणांवर लिहिलेला ग्रंथ 'द आर्ट ऑफ वॉर'मध्येही राजकीय हत्यांविषयी विस्तृत चर्चा केलेली आहे. यात सांगितले आहे की सत्तेतील लोकांना याचे कसे फायदे होतात?

चीनमध्ये सर्वात चर्चेतील राजकीय हत्येचे प्रकरण एक अशी केस आहे, ज्यात हत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. इसवी सन पूर्व 300 च्या आसपास चीन राजघराण्याचा पहिला राजा चीन शी हुआंगची हत्या करण्यासाठी यान राज्याचे राजकुमार दानने जिंग नावाच्या व्यक्तीला पाठवले होते. मात्र जिंग यशस्वी होऊ शकला नाही.

भारतात चाणक्यच्या अर्थशास्त्रात पहिल्यांदा राजकीय हत्येची चर्चा... चंद्रगुप्त मौर्याने अलेक्झांडरच्या जनरलची हत्या घडवली होती

युवावस्थेतील गुराखी चंद्रगुप्त मौर्याचा पुतळा दिल्लीतील संसद भवनात उभारलेला आहे. चंद्रगुप्त मौर्याची गणना भारताचे एकत्रीकरण करणाऱ्या शासकांत होते. यात चाणक्यनितीचे महत्व सर्वाधिक मानले जाते.
युवावस्थेतील गुराखी चंद्रगुप्त मौर्याचा पुतळा दिल्लीतील संसद भवनात उभारलेला आहे. चंद्रगुप्त मौर्याची गणना भारताचे एकत्रीकरण करणाऱ्या शासकांत होते. यात चाणक्यनितीचे महत्व सर्वाधिक मानले जाते.

भारतीय ग्रंथांत राजकीय हत्यांचा उल्लेख सर्वप्रथम चाणक्यच्या अर्थशास्त्र या ग्रंथात आढळतो. या ग्रंथात चाणक्याने राजकीय हत्यांविषयी विस्ताराने चर्चा केली आहे.

चाणक्यचा शिष्य म्हटल्या जाणाऱ्या मौर्य वंशाचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्याने नंतर राजकीय हत्यांचा वापरही केला होता.

अलेक्झांडरने भारतातून जाताना आपला जनरल फिलिपला भारताचा सत्रप(गव्हर्नर) नियुक्त केले होते. इसवी सन पूर्व 325 मध्ये फिलिपच्या शिपायांनी त्याची हत्या केली होती. असे मानले जाते की या हत्येचे षडयंत्र चंद्रगुप्त मौर्याने रचले होते.

रोमन साम्राज्यातील सर्वात चर्चित राजकीय हत्येने संपुष्टात आणली होती रोमची रिपब्लिक व्यवस्था

रोमन सीनेटमध्ये ज्युलियस सीझरची हत्या दाखवणारी ही पेंटिंग विल्यम्स होम्स सुलिवानने 1888 मध्ये बनवली होती.
रोमन सीनेटमध्ये ज्युलियस सीझरची हत्या दाखवणारी ही पेंटिंग विल्यम्स होम्स सुलिवानने 1888 मध्ये बनवली होती.

रोमन साम्राज्याची स्थापना एक प्रजासत्ताक म्हणून झाली होती. यात जनतेने निवडलेले सीनेटर धोरण ठरवायचे. सर्वात प्रभावशाली नेता गायस ज्युलियस सीझरने स्वतःला आजीवन हुकूमशहा घोषित केले होते.

याविरोधात सीनेटर्सनी एकत्र येत रोमच्या सीनेटमध्येच ज्युलियस सीझरची हत्या केली होती. ही रोमन इतिहासातील सर्वात चर्चित राजकीय हत्या मानली जाते. या हत्येनंतर रोममधील प्रजासत्ताक व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आणि ऑगस्टस सीझर पहिला रोमन सम्राट बनला.

रोमच्या इतिहासात राजकीय हत्यांनी नवे रुप घेतले होते. त्यापूर्वी राजकीय हत्या प्रामुख्याने सत्ता मिळवण्यासाठी केल्या जायच्या. मात्र रोममध्ये विरोधकांना गप्प करण्यासाठी किंवा धोरणांवर परिणाम करण्यासाठीही राजकीय हत्या सुरू झाल्या.

एका राजकीय हत्येने सुरु झाले होते पहिले महायुद्ध

आर्चड्युक फ्रान्झ फर्डिनान्डची हत्या दाखवणारे हे इल्युस्ट्रेशन 12 जुलै 1914 रोजी इटलीचे वृत्तपत्र डोमिनिका डेल कुरियेरेमध्ये प्रकाशित झाले होते.
आर्चड्युक फ्रान्झ फर्डिनान्डची हत्या दाखवणारे हे इल्युस्ट्रेशन 12 जुलै 1914 रोजी इटलीचे वृत्तपत्र डोमिनिका डेल कुरियेरेमध्ये प्रकाशित झाले होते.

28 जून 1914 रोजी ऑस्ट्रिया-हंगेरी एम्पायरचे युवराज मानले जाणारे आर्चड्युक फ्रान्झ फर्डिनान्ड आणि त्याची प्तनी सोफीची बोस्नियाच्या सारायेवोमध्ये हत्या झाली होती.

खुनी गाव्रिलो प्रिन्सिप एक सर्ब नॅशनलिस्ट होता आणि बोस्निया-हर्जेगोव्नियाला ऑस्ट्रिया-हंगेरीत सामिल करण्याच्याविरोधात त्याने हत्या केली होती.

कारमध्ये बसताना आर्चड्युक फर्डिनान्ड आणि त्याच्या पत्नीचा हा फोटो हत्येच्या काही मिनिटे आधी काढण्यात आला होता.
कारमध्ये बसताना आर्चड्युक फर्डिनान्ड आणि त्याच्या पत्नीचा हा फोटो हत्येच्या काही मिनिटे आधी काढण्यात आला होता.

50 वर्षीय आर्चड्युक फ्रान्झ फर्डिनान्ड, ऑस्ट्रिया-हंगेरीचे आगामी राजा होणार होते. त्यांच्या हत्येने संतप्त ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाविरोधात युद्धाची घोषणा केली. फर्डिनान्डच्या हत्येच्या चार आठवड्यांनंतरच या युद्धात दोन्ही बाजूंनी अनेक देशांनी उड्या घेतल्या आणि महायुद्धाला सुरुवात झाली.

अमेरिकेच्या 4 राष्ट्राध्यक्षांच्या राजकीय हत्या झाल्या... ब्रिटनमध्येही एका पंतप्रधानांची राजकीय हत्या झाली होती

1901 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक्किनले यांच्यावर एक हल्लेखोराने अगदी समोरून गोळी झाडली होती. त्यांच्या हत्येच्या प्रसंगाचे हे इल्युस्ट्रेशन तेव्हाच्या अमेरिकेच्या वृत्तपत्रांत प्रकाशित झाले होते.
1901 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक्किनले यांच्यावर एक हल्लेखोराने अगदी समोरून गोळी झाडली होती. त्यांच्या हत्येच्या प्रसंगाचे हे इल्युस्ट्रेशन तेव्हाच्या अमेरिकेच्या वृत्तपत्रांत प्रकाशित झाले होते.

अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत 4 राष्ट्राध्यक्षांची राजकीय हत्या झालेली आहे. तर 5 राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न झालेला आहे.

अब्राहम लिंकन यांची 1865 मध्ये झालेली हत्या इतिहासातील सर्वात चर्चित राजकीय हत्यांपैकी एक आहे. त्यांच्याशिवाय जेम्स गारफील्ड, विल्यम मॅक्किनले आणि जॉन ए केनेडींची राष्ट्राध्यक्ष असताना हत्या झाली होती.

याशिवाय अमेरिकेचे 5 राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन, फ्रँकलिन रुझवेल्ट, हॅरी ट्रुमॅन, गेराल्ड फोर्ड आणि रोनाल्ड रीगन यांच्यावर जीवघेणे हल्लेही झाले होते.

ब्रिटनमध्ये 1812 मध्ये पंतप्रधान स्पेन्सर पर्सिवल यांची हत्या करण्यात आली होती. ब्रिटनच्या इतिहासात केवळ पर्सिवल हे एकमेव पंतप्रधान आहेत, ज्यांची पदावर असताना हत्या झाली होती. त्यांचा हत्यारा जॉन बेलिंघम एक व्यापारी होता, जो खूप काळ रशियाच्या तुरुंगात राहिला होता.

ब्रिटिश पंतप्रधान स्पेन्सर पर्सिवल यांच्या हत्येचे हे इल्युस्ट्रेशन तेव्हा ब्रिटिश वृत्तपत्रांत प्रकाशित झाले होते.
ब्रिटिश पंतप्रधान स्पेन्सर पर्सिवल यांच्या हत्येचे हे इल्युस्ट्रेशन तेव्हा ब्रिटिश वृत्तपत्रांत प्रकाशित झाले होते.

बेलिंघमचे म्हणणे होते की त्याला चुकीच्या पद्धतीने रशियाच्या तुरुंगात ठेवले होते आणि यामुळे सरकारने त्याला नुकसान भरपाई द्यायला हवी. मात्र त्याच्या याचिका स्वीकारल्या न गेल्याने तो रागात होता आणि त्याने हाऊस ऑफ कॉमन्सच्या लॉबीतच पंतप्रधानांवर गोळीबार केला.

भारतात स्वातंत्र्यानंतर 3 प्रमुख राजकीय हत्या, तिनही गांधी

1924 मधील या फोटोत महात्मा गांधींसोबत इंदिरा गांधी बसलेल्या आहेत. दोघांची नंतर हत्या झाली.
1924 मधील या फोटोत महात्मा गांधींसोबत इंदिरा गांधी बसलेल्या आहेत. दोघांची नंतर हत्या झाली.

भारतात स्वातंत्र्यानंतर 3 प्रमुख राजकीय हत्या झाल्या. 1948 मध्ये महात्मा गांधींची नथुराम गोडसेने गोळी घालून हत्या केली होती.

1984 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली होती. 1991 मध्ये त्यांचे पुत्र राजीव गांधींची हत्या लिट्टेच्या आत्मघाती बॉम्बरने केली होती.

भाजप किंवा जनसंघाचे नेते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या मृत्यूवरही प्रश्न उपस्थित होत गेले, मात्र त्यांना अधिकृतरित्या हत्या मानले जात नाही.

हशाशिनमधून मिळाली होती प्रसिद्धी... शब्द बनला Assassination

मध्य पूर्व आशियात 1090 ते 1275 दरम्यान एक समुदाय राहत होता त्याला हशाशिन म्हटले जायचे. हा समुदाय लपून राजकीय हत्या करण्यासाठी ओळखला जायचा. याच्या नावावरूनच इंग्रजीतील Assassination हा शब्द बनला होता. ज्याचा अर्थ होतो राजकीय हत्या.

इंग्लंडचे राजे किंग एडवर्ड-1 यांच्या हत्येच्या प्रयत्नाचे हे चित्र फ्रेंच कलाकार गुस्ताव डोरेने काढले होते.
इंग्लंडचे राजे किंग एडवर्ड-1 यांच्या हत्येच्या प्रयत्नाचे हे चित्र फ्रेंच कलाकार गुस्ताव डोरेने काढले होते.

असे म्हटले जाते की 1271 मध्ये आपल्या राज्याभिषेकापूर्वी राजा किंग एडवर्ड-1 जेव्हा क्रुसेडवर गेले होते तेव्हा त्यांच्यावर एका सीरियन हसाशिनने हल्ला केला होता. त्यांची विष लावलेल्या चाकूने हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र ते यातून थोडक्यात बचावले.

आता टार्गेटेड किलिंगने घेतली जागा... इस्रायल यासाठी बदनाम, अमेरिकाही मागे नाही

5 सप्टेंबर 1972 मधील या फोटोत म्युनिक ऑलिम्पिक व्हिलेजच्या इमारतीवर सशस्त्र लोक दिसत आहेत. इथे ब्लॅक सेप्टेंबर ग्रुपच्या दहशतवाद्यांनी व्हिलेजमध्ये शिरत इस्रायली खेळाडूंना बंधक बनवले होते. या सर्व खेळाडूंची हत्या करण्यात आली होती.

वेळेसह या राजकीय हत्यांचे स्वरुपही बदलले आहे. आता या हत्यांना असॅसिनेशनऐवजी टार्गेटेड किलिंग म्हटले जात आहे.

जगातील वेगवेगळ्या देशांतील गुप्तचर संस्था आता या कामात उतरल्या आहेत. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद राजकीय हत्या किंवा बदल्यासाठी केलेल्या हत्यांसाठी कुख्यात आहे.

म्युनिक ऑलिम्पिकदरम्यान इस्रायली खेळाडूंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मोसादने अनेक वर्षे युरोपात आपले एजंट तैनात ठेवले. ते या घटनेसाठी जबाबदार संस्थेच्या लोकांची हत्या करत होते. पॅलेस्टाईनच्या अनेक नेत्यांच्या हत्येतही मोसादचा हात मानला जातो.

अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने शीतयुद्धादरम्यान क्युबाचे हुकूमशहा फिडेल कास्त्रोंच्या हत्येचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र यात त्यांना यश आले नाही.

अमेरिकन सरकारचा दावा - कोणतीही राजकीय हत्या करत नाही... टार्गेटेड किलिंग्सबद्दल अडचण नाही

1986 मध्ये लीबियावर एअर स्ट्राईकच्या निर्णयाआधी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी दोन्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांशी सल्लामसलतही केली होती. या हवाई हल्ल्यात कर्नल गद्दाफी मेला नाही, मात्र अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर हा फोटो कुख्यात झाला.
1986 मध्ये लीबियावर एअर स्ट्राईकच्या निर्णयाआधी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी दोन्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांशी सल्लामसलतही केली होती. या हवाई हल्ल्यात कर्नल गद्दाफी मेला नाही, मात्र अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर हा फोटो कुख्यात झाला.

1981 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी कार्यकारी आदेश 12333 जारी केला होता. यात ही घोषणा केलेली होती की अमेरिकन सरकार कोणतीही राजकीय हत्या करणार नाही.

यानंतरही दुसऱ्या देशांच्या प्रमुख व्यक्तींच्या हत्येचे अमेरिकेचे प्रयत्न थांबले नव्हते. 1986 मध्ये लीबियाचा हुकूमशहा मुअम्मर अल-गद्दाफीच्या बंकरवर अमेरिकेच्या वायुदलाने हल्ला केला होता. यात एका नवजात मुलीचा मृत्यू झाला होता. अमेरिकेने ड्रोन हल्ल्यांतून इराक, अफगाणिस्तानसह अनेक देशांत टार्गेटेड किलिंग केलेल्या आहेत.

रशियात राजकीय हत्यांचा इतिहास जुना... 5 राजांची हत्या झाली होती, आज राजकारणातील सर्वात धारदार हत्यार

हा फोटो 2006 मधील आहे. यात अलेक्झांडर लितिवेन्को रुग्णालयात दिसतो. लितिवेन्कोच्या हत्येतही व्लादिमीर पुतिन यांचा हात मानला जातो.
हा फोटो 2006 मधील आहे. यात अलेक्झांडर लितिवेन्को रुग्णालयात दिसतो. लितिवेन्कोच्या हत्येतही व्लादिमीर पुतिन यांचा हात मानला जातो.

रशियात राजकीय हत्या नव्या नाही. कम्युनिस्ट सरकारच्या सुरुवातीच्या खूप आधीपासून झारशाहीच्या काळापासून इथे राजकीय हत्या होत आलेल्या आहेत.

झारसाहीच्या 200 वर्षांच्या इतिहासात 5 झार राजकीय हत्येचे बळी ठरले होते. शेवटचा झार निकोलस-2 च्या पूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात आली होती.

कम्युनिस्ट शासनात विरोधातील आवाज दाबण्यासाठी राजकीय हत्या हे मुख्य हत्यार बनले होते. मानले जाते की सोव्हिएत संघाच्या काळात स्टॅलिनने लोह पडद्यावर आपले धोरण बनवले होते, तेव्हा याचा विरोध करणाऱ्या अनेक राजकीय नेते, उद्योजक, कलाकार आणि विद्वानांची हत्या करण्यात आली होती.

चेचन्यातही रशियाने अशाच प्रकारे टार्गेटेड किलिंग्सच्या माध्यमातून बंडखोर गटाच्या नेत्यांना निशाणा बनवलेले आहे.

2006 मध्ये केजीबीचा माजी अधिकारी अलेक्झांडर लितिवेन्कोची रेडिओअॅक्टिव्ह विष पोलिनियम-210 ने हत्या करण्यात आली होती. लितिविन्को राजकीय शरणार्थी म्हणून ब्रिटनमध्ये होता. तपासात हे रेडिओअॅक्टिव्ह विष आण्विक प्रकल्पाचे आढळून आले होते.

ब्रिटनने या हत्येसाठी केजीबीचा माजी बॉडीगार्ड अँड्रेई लुगोवॉयला जबाबदार मानत त्याची रशियाकडून प्रत्यार्पणाची मागणी केली होती. ही मागणी रशियाने फेटाळली होती. नंतर लुगोवॉय रशियात खासदार बनला होता.

बातम्या आणखी आहेत...