आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • World Mothers Day 2022 । Mothers Day Special Inpsiring Stories । How Powerful And Accurate Every Step Of A Mother Is

जी न बोलता मनातलं ऐकते... ती आई:या 4 कहाण्यांनी समजून घ्या किती सशक्त आणि अचूक असते आईचे प्रत्येक पाऊल

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज 'मदर्स डे' निमित्त वाचा, आई कशी आपल्याला सांभाळते, जीवनासाठी तयार करते. आईची सर्वात मोठी अपेक्षा असते- आपल्या बाळाचा आनंद, बहुधा यामुळेच आपल्या आनंदाचा शोधही आईपाशी येऊन पूर्ण होतो. तुमचा आनंद कशात आहे, ही बाब न सांगताही समजून घेते आई.

आई आपल्याला हे सर्वकाही देते...

प्रेरणा - जेणेकरून आपण आपल्या क्षमता ओळखू शकू, स्वत:ला कमी समजू नका. नेहमी नवा आणि मोठा विचार करा.
शिक्षण - जेणेकरून आपण ते शिकावे, जे आपल्या जास्त उपयोगाचे आहे. जे नेहमी पुढे नेईल, अग्रेसर ठेवील.
आशा - जेणेकरून आपण हार मानू नये. वाईट काळातही नेहमी चांगुलपणा आणि भल्याची आशा सोडू नये.
आनंद - जेणेकरून आपले आयुष्य संपूर्ण होईल. असा विचार बनावा की प्रत्येक परिस्थितीत आपले मन मजबूत राहील, आनंदी राहील.

एक मुलाची आई असलेल्या शारदा निर्मळ यांना 5 वर्षांच्या मुलीने बनविले 80 अनाथांची आई

मुंबईतील धारावी येथील शरणम नावाच्या निवारागृहात सध्या सुमारे 25 अनाथ मुली राहतात. या मुलींना शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम आई शारदा निर्मळ यांनी हाती घेतले आहे. शारदा यांनी आतापर्यंत 80 अनाथ मुलींचा सांभाळ केला आहे. निर्मल कम्युनिटी आउटरीच प्रोग्रामच्या प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या शारदा सांगतात की, माझ्या अभ्यासादरम्यान, माझ्या परिसरात मी एकटीच 10वीत शिकणारी मुलगी होते. शिक्षण घेऊन काय करायचे ही मुलींबाबत समाजाची विचारसरणी होती. त्यामुळे जेव्हा मी शरणम सुरू करू शकले, तेव्हा मुलींचे शिक्षण हा मुख्य उद्देश होता. काही वर्षांपूर्वी एक पाच वर्षांची मुलगी शेल्टर होममध्ये आली होती. तेव्हा इतर मुलं मला दीदी म्हणायचे पण ती पाच वर्षांची मुलगी मला माँ म्हणू लागली. मी तर आधीच एका मुलाची आई बनली होते. त्यामुळे आई होणे किती महत्त्वाचे आहे याची मला जाण होऊ लागली. मी माझ्या मुलांना समजावून सांगितले की शेल्टर होममधील मुली अनाथ आहेत, त्यामुळे त्यांना तुमच्यापेक्षा जास्त आईपणाची गरज आहे. माझा तीन वर्षांचा मुलगा तेव्हा त्याच्या शिक्षकाला सांगायचा की त्याला 30 बहिणी आहेत. आता शेल्टर होममधील सर्व मुली मला आई म्हणतात. शारदा म्हणते की, वडील आई म्हणजे एका वटवृक्ष असतील तर त्याची मुळं आई आहे. वडिलांचे श्रम फळाच्या रूपात दिसतात, पण आई हे बळ वृक्षाला खंबीरपणे उभे राहण्यासाठी साथ देते. (मुंबईहून विनोद यादव)

कार रेसिंगमधील आई-मुलीची टीम, प्रोफेसर आई वयाच्या 52 व्या वर्षी बनली मुलीची को-ड्रायव्हर

कर्नाटकच्या दावणगेरे परिसरातील शिवानी आणि तिची आई दीप्ति या दोघी या एक अद्वितीय आई आणि मुलीची जोडी म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. आईला वैद्याकीसय क्षेत्र आवडते म्हणून मुलीने वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकले, तर दुसरीकडे मुलीला रेसिंग आवडत होती. मात्र स्पर्धेसाठी को ड्रायव्हरउ मिळत नसल्याने डॉक्टर आईने मुलीची को ड्रायव्हर होण्याचे ठरवले. विशेष बाब म्हणजे या दोघींनी इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिपमध्ये एक संघ म्हणून सहभागही नोंदवला होता. यामुळे त्यांची चर्चा सुरू झाली आहे.

2016 मध्ये शिवानी धारवाडच्या एसडीएम मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेत होती. अभ्यासाचे दडपण येत असल्याने काही दिवस घरी गेली होती. यावेळी तिच्या वडीलांनी तिला त्याच्या पाईप कारखान्याच्या अंगणात घेऊन गेले, तिथे शिवानीने वडिलांची रेसिंग कार पहिल्यांदा चालवली होती. दरम्यान तिचे ड्रायव्हिंग पाहूण वडीलांनी तिला तू रेसिंगमध्ये आंतरराष्ट्रीय पारितोषिक जिंकू शकतेस असे सांगितले होते. दरम्यान वडीलांच्या बोलण्यामुळे शिवानीमध्ये कार रेसिंगची आवड निर्माण झाली आणि तिने प्रशिक्षण सुरू केले. तर 2018 मध्ये तिने व्यावसायिक रेसिंग ड्रायव्हर म्हणून नोदंणीही केली. मात्र यानंतर सहकारी ड्रायव्हर मिळत नसल्याने तिच्या आईने मुलीसाठी रेसिंगमध्ये को ड्रायव्हर होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर या जोडीने इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिपमध्ये सहभागही नोंदवला होता. (बंगळुरूहून विनय माधव)

मुले बिघडू नयेत म्हणून आईने खोचला पदर / मदर्स समितीकडून शाळेचा कायापालट, इथले प्रत्येक मूल अभ्यासू

आसाममधले गुतंग गाव. इथल्या काही महिलांनी रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांना शाळेत का गेला नाहीत, असा प्रश्न विचारला. त्यांनी उत्तर दिले, शाळेत जायला आवडत नाही. या उत्तरानेच महिलांमधील मातृत्वाला हादरवून सोडले. त्यातूनच मदर्स समिती उदयास आली. या समितीचे एकच काम होते, प्रत्येक मुलाला रोज शाळेत पाठवणे.

मदर्स समितीच्या सदस्य दीपा म्हणतात, आम्ही रोज शाळेचे रजिस्टर तपासायला सुरुवात केली. कोणती मुले शाळेत येत नाहीत, हे पाहिले. त्यानंतर तो मुलगा शाळेत का आला नाही, याचे कारण शोधायाचो. तो मुलगा शाळेत कसा जाईल, यावर मार्ग काढायचा. समिती इतक्यावरच थांबली नाही. त्यांनी शिक्षकांनीही रोज शाळेत यावे, यासाठी प्रयत्न केले. शिक्षक शाळेत आले नाहीत, तर त्याची माहिती समितीला मिळावी, अशी सोय करण्यात आली. समितीच्या सदस्यांनी मुलांना अभ्यासात मदत करायला सुरुवात केली. माध्यान्ह भोजनाची व्यवस्था, देखरेख आपल्या हातात घेतली. दीपा मोठ्या अभिमानाने सांगतात की, या उपक्रमासाठी गेल्या 12 वर्षांपासून गावातील प्रत्येक आईने मेहनत घेतली. त्याचे परिणामही समोर आले. कित्येक डझन मुलांनी दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले. अनेक जण परीक्षेत अव्वल आले. आता तर वाटते की, इथल्या प्रत्येक मुलाला अभ्यासू व्हायचे आहे. समितीच्या 36 वर्षांच्या सदस्य हुनुती सांगतात, समिती चाइल्ड क्लबच्या माध्यामातून मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देते. या कार्यक्रमासाठी गावातल्या ज्येष्ठांना आवर्जुन बोलावले जाते. त्यांनी यावे, गोष्टी सांगाव्या. हाच उद्देश असतो. त्यामुळे मुलांच्या शाळा आनंदाने ओसंडून वाहतायत. (दिसपूरहून आदित्य. डी.)

आई आणि मुलाचा एकत्रित प्रवास : आईच्या डोळ्यातून जग पाहण्याचा अनुभव म्हणजे हा मनाला भावणारा सर्वात मोठा आनंद होय

केरळमधील सरथ रामचंद्रन हे आपल्या आईच्या नजरेतून जग पाहत आहेत. तरुण मुले जेव्हा पर्यटनाला जातात तेव्हा बहुधा ते,आपल्यासोबत पर्यटनासाठी त्यांच्या तरुण मित्राला किंवा समवयस्कांचा शोध घेतात, पण 30 वर्षाचा सरथ हा इतरांपेक्षा जरा वेगळा आहे. व्यवसायाने तो बिझनेसमॅनआहे. तो कुठेही गेला तरी त्याची 64 वर्षीय आईंना गीता यांना तो सोबत घेऊन जातो. सरथच्या मते, त्याच्या आईने आपल्या घराजवळील वडक्कुमनाथ मंदिरापलीकडे जग क्वचितच पाहिले असेल, हे मला माहिती होते. त्यामुळे आईला त्या चोकटीपलिकडे नेण्याच्या उद्देशाने तीला माझ्यासोबत प्रवासाला येण्यास सांगीतले.सुरुवातीला तिने त्याला नकार दिला. ती म्हणायची की मला घरात राहायला आवडते. मी मोठ्या प्रयत्नाने आईचे मन वळवले आणि तिला सर्प्रथम वाराणसीला नेले. तिथून मग आम्ही शिमल्याला गेलो. मग मनाली ते रोहतांग असा चक्क बाईकने प्रवास केला. एवढा लांबचा प्रवास आईने आयुष्यात पहिल्यांदाच केला होता. आता आई गीता प्रवासाचा आनंद घेऊ लागली आहे. आम्हा दोघांनी आतापर्यंत जवळपास अर्धा देश एकत्रित प्रवास केला आहे. आमचा सर्वात मोठा प्रवास म्हणजे 16 दिवसांचा कैलास मानसरोवर आहे. (त्रिशूरहून के. ए. शाजी)

बातम्या आणखी आहेत...