आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुढच्या वेळी जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या असाधारण आईला स्क्रीनवर पाहाला तेव्हा त्या देवीला आठवा जिने त्या भूमिकेसाठी प्रेरित केले आहे. सिनेमात हे अवतार वेगवेगळ्या नॅरेटिव्हमध्ये प्रतिबिंबित झालेले आहेत. 'तंत्र-चूडामणि'नुसार देवी सतीने जेव्हा यज्ञकुंडात उडी मारली आणि महादेवाने त्यांच्या पार्थिवाला उचलून तांडव केले तेव्हा भगवान विष्णूने प्रलयाचे संकेत ओळखून आपले सुदर्शन चक्र फेकले. सुदर्शन चक्राने सतीच्या पार्थिवाला एक्कवान्न तुकड्यांमध्ये (काही जणांच्या मते 108 तुकडे) विभाजित केले. सर्व देवी शक्तीची रूपे बनली. भारतीय सिनेमात हे अवतार वेगवेगळ्या नॅरेटिव्हमध्ये प्रतिबिंबित होत आले आहेत. ‘संजोग’मध्ये माला सिन्हा यांना लक्ष्मी अवतारातील रूपात दाखवण्यात आले आहे. दुर्गा/अंबा या चांगल्याच्या पोषणासाठी आणि वाईटाच्या नाशासाठी बनवण्यात आलेली देवी 'शक्ती'ची रूपे आहेत. एका पौराणिक कथेनुसार जेव्हा राक्षस महिषासुर अजेय होता, तेव्हा भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महादेवाने देवी असाधारण बनण्यासाठी ऊर्जा केंद्रित केली. राकेश रोशन यांच्या ‘खून भरी मांग’मध्ये रेखा, कबीर बेदीचा पराभव करते. आणि जशी शिव, ब्रह्मा आणि विष्णूने दुर्गामातेची सहायता केली होती, तद्वतच एक अनोळखी व्यक्ती रेखाचा जीव वाचवते, एक डॉक्टर तिला एक नवी ओळख देतो आणि तिची मुले तिला यातना देणाऱ्याशी लढण्याचे बळ देतात.
असे मानले जाते की, देवी लक्ष्मी, सरस्वती आणि महाकालीने वैष्णोदेवीला उत्पन्न करण्यासाठी एकत्र येऊन आपल्या शक्ती संयुक्त केली, जेणेकरून देवी मानवांना छळातून मुक्त करू शकेल. वैष्णो देवीची रचना कठोर तपश्चर्या आणि आत्यंतिक भक्ती केल्यानंतर झाली होती. गोविंद सरैया यांच्या ‘सरस्वती चंद्रा’मध्ये कुमुद सुंदरीच्या रूपात या पवित्र आणि तपस्वी भूमिकेची झलक पाहता येऊ शकते. ही भूमिका नूतनने साकारली होती.
चित्रपटांत देवी सरस्वतीचे कोणत्या ना कोणत्या रूपात गुणगान करण्यात आले आहे. ‘आवारा’मध्ये राज कपूर यांनी विद्येच्या रूपात, हृतिक रोशनने ‘गुजारिश’मध्ये मलम लावणारीच्या रूपात, जितेंद्र यांनी ‘ज्योति’मध्ये सुधारकाच्या रूपात तर कमल हासन यांनी ‘एक दूजे के लिए’मध्ये शिक्षिकेच्या रूपात पाहिले. देवी सावित्री ही सतीचाच एक अवतार आहे, जो वैवाहिक जीवनासाठी समर्पित आहे. भारतीय सिनेमा पिढ्यांपासून आपल्या पतीसाठी समर्पित सर्वगुण संपन्न नायिकांना चालना देत आला आहे. मग भले तो ‘मैं चुप रहूंगी’ असो वा ‘दिल एक मंदिर’ असो. तर मग पुढच्या वेळी जेव्हाही तुम्ही एखाद्या असाधारण आईला स्क्रीनवर पाहाल तेव्हा त्या देवीला जरूर आठवा जिने त्या भूमिकेसाठी प्रेरित केले आहे.
-भावना सोमाया
(contact@bhawanasomaaya.com)
प्रसिद्ध चित्रपट लेखिका,
समीक्षक आणि इतिहासकार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.