आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • World Mother's Day 2022 The Lessons Of The Mother Who Will Stay With You For The Rest Of Your Life | Marathi News

मातृदिन विशेष:आईच्या प्रत्येक शब्दात शिकवण, आईचे धडे जे आयुष्यभर तुमच्या सोबत राहतात

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आईचा प्रत्येक सल्ला, प्रत्येक गोष्ट एक धडा आहे. तो आपल्याला आनंदाच्या मार्गावर घेऊन जातो. आठवा हे तुमच्या आईने तुम्हाला हे सांगितले होते का...

1) दररोज नवीन शिका
हे सांगून आई तुम्हाला समृद्ध आणि संपूर्ण होण्यासाठी तयार करते. अशा प्रकारे प्रेरित करते. सतत सुधारणा केल्याने परिपूर्णता येते हे ती जाणून आहे. यश आणि आनंद हे गंतव्यस्थान नाही. तर तो एक प्रवास असून ज्यावर आपल्याला दररोज चालत जायचे आहे.

२) चूक मान्य करा
तू चूक केली आहेस, तूच ती दुरुस्त कर, असे जेव्हा आई सांगते. तेव्हा ती तुम्हाला जबाबदार बनवते.
कारण आयुष्यात समोर येणाऱ्या प्रत्येक समस्या आणि संकटाचा सामना तुम्हाला एकट्यानेच करायचा असून कोणीही मदतीला येणार नाही, हे तिला माहिती आहे.

3) तु करू शकतोस
एखादी गोष्ट करण्यासाठी जेव्हा आई तुम्हाला सांगते. तेव्हा ती तुम्हाला आत्मविश्वासाचा धडा शिकवते.
कारण यश-अपयश हे आपले नसून दुसऱ्याचे आहे हे तिला माहीत असते. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात. ते गुण ओळखणे गरजेचे आहे.

4) जरा धीर धर
जेव्हा आई जरा धीर धरण्यास सांगते. तेव्हा ती तुम्हहाला जगायला शिकवते आणि आशावान बनवते.
कारण, जे घडले ते बदलता येत नाही, उद्या जे घडेल ते हाताशी नाही. पण त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहणे आवश्यक आहे, हे तिला माहिती आहे.

५) प्रेमाने बोलं
सर्वांशी प्रेमाणे बोलण्यास आई सांगते. तेव्हा ती तुम्हाला यशाचा सर्वात महत्वाचा मंत्र शिकवत असते.
कारण तिला माहित आहे, आपल्या बोलण्यातूनच तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रभावीत करू शकाल आणि तुम्हाला हवा असलेला आनंददायी बदल घडवू शकला.

६) बचत करायला सांगते
तुमच्या आयुष्यात समोर येणाऱ्या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी ती तुम्हाला तयार करते. अशा प्रकारे ती तुम्हाला सुरक्षित करते. कारण, गरजा या नेहमीच वाढतात. जर तुमच्याकडे त्या पूर्ण करण्यासाठी सुरक्षित पैसा असेल तर तुम्ही नेहमीच निर्भय राहाल.

७) वाकून चालू नकोस
असे जेव्हा आई म्हणते, तेव्हा ती तुम्हाला आपली देहबोली कशी असावी ही शिकवत असते. कारण, चांगले पॉश्चर हे आकर्षक आणि निर्भय बनवते. हे गरजेचे आहे.

८) वेळेवर उठं
सकाळी लवकर उठण्यासाठी जेव्हा आई सांगते. तेव्हा ती तुम्हाला निरोगी भविष्यासाठी तयार करते, योग्य दिशा दाखवते. कारण तिला माहित आहे, की वेळ सर्वात मौल्यवान आहे. आपण ती कधीही परत मिळवू शकत नाही. जीवनात तुम्ही काय मिळवाल आणि काय गमावाल याचा सर्वात महत्वाचा घटक ही वेळ आहे.

9) मित्र बनवं
जेव्हा आई मित्र बनवण्यास सांगते. तेव्हा ती तुम्हाला जगायचे कसे हे शिकवते. कारण, संगत जर चांगली असेल तर तुम्ही चांगले व्यक्ती बनता. एक चांगला मित्र प्रत्येक समस्येवर उपाय असू शकतो, हे तीला माहिती आहे.

10) घाबरू नको, करून टाक
जेव्हा आई असे म्हणते, तेव्हा ती तुम्हाला निडर बनवते. भीती ही स्वप्ने पूर्ण होण्यापासून रोखते हे ती तुम्हाला सांगते. कारण तिला माहित आहे की जर तुम्ही भीतीवर विजय मिळवू शकत नसाल तर ती वाढत जाते. यावर उपाय म्हणजे जे काम भीतीदायक होते ते आजच करून पहा.

बातम्या आणखी आहेत...