आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जागतिक लाेकसंख्या दिन विशेष:प्रत्येक मुलगी दहावीपर्यंत शिकली तरी 2050 मध्ये जगाची लोकसंख्या 150 कोटींपर्यंत कमी होईल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलींना शिकवणे हा लोकसंख्येवर नियंत्रणासाठी, जग आणखी चांगले बनवण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग
Advertisement
Advertisement

ब्रुकिंग्ज संस्थेच्या अहवालानुसार, मुलींच्या साक्षरता आणि जन्म दरात जवळचा संबंध आहे, कारण शिक्षणामुळे मुलींना कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजते. बाल विवाह व कमी वयात आई होणे या समस्यांपासूनही सुटका होते. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘वर्ल्ड पॉप्युलेशन अँड ह्युमन कॅपिटल इन ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी स्टडी’ नुसार, प्रत्येक मुलीला व मुलाला १० पर्यंत नियमित शिक्षण मिळाले तर २०५० मध्ये जगाची लोकसंख्या १५० कोटींनी कमी असेल. यूएननुसार, २०५० मध्ये जगाची लोकसंख्या ९८० कोटी असेल.

जगाचे उदाहरण

आफ्रिकेत महिला शिक्षणाच्या सुविधा कमी आहेत, तेथे प्रत्येक महिला सरासरी ५.४ मुलांना जन्म देत आहेत, तर ज्या देशांत मुलींना १० वीपर्यंत शिक्षण मिळत आहे तेथे प्रत्येक महिला २.७ मुलांना जन्म देतात. मुलींसाठी जेथे कॉलेजपर्यंतची सुविधा आहे तेथे १ महिला सरासरी २.२ मुलांना जन्म देत आहेत.

देशाचे उदाहरण

हाच ट्रेंड भारतात आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशनच्या ताज्या अहवालानुसार दर हजारी सर्वात कमी जन्मदर केरळमध्ये १३.९ आहे. तामिळनाडूत जन्मदर १४.७ आहे. ही राज्ये मुलींच्या साक्षरतेतही पुढे आहेत. २०११ मध्ये महिला साक्षरतेत सर्वात पिछाडीवर असलेली राजस्थान (५२.७), बिहार (५३.३), उत्तर प्रदेश (५९.५) होती. तेथे जन्मदर अनुक्रमे २३.२,२५.८ व २४.८ आहे.

गेल्या २०० वर्षांत मानवाने या मोठ्या आव्हानांवर मात केली

स्वातंत्र्य : लोकशाहीत १% राहत होते,आता ५६% राहतात

१८२० पर्यंत १०० पैकी केवळ एक व्यक्ती लोकशाही असलेल्या देशात जन्म घेत होती. आज जगातील ५६% लोक लोकशाही देशात राहतात. १९ व्या शतकात लोकसंख्येच्या एकतृतीयांशपेक्षा जास्त लोक वसाहती असलेल्या देशांत राहत होते आणि जवळपास अन्य सर्व राजेशाही वा हुकूमशाही असलेल्या देशांत राहत होते. २० व्या शतकात जगात अनेक बदल झाले. वसाहतवादी साम्राज्य संपून अधिकाधिक देश लोकशाही देश झाले. जगात लोकशाहीतील लोकसंख्या सतत वाढत आहे.

गरिबी : ९४% लोकांना अति गरिबीतून बाहेर काढले

१८२० पर्यंत अत्यल्प लोकांना सुखी जीवनाच्या सर्व सुविधा उपलब्ध होत्या. १०० पैकी केवळ ६ व्यक्तीच चांगले जीवन जगू शकत होत्या. बाकी ९४% लोक अत्यंत गरीब होते. १९५० मध्ये जगातील दोनतृतीयांश लोक खूप गरीब होते. १९८१ मध्.ये हा आकडा कमी होऊन ४२ % वर आला. २००१५ मध्ये अत्यंत गरीब असलेल्या लोकांची संख्या १०% पेक्षाही कमी झाली. हे गेल्या २०० वर्षांमधील सर्वात मोठे यश म्हटले जाते. यूएनच्या म्हणण्यानुसार या २०० वर्षांत जगाच्या लोकसंख्येच्या ९४% लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे.

साक्षरता :४०६ कोटी मुलांच्या शिक्षणाची सोय केली

१८ व्या शतकाच्या प्रारंभी लोकसंख्या वेगाने वाढत असताना १०० पैकी ८३ मुलांच्या शिक्षणाची काहीच सोय नव्हती. ही मुले साक्षरही होऊ शकत नव्हती. १०० कोटी लोकसंख्येत त्या वेळी केवळ १० कोटी लोक साक्षर होते. थोडी सुधारणा झाल्यावर १९३० मध्ये १५ वर्षांपेक्षा अधिक वयाची प्रत्येक तिसरी व्यक्ती साक्षर व्हायला लागली. आता जगात ८६% लोक साक्षर आहेत. आज जगातील १५ वर्षांपेक्षा अधिक वयाची लोकसंख्या ५०४ कोटी आहे. यातील सुमारे ८५% म्हणजे ४०६ कोटी लोक साक्षर आहेत.

मुलींचा साक्षरता व जन्म दर

राज्य साक्षरता जन्म दर

केरळ, 92% - 13.9%

तामिळनाडू, 73% - 14.7%

हिमाचल, 76% - 15.7%

उत्तराखंड, 71% - 15.0%

भारत सरासरी 65% - 20.0

Advertisement
0