आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आज जागतिक व्याघ्र दिन:राज्यात वाघ वाढले : 2006 मध्ये 103, तर 2018-19 मध्ये 312 वाघांची नोंद

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तलावाच्या काठी बब्बर आणि माया या वाघ-वाघिणीचे छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी टिपलेले छायाचित्र.
  • आज जागतिक व्याघ्र दिन : वाघांच्या संरक्षणाचा संकल्प हवा...

निसर्गाच्या अन्नसाखळीचा अविभाज्य घटक असणाऱ्या वाघांचे संवर्धन आणि संरक्षणाच्या जनजागृतीचा हा दिवस. वाघ म्हणजे आपल्या वनांची आन, बान आणि शान. त्यामुळे समृद्ध निसर्गासाठी व मानवाच्या सुदृढ जीवनासाठी वाघांचे संरक्षण करण्याचा संकल्प आज करूया.

महाराष्ट्रात असलेल्या ६ व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण ३१२ वाघ आहेत. यापूर्वीच्या प्रसिद्ध अहवालामध्ये २००६ मध्ये ही संख्या १०३, २०१० मध्ये १६८, २०१४ मध्ये १९० आणि आता २०१८-१९ च्या सर्वेक्षणामध्ये संख्या ३१२ झाली आहे. यामुळे भविष्यात व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन वाढेल.