आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • World Vaccination: Rich Countries Controlling 53 Percent Of Whole Corona Vaccine Supply, Poor Countries Get Nothing, Vaccination In India News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ओरिजिनल:जगातील निम्मे व्हॅक्सीन श्रीमंत देशांकडे, कित्येक गरीब देशांकडे एक डोस सुद्धा नाही; भारतात सुद्धा दयनीय अवस्था

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीमंत देशांनी जगभरातून होणारा व्हॅक्सीनचा 53% पुरवठा आपल्या ताब्यात घेतला

कोरोना आणि लॉकडाउनप्रमाणेच लसीकरणात सुद्धा जग श्रीमंत आणि गरीब असा विभागला गेला आहे. काही देशांकडे भरपूर व्हॅक्सीन आहेत. तर काही देशांना एक व्हॅक्सीन सुद्धा मिळालेली नाही. वॉशिग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, महामारीत ही दरी आणखी वाढणार आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, एकूण कोरोना व्हॅक्सीनपैकी 48% डोस श्रीमंत देशांनी आपल्या नागरिकांना लावल्या आहेत. या देशांची लोकसंख्या जगातील लोकसंख्येपैकी केवळ 16% आहे. अर्थात 84% लोकसंख्या असलेल्या मध्यमवर्गीय आणि गरीब देशांना उर्वरीत 52 टक्के व्हॅक्सीन मिळाल्या आहेत.

इस्रायलच्या 58% नागरिकांनी घेतले दोन्ही डोस
व्हॅक्सीनेशनच्या बाबतीत 19 एप्रिलपर्यंत जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, इस्रायलच्या 60% लोकांनी व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे. तर 58 टक्के लोक असे आहेत की ज्यांनी व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यातही इस्रायलने जास्तीचे पैसे मोजून लोकांना व्हॅक्सीन लावल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांना लस देण्यासाठी सरकारने आपल्या आरोग्य यंत्रणेची आकडेवारी औषध कंपन्यांसोबत शेअर केली आहे. यासाठी इस्रायलने आतापर्यंतत 7.88 कोटी डॉलर अर्थात 5 हजार 910 कोटी रुपये खर्च केले आहेत. सरासरी एक लाखपैकी 14 हजारपेक्षा अधिक लोकांना लस दिली जात आहे.

ब्रिटनने व्हॅक्सीनेशनवर खर्च केले तब्बल 1.20 लाख कोटी रुपये
ब्रिटनच्या सरकारी आकडेवारीनुसार, देशात व्हॅक्सीनेशनवर तब्बल 16 अब्ज अमेरिकन डॉलर अर्थात 1 लाख 20 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या ठिकाणी 50% लोकांनी व्हॅक्सीन घेतले आहे. तर एकूणल लोकसंख्येच्या 16% लोकांनी दोन्ही डोस घेतले. या ठिकाणी सरासरी एक लाख लोकांपैकी 59,308 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे.

अमेरिकेत 41% नागरिकांना मिळाला पहिला डोस
जगातील सर्वाधिक संक्रमितांचा देश झालेला अमेरिका आणि सर्वाधिक कोराना रुग्ण बरे करणारा देश होत आहे. वॉशिंगटन पोस्टच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत व्हॅक्सीन बनवणे आणि खरेदी करण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च करण्यात आले आहेत. त्यात 46% लोकांनी पहिला तर 26% लोकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. सद्यस्थितीला अमेरिकेकडे लोकसंख्येच्या गरजेपेक्षा जास्त व्हॅक्सीन उपलब्ध आहेत. त्यामुळे आता बायडेन ते इतर देशांना देण्याच्या तयारीत आहेत.

चिलीमध्ये 29% लोकांनी घेतले दोन्ही डोस
कोरोनातून झपाट्याने सावरण्यचा प्रयत्न करणाऱ्या देशांपैकी एक चिलीने व्हॅक्सीनेशनमध्ये गती आणली आहे. येथील 41% नागरिकांना पहिला तर 29% लोकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. तरीही रोज येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या अजुनही कमी झालेली नाही. या ठिकाणी सरासरी एक लाख पैकी 71 हजार लोकांना व्हॅक्सीन दिले जात आहे.

हंगेरीत 35% लोकांचे व्हॅक्सीनेशन
युरोपियन युनियनचा भाग असलेला देश हंगेरी येथे चीन आणि रशियाकडून व्हॅक्सीन विकत घेत दिल्या जात आहेत. 35% लोकांनी व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे. या ठिकाणी सरासरी एक लाख लोकांपैकी 49 हजार लोकांना व्हॅक्सीन दिले जात आहे.

कॅनडा आणि युरोपियन देश सध्या सर्वात जास्त व्हॅक्सीनेशन करत आहेत. या देशांकडे लोकसंख्येपेक्षा जास्त व्हॅक्सीन आहेत. परंतु, राजकारण आणि धोरणांमुळे अद्याप सर्वांचे व्हॅक्सीनेशन होऊ शकलेले नाही. युरोपियन नेत्यांवर यासाठी जगभरातून टीका देखील केल्या जात आहेत.

काही देशांकडे एक डोस सुद्धा नाही
ड्यूक युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल हेल्‍थ सेंटरने एका अभ्यासात निदर्शनास आणले की श्रीमंत देशांनी जगभरातून होणारा व्हॅक्सीनचा 53% पुरवठा आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यामुळे, 92 गरीब देशंना 2023 पूर्वी आपल्या निम्म्या नागरिकांना सुद्धा व्हॅक्सीन देता येणार नाही. एवढेच नव्हे, तर सोमालिया, नॉर्थ कोरिया, येमेन, लायबेरिया आणि हैती सारख्या देशांपर्यंत व्हॅक्सीनचे एक डोस सुद्धा पोहोचलेले नाही. यासोबतच, सुडान, माली, अफगाणिस्तान, मोझॅम्बिक आणि तझाकस्तान इत्यादी देशांनी अद्याप आपल्या 1% नागरिकांना सुद्धा लस दिलेली नाही.

भारतातील परिस्थिती सुद्धा दयनीय
भारतात सुद्धा व्हॅक्सीनेशनची अवस्था विकट आहे. अल्पोत्तपन्न गटात येणाऱ्या भारतात केवळ 8.2% लोकांनी व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे. सरासरी एक लाखपैकी केवळ 9,488 लोकांना व्हॅक्सीनचा डोस देण्यात आला आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये व्हॅक्सीनेशन सेंटर बंद करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी उरलेले व्हॅक्सीन घेण्यासाठी मारामारी केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एक तर सरकारने व्हॅक्सीन उत्पादनाचा खोटा गाजा-वाजा केला. किंवा व्हॅक्सीन उत्पादन करून तो इतर देशांना विकला अशी टीका केली जात आहे.

केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करावे असे आदेश जारी केले. परंतु, व्हॅक्सीनचा पुरवठाच नसल्याने महाराष्ट्रासह काही राज्यांना 1 मे पासून व्हॅक्सीन देता येणार नाही असे राज्य सरकारांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...