आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुने कपडे निरुपयोगी म्हणून आपण अनेकदा फेकून देतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का की जगात जुन्या जीन्स किती मौल्यवान समजल्या जातात? अलिकडेच झालेल्या एका लिलावात जुनी जीन्स एक-दोन नव्हे तर 94 लाखांत विकली गेलीय.
इतकेच नव्हे तर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदोमीर झेलेन्स्की आणि फुटबॉलपूट मॅराडोनाचे टी शर्ट आणि जॅकेटचाही लाखो रुपयांत लिलाव झाला आहे.
1857 मधील वादळात बुडालेल्या एका जहाजाच्या ट्रंकमध्ये165 वर्षांपूर्वीची जीन्स सापडली होती. अमेरिकेत ही जीन्स जगातील सर्वात जुनी जीन्स म्हणून सादर करण्यात आली. अलिकडेच तिचा लिलाव झाला. एका व्यक्तीने ही जीन्स 94.2 लाख रुपयांत खरेदी केल्यानंतर सर्वच जण चकित झाले.
5 बटणांची व्हाईट जीन्स सोशल मीडियावर व्हायरल
5 बटण असलेल्या पांढऱ्या रंगाच्या या मायनर्स जीन्सचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जर्मन-अमेरिकन व्यावसायिक लेव्ही स्ट्रॉस यांच्याशी हीचा संबंध मानला जात आहे. वास्तविक, लेव्ही स्ट्रॉस कंपंनीची पहिली अधिकृत जीन्स 1873 मध्ये तयार झाली होती. तर ही जीन्स त्यापेक्षाही 16 वर्षे आधीची आहे. म्हणजेच लिलाव झालेली जीन्स 12 सप्टेंबर 1857 पूर्वीच तयार झालेली होती.
578 प्रवाशांचे जहाज वादळामुळे बुडाले होते
ही जीन्स त्या जहाजाच्या अवशेषांत सापडली आहे. जे 12 सप्टेंबर 1857 रोजी बुडाले होते. या जहाजात क्रू सदस्यांशिवाय 578 प्रवासी होते. यापैकी 425 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हे जहाज सॅन फ्रॅन्सिस्कोहून पनामा मार्गे न्यूयॉर्कला जात होते.
विशेष म्हणजे ही जीन्स जुनी असल्याचे पुरावे आढळले नाहीत. काही महिन्यांपूर्वीच लेवीच्या जीन्सची एक जोडी 62 लाखांना विकण्यात आली होती. मात्र ती जीन्सही 1880 च्या दशकातील मानली गेली. ती अमेरिकेच्या निर्जन खदानीत सापडली होती.
वोलोदिमीर झेलेन्स्कींनी टी-शर्ट आणि जॅकेटमधून गोळा केले 85 लाख रुपये
रशियासोबत युद्ध सुरु ठेवण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्कींनी प्रयत्न आणखीन वाढवले आहेत. यासाठी त्यांनी ब्रिटनमध्ये आपले खाकी शर्ट आणि जॅकेटचा लिलाव करून 85 लाख रुपयांचा निधी गोळा केला होता. हा लिलाव याच वर्षी लंडनमधील युक्रेनच्या दुतावासात झाला होता.
सुमारे 68 कोटींत विकली होती मॅराडोनाची हँड ऑफ गॉडवाली जर्सी
36 वर्षांपूर्वी 22 जून 1986 रोजी फिफा विश्वचषकात अर्जेंटिनाचे फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनांनी जी जर्सी घालून ऐतिहासिक आणि वादग्रस्त हँड ऑफ गॉड गोल केला होता. तो फुटबॉल शर्ट लंडनमधील लिलावात 67.86 कोटी रुपयांना विकला गेला होता.
इंग्लंडविरोधातील सामन्यात मॅराडोनांनी हाताने वादग्रस्त गोल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तेव्हा या जर्सीने लिलावाचाही विक्रम केला होता. एखाद्या सामन्यात खेळाडूने घातलेल्या जर्सीची ही सर्वाधिक किंमत होती. 2019 मध्ये बेबे रूथच्या यांकिज रोडची जर्सी 43 कोटींना विकण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.