आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Vladimir Putin Successor; Who Is Yevgeny Prigozhin | Russia Ukraine War | Vladimir Putin | Yevgeny Prigozhin

दिव्य मराठी एक्सप्लेनरस्वयंपाकी होऊ शकतो पुतीन यांचा उत्तराधिकारी:9 वर्षे तुरुंगात राहिले येवगेनी, हॉट डॉगचा स्टॉल लावला, खासगी सैन्यही बनवले

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवगेनी प्रिगोजिन यांच्या सर्वात प्रसिद्ध 
छायाचित्रांपैकी हे एक छायाचित्र आहे. 2011 मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथील रेस्टॉरंटमध्ये ते पुतिन यांना वाढतांना दिसत आहेत.    - Divya Marathi
येवगेनी प्रिगोजिन यांच्या सर्वात प्रसिद्ध छायाचित्रांपैकी हे एक छायाचित्र आहे. 2011 मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथील रेस्टॉरंटमध्ये ते पुतिन यांना वाढतांना दिसत आहेत.   

युक्रेनवर रशियाचे आक्रमण होऊन 316 दिवस झाले आहेत. युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी रशियन सैन्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, पुतीन यांची तब्येत बिघडल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. अशा वेळी रशियात नवा नेता उदयास येत आहे. हा दुसरा कोणी नसून पुतिन यांचा स्वयंपाकी किंवा शेफ येवगेनी प्रिगोजिन आहे.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे उत्तराधिकारी म्हणून येवगेनी यांची वर्णी लागली आहे. त्याचे संकेत खालील चार गोष्टींमध्ये आढळून येतात...

  • 61 वर्षीय येवगेनी कट्टरपंथीयांमध्ये लोकप्रिय आहेत, जे युक्रेन युद्धाच्या अपयशाचे खापर पुतीन यांच्या वृद्धत्वावर फोडतात. तसेच कट्टरपंथीयांमध्ये पुतिन यांच्यापेक्षा त्यांना अधिक धोकादायक मानले जाते.
  • पुतीन यांचे निकटवर्तीय येवगेनी हे रशियातील सर्वात शक्तिशाली बनत आहेत. युक्रेनमधील युद्धातील अपयशाबद्दल येवगेनी उघडपणे रशियन संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्यावर टीका करत आहेत. पुतिन त्यांचा विरोधही करत नाहीये.
  • पुतीन यांच्या ढासळत्या प्रकृतीबाबतही अनेक बातम्या आल्या आहेत. पुतिन यांना पार्किन्सन्सपासून ते कर्करोगाने ग्रासल्याच्या बातम्या आल्या आहेत. म्हणजेच पुतीन यांना काही झाले तर रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत येवगेनी आघाडीवर असतील.
  • येवगेनी त्यांच्या वॅगनर ग्रुपच्या भाडोत्री सैनिकांना रशियाची सर्वात प्रभावी लढाऊ शक्ती म्हणून सादर करत आहे. म्हणजे एकप्रकारे ते रशियन सैन्याला हीन दर्जाचे म्हणत आव्हान देत आहेत.

हॉट डॉग स्टॉल उभारणारे येवगेनी पुतिन यांचे शेफ बनण्याची कहाणी…

9 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर व्यवसाय सुरू केला

येवगेनी प्रिगोजिन यांचा जन्म 1 जून 1961 रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. पुतीनप्रमाणेच येवगेनी सेंट पीटर्सबर्गमध्ये वाढले. रशियन न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, येवगेनी यांना 1981 मध्ये प्राणघातक हल्ला, दरोडा आणि फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आणि 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

वास्तविक, सोव्हिएत युनियनच्या पतनाच्या 9 वर्षांनंतर येवगेनी यांची सुटका करण्यात आली. येवगेनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. प्रथम हॉट डॉग स्टॉल उभारला. यानंतर श्रीमंत लोकांसाठी रेस्टॉरंट उघडले.

2006 मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथील येवगेनी यांच्या रेस्टॉरंटमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश.
2006 मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथील येवगेनी यांच्या रेस्टॉरंटमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश.

येवगेनी यांनी आपल्या भागीदारांसह डॉक केलेल्या बोटीवर रेस्टॉरंट उघडले. त्याला त्वरीत प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि सेंट पीटर्सबर्गमधील सर्वात फॅशनेबल जेवणाचे ठिकाण बनले आहे. या रेस्टॉरंटमध्ये जागतिक नेत्यांसोबत पुतिन स्वत: गेले यावरून लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. पुतिन यांनी 2001 मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक आणि त्यांच्या पत्नीचे तर 2002 मध्ये अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली होती. 2003 मध्ये पुतिन यांनी त्यांचा वाढदिवसही या रेस्टॉरंटमध्ये साजरा केला होता.

जेव्हा जेव्हा रेस्टॉरंटमध्ये असा मोठा कार्यक्रम असेल तेव्हा येवगेनी नेहमी मोठ्या पाहुण्यांच्या आसपास असायचे. कधी-कधी ते रिकामे ताटही स्वच्छ करत असे. पुतिन यांनीही त्याची दखल घेतली. एकदा सेंट पीटर्सबर्गच्या गोरोड 812 मासिकाशी झालेल्या संभाषणात, येवगेनी म्हणाले की, मी माझा व्यवसाय कोणत्या परिस्थितीत सुरू केला हे अध्यक्ष पुतिन यांनी पाहिले आहे. तसेच मी माझ्या रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करायचो.

पुतीन यांच्या संपर्कात आल्यानंतर येवगेनी यांनी कॉन्कॉर्ड केटरिंग सुरू केले. यानंतर येवगेनी यांना रशियाच्या शाळा आणि सैन्यासाठी मोठी सरकारी कंत्राटे मिळू लागली. राष्ट्रपतींच्या मेजवानीचे आयोजन करण्याची संधीही त्यांना मिळाली. यानंतर, त्यांना पुतिनचा स्वयंपाकी किंवा आचारी म्हटले गेले. अँटी करप्शन फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, येवगेनी यांना गेल्या पाच वर्षांत 3.1 अब्ज डॉलर किंवा रु. 26,000 कोटींचे सरकारी कंत्राट मिळाले आहेत.

2016 च्या अमेरिकन निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप

आपल्या रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसायातून पैसा कमावल्यानंतर येवगेनी त्यांच्या स्वयंपाकघरातून बाहेर पडले. यूएस वकिलांच्या मते, येवगेनी हे इंटरनेट रिसर्च एजन्सीचे मालक आहेत, ही कंपनी रशियाच्या ट्रोल फॅक्टरीला निधी पुरवते. सोशल मीडियावर काल्पनिक नावाने अमेरिकेविरुद्ध खोटे पसरवणे हे त्यांचे काम आहे.

याच कंपनीने 2016 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन करणारे आणि हिलरी क्लिंटन यांच्यावर टीका करणारे संदेश पाठवल्याचा आरोप आहे. म्हणजे एक प्रकारे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, 2013 मध्ये जेव्हा ट्रोल फॅक्टरी तयार करण्यात आली होती, तेव्हा मुख्य कार्य सोशल मीडियावर लेख आणि टिप्पण्यांनी भरणे हे होते. यामुळे असे लक्षात येते की, पुतीन यांची राजवट भ्रष्ट्र पाश्चात्य देशांपेक्षा नैतिकदृष्ट्या अधिक चांगली आहे.

रशियामधील भाडोत्री सैनिकांसाठी अर्थसहाय्य

ऑगस्ट 2022 मध्ये युक्रेनच्या भागावर ताब मिळवल्यानंतर लुहान्स्क येथे वॅगनरच्या सैन्यासह येव्हगेनी प्रिगोजिन.
ऑगस्ट 2022 मध्ये युक्रेनच्या भागावर ताब मिळवल्यानंतर लुहान्स्क येथे वॅगनरच्या सैन्यासह येव्हगेनी प्रिगोजिन.

येवगेनी वॅगनरशी देखील संबंधित आहे, जो रशियन सरकारच्या पाठीशी असलेल्या लढवय्यांचा एक धोकादायक गट आहे. अनेक वर्षांच्या अनुमानांनंतर सप्टेंबर 2022 मध्ये येवगेनीने स्वतः ते स्वीकारले. रशियाची खासगी सेना म्हणून ओळखल्या जाणार्‍या वॅगनर आर्मीची स्थापना 2014 मध्ये झाली. युरोपियन युनियन आणि यूएस ट्रेझरी डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, येवगेनी प्रिगोजिन कंपनीच्या रूपात या खासगी सैन्याला निधी देतात. टाईम्सच्या मते, ही कायदेशीररित्या नोंदणीकृत कंपनी नाही आणि भाडे तत्वावर सैनिक रशियन कायद्यानुसार बेकायदेशीर आहेत. तरी देखील, या गटाकडे अजूनही क्रेमलिन समर्थक खासगी सैन्य म्हणून पाहिले जाते.

2014 मध्ये रशियाने क्राइमियाचा समावेश रशियामध्ये केल्यानंतर वॅगनरचे सैन्य प्रथम तैनात केले गेले, असे मानले जाते. या खासगी सैन्याने यापूर्वी सीरिया, लिबिया, माली आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये क्रूर आणि भीषण मोहिमा केल्या आहेत. युक्रेनवर हल्ला होण्यापूर्वी, या गटातील लढवय्ये पूर्व युक्रेनमध्ये खोटे ध्वज ऑपरेशन करत होते आणि रशियाला हल्ल्याचे कारण देत होते.

येवगेनी प्रिगोजिन यांनी अनेक वर्षांपासून वॅगनर आर्मीमध्ये सहभाग असल्याच्या वृत्ताला नकार देत होते. इतकच नाही वॅगनर यांचा संबंध असल्याचा दावा करणाऱ्या पत्रकारावर त्यांनी खटलाही भरला होता.

रशियन सैन्यासाठी वॅगनर आर्मीही आव्हान

संडे गार्डियन लाइव्हमधील वृत्तानुसार, येवगेनी प्रिगोजिन यांनी युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या बेल्गोरोड आणि कुर्स्क या रशियन प्रदेशांमध्ये लष्कराच्या बरोबरीने लष्करी संरचना उभारली आहे. हे वॅगनर आर्मीचे प्रशिक्षण सुविधा आणि भरती केंद्र देखील आहे. यूएस नॅशनल सिक्युरिटी प्रवक्ते जॉन किर्बी यांच्या मते, येवगेनी प्रिगोजिन यांची वॅगनर आर्मी स्वतः रशियन सैन्यासाठी प्रतिस्पर्धी शक्ती केंद्र म्हणून उदयास येत आहे.

येवगेनी प्रिगोगिनची तुलना रासपुतिन यांच्याशी

बरेच तज्ञ म्हणतात की, येवगेनी प्रिगोजिनच्या प्रभावाच्या किंवा शक्तीच्या क्षेत्राबद्दल आमच्या मनात कोणताही प्रश्न नाही. मात्र, ते त्यांच्या वाढत्या प्रभावाचे राजकीय कारकीर्दीत रूपांतर करू शकतात का, हे पाहणे बाकी आहे.

येवगेनी, बहुतेक राजकारण्यांप्रमाणे, त्याच्या महत्वाकांक्षेला कमी महत्त्व देतात. अलीकडेच ते म्हणाले होते की, मी लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करत नाही. मातृभूमीप्रती असलेले माझे कर्तव्य पार पाडणे हे माझे काम आहे. राजकारणात येण्याचा प्रश्न सोडा, माझा कोणताही राजकीय पक्ष काढण्याचा विचार नाही. तथापि, रशियामधील त्यांचा उदय आणि क्रेमलिनमधील त्यांचे वर्चस्व याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

1910 मध्ये ग्रिगोरी रासपुतिन फोटोसाठी पोझ देताना.
1910 मध्ये ग्रिगोरी रासपुतिन फोटोसाठी पोझ देताना.

रशियन राजकारणातील तज्ञ आणि वॉशिंग्टन स्थित कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसचे वरिष्ठ सहकारी आंद्रेई कलाश्निकोव्ह म्हणतात की, येवगेनी यांचा प्रभाव रशियाच्या झार निकोलस II यांच्या दरबारात ग्रेगरी रासपुतिनसारखा होऊ लागला आहे. साहजिकच ही व्यक्ती पुढची राष्ट्रपतीपदाची उमेदवार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

असे म्हणतात की, रासपुतिन यांच्याकडे संमोहनाची इतकी ताकद होती की, त्यांनी रशियाच्या शासकालाही आपला गुलाम बनवले होते. रसपुतिन 1906 मध्ये पहिल्यांदा झार निकोलस यांच्या दरबारात आले. रासपुतीन दरबारात पोहोचले तेव्हा, राणी अलेक्झांड्रा त्यांच्या मुलासाठी अनेक वर्षांपासून वैद्याच्या शोधात होत्या. त्यांच्या मुलाला हिमोफिलिया झाला होता.

राजपुत्राला थोडासाही कट लागला तर त्याचा मृत्यू होण्याचा धोका होता. त्यावेळी या आजारावर कोणताही इलाज नव्हता. अशा परिस्थितीत, रासपुतीन यांनी राणीला आश्वासन दिले की, राजकुमाराला काहीही होणार नाही. त्यांनी काय केले माहिती नाही, पण काही दिवसातच राजकुमार पूर्णपणे बरा झाला. यामुळे, शाही दरबार रासपुतीनचा चाहता बनला.

रशियामधील आपल्या खास लोकांकडे सत्ता सोपवण्याची परंपरा

व्लादिमीर पुतिन यांनी 7 मे 2000 रोजी पदाची शपथ घेतली. त्यांच्या मागे रशियाचे माजी अध्यक्ष बोरिस येल्तसिन दिसत आहेत.
व्लादिमीर पुतिन यांनी 7 मे 2000 रोजी पदाची शपथ घेतली. त्यांच्या मागे रशियाचे माजी अध्यक्ष बोरिस येल्तसिन दिसत आहेत.

1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर म्हणजेच 31 वर्षांत रशियामध्ये केवळ 3 व्यक्ती राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. 10 जुलै 1991 रोजी बोरिस येल्त्सिन हे रशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. यानंतर येल्त्सिन यांनी ऑगस्ट 1999 मध्ये व्लादिमीर पुतीन यांना पंतप्रधान केले. राष्ट्राध्यक्ष येल्त्सिन पुतीन यांना क्रेमलिनचे म्हणजेच देशाचे नेतृत्व करण्यासाठी तयार करत होते हे स्पष्ट संकेत होते. येल्त्सिन यांचा कार्यकाळ 2000 पर्यंत होता. मात्र, डिसेंबर 1999 मध्ये त्यांनी अचानक राजीनामा दिला.

यानंतर व्लादिमीर पुतिन कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष बनले आणि नंतर निवडणूक जिंकून 7 मे 2000 रोजी रशियाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर ते 7 मे 2008 पर्यंत ते अध्यक्ष होते. रशियामध्ये कोणतीही व्यक्ती सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. या कारणास्तव, 7 मे 2008 रोजी पुतिन यांनी दिमित्री मेदवेदेव, जे पंतप्रधान होते, त्यांना अध्यक्ष केले.

यादरम्यान घटनादुरुस्ती करून केवळ 2 वेळा राष्ट्रपती होण्याची मर्यादा रद्द करण्यात आली. यानंतर, 7 मे 2012 रोजी पुतिन पुन्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. म्हणजेच आपल्या जवळच्या मित्राकडे सत्ता सोपवण्याची प्रथा रशियात सुरू आहे. असे मानले जात की, पुतिन देखील त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याला या पदावर बसवतील आणि येवगेनी प्रीगोजिन यांना त्यांचा उत्तराधिकारी बनवतील.

विविध विषयांवरील इतर एक्सप्लेनर देखील वाचा...

24 रशियन श्रीमंतांचा मृत्यू, पुतिन यांच्यावर संशय:कोणी डोंगरावरुन तर कोणी छतावरून पडले, भारतात 3 मृत्यू

'नोटाबंदी' निर्णयावर असहमत एकमेव न्यायमूर्तीची कहाणी:5 वर्षांपूर्वीही केंद्र सरकारचा निर्णय उलटला

ब्रेन-ईटिंग अमिबाने फस्त केले मानवी मांस:कोमट पाण्याद्वारे नाकातून शरीरात; 11 दिवसांत व्यक्तीचा मृत्यू

मुलगी कायमच स्वच्छता करत राहते:डॉक्टरांनी OCD सांगितले; उपचारासाठी न्यायालयाची परवानगी असलेला आजार नेमका काय?