आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा(सचिन काटे)
करोनाच्या रुग्णांना वैद्यकीय पुरवणारे डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी वैभव छाब्रा आणि रिचा श्रीवास्तव या तरुण दांपत्याने १० लाख एम-१९ फेस शील्ड तयार करण्याचा संकल्प केलाय. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून त्यांनी निधी उभा केला असून पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसह १० शहरात युद्ध पातळीवर फेस शील्डची निर्मिती सुरू आहे. तयार शील्ड कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना विनामूल्य पाठवल्या जात आहे. आतापर्यंत ४.६ लाखाच्यावर शील्ड तयार होऊन राज्यभरात पाठवण्यात आल्या आहेत.
करोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्यांसाठी पीपीई म्हणजेच पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट गरजेचे आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढल्याने त्याची कमतरता भासतेय. रुग्णसेवा बजावणाऱ्यांना संसर्गापासून वाचण्यासाठी पीपीईचा एक भाग असणाऱ्या एम- १९ फेस शील्ड महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे ‘मेकर्स असायलम’ या डिझाइन लॅबचे संचालक वैभव छाब्रा आणि रिचा श्रीवास्तव या दांपत्याने १० लाख फेस शील्ड तयार करून त्या विनामूल्य वितरित करण्याचा संकल्प केलाय. त्यात चांगले यश मिळत आहे.
ऑनलाइन ट्युटोरियल
फेस शील्डची जुळणीचे तंत्र www.makersasylum.com/covid HYPERLINK "http://www.makersasylum.com/covid19"19 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वेगवेगळ्या शहरात तरुण आपापल्या घरात हे काम करत आहेत. आतपर्यंत मुंबईत ५९,३४३, पुण्यात ५४४६९, नागपुरात २७,४५०, नाशिक २०२०, नांदेड ४४२०, औरंगाबाद ३५११ तर अन्य ठिकाणी मिळून ४६३,२०६ शील्डचे वितरण झाले आहे.
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर
तरुण पिढी समाजमाध्यमावर वेळ घालवते. परंतु या माध्यमांचा सकारात्मक वापर केला तर चांगला बदल घडवता येऊ शकतो हे आमच्या उपक्रमाने दाखवून दिले आहे. - वैभव छाब्रा, रिचा श्रीवास्तव, समन्वयक, एम-१९ कलेक्टिव्ह
रोज १८ तास काम
सुरुवातीला समाजमाध्यमावर ‘एम-१९ कलेक्टिव्ह’ ही मोहीम चालवली. आर्थिक साहाय्याचे आवाहन केले. १ लाख शील्ड तयार करण्याचे ध्येय होते. मात्र, रुग्णसंख्या वाढली आणि दानशूरांकडून मदतत मिळत गेल्याने १० लाख शील्डचा संकल्प केला. हेे काम पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, मंगलोर आणि बंगळुरू अशा १० शहरांत सुरू असून स्वयंसेवक दररोज १८ तास काम करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.