आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Youngest Player To Get Padma Shri, Luxurious Bungalows In Hyderabad And Dubai, Luxury Life Of Sania Mirza, Latest News And Update

टेनिसला घरोघरी पोहोचवणारी सानिया:'पद्मश्री' मिळवणारी सर्वात तरुण खेळाडू, हैदराबाद-दुबईमध्ये बंगले; अशी आहे लग्झरी लाईफ

लेखक: आतिश कुमार15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सानिया मिर्झा... देशातील आघाडीच्या टेनिसपटूंपैकी एक प्लेअर. जीने उत्कृष्ट टेनिसच्या माध्यमातून जगात स्वतःचे नाव कमावले आहे. महिला टेनिस असोसिएशन म्हणजेच WTA चे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला म्हणन तीची ओळख. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2006 मध्ये पद्मश्री आणि 2015 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी सानियाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यूएस ओपनच्या एकेरीच्या सामन्यांची चौथी फेरी गाठणारी सानिया ही भारताची एकमेव खेळाडू आहे. 2015-16 दरम्यान दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सानियाने जानेवारी 2022 मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. सध्या सानिया तिच्या घटस्फोट आणि नवीन टॉक शो मुळे चर्चेत आली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक घटस्फोटाच्या तयारीत आहेत. रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, शोएबने सानियाची फसवणूक केली आहे. आता दोघेही वेगळे राहत आहेत. दरम्यान, हे दोघेही एका पाकिस्तानी वाहिनीवरील टॉक शोमध्ये दिसणार असल्याची बातमी समोर आली आहे. 'द मिर्झा मलिक शो' असे या टॉक शोचे नाव आहे.

चला तर आज चर्चेतला चेहरा असलेल्या सानिया मिर्झाच्या लक्झरी लाईफबद्दल जाणून घेऊया...

दुबई आणि हैदराबादमध्ये आलिशान बंगले
देशातील सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्याकडे सध्या हैदराबाद आणि दुबईमध्ये आलिशान घर आहेत तिने 2012 मध्ये हैदराबादेत बंगला खरेदी केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आलिशान बंगल्याची किंमत 13 कोटी रुपये आहे. हैदराबादमधील या बंगल्यात सरावासाठी टेनिस कोर्टही आहे. सद्या सानिया दुबईत एका आलिशान घरात राहते. एका मुलाखतीत तिने सांगितले की, ती जवळपास 12 वर्षांपासून दुबईमध्ये राहात आहे. एकदा दुबईमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला इतरत्र कुठेही राहायचे इच्छा होत नाही, असा विश्वास तिने व्यक्त केलेला आहे.

वयाच्या 6 व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली
15 नोव्हेंबर 1986 रोजी जन्मलेल्या सानियाने वयाच्या 6 व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात महेश भूपतीचे वडील आणि यशस्वी टेनिसपटू सीके भूपती यांनी तिला प्रशिक्षण दिले. टेनिससोबतच सानिया क्रिकेट आणि स्विमिंगचीही उत्कृष्ट खेळाडू आहे. पण त्याने आपल्या कारकिर्दीसाठी टेनिसची निवड केली. त्यानंतर वयाच्या 14 व्या वर्षी जागतिक ज्युनियर टेनिस चॅम्पियनशिपच्या माध्यमातून त्यांनी प्रथमच क्रीडा कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर, 2006 आशियाई क्रीडा स्पर्धेत लिअँडर पेससह मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. यासह तिने 2009 मध्ये मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन, 2014 मध्ये यूएस ओपन, 2015 मध्ये विम्बल्डन आणि 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन अशी अनेक विजेतेपदे जिंकली.

2010 मध्ये शोएबशी लग्न केले, 2018 मध्ये मुलाला जन्म दिला
सानिया जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती. त्याच सानियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 12 एप्रिल 2010 रोजी तिने हैदराबादमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले. एका मुलाखतीत शोएब मलिकने सांगितले होते की, तो सानियाला 2003 मध्ये पहिल्यांदा भेटला होता. 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या होबार्टमध्ये पुन्हा भेटले होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 8 वर्षानंतर सानियाने 2018 मध्ये मुलालाही जन्म दिला.

सानिया मिर्झाच्या सर्वात उल्लेखनिय फोटोपैकी एक असलेला फोटो.
सानिया मिर्झाच्या सर्वात उल्लेखनिय फोटोपैकी एक असलेला फोटो.

वादांशी निगडीत नाव पण कधीही विचलित होत नाही
सानिया मिर्झा तिच्या करिअरमध्ये अनेकदा वादात सापडली होती. टेनिस सामन्यांदरम्यान लहान कपडे परिधान केल्यामुळे मुस्लिम संघटनांनी तिच्यावर टीका केली होती. एका मुस्लिम विद्वानाने तिच्या विरोधात फतवाही काढला होता. 2008 मध्ये तिच्यावर तिरंगा झेड्यांचा अपमान केल्याचा आरोपही झाला होता. एका कार्यक्रमादरम्यान तिने तिरंग्याला पायाने स्पर्श केल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी सानियावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पण सानिया कधीही कोणत्याही वादामुळे खचली नाही आणि त्यातून बाहेर पडत राहिली.

सानियाकडे आलिशान कारचे कलेक्शन

जानेवारी 2022 मध्ये निवृत्तीची घोषणा करणाऱ्या सानियाकडे आलिशान कारचा संग्रह आहे. 36 वर्षीय सानिया तिच्या खेळातून वर्षाला 3 कोटी कमावत होती. आज, तिच्या वाहनांमध्ये लक्झरी ​​​​​​ BMW 7-सीरीजचा समावेश आहे, ज्याची किंमत सद्या 1.35 कोटी रुपये आहे. याशिवाय सानियाकडे 45 लाख रुपयांची जग्वार XE, 77.11 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ ई-क्लास, 60 लाख रुपयांची BMW 5-सीरीज आणि 65 लाख रुपयांची रेंज रोव्हर इव्होक ही कार देखील आहे.

सानियालाही शूजची आवड

सानिया जेव्हा तिच्या खेळाच्या शिखरावर होती. तेव्हा ती तिच्या फॅशन सेन्सबद्दल खूप बोलायची. अनेक मासिकांच्या कव्हर पेजवरून ती ग्लॅमर गर्ल म्हणूनही लोकांमध्ये प्रसिद्ध होती. आपल्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या सानियाने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, तिला सर्व प्रकारचे शूज आवडतात. आणि सध्या त्याच्या हैदराबादच्या घरात 350 हून अधिक शूजच्या जोड्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...