आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासावली साथ सोडण्याला ‘झीरो शॅडो डे’ म्हणतात. पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो, पण या दोन टोकांच्या वृत्तांमधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. मे महिन्यात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वेळेत संपूर्ण राज्यात शून्य सावली दिवस अनुभवता येईल, अशी माहिती रामन विज्ञान केंद्राचे तंत्र अधिकारी महेंद्र वाघ यांनी दिली.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे प्रत्येक शहर आणि वेळेत काही सेकंदांचा फरक पडेल. त्यामुळे दुपारी १२ ते १२.३५ या वेळेदरम्यान सूर्यनिरीक्षण करावे. समूहासाठी मोकळ्या पटांगणावर, तर कुटुंबासाठी घराच्या अंगणात वा गच्चीत शून्य सावली दिवस अनुभवता येईल. ३१ मेपर्यंत सावलीनेही साथ सोडल्याचा अनुभव घेता येईल. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त व मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा डोक्यावर येतो. सूर्य रोज ०.५० अक्षांश सरकतो. म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली दिवस अनुभवता येऊ शकतो, असे वाघ यांनी सांगितले.
राज्यातील शून्य सावलीचे दिवस याप्रमाणे
> ६ मे आणि ६ ऑगस्ट : कोल्हापूर व इचलकरंजी, > ७ मे आणि ५ ऑगस्ट : रत्नागिरी, सांगली, मिरज, > ८ मे आणि ४ ऑगस्ट : कराड, > ९ मे आणि ३ ऑगस्ट : चिपळूण व अक्कलकोट, > १० मे आणि २ ऑगस्ट : सातारा, पंढरपूर, सोलापूर, > ११ मे आणि १ ऑगस्ट : महाबळेश्वर, फलटण व तुळजापूर, > १२ मे आणि ३१ जुलै : बारामती, उस्मानाबाद, बार्शी, औसा > १३ मे आणि ३० जुलै : मुळशी, पुणे, दौंड, लातूर > १६ मे आणि २७ जुलै : बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, अहमदनगर, परभणी, नांदेड, > १९ मे आणि २४ जुलै : नाशिक, कोपरगाव, वैजापूर, औरंगाबाद, जालना, पुसद, बल्लारशा, > २० मे आणि २३ जुलै : मेहकर, वाशिम, वणी, चंद्रपूर > २२ मे आणि २१ जुलै : बुलडाणा, यवतमाळ, आरमोरी, > २३ मे आणि २० जुलै : खामगाव, अकाेला, वर्धा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.