आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Zydus Cadila Zycov D Vaccine Explained; How ZyCoV D Works | India First Covid Vaccines For Babies And Children

एक्सप्लेनर:कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिकनंतर येतेय चौथी लस झायकोव्ह-डी; जगात वेगळी असलेली ही लस कसे कार्य करेल, याचे किती डोस दिले जातील? जाणून घ्या...

जयदेव सिंहएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • झायकोव्ह-डी या लसीबद्दल जाणून घ्या सविस्तर...

भारतीय औषधी कंपनी झायडस कॅडिला या आठवड्यात त्यांनी तयार केलेल्या झायकोव्ह-डी या कोरोना लसीच्या आपत्कालीन मंजुरीसाठी सेंट्रल ड्रग्स रेग्युलेटरकडे अर्ज करू शकते. या लसीला मंजुरी मिळाल्यास, ही जगातील पहिली DNA बेस्ड लस असेल.

अशाप्रकारे देशात उपलब्ध असलेल्या लसींची संख्या 4 वर जाईल. आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक-व्ही भारतात वापरली जात आहेत. झायकोव्ह-डी ही चौथी लस असेल जी अहमदाबादच्या झायडस कॅडिला कंपनीने बनवली आहे.

ही सिंगल डोस लस आहे की डबल?
सध्या भारतात दिल्या जाणा-या तिन्ही लस या डबल डोस लस आहेत. तर जॉन्सन अँड जॉन्सन आणि स्पुतनिक लाइट सारख्या लस या सिंगल डोस व्हॅक्सिन आहेत, ज्या येत्या काही महिन्यांत भारतात येऊ शकतात. परंतु झायकोव्ह-डी ही लस या सर्वांपेक्षा वेगळी आहे. या भारतीय लसीचे एक किंवा दोन नव्हे तर तीन डोस दिले जातील.

फेज -1 आणि फेज -2 चाचणी दरम्यान, या लसीचे तीन डोस दिल्यानंतर ही लस रोग प्रतिकारशक्ती ब याच काळासाठी मजबूत ठेवते, असे दिसून आले आहे. याशिवाय कॅडिला या लसीच्या दोन डोसचीही चाचणी घेत आहे. यासंबंधित निकालही लवकरच येऊ शकतात.

ही लस देण्याची पद्धत उर्वरित लसींपेक्षा वेगळी आहे का?
होय, झायकोव्ह-डी ही सुई नसलेली लस आहे. यात जेट इंजेक्टर बसवले जाईल. जेट इंजेक्टर मोठ्या प्रमाणात अमेरिकेत वापरले जातात. ही लस हाय प्रेशरने लोकांच्या त्वचेमध्ये इंजेक्ट केली जाते. सामान्यत: वापरल्या जाणार्‍या निडल इंजेक्शनद्वारे फ्लूड किंवा औषध स्नायूंमध्ये जातात. जेट इंजेक्टर्सच्या दबावासाठी कॉम्प्रेस्ड गॅस किंवा स्प्रिंगचा वापर केला जातो.

या डिव्हाइसचा शोध 1960 मध्ये लागला होता. डब्ल्यूएचओने 2013 मध्ये त्याच्या वापरास परवानगी दिली. 2014पासून अमेरिकेत जेट इंजेक्टर मोठ्या प्रमाणात वापरात आहेत. यासह, युरोप, आफ्रिका आणि आशियाच्या काही देशांमध्येही याचा वापर केला जातो.

जेट इंजेक्टरद्वारे लस टोचण्याचे फायदे काय आहेत?
पहिला फायदा असा आहे की, लस घेणा-या व्यक्तीला त्रास कमी होतो, कारण सामान्य इंजेक्शनप्रमाणे ते तुमच्या स्नायूच्या आत जात नाही. दुसरा फायदा असा आहे की, यामुळे निडलच्या इंजेक्शनच्या तुलनेत इंफेक्शनचा धोका कमी असतो. फार्मजेट, स्पिरिट इंटरनेशनल, वॅलेरिटस होल्डिंग्ज, इंजेक्स, एन्टरिस फार्मा सारख्या कंपन्या जेट इंजेक्टर तयार करतात.

झायकोव्ह-डीला कधीपर्यंत मान्यता मिळू शकेल?
झायडस कॅडिला ही कंपनी या आठवड्यात झायकोव्ह-डीच्या आपत्कालीन मंजुरीसाठी डीजीसीआयकडे अर्ज करू शकते. लस चाचणीच्या फेज 3 चे डेटा विश्लेषण जवळजवळ तयार आहे. कंपनीने याबाबत सरकारला माहिती दिली आहे. प्रौढांव्यतिरिक्त, ही लस 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर देखील तपासली जात आहे. ज्या लोकांना आधीच गंभीर आजार आहेत अशा लोकांवरही या लसीची चाचणी घेण्यात येत आहे.

झायडस कॅडिलाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शेरविन पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले की, जुलैपर्यंत या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होईल अशी आम्हाला आशा आहे. या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरूवातीस कंपनीला मान्यता मिळणे अपेक्षित आहे.

ही लसीमुळे डोसची आवश्यकता किती प्रमाणात भागवली जाऊ शकते?
झायडस कॅडिला या कंपनीने एका वर्षात 24 कोटी डोस तयार करणार असल्याचे सांगितले आहे. मान्यता मिळाल्यास तातडीने ही लस बाजारात उपलब्ध करुन देण्याची तयारी कंपनीकडून झाली आहे. कंपनी दरमहा 2 कोटी लस तयार करेल. यासह उत्पादन वाढविण्यासाठी अन्य उत्पादकांशीही चर्चा सुरू आहे. कंपनी पहिल्या महिन्यात सुमारे एक कोटी डोस करेल. त्यानंतर पुढील महिन्यापासून उत्पादन दुप्पट होईल.

किती दिवसांच्या अंतराने झायकोव्ह-डी चे तीन डोस दिले जातील?
झायकोव्ह-डीचा दुसरा डोस पहिल्या डोसच्या 28 दिवसानंतर दिला जाईल. तर तिसरा डोस पहिल्या डोसच्या 56 दिवसानंतर दिला जाईल. म्हणजेच, प्रत्येक डोसमध्ये 4-4 आठवड्यांचे अंतर असेल. झायकोव्ह-डी च्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी 28 हजारांहून अधिक लोकांची नोंद झाली आहे. यात 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश आहे.

कॅडिलाने देशभरातील 20 केंद्रांवर तिस-या टप्प्यातील चाचणी घेतली. प्रत्येक केंद्रात, 12 ते 18 वर्षे वयोगटातील 20-20 मुले देखील चाचणीचा भाग होती. चाचणीत सामील झालेल्या केंद्रांनी सांगितल्यानुसार, लसीचे मुलांवर कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. अशी अपेक्षा आहे की, लवकरच देशातील मुलांना पहिली लस मिळेल.

असे म्हटले जात आहे की, लवकरच कंपनी 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी घेऊ शकते. चाचणीचा निकाल समाधानकारक असल्यास लसीकरणाची व्याप्ती आणखी वाढविली जाऊ शकते.

ही लस कशी कार्य करते?
झायकोव्ह-डी ही डीएनए-प्लाझ्मिड लस आहे. ही लस शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जेनेटिक मटेरियलचा वापर करते. जसे अमेरिकेसह अनेक देशांमध्ये दिल्या जाणा-या फायझर आणि मॉडर्नाच्या लस रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी mRNA वापरतात, त्याच प्रकारे ही लस प्लाझ्मिड डीएनए वापरते.

mRNAला मेसेंजर आरएनए देखील म्हटले जाऊ शकते, जे शरीरात जाते आणि कोरोना विषाणूंविरूद्ध अँटीबॉडी बनविण्याचा संदेश देते. तर, प्लाझ्मिड हे मानवी पेशींमध्ये असलेले एक लहान डीएनए रेणू आहे. हा डीएनए सामान्य गुणसूत्र डीएनएपेक्षा वेगळा असतो. प्लाझ्मिड-डीएनए सामान्यत: बॅक्टेरियाच्या पेशींमध्ये आढळतात आणि स्वतंत्रपणे रेप्लिकेट होऊ शकतो.​​​​​​

प्लाझ्मिड-डीएनए जेव्हा मानवी शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याचे रुपांतर व्हायरल प्रोटीनमध्ये होते. यामुळे शरीरातील विषाणूविरोधात प्रतिकार शक्ती निर्माण होते. हे शरीरातील व्हायरसची वाढ थांबवते. जर एखाद्या विषाणूचा आकार बदलला, म्हणजेच त्याचे म्युटेशन झाले तर काही आठवड्यात ही लस बदलू शकते.

इतर लसींपेक्षा या लसीची देखभाल करणे सोपे आहे. ही लस 2 ते 8 डिग्री तापमानात स्टोअर केली जाऊ शकते. अगदी 25 डिग्री रुम टेम्परेचरमध्येही ती खराब होत नाही. यामुळे, त्याच्या देखभालसाठी कोल्ड चेनची आवश्यकता नाही. अगदी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमध्येही, उर्वरित लसींच्या तुलनेत ती सहज मॉडिफाय केली जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...