जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असे महाराष्ट्राचे वर्णन केले जाते. राज्यातील अवर्षणप्रवण म्हणून ओळख असलेल्या मराठवाडा, काही प्रमाणात विदर्भ, सोलापूर व नगर जिल्ह्यातील भागाला हे वर्णन तंतोतंत लागू पडते. तर अशा या दगडांच्या देशात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे अंक सध्या सुरू आहेत. तसे हे प्रयोग या राज्यासाठी नवे नाहीत. २००३ -०४ मध्ये बारामती परिसरातून या प्रयोगाला सुरुवात झाली. त्यासाठी त्या वेळी १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या प्रयोगातून त्या वेळी एक ते सहा मिमी पाऊस पडल्याचे...
  08:45 AM
 • माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. पी. चिदंबरम हे आर्थिक घोटाळ्याच्या दोन गुन्ह्यांमध्ये अटक टाळण्यासाठी सीबीआय व ईडी यांच्याशी मंगळवारी रात्रीपासून लपंडाव खेळत होते. ज्या न्यायालयाने त्यांना जुलै २०१८ मध्ये हंगामी जामीन दिला होता, त्याच न्यायालयाने तो फेटाळला. त्यांना सर्वोच्च न्यायालयात लगेच दिलासा मिळाला नव्हता. जामीन अर्जाच्या शुक्रवारच्या सुनावणीपूर्वीच सीबीआयने त्यांना नाट्यमयरीत्या अटक केली. आणीबाणीनंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या...
  August 22, 09:55 AM
 • खय्याम गेले. अभिजात संगीतकार हरपला. आपल्या अवीट गोडीच्या चालींचा हा उमराव. रसिकांची जान असलेला संगीतदूत. आपल्या आगळ्या चालींनी गीतकारांचे शब्द रसिकांच्या मन:पटलावर कायमचे कोरणारा सांगीतिक शिल्पकार. मळलेल्या वाटा सोडून एंट्रो पीस, इंटरलूड -अंतऱ्यामधील संगीत ते कोडा म्युझिक - गीत समारोपाचे संगीत अशा जागा अधोरेखित करणारं कर्णमधुर संगीत ही खय्याम या अनोख्या संगीतकाराची खासियत. गाण्यात ऱ्हिदमनुसार येणारे पॉज हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य.महंमद जहूर खय्याम हाश्मी असे मूळ नाव असलेल्या या...
  August 21, 09:36 AM
 • पूर, भूकंप, आग, इमारत कोसळणे यांसारख्या आपत्तींमुळे माणसांचे हकनाक बळी जाण्याच्या घटना घडत असतात. वेळोवेळी सरकारकडून बळींना अथवा नातेवाइकांना नुकसान भरपाईदेखील दिली जाते. पण लहान-मोठ्या अपघातात दर दिवशी चिरडल्या जाणाऱ्या, जखमी होणाऱ्यांच्या वेदना या केवळ वैयक्तिक होऊन जातात. या अपघातांमागील कारणे पाहिल्यास वाहतुकीचे नियम तुडवणे, मद्यप्राशन करून किंवा बेदरकारपणे वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या सुरक्षेचा विचार न करणे,अरुंद रस्ते आणि वाहनांची प्रचंड वर्दळ, रस्ते विकासाची...
  August 20, 08:40 AM
 • अशी गोष्ट, जी जगाला सांगितली नाही, तर आपला स्वतःचा स्फोट तर नक्की आहे, अशा कहाण्या प्रत्येक कलाकार सोबत घेऊन जगत असतो. जगभरातील कलाकार कलेच्या माध्यमातून ही घुसमट बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. सध्या आपल्याकडे प्रसारित होणाऱ्या वेबसिरीजमधून घुसमटीतून निर्माण झालेला तुंबारा जगापुढे येताना िदसतोय. बॉलीवूडचा लेखक-दिग्दर्शक अनुराग कश्यप याला मुंबई आणि तेथील व्यक्ती-समूह, तत्कालीन घटनांचे माणसांवर होणारे परिणाम, लोकसमूहांचा इतिहास, संस्कृती परंपरा, पारंपरिक मिथके, धार्मिक वर्गीकरण,...
  August 17, 09:30 AM
 • जम्मू-काश्मीरमधील वादग्रस्त कलम ३७० व ३५ ए रद्द करण्याच्या निर्णयानंतर आलेला पहिला ईदचा सण तेथे शांततेत पार पडला असला आणि आठवडाभराच्या कालावधीत कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नसली तरी याचा अर्थ तेथे सारे काही आलबेल आहे, असा नाही. सुरक्षा दलांच्या सध्या तेथे तैनात असलेल्या तुकड्या व सैनिकांची संख्या पाहता अगदी तोंडावर येऊन ठेपलेला स्वातंत्र्यदिन आणि त्यानंतर आणखी काही दिवस तरी काश्मीरचा अंतर्गत बंदोबस्त चोख ठेवला जाईल, यात शंका नाही. मात्र, दुसरीकडे पाकिस्तान या मुद्द्यावरून जगभर करत...
  August 14, 09:42 AM
 • दोन टप्प्यांतील १२ तासांच्या बैठकीनंतरही काँग्रेसच्या कार्यकारिणीला नवा अध्यक्ष निवडता आला नाही. सोनिया गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची हंगामी जबाबदारी सोपवून कार्यकारिणी तूर्त मोकळी झाली. हंगामी अध्यक्षपद म्हणजे ते किती काळासाठी हे निश्चित नाही. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांच्या व फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्ली आणि जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका आहेत. पक्षांतर्गत निवडणुकांची प्रक्रिया पार पाडून राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होईपर्यंत या...
  August 13, 09:30 AM
 • राज्यातील एखादा जिल्हा वा तालुका वर्षानुवर्षे पुराच्या विळख्यात सापडत असेल आणि सरकार व प्रशासन काहीच करणार नसेल तर स्थानिक लोकांनी करावे तरी काय, असा प्रश्न पुन्हा एकदा नक्षली हिंसाचाराने ग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याच्या बाबतीत निर्माण झाला अाहे. तालुक्यातील दुर्गम गावे तर सोडूनच द्या. बारमाही रस्ते नसल्याने संपूर्ण पावसाळ्यात या गावांमधील गरीब, आदिवासींचे जनजीवन अक्षरश: वाऱ्यावर असते. कारण गावांना जगाशी जोडणारे पक्के रस्तेच नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना...
  August 10, 09:58 AM
 • महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे, तर विकास निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांत अजून पावसाला म्हणावी तशी सुरुवात झाली नाही. या दोन्ही भागांची दशा परस्परभिन्न असली तरी माणसांच्या जिवावर बेतणारी ही गंभीर परिस्थिती. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही केवळ झाकोळून आलेल्या आभाळाकडे पाहण्याची वेळ मराठवाड्याच्या वाट्याला आली. अर्थात या भागात मदतनिधीतून पैसा-पाणी पुरवता...
  August 9, 09:37 AM
 • अमोघ वक्तृत्वाने जनमानस जिंकणाऱ्या भारतीय राजकारणातील कणखर नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या जडणघडणीतील रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज मंगळवारी काळाच्या पडद्याआड गेल्या. प्रखर तेजस्वी व्यक्तिमत्त्व आता आपल्यात नाही, ही भावनाच अविश्वसनीय आहे. सरकारने काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याबाबत त्यांनी नुकताच आनंद व्यक्त केला होता. त्यांच्या निधनाच्या बातमीने विरोधकही शोकव्याकुळ झाले आहेत. देश असाे की विदेश, संसद असाे की संयुक्त राष्ट्राची महासभा,...
  August 8, 08:43 AM
 • नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनला जुगार म्हटले जाते. त्याचे प्रत्यंतर मान्सूनने गेल्या काही वर्षांत सातत्याने दिले आहे. कधी धो धो बरसत, सर्वांच्या कंठाशी तो प्राण आणतो, तर कधी एवढी दडी मारतो की तोंडचे पाणी पळावे. यंदा मान्सूनने आपली सर्व वैशिष्ट्ये दाखवण्याचे ठरवलेले दिसते. एक तर त्याचे आगमन उशिरा झाले. केरळात तो आठ दिवस उशिराने ८ जूनला दाखल झाला. त्यातच अरबी समुद्रात वायू वादळ निर्माण झाले. या वादळाने बाष्प पळवल्याने मान्सून दक्षिणेतच रेंगाळला. मुंबईत येण्यासाठी त्याला २२ जून उजाडावा...
  August 7, 08:33 AM
 • जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारे वादग्रस्त कलम ३७० रद्द करण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय जेवढा ऐतिहासिक, तेवढाच महत्त्वाचा आणि धाडसी आहे. सोबतच जम्मूू-काश्मीरला राज्याऐवजी केंद्रशासित प्रदेश करण्याचा आणि लेह-लडाख त्यापासून वेगळे करण्याचा निर्णयही दूरगामी परिणाम करणारा असेल. साहजिकच सामाजिक आणि राजकीय पातळीवर त्याचे पडसाद उमटणार यात शंका नाही. राजकीय टायमिंग साधण्यात माहीर असलेल्या मोदींनी हा निर्णय घेतेवेळी अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपलेला स्वातंत्र्य...
  August 6, 09:48 AM
 • घंटेशी माणसाचा पहिल्यांदा संबंध येतो ताे शाळेत! निदान मोबाइलचा शोध लागण्यापूर्वीपर्यंत असेच हाेते. वर्गात तरटपट्ट्यांवर बसलेल्या मुलांचे सारे लक्ष शाळेच्या घंटेकडे असे. कारण ती वाजली की, शाळा सुटली, पाटी फुटली असे म्हणत घरी जाण्याचा आनंद अवर्णनीय असे. त्यानंतर सर्वात आवडती असे सायकलची घंटी. ट्रिंगss ट्रिंगss अशी घंटी वाजवल्यानंतरही ओ, शुकss शुकss असे म्हणत तोल सावरत सायकल दामटण्याचा आनंद कोणत्याही डाॅलरमध्ये िवकत घेता येणार नाही... शाळेच्या घंटेचा आणि सायकलच्या घंटीचा नाद अजूनही कानात...
  August 3, 10:46 AM
 • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरीच्या कर्मभूमीतून आपल्या यात्रेला सुरुवात करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळ संपवण्यासाठी पुन्हा एकदा महाजनादेश देण्याचे आवाहन केले. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना सर्वच राजकीय पक्षांना अचानक पुतना मावशीचे प्रेम दाटून आलेय. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढली. त्यानंतर लागलीच मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेची सुरुवात केली. यात्रेची सुरुवात होत...
  August 2, 09:28 AM
 • राजकीय यात्रांची परंपरा असलेला भाजप महाराष्ट्रात प्रथमच मुख्यमंत्र्यांना यात्रेकरू बनवून जनतेच्या दारात पाठवत आहे. शिवशाही सरकार अन् पारदर्शी कारभार असे ब्रीद घेऊन राज्यकारभार करत असल्याचा दावा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या ५ वर्षांतील कामांचा लेखाजाेखा या निमित्ताने जनतेसमाेर मांडतील. आणि याच भांडवलावर विधानसभा निवडणुकीसाठी मतांचा जाेगवाही मागतील. शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, सातवा वेतन आयाेग असे जनतेस लाभदायी ठरणारे मुद्दे ते या प्रचार​ ​यात्रेतून मांडतील....
  August 1, 10:03 AM
 • ज्या माहिती अधिकाराच्या आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून देशात ऐतिहासिक वगैरे सत्तांतर झाले, त्याच मुद्द्याला नव्या सत्ताधीशांनी बगल देत आपला खरा चेहरा दाखवला आहे. जाहीर सभांमधून आणि जाहिरातबाजीतून पारदर्शक कारभार आणि सुशासनाच्या वल्गना करणाऱ्या केंद्र सरकारची माहिती आयुक्तांवर नियंत्रण आणण्यासाठी चाललेली धडपड ही भारतीय लोकशाहीपुढील धोक्याची घंटा आहे. भल्याभल्यांच्या गैरव्यवहारांची पोलखोल करण्याची शक्ती सामान्य नागरिकाला देणाऱ्या कायद्याबद्दल सरकारला भीती न वाटती तरच नवल....
  July 31, 09:17 AM
 • राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजप अथवा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी जणू चढाओढ लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विधानसभेची निवडणूक जशी जवळ येईल तसे विशेषत: भाजपमधील या मेगा भरतीला अधिकच उधाण येत जाईल. गलितगात्र काँग्रेस ही लाट थोपवण्याच्या स्थितीत बिलकुल नसताना दुसरीकडे तिच्या तडाख्याने राष्ट्रवादीच्या गलबतालाही खिंडारे पडू लागली आहेत. केंद्रात मोदी सरकार पुन्हा सक्षमपणे सत्तारूढ झाल्यापाठोपाठ राज्यातील विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांचा धीर सुटायला...
  July 30, 09:43 AM
 • लोकसभेत गुरुवारी मुस्लिम महिला वैवाहिक अधिकार संरक्षण विधेयकावर चर्चा सुरू होती. यावेळी समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू आहे. हंगामी सभापतिपदाच्या खुर्चीवर आसनस्थ असलेल्या भाजपच्या खासदार रमादेवी यांना उद्देशून जे काही बोलले, ते वाईट हेतूने नाहीत, असा खुलासा आझम खान आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. सभापती ओम बिर्ला यांनी बोलावलेल्या बैठकीत सर्वपक्षीय खासदारांनी आझम खान यांचे वक्तव्य आक्षेपार्ह ठरवत कडक कारवाईची...
  July 27, 09:36 AM
 • कारगिलमध्ये घुसखोरी करण्याची पाकिस्तानने केलेली आगळीक मोडून काढत भारताने ऑपरेशन विजयच्या माध्यमातून पाकला लगावलेल्या सणसणीत चपराकीला आज वीस वर्षे होत आहेत. आपल्या सैन्याने केलेल्या पराक्रमाच्या गौरवार्थ २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा करायलाच हवा. पण, तो करताना उत्साहाचे रूपांतर सामाजिक व राजकीय उन्मादात होणार नाही, याचे भानदेखील बाळगले जायला हवे. सद्य:स्थितीत कट्टरतेचे मळभ सर्वत्र दाटत असताना तर ते अधिकच अगत्याचे आहे. कारगिल विजयाला दोन दशके उलटत असताना १९९९ मधील...
  July 26, 08:09 AM
 • न्यायशास्त्रात दाेन तत्त्वे प्रचलित आहेत. एक म्हणजे एखादा कायदा याेग्य आहे की चुकीचा हे शाेधण्यासाठी हेदेखील तपासले पाहिजे की, ताे नसल्यामुळे काेणते धाेके उद्भवू शकतात आणि दुसरे म्हणजे ज्याच्या साेयीस्कर वापराने बचाव करणे साेपे हाेते आणि समाजाचे भले हाेण्याएेवजी हानी पाेहाेचते. कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारला बहुमताअभावी पायउतार व्हावे लागले. न्याय आणि विधीमंडळात संतुलन राखण्याचा प्रयत्न सर्वाेच्च न्यायालयाने केला हाेता. मात्र पक्षांतर कायद्याला ठेंगा दाखवत मंत्री...
  July 25, 09:37 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात