जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • रेल्वे अर्थसंकल्पात भलेही महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आले नसले... अर्थसंकल्पात भलेही महाराष्ट्राच्या पॅकेजसाठी विशेष तरतूद नसली... दुष्काळग्रस्त राज्यासाठी भलेही केंद्राने आर्थिक मदत देण्यास हात आखडते घेतले असले... यूपीएससीमधून मराठी भाषेला हद्दपार करण्याचा कितीही घाट घातला जात असला... नितीन गडकरींपासून सुशीलकुमार शिंदेंपर्यंत मराठी राजकारण्यांना भलेही दिल्लीकर गांभीर्याने घेत नसले, तरीही सांस्कृतिक क्षेत्रात जी काही इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांपासून...
  March 19, 11:00 PM
 • आदमासे दहा दिवसांपासून अवघा देश क्षुब्ध होता. घराघरात चर्चा सुरू होती. कडवट बोल. प्रत्येक जण विचारत होता : अखेर सरकारला झाले आहे तरी काय? आमच्या 16 वर्षे वयाच्या मुलांना सेक्ससाठी चिथावणी देण्याचा सरकारचा इरादा का आहे. संबंधांचे वय घटवण्याच्या विरोधात भास्कर समूहाने सर्वप्रथम आंदोलन छेडले. जनआंदोलन. जबाबदारी निभावण्याच्या उद्देशाने. आपल्या कोट्यवधी वाचकांशी, समाजाशी, देशाशी बांधिलकी जपणाच्या शुद्ध हेतूने. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा करण्यात केंद्र सरकारकडून होणार्या...
  March 19, 05:50 AM
 • जवळपास गेली दोन वर्षे मंदीच्या तडाख्यात अडकलेल्या देशातील विमान सेवा कंपन्यांना आता कुठे दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सहा महिन्यांपूर्वी सरकारने या क्षेत्रात 49 टक्के थेट विदेशी गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आणि पुन्हा एकदा हवाई क्षेत्रात चैतन्य निर्माण होण्याचा अंदाज होता. हा अंदाज आता खरा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरी उड्डयनमंत्री अजितसिंग यांनी आग्रहाने 49 टक्के विदेशी गुंतवणुकीचा प्रस्ताव रेटला, त्या वेळी किंगफिशर आणि एअर इंडिया या दोन कंपन्या...
  March 18, 11:16 PM
 • लोकसभा निवडणुका मुदतीपूर्वी होण्याची शक्यता नाही. पण रविवारी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अधिकार रॅलीने संघ परिवार आणि नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षांना सुरुंग लावण्याचे काम केले. गेले काही महिने इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींचे स्तोम माजवले जात होते. त्याला विरोध करण्याची हिंमत एनडीए आघाडीतील जयललिता, नवीन पटनाईक या नेत्यांकडून दाखवली जात नव्हती. नितीशकुमार अशाच संधीची वाट पाहत होते व त्यांनी दिल्लीत रॅली...
  March 17, 10:50 PM
 • जगविख्यात चित्रपट दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या चित्रपटाचे जगभर चाहते आहेत. गेली 40 वर्षे त्यांनी सायन्स फिक्शनपासून फँटसीपर्यंत, साहसापासून इतिहासापर्यंत अनेक विषयांना स्पर्श करणार्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. हॉलीवूडमध्ये एवढ्या विषयांच्या रेंजमध्ये चित्रपट करणार्यांमध्ये स्पीलबर्ग यांच्या तोडीचा असा दिग्दर्शक कोणी नाही. वेगवेगळ्या विषयांची प्रयोगशीलता, जागतिक भान, पटकथांवर विचार करणारा दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे. स्पीलबर्ग यांच्या चित्रपटांनी 80-90च्या...
  March 16, 04:00 AM
 • पूर्वी डेंग्यू हा आजार प्रचलित नव्हता. डेंग्यूची साथ पसरली ती गेल्या 20-25 वर्षांत. सर्व शहरांना आणि खेड्यांना विद्रूप करणारी होर्डिंग ऊर्फ फलकांची साथही याच काळात पसरली. डेंग्यू होतो हवा-पाण्यातील प्रदूषणामुळे. होर्डिंगची साथ पसरली ती राजकीय आणि सांस्कृ तिक प्रदूषणामुळे. पूर्वी गांधीजी, नेहरूंना वा नंतर कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशींना प्रचारासाठी, प्रसिद्धीसाठी आणि प्रतिमेसाठी रंगीबेरंगी फलकांवर झळकावे लागत नसे. त्यांच्या वाढदिवशी वा जाहीर सभांसाठी नाक्यानाक्यांवर वा प्रत्येक...
  March 15, 04:00 AM
 • कोंबडे झाकून ठेवले तरी उजाडायचे तेव्हा उजाडतेच. आपल्या देशातील तथाकथित राष्ट्रीय स्तरावरील मीडियाने कर्नाटकमधील भाजपचा झालेला दारुण पराभव झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला; पण म्हणून त्या राज्यातील राजकीय वास्तव लपून राहिलेले नाही. आणखी दोन महिन्यांनी कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार आहेत. गेल्या पाच वर्षांत कर्नाटकमध्ये भाजपने जे दशावतारी नाटकाचे (म्हणजे फार्सचे) प्रयोग केले, त्यामुळे या पार्टी विथ डिफरन्सचे पितळच उघडे पडले असे नव्हे, तर सगळीच खनिजे व धातू उघडे पडले. भाजपला...
  March 14, 03:00 AM
 • भारताला मुष्टियुद्धाचे पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणार्या विजेंदरसिंगचे नाव सध्या मादक द्रव्य सेवन केल्याबाबत चर्चेत आहे. खरे तर खेळाडूंवर अधिक आरोप होतात उत्तेजक सेवन केल्याचे; त्यायोगे सर्वोत्तम कामगिरी करून पदके जिंकल्याचे. तमाम क्रीडाविश्व या उत्तेजकांच्या विळख्यातून खेळाडूंची सुटका करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. असे असताना विजेंदरसिंग आणि त्याचा मुष्टियोद्धा सहकारी रामसिंग यांचे नाव हेरॉइन हे मादक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी गाजत आहे. ज्या विजेंदरने बीजिंग...
  March 13, 04:00 AM
 • सध्या विकासाचे मॉडेल म्हटले की गुजरातचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा होताना दिसते आहे. गुजरातच्या शहरांमधील चकाचक रस्ते म्हणजे हे राज्य या देशातील स्वर्गच आहे आणि या स्वर्गाची उभारणी मोदींनी कशी केली आहे, याची रसभरित वर्णने देशातील मीडियाकडून आणि राजकारण्यांकडून रंगवली जात आहेत. परंतु जो गरजते हैं, वो बरसते नहीं, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे म्हणणे खरे ठरावे, असे ठळक उदाहरण आपल्यासमोर गुजरातचे आहे. विकासाच्या बाबतीत कधीही न गरजणारे बिहारचे...
  March 12, 03:00 AM
 • कधी नव्हे एवढ्या भीषण दुष्काळाचा दाह, तीव्र पाणीटंचाई, महागाई, ढासळती कायदा-सुव्यवस्था अशा सर्वसामान्यांशी निगडित प्रश्नांचे काहूर चहूकडे उठलेले असताना आजपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यातच या अधिवेशनादरम्यान राज्याचा अर्थसंकल्पदेखील सादर करावा लागणार आहे. मात्र एवढे सारे असूनदेखील सत्ताधारी तसे रिलॅक्स मूडमध्ये दिसतात ते विरोधकांच्या कर्मदरिद्रीपणामुळे. सत्ताधारी काँग्रेसची बेपर्वाई आणि राष्ट्रवादीची टगेगिरी दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर...
  March 11, 03:00 AM
 • इंटरनेट आणि मोबाइल यांचा मिलाप झाल्याने माणसाच्या आयुष्यात अनेक बदल येऊ घातले आहेत. यामुळे आपले दैनंदिन जीवन सुलभ होत आहे. मोबाइलचा वापर करून आता कोणतेही आर्थिक व्यवहार एका झटक्यात करणे शक्य होऊ लागले आहे. सर्व प्रकारच्या बिलांचा भरणा मोबाइलच्या अॅपवरून करणे हा त्यातील पहिला टप्पा झाला. मोबाइलमुळे तर संपूर्ण जग आपल्या हातात आल्यासारखे झाले आहे. सुरुवातीला मोबाइलचा वापर फक्त बोलण्यासाठी केला जात होता. परंतु काळाच्या ओघात हातातले हे यंत्र आकाराने छोटे होऊ लागले. मात्र काम मोबाइल ऑफिस...
  March 9, 04:00 AM
 • कॅगच्या अहवालामुळे देशपातळीवरील शेतीकर्जमाफी योजना अंमलबजावणीतील गैरप्रकार देशासमोर आले असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मार्च 2008 च्या अंदाजपत्रकात शेतीकर्ज माफीचे धोरण जाहीर झाले. त्यानुसार देशभरातील 3.7 कोटी शेतकरी खातेदारांना एकूण 52 हजार कोटी रुपयांची कर्ज माफी केंद्र शासनाने दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्जमाफीची ही दुसरी वेळ आहे. या अगोदर व्ही. पी. सिंग पंतप्रधान असताना जवळपास 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली गेली होती.त्यानंतरची मनमोहनसिंग यांच्या कारकीर्दीतील ही...
  March 8, 03:00 AM
 • व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे बुधवारी कर्करोगाने निधन झाले. वास्तविक महाराष्ट्र-भारत आणि व्हेनेझुएला यांना जोडणारा भौगोलिक-राजकीय किंवा वांशिक असा कोणताही धागा नाही. व्हेनेझुएला हा देश लॅटिन अमेरिकेतला म्हणजे दक्षिण अमेरिकेतील एक तेलसंपन्न पण गरीब असा देश आहे. या देशाला भेडसावणारे जे सामाजिक-आर्थिक प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याकडेही आहेत. पण आपल्याकडे भ्रष्टाचार या विषयाचा बागुलबुवा इतका मोठा करण्यात आला आहे, की इतर प्रश्नांकडे लक्ष देण्याची आपली तयारी नाही. त्यामुळेच...
  March 7, 05:53 AM
 • महागाई, दुष्काळ, पाणीटंचाई, इंधन दरवाढ अशा अनेक समस्यांनी सर्वसामान्य माणूस कातावून गेला असतानाच आता ऐन उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये संप पुकारण्याचा इशारा एसटी कर्मचा-यांनी दिला आहे. परिणामी या समस्यांवर दोन घडीचा उतारा म्हणून का होईना, सुटीत कुटुंबासह बाहेरगावी जाण्याचा सामान्यांनी आखलेला बेतसुद्धा उधळला जाण्याची चिन्हे आहेत. लग्नकार्य असो, नातेवाइकांच्या भेटीगाठी असोत, की एखाद्या जवळच्या पर्यटनस्थळी जाणे असो, आजदेखील सर्वसामान्यांचा कल मुख्यत: एसटीकडेच असल्याचे दिसून येते....
  March 6, 06:32 AM
 • महागाई, दुष्काळ, पाणीटंचाई, इंधन दरवाढ अशा अनेक समस्यांनी सर्वसामान्य माणूस कातावून गेला असतानाच आता ऐन उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये संप पुकारण्याचा इशारा एसटी कर्मचा-यांनी दिला आहे. परिणामी या समस्यांवर दोन घडीचा उतारा म्हणून का होईना, सुटीत कुटुंबासह बाहेरगावी जाण्याचा सामान्यांनी आखलेला बेतसुद्धा उधळला जाण्याची चिन्हे आहेत. लग्नकार्य असो, नातेवाइकांच्या भेटीगाठी असोत, की एखाद्या जवळच्या पर्यटनस्थळी जाणे असो, आजदेखील सर्वसामान्यांचा कल मुख्यत: एसटीकडेच असल्याचे दिसून येते....
  March 6, 02:00 AM
 • नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा फक्त शपथविधी बाकी आहे, असे वातावरण त्यांनी आणि मीडियातील काही जणांनी निर्माण केले आहे. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुका अजून 15 महिने दूर आहेत. मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता अनेकदा राजकीय पंडितांकडून व्यक्त केली जाते, पण लोकसभेतील कोणत्याही खासदाराला वा पक्षाला लवकर निवडणुका नको आहेत. कुणालाच पुन्हा निवडून यायची खात्री वाटत नाही. मग पदरात पडलेले पुढील 15 महिने कशाला उधळून द्या, असा त्यांचा वास्तववादी विचार आहे. शिवाय आता लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला करावा...
  March 5, 06:50 AM
 • गेल्या दशकात देशात औद्योगिक संप, टाळेबंदी या घटना कमी झाल्या आहेत, असेच सर्वसाधारण चित्र होते. सहा महिन्यांपूर्वी मात्र दिल्लीशेजारील हरियाणाच्या सीमेवर असलेल्या मारुती मोटार्सच्या प्रकल्पात कामगारांच्या संपाने उग्र रूप धारण केले होते, हाच काय तो अलीकडच्या काळातील अपवाद. मात्र या संपानंतर मारुतीतील 5000 हंगामी कामगारांना कायम करण्यात आले आणि कामगारांच्या पगारातही 50 टक्के अशी भरघोस वाढ झाली. या घटनेनंतर वाहन उत्पादन क्षेत्रातील कामगारांच्या पगारात झपाट्याने वाढ होत चालली आहे. आता तर...
  March 3, 10:01 PM
 • वयाच्या नव्वदीतही मुकुंदराव किर्लोस्करांचा जीवनरस अगदी ताजातवाना होता. वयोपरत्वे शरीर पूर्वीसारखे साथ देत नव्हते, पण मनाचा टवटवीतपणा टिकून होता. त्यांना वाटत असे की, त्यांची स्मृती क्षीण होत चालली आहे. पण प्रत्यक्षात सध्याच्या चाळिशीत असलेल्यांपेक्षा त्यांची स्मरणशक्ती तीव्र होती. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या, विशेषत: 1930 ते 1947 या काळातल्या घटना जणू काल-परवा घडल्या असाव्या अशा ठळकपणे त्यांना आठवत आणि लहान मुलाच्या उत्साहाने ते सांगत. लौकिक अर्थाने ते कोणत्याही प्रथितयश दैनिकाचे...
  March 1, 10:53 PM
 • आपल्याकडे राजकारण आणि अर्थकारण हे हातात हात घालूनच चालत आले आहे. अर्थात, अर्थकारणाच्या सुधारणांसाठी राजकीय इच्छाशक्तीही लागते. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना चिदंबरम यांनी आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवण्यात काहीच गैर नव्हते; परंतु विशेष म्हणजे, या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारचा लोकानुनय नाही.लोकसभा निवडणुकीची नेपथ्यरचना या अर्थसंकल्पाद्वारे केली जाईल, असा अंदाज मुख्यत: भाजपचे अध्वर्यू व्यक्त करत होते; परंतु चिदंबरम यांनी अर्थ आणि विवेक या दोनच बाबी इतक्या सफाईने...
  March 1, 07:57 AM
 • जागतिक पातळीवर आर्थिक दृष्टिक्षेप टाकल्यास आपल्याला एकूण निराशेचाच सूर दिसतो. अमेरिका मंदीच्या कचाट्यातून गेल्या चार वर्षांत अजून काही बाहेर आलेली नाही. युरोपातील परिस्थितीतही या काळात सुधारणा झालेली नाही. उलट तेथील अनेक देशांची आर्थिक स्थिती बिघडतच चालली आहे. झपाट्याने विकास करणा-या ब्रिक्स(ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, साऊथ आफ्रिका) देशांना याचा फटका बसणे स्वाभाविकच होते. आपली अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असतानाही केवळ जागतिक पातळीवरील पडसाद आपल्याला भोगावे लागले आणि आपला विकासदर...
  February 28, 06:19 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात