Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • काही अभ्यासक राजकारणाला जुगार म्हणतात, तर काही जण राजकारणाची तुलना सापशिडीच्या खेळाशी करतात. देशभरातील विविध राज्यांत विधानसभांच्या आठ जागांसाठी व लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये हरियाणा आणि हिमाचल प्रदेश तसेच कर्नाटकमधील विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल काय लागतात हे महत्त्वाचे मानले गेले होते. हरियाणा, हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या प्रत्येकी एक अशा दोन जागा काँग्रेसने जिंकल्या आणि कर्नाटकमधील बेल्लारी मतदारसंघात भाजपचे डिपॉझिट जप्त होऊन काँग्रेस दुस-या...
  December 5, 11:44 PM
 • जगप्रसिद्ध आयरिश नाटककार आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंस्थापक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या धाकट्या मुलीचे अकस्मात निधन झाले होते. त्या उद्ध्वस्त मन:स्थितीतून सावरल्यानंतर शॉ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, आय थॉट, शी इज इमॉर्टल... नेमकी अशीच काहीशी भावना सळसळत्या उत्साहाचे जिवंत प्रतीक बनलेल्या आणि चिरतारुण्याचे जणू वरदान घेऊन आलेल्या धरमदेव आनंद यांच्याबद्दल आज वयाच्या साठी-सत्तरीत असलेल्या भारतीय चित्रपट रसिकांची आजवर होती. म्हणूनच या पिढीचा प्रतिनिधी म्हणता येईल अशा...
  December 5, 12:34 AM
 • अण्णा आणि कंपनीचा मुख्य शत्रू यूपीए सरकार! त्यातही काँग्रेस हे मुख्य लक्ष्य असल्याने लोकपाल विधेयकावरून देशातील वातावरण जेवढे तापवता येईल, तेवढे आता त्यांना तापवायचे आहे. गुरुवारी संसद सदस्यांच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मनू सिंघवी यांनी केंद्रीय सेवेतील तिस-या वर्गाच्या अखत्यारीत येणा-या अधिका-यांना (सुमारे 60 लाख) लोकपालच्या कार्यकक्षेतून वगळण्याचा प्रश्न उपस्थित केला. या मुद्द्याच्या विरोधात अण्णा आपले आंदोलन अधिक तीव्र करणार आहेत. 27 डिसेंबरपासून ते बेमुदत उपोषणालाही...
  December 3, 02:44 AM
 • अण्णा हजारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत नव्हे तर (कदाचित) नोबेल दर्जाचे अर्थतज्ज्ञ आहेत, हे अगदी भल्याभल्या आणि त्यांच्या कट्टर समर्थकांनाही माहीत नव्हते. आता जगातील सर्वश्रेष्ठ 100 विचावंतांमध्ये त्यांची नोंद झाली आहे आणि लवकरच 100 अर्थतज्ज्ञांमध्ये त्यांचे नाव घेतले जाईल. अजून तरी त्यांनी फिजिक्स विषयातील त्यांचे ज्ञान पाजळलेले नाही. राळेगणसिद्धीत ज्या झाडाखाली बसून ते टीव्ही चॅनल्सना लंब्याचवड्या मुलाखती देतात, त्या झाडाला कोणती फळे लागतात हे आम्हाला माहीत नाही. पण ते...
  December 2, 02:35 AM
 • पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमारेषेवर 26 नोव्हेंबरला नाटोने केलेल्या हवाई हल्ल्यात 24 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याने पाकिस्तान-अमेरिका संबंधांत कमालीचे वितुष्ट आले आहे. अमेरिका 2014 पर्यंत अफगाणिस्तानातून सैनिक मागे घेणार असल्याने गेल्या काही दिवसांत अफगाण सैन्याच्या मदतीने पाकिस्तान-अफगाण सीमारेषेवर दहशतवाद्यांविरोधात मोठी आघाडी उघडली गेली आहे. पण या संघर्षात हक्कानी गटाचे दहशतवादी, तालिबान बंडखोर, निष्पाप नागरिक आणि पाकिस्तानी सैनिकांचा बळी जात असल्याने पाकिस्तानमध्ये नाटो व...
  December 1, 12:34 AM
 • कथा असो, कादंबरी असो वा नादमय कविता, या साहित्यप्रकारांचा एक प्रवाह कल्पनाविश्वाशी जोडलेला असतो. त्यात उपमा-उत्प्रेक्षांची नक्षीदार आरास असते. प्रतिमा, प्रतीके आणि संज्ञाप्रवाहांची बेसुमार गर्दीसुद्धा असते. साहित्यातील दुसरा प्रवाह मात्र थेट हाडामासांच्या माणसांशी नाते सांगणारा असतो. त्यांच्या दु:ख- वेदना आणि कारुण्याचा नेमका ठाव घेणारा असतो. समकालीन बदलांची जाणीवपूर्वक नोंद घेत प्रस्थापित व्यवस्थेविरोधात वेळोवेळी बंड पुकारणाराही असतो. आसामी साहित्यप्रेमींमध्ये ममोनी बायडू...
  November 30, 12:22 AM
 • केंद्रातले सध्याचे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार हे जणू देशद्रोही आणि जनतेच्या प्रश्नांची जाण नसलेले आहे, अशी एक ठाम समजूत विरोधी पक्ष भाजप, डावे पक्ष व सत्ताधारी आघाडीतील तृणमूल काँग्रेस यांनी करून घेतलेली दिसते. थेट विदेशी गुंतवणुकीसाठी रिटेलची दारे उघडून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यावर या पक्षांनी जो थयथयाट चालवला आहे, तो पाहता डॉ. मनमोहनसिंग राजवट जुलमीच आहे, अशी कुणाचीही समजूत व्हावी. देशातील या जनतेचे आपणच तारणहार आहोत आणि जनतेचे प्रश्न आपल्यालाच समजतात,...
  November 29, 12:51 AM
 • देशात पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची चिन्हे दिसत असताना केंद्रीय मंत्रिमंडळाने रिटेल उद्योगात थेट विदेशी गुंतवणुकीस 100 टक्क्यांपर्यंत परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रिटेल क्षेत्र पूर्णत: खुले करण्याबाबतचा निर्णय प्रदीर्घ काळ प्रलंबित होता. कारण काँग्रेस पक्षातील काही नेते तसेच सत्ताधारी आघाडीतील काही घटक पक्ष आणि भाजप, डावे या प्रमुख विरोधी पक्षांचा याला विरोध होता. यामुळे सरकार ठोसपणे काहीच ठरवीत नव्हते. आता मात्र अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी...
  November 28, 02:13 AM
 • गेले वर्षभर देशात असे चित्र निर्माण केले गेले होते की प्रत्येक राजकीय व्यक्ती भ्रष्ट आणि खलनायक आहे. त्यातही विरोधाभास हा की ज्या राजकारणाच्या रणांगणावर भाजप आहे, त्या भाजपनेही तसे चित्र निर्माण करण्यात हिरिरीने पुढाकार घेतला आहे. संघपरिवाराच्या देशव्यापी यात्रा आणि मोहिमांमधून मात्र फक्त काँग्रेस आणि यूपीएचे मंत्री वा खासदार भ्रष्ट व दुष्ट आहेत, असा प्रचार केला जातो. जणू बंगारू लक्ष्मण ते येडियुरप्पा हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत आणि राजकारणातील रणांगणाच्या बाहेर आहेत. लालकृष्ण...
  November 25, 11:37 PM
 • कॉर्पोरेट जगतातील 142 वर्षांची ओजस्वी परंपरा आणि तब्बल 82 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या टाटा उद्योगसमूहाची पुढील काळातील सूत्रे कोणाकडे असणार याकडे सा-या जगाचे लक्ष लागले होते. गेले वर्षभर चर्चेत असलेल्या या विषयाला अखेर विराम मिळाला तो शापूरजी पालनजी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सायरस मिस्त्री यांच्या नेमणुकीने. विद्यमान अध्यक्ष रतन टाटा यांचे वय पुढील वर्षी 75 होणार असल्याने त्यांचा वारस शोधण्यास सुरुवात झाली त्या वेळी नोएल टाटा, इंद्रा नुई, केकी मिस्त्री अशा काही कॉर्पोरेट जगतातील...
  November 25, 03:25 AM
 • लोकसभेत पुन्हा हैदोस-धिंगाणा सुरू झाला आहे. अनेक अर्थांनी हे अधिवेशन ऐतिहासिक आहे. या अधिवेशनात एकूण 54 विधेयके येणार आहेत. त्यापैकी एक आहे वादग्रस्त आणि बहुचर्चित लोकपाल विधेयक! संसदेला कायदेमंडळ असेही म्हटले जाते. कारण कायदे करण्याचा, वेळप्रसंगी ते कायदे बदलण्याचा, काळाच्या गतीनुसार राज्यघटनेत (मूळ ढाच्याला धक्का न लावता) बदल करण्याचा अधिकारही संसदेला असतो. अन्नसुरक्षा विधेयक असो वा लोकपाल विधेयक, त्यांचे कायद्यात रूपांतर करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. म्हणजेच भारताच्या...
  November 24, 03:15 AM
 • विकासाच्या वाटेवर वेगाने घोडदौड करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे आलंकारिक भाषेत कोडकौतुक करण्याची अलीकडच्या काळात जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. या स्पर्धेत केवळ संघ परिवारातील लोकांनाच प्रवेश उपलब्ध आहे असे नाही. किंबहुना संघ परिवाराच्या बाहेरील स्वत:ला सेक्युलर, समतावादी, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पाईक म्हणवणा-या, भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वत:चा जीवही पणाला लावण्याची तयारी ठेवणा-या अनेक महाभागांचीही नरेंद्र मोदींच्या कौतुकासाठी जणू चढाओढच सुरू आहे. कुणाला मोदींनी...
  November 23, 03:34 AM
 • मायावतींनी त्यांच्या पक्षाचा हत्ती आकस्मिकपणे उत्तर प्रदेशातील राजकीय रणांगणावर आणून एकदम हाहाकार माजवला आहे. भाजप, काँग्रेस, समाजवादी अशा सर्व विरोधी पक्षांची मायावतींनी एका दणक्यात दाणादाण उडवून दिली आहे. उत्तर प्रदेशचे चार राज्यांत विभाजन करण्याचा प्रस्ताव मायावतींनी सोमवारी विधानसभेत मंजूर करून घेतला आणि फक्त त्या राज्यातीलच नव्हे, तर देशातील राजकारणाचेच समीकरण बदलून टाकले. एक गोष्ट तर स्पष्ट आहे. ती ही की, उत्तर प्रदेशच्या विभाजनाचा निर्णय प्रत्यक्षात व्हायला आणि तो...
  November 21, 11:54 PM
 • अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत 80 च्या दशकापासून मराठी माणूस काम करत आहे व गेल्या 20 वर्षांत त्याने सॉफ्टवेअर उद्योगात कर्तबगारी दाखवली आहे. तरी 21 व्या शतकाचे दुसरे दशक सुरू होऊनही मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचावी किंवा ही भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत. केवळ माहिती तंत्रज्ञानाच्या जगात अत्यावश्यक असलेले ज्ञान मराठी माणसाने आत्मसात करून रोजीरोटीचा एक नवा व्यवसाय निवडला. पण ज्ञानक्षेत्रातील संकल्पना, प्रमेये, सिद्धांत अशा पातळीवरची त्याची कामगिरी फारशी चांगली...
  November 21, 04:00 AM
 • गेले आठ महिने तमाम भारत देश सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा करीत आहे. इंग्लंडच्या दौ-यात त्या देशाने भारतीय संघाचे पानिपत केले. इंग्लंडहून सपाटून मार खाऊन भारतात परतलेल्या क्रिकेट संघाने त्याच इंग्लंडला भारतात एकदिवसीय क्रिकेट मालिकेत 5-0 असे लोळवले. वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या घडामोडींमध्ये राहुल द्रविड नामक क्रिकेटचा एक निस्सीम कर्मयोगी आपले कर्तव्य पार पाडीत होता. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांच्या झंझावातासमोर तो एकटा...
  November 18, 11:20 PM
 • ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी लोकसंख्या कमालीची वाढली. 90 वर्षांनंतर असे घडत आहे. तथापि, हा केवळ तर्क आहे, सत्य नाही. त्या वैळी प्लेग, फ्लू, महामारीमुळे लाखो लोक बेघर झाले होते, मरण पावले होते. आज ढीगभर सरकारी योजना, योजना मठाधीशांनी पसरवलेल्या फ्लू, महामारीचे बळी आहेत. किंबहुना कोट्यवधी कुटुंबांना त्या बळी ठरवत आहेत. लाखो तरुणांना सलगपणे बेघर करत आहेत. त्यांना कुठेतरी जाऊन स्थायिक होणे भाग पडत आहे. स्थायिक होण्यासाठी नव्हे, कामासाठी! पडेल ते कोणतेही काम! उत्तर प्रदेशात मोठा बिकट प्रश्न उभा...
  November 18, 05:13 AM
 • राजकारणातील धुरिणांच्या ढासळत चाललेल्या निष्ठा आणि तत्त्वांच्या अध:पतनामुळे अस्वस्थ होणारे, कार्यकर्त्यांमध्ये विचारांचे स्फुल्लिंग पेटवणारे आणि मूल्यांशी तडजोड हा गुन्हा मानणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वक्तृत्वात वाघासारखा आवेश आणि संवेदनशील हृदयाचे बापू म्हणजे मराठवाड्यातील शिस्तप्रिय, तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व. कार्यकर्त्यांची, विचारवंतांची एक पिढी त्यांनी बडेजावपणाचा लवलेशही न बाळगता घडवली. समाजकारण आणि राजकारणातील...
  November 18, 01:57 AM
 • गेले काही दिवस आर्थिक वादळात हेलकावे खात असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सला जीवनदान देण्यासाठी उद्योगपती विजय मल्ल्या यांनी आपली योजना पत्रकार परिषदेत जाहीर केली. किंगफिशरला वाचवण्यासाठी आपण सरकारला बेलआऊट करण्याची याचना केली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे खासगी कंपन्यांना बेलआऊट करण्यास उद्योगपती राहुल बजाज यांनी स्पष्ट शब्दात विरोध दर्शवला होता. राहुल बजाज आणि मल्ल्या हे दोघेही शरद पवार यांच्या निकटच्या वर्तुळातील मानले जातात. शरद पवार यांची सहानुभूती मल्ल्यांना...
  November 17, 07:35 AM
 • केंद्र व राज्य सरकारांनी योग्य समन्वय साधून झटपट निर्णय घ्यावेत व धोरणे आखताना त्यामध्ये राजकीय हेवेदावे आणू नयेत, असे उपदेशाचे डोस उद्योगपती मुकेश अंबानी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि सीसीआयने आयोजित केलेल्या इंडियन समिटमध्ये पाजले आहेत. खासगी क्षेत्राला सरकारने भरभरून मदत केली पाहिजे, असा त्यांचा भाषणाच्या सूर आहे. देशाने आजवर जी आर्थिक प्रगती केली त्यामध्ये खासगी क्षेत्राबरोबरच सरकारी उपक्रमांचाही तितकाच सिंहाचा वाटा आहे, याबद्दल या परिषदेत एकाही उद्योगपतीने कौतुकाचे...
  November 16, 01:47 AM
 • शिवसेना-भाजप-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महायुतीची सोमवारी औपचारिक घोषणा करण्यात आली. भारतीय परंपरांमध्ये औपचारिकपणा, परंपरा, रूढी यांना प्रचंडच महत्त्व आहे. त्यामुळे इतके दिवस रिपाइं आणि सेना-भाजपच्या लिव्ह इन रिलेशनशिपला आता अधिकृत दर्जा मिळाल्याने रिपाइंचे नेते आठवले व त्यांच्या समर्थकांना हुरूप येणे स्वाभाविक आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारप्रवाह ज्या स्वातंत्र्य-समता-बंधुता यांच्या आकांक्षांनी भारलेला होता, त्याला या निमित्ताने पूर्णपणे हरताळ फासण्यात...
  November 15, 12:06 AM
 
जाहिरात

RECOMMENDED