Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • गेले काही दिवस आर्थिक वादळात हेलकावे खात असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सला जीवनदान देण्यासाठी उद्योगपती विजय मल्ल्या यांनी आपली योजना पत्रकार परिषदेत जाहीर केली. किंगफिशरला वाचवण्यासाठी आपण सरकारला बेलआऊट करण्याची याचना केली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे खासगी कंपन्यांना बेलआऊट करण्यास उद्योगपती राहुल बजाज यांनी स्पष्ट शब्दात विरोध दर्शवला होता. राहुल बजाज आणि मल्ल्या हे दोघेही शरद पवार यांच्या निकटच्या वर्तुळातील मानले जातात. शरद पवार यांची सहानुभूती मल्ल्यांना...
  November 17, 07:35 AM
 • केंद्र व राज्य सरकारांनी योग्य समन्वय साधून झटपट निर्णय घ्यावेत व धोरणे आखताना त्यामध्ये राजकीय हेवेदावे आणू नयेत, असे उपदेशाचे डोस उद्योगपती मुकेश अंबानी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि सीसीआयने आयोजित केलेल्या इंडियन समिटमध्ये पाजले आहेत. खासगी क्षेत्राला सरकारने भरभरून मदत केली पाहिजे, असा त्यांचा भाषणाच्या सूर आहे. देशाने आजवर जी आर्थिक प्रगती केली त्यामध्ये खासगी क्षेत्राबरोबरच सरकारी उपक्रमांचाही तितकाच सिंहाचा वाटा आहे, याबद्दल या परिषदेत एकाही उद्योगपतीने कौतुकाचे...
  November 16, 01:47 AM
 • शिवसेना-भाजप-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महायुतीची सोमवारी औपचारिक घोषणा करण्यात आली. भारतीय परंपरांमध्ये औपचारिकपणा, परंपरा, रूढी यांना प्रचंडच महत्त्व आहे. त्यामुळे इतके दिवस रिपाइं आणि सेना-भाजपच्या लिव्ह इन रिलेशनशिपला आता अधिकृत दर्जा मिळाल्याने रिपाइंचे नेते आठवले व त्यांच्या समर्थकांना हुरूप येणे स्वाभाविक आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारप्रवाह ज्या स्वातंत्र्य-समता-बंधुता यांच्या आकांक्षांनी भारलेला होता, त्याला या निमित्ताने पूर्णपणे हरताळ फासण्यात...
  November 15, 12:06 AM
 • फड नेमका तुर्याला आल्यावरच म्हणजे ऊस अगदी तयार झाल्यावरच त्याला कोल्हा लागण्याची भीती असते. ग. दि. माडगूळकरांचे यावर बेतलेले गीत आजही मराठी मनाला भुरळ घालत असते. सध्या महाराष्ट्रातील शेतांमध्ये डौलात उभ्या असलेल्या उसामुळे मोठे वादळ येऊ घातले आहे. अन्नधान्यापासून ते पेट्रोलपर्यंत आणि औषधांपासून ते स्नो-पावडरींपर्यंत सगळ्याच गोष्टींचे भाव वाढत असताना शेतकर्यांनी मात्र त्यांच्या शेतमालाच्या भावासाठी आंदोलन केले की सरकारपासून ते अर्थशास्त्रज्ञांपर्यंत सगळ्यांच्याच पोटात का...
  November 14, 06:21 AM
 • जग पुन्हा एकदा मंदीच्या खाईत लोटले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तीन-चार वर्षांपूर्वी अमेरिकेत आलेली मंदी पूर्णपणे ओसरली नसतानाही जगात आशादायी चित्र उभे करण्यात आले होते. परंतु आता तर अमेरिकेच्या जोडीला युरोपातील इटली, ग्रीस, पोर्तुगाल, स्पेन, आयर्लंड या देशातील आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. इटली व ग्रीस हे दोन देश तर दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. गेल्या वेळच्या मंदीतून भारत व चीन सर्वात प्रथम सावरले होते. आतादेखील या दोन झपाट्याने विस्तारणा-या...
  November 12, 12:51 AM
 • मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या वर्षभराच्या कारकीर्दीचा ताळेबंद त्यांनी स्वत:च्या मनाशी जरी करून पाहिला तरी आपल्या सर्व मुलाखती, सरकारी आकडेवारी आणि आघाडीच्या अडचणींचा पाढा किती अर्थशून्य आहे, हे त्यांच्या लक्षात येईल. आता तर वर्षपूर्तीचा नजराणा म्हणून आद्य क्रांतिकारक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिले आहे. लोकायुक्त नेमा, लवासाची चौकशी करा, भ्रष्टाचार नष्ट करा, अन्यथा उग्र आंदोलनाला तयार राहा, अशी धमकी अण्णांनी दिली आहे. सोनिया गांधींच्या...
  November 11, 03:51 AM
 • खरे म्हणजे ऐश्वर्या अभिषेक बच्चन-राय यांचे बाळंतपण हा राष्ट्रीय चर्चेचा विषय नव्हे. (तरीही आम्ही हा अग्रलेख त्या विषयावर लिहिणे हे अनेकांना आक्षेपार्ह वाटू शकेल!) परंतु मीडियाने गेले काही दिवस याबद्दल इतकी चर्चा, चर्वितचर्वण आणि चहाट लावले आहे की त्या माध्यम संस्कृतीतच आम्ही असल्याने, त्यापासून दूर राहणे आम्हालाही अशक्य आहे. हल्ली अनेक बिनमहत्त्वाचे विषय बुनियादी राष्ट्रीय विषय म्हणून पुढे आले. उदाहरणार्थ, रा.वन आघाडीवर की बॉडीगार्ड किंवा फॉर्म्युला वन स्पर्धा महत्त्वाची की...
  November 10, 03:59 AM
 • वैभव - मग ते साहित्यविषयक असो, कलाविषयक असो वा विज्ञानविषयक - स्वत:च्या पावलांनी चालत आपल्या दारी यावे आणि आपण बेमुर्वतपणे त्याकडे पाठ फिरवण्याचा कपाळकरंटेपणा दाखवावा ही महाराष्ट्रासंदर्भात वरचेवर अनुभवास येणारी बाब मुंबईत पार पडलेल्या मुंबई लिटरेचर फेस्टिव्हल अर्थात इंग्रजी साहित्य महोत्सवात पुन्हा एकदा दिसून झाली. एरवी जागतिक (त्यातही मुख्यत: इंग्रजी) साहित्याचे अकल्पित असे भान केवळ आपल्यालाच आले असल्याचा बहुसंख्य महाराष्ट्रीय बुद्धिवादी मंडळींचा तोरा असतो. मराठीपेक्षा...
  November 9, 03:12 AM
 • कॉम्प्युटरमुळे बेकारी झपाट्याने वाढेल किंवा कॉम्प्युटरचा शिक्षणात अधिकाधिक उपयोग केल्यास पारंपरिक भारतीय शिक्षण पद्धतीला धोका पोहोचेल अशा अनेक भाकडकथा समाजात मुद्दामहून पसरवल्या जातात. भारतासारख्या परंपरावादी किंवा स्थितप्रज्ञ देशाला ढवळून काढण्याची शक्ती माहिती तंत्रज्ञानात असल्याने केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक क्षेत्रात काम करणा-या अनेकांचे हितसंबंध धोक्यात येत असतात. मध्यंतरी जगातील सर्वात स्वस्त म्हणजे केवळ अडीच हजार रुपये किमतीच्या आकाश या टॅबलेटचे अनावरण...
  November 8, 01:42 AM
 • देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या किमती लिटरमागे जवळपास दोन रुपयांनी वाढवल्यापासून राजकारण पेटू लागले आहे. देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात गेली तरी चालेल, मात्र या प्रश्नावर गरिबांची (?) बाजू लढवून राजकारण पेटते ठेवण्याचा निर्धार सत्ताधारी आघाडीतील तृणमूल कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स यांनी जाहीर केला आहे. त्यांच्या जोडीला भाजपपासून मार्क्सवादी कम्युनिस्टांपर्यंत सगळ्याच विरोधी पक्षांनी बाहू सरसावून या लढ्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान...
  November 7, 03:00 AM
 • अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीहून थेट राजघाट गाठले आणि तेथे ध्यानस्थ बसून त्यांचे 19 दिवसांचे मौन सोडले. ग्रहण सुटल्याचे जसे दे दान सुटे गिरान असे करुण किंकाळ्या ऐकून आपल्याला कळते, तसे तमाम खासगी टीव्ही चॅनल्समधून मौन सुटल्याचे जगाला कळले. अण्णांनी मौन जाहीर केले तेव्हा गांधीजींची साक्ष काढली नव्हती, मग सोडताना त्यांना राजघाटावर का जावेसे वाटले हे कळू शकलेले नाही. त्यांच्या ब्लॉगवरही त्याबद्दल काही स्पष्टीकरण नाही! नाही तरी त्यांच्या ब्लॉग्जची विश्वासार्हता उरलेलीच नव्हती....
  November 5, 05:24 AM
 • युद्धाची आणि शांततेची नेपथ्यरचना एकाच वेळी सुरू असते. एकीकडे युद्ध सुरू असले तरी दुसरीकडे शांततेच्या वाटाघाटी सुरूच असतात. व्हिएतनाम युद्धात व्हिएतनामवर हवाई हल्ले चालू असताना 1970 च्या दशकात जीनिव्हा व पॅरिसमध्ये मात्र अमेरिका व्हिएतनामशी शांततेच्या वाटाघाटी करत होती. इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष सुरू असतानाही शांततेच्या वाटाघाटी सुरू असतात. असाच एक नवा अध्याय भारत-पाकिस्तान संबंधांबाबत बुधवारी सुरू झाला. व्यापार आणि आर्थिक प्रक्रियेत भारताला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा देऊन...
  November 4, 12:30 AM
 • सलमान बट्ट, महंमद आसिफ आणि आमेर महंमद या तीन पाकिस्तानी क्रिकेटपटूंना स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरवून लंडनच्या न्यायालयाने कारावासाच्या शिक्षेचे सूतोवाच केले आहे. मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग आणि तत्सम सट्टेबाजीचे प्रकार क्रिकेटमध्ये कित्येक वर्षांपासून प्रचलित आहेत. त्याविरुद्ध आरडाओरडही भरपूर होत आहे. प्रत्येक देशाच्या क्रिकेट बोर्डापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपर्यंत प्रत्येकाने हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्यासाठी पावले उचलली आहेत. पण प्रत्यक्षात...
  November 3, 02:44 AM
 • दीपोत्सवानंतर धान्याचे दर सरासरी 30 टक्क्यांनी घसरत असल्याची सुखद बातमी आली असतानाच राज्यातील महावितरणने वीज ग्राहकांच्या खिशात हात घालून महागाईचा शॉक दिला आहे! ही वाढ प्रति युनिट सरासरी 41 पैशांची असून सर्वसामान्य वीज ग्राहकांना 45 पैशांचा प्रति युनिट भार सोसावा लागेल. गेल्या दीड वर्षातली ही आठवी दरवाढ असून या वाढीनंतरही महावितरणचा तोटा पूर्णपणे भरून निघणारा नाही. त्यामुळे भविष्यातही विजेच्या दरवाढीची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. खरे तर महावितरणने 5,155 कोटी रुपये आपल्या तिजोरीत...
  November 2, 05:26 AM
 • दिवाळीनंतरच्या पहिल्याच रविवारी देशात झालेल्या पहिल्या-वहिल्या फॉर्म्युला वन कारच्या स्पर्धेवर सा-या देशाचे लक्ष लागले होते. अनेकांना या स्पर्धेचे नियम, त्यातले बारकावे याचा थांगपत्ताही नसेल; पण 320 कि.मी. लांबीच्या या स्पर्धेचा थरार अनुभवताना नवमध्यमवर्गीय आणि नवश्रीमंतांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ज्याप्रमाणे आय.पी.एल. स्पर्धांनी क्रिकेट आणि करमणूक यांची बेमालूम सांगड घालून व्यवसाय केला, तसेच या स्पर्धेतही ज्यांच्या खिशाला तिकीट परवडले त्यांनी प्रत्यक्ष जाऊन किंवा...
  November 1, 01:01 AM
 • आज म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी पृथ्वीवर आणखी एक नवा मानवी जीव जन्माला (कार्ल हॉब या वॉशिंग्टनस्थित पॉप्युलेशन रेफरन्स ब्युरोमधील लोकसंख्यातज्ज्ञांच्या अंदाजानुसार हा जीव भारतातील उत्तर प्रदेशात जन्माला येण्याची दाट शक्यता आहे) येऊन जगाच्या लोकसंख्येने 700 कोटींचा आकडा गाठलेला असेल. एका अर्थाने जगाच्या इतिहासातील हा महत्त्वाचा टप्पा. परंतु हा क्षण साजरा करण्याच्या मन:स्थितीत कोणीही दिसत नाही. नपेक्षा लोकसंख्येचा एवढा प्रचंड भार पृथ्वीला पेलणार कसा, या चिंतेने देशोदेशीच्या...
  October 31, 03:11 AM
 • काळ कोणताही असो, माणसाला जितकी स्वत:च्या अपूर्णतेची, असमर्थतेची आणि मर्त्यपणाची जाणीव सोबत करीत आली तितकीच अवास्तव फॅण्टसीची वा कल्पनाविलासाची त्याला असलेली ओढही कायम राहिली. कधीकाळी याच अगम्य अशा ओढीतून त्याने तारणहार ठरणा-या देव या संकल्पनेला जन्माला घातले आणि याच विलक्षण ओढीतून त्याने स्वप्न-वास्तवाचा अकल्पित मेळ असलेले आधुनिक सुपरहिरोही साकारले. त्या अर्थाने सुमारे शंभर वर्षांपूर्वी एडगर राइस बरोजच्या टारझनपासून सुरू झालेल्या सुपरहिरोच्या प्रवासाचे ऐन दिवाळीत प्रदर्शित...
  October 29, 03:09 AM
 • केंद्रीय मंत्रिमंडळाने ऐन दिवाळीत राष्ट्रीय औद्योगिक उत्पादन धोरणाला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे जीडीपी वाढवण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या या धोरणानुसार येत्या आठ वर्षांत, 2020 पर्यंत देशभरात 10 कोटी नोक-या निर्माण केल्या जाणार आहेत आणि सात नवी औद्योगिक शहरे वसवली जाणार आहेत. ही प्रक्रिया सध्या नियोजनाच्या पातळीवर असली तरी त्यामुळे नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल, ही सरकारने देशभरातील बेरोजगारांना दिवाळीनिमित्त दिलेली गोड भेटच मानता येईल....
  October 27, 03:06 AM
 • मराठी भाषेत इंग्रजी, हिंदी, उर्दू, फारसी अशा अनेक भाषांमधील शब्दांची भेसळ झाली आहे आणि शुद्ध (म्हणजे कोणती?) मराठी आता उरलेली नाही, अशी रड आणि ओरड नेहमी ऐकू येते. मला टाइम नसतो, लेट झालाय, मी बिझी आहे, कॉल कर, हे व असे अनेक इंग्रजी शब्द आपण नेहमी वापरतो आणि सामान्य माणसाला त्यात काही वावगेही वाटत नाही. किंबहुना डोंट फेकोफाय, व्हॉट नखराज शी डज, यू आर एकदम मॅड अशी कोणत्याही भाषेच्या व्याकरणात/शब्दकोशात न बसणारी वाक्येही विशेषत: शहरी भागांमध्ये सर्रास ऐकू येतात. याला नाके मुरडतात ते शुद्ध भाषावादी...
  October 26, 12:26 AM
 • जगातील सोन्याने मढवलेला देश असे वर्णन करायचे झाल्यास भारताचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. सोन्याने मढवले जाणे या शब्दप्रयोगामध्ये आपल्या देशाच्या मानसिकतेचेही प्रतिबिंब पडलेले आहे. सणवार, लग्नसराई यांच्या निमित्ताने सोन्याचांदीची होणारी खरेदी एक वेळ समजू शकतो, पण या देशात वर्षातले 365 दिवस सोन्याची सातत्याने खरेदी सुरू असते. सोने खरेदी करून ठेवले तर ते भविष्यात अडचणीच्या वेळी कामाला येईल असे सांगितले जाते. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी सोनेखरेदीचा भारतीयांचा सोस पाहता ती हौस...
  October 24, 11:35 PM
 
जाहिरात

RECOMMENDED