जाहिरात
जाहिरात
Home >> Editorial >> Agralekh

Agralekh

 • सुपरहिट ठरलेला फॉर्म्युला पुरेपूर एन्कॅश करण्यासाठी एखाद्या चित्रपटाचे सिक्वल अथवा पार्ट वन, टू, थ्री... जसे बनवले जातात, तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही निवडणुकीच्या फडात साहेबांच्या खंजिरी राजकारणाचे नवनवे प्रयोग सादर होत असतात. आताही नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषत: जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने साहेबांचा इशारा होताच त्यांच्या संचातील नेहमीच्या यशस्वी कलाकारांनी खंजीरनाट्याला धडाक्यात प्रारंभ केला आहे. एवढेच नव्हे तर अगोदर धोबीपछाड दिलेल्या...
  March 26, 04:42 AM
 • परवाचा 22 जून हा दिवस प्रत्येक बांगलादेशी नागरिकासाठी वेगळा होता. शेर-ए-बांगला स्टेडियमवर उपस्थित असलेल्या प्रत्येक बांगलादेशी नागरिकाच्या हृदयाचे ठोके अधिक पडत होते. पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यातील प्रत्येक चेंडू बांगलादेशात श्वास रोखून पाहिला जात होता. आयसीसीच्या या आशिया कप क्रिकेट स्पर्धेला याआधी कधीच एवढे महत्त्व आले नव्हते. सामन्यांना गर्दी होत नव्हतीच, परंतु सामनेही एकतर्फी व्हायचे. सहभागी संघांनीदेखील खेळताना कधी रस दाखवला नाही. या वेळी मात्र बांगलादेश क्रिकेट संघाचा...
  March 23, 10:57 PM
 • तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रात अनेक साहेब होऊन गेले. त्यात डॉ. आंबेडकरांसारख्या जगातील शोषितांना मुक्तीचा मार्ग दाखवणा-यांपासून ते दगडांच्या देशा म्हणून स्वत:ला गौरवून घेणारे हे राज्य ख-या अर्थाने सुजलाम सुफलाम बनवणा-या आणि सेक्युलॅरिझम या इंग्रजी शब्दाचा अर्थ नीट समजलेल्या यशवंतराव चव्हाणांपर्यंत काही ख-या साहेबांचा जसा उल्लेख होतो, तसा सांप्रत पवारसाहेब, बाळासाहेब ते अगदी आठवलेसाहेब इथपर्यंत ही साहेबी मांदियाळी वाढवली जाऊ शकते. सध्याच्या या साहेबी मांदियाळीतील पवारसाहेब हे...
  March 23, 12:57 AM
 • वादग्रस्त कुडानकुलम अणुप्रकल्पाला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी अखेर हिरवा कंदील दाखवल्यानंतर या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये येणारा मोठा अडसर दूर झाला आहे. गेल्या महिन्यातच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सायन्स या नियतकालिकाला एक मुलाखत देऊन कुडानकुलम अणुप्रकल्पाच्या निर्मितीत अमेरिका आणि स्कॅण्डेनिव्हयन देशातील काही एनजीओ बाधा आणत असल्याचा थेट आरोप करून या गंभीर विषयाला वाचा फोडली होती. पंतप्रधानांच्या या आरोपामुळे डाव्यांसह भाजप व मेधा पाटकर यांच्यासारख्या...
  March 21, 10:58 PM
 • प्रश्न कितीही गंभीर असो, समस्या कितीही गुंतागुंतीची असो, लोकानुनयी भूमिका घेण्याच्या नादात सवंगपणा करत जाणे हे भारतीय मानसिकतेचे व्यवच्छेदक लक्षण बनू पाहत आहे. हा सवंगपणा जितका राजकीय क्षेत्रात ठळकपणे दिसून येत आहे, तितकाच तो गेल्या काही वर्षांत कमालीचे उपद्रवमूल्य वाढलेल्या मीडियामध्येही पाहायला मिळत आहे. त्यातही टेलिव्हिजन मीडियाने स्वत:कडे न्यायाधीशांची भूमिका घेतलेली दिसत आहे, तर प्रिंट मीडियाने एखाद्या घटनेचा स्वत:च्या सोयीचा अर्थ लावत सर्वसामान्य जनतेचा बुद्धिभेद...
  March 20, 11:35 PM
 • प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी विक्षिप्त व्यक्ती असते. मग ती स्त्री असेल वा पुरुष. विक्षिप्त म्हणजे वेड लागलेली व्यक्ती नव्हे, जरी त्या विक्षिप्तपणाला वेडसरपणाची झाक भासली तरी अशा विक्षिप्त व्यक्तीला घरात आणि घराबाहेर सांभाळून घेणे हे त्या कुटुंबातील सर्वांनाच विलक्षण अडचणीचे असते. घरातलीच व्यक्ती आणि तीसुद्धा वयस्कर स्त्री असेल तर घरातून बाहेर काढता येत नाही, मारणे तर गैर आणि अशक्यच आणि तिच्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्या कुटुंबातील...
  March 20, 04:57 AM
 • क्रिकेट हा खेळ नाही तर जीवनाचा आनंद लुटण्याचे एक उत्तम माध्यम असल्याची जाणीव सर्वप्रथम सर डॉन ब्रॅडमन यांनी क्रिकेट रसिकांना करून दिली. डॉन ब्रॅडमन यांचा वारसा सचिन तेंडुलकरने जपला. ब्रॅडमन यांचा प्रत्येक डाव म्हणजे फलंदाजीची एक मैफल असायची. क्रिकेट या खेळात रस नसलेलेही त्यामुळे मैदानावर यायचे. दोन दशकांची ब्रॅडमन यांची कारकीर्द म्हणूनच क्रिकेट या खेळासाठी एक सांस्कृतिक सोहळा ठरली. कव्हर्स नसलेल्या खेळपट्ट्या, ओलसर खेळपट्ट्या, उसळते चेंडू टाकण्याचे निर्बंध नाहीत,...
  March 18, 11:17 PM
 • भारताच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली असताना तसेच जागतिक पातळीवर आर्थिक पेचप्रसंगाची मालिका डोळ्यापुढे दिसत असताना अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी वास्तववादी अर्थसंकल्प सादर केला आहे. कोणत्याही मोठ्या घोषणा न करता सध्याच्या आर्थिक स्थितीचा यशस्वीपणे मुकाबला कसा करता येईल याची आखणी अर्थमंत्र्यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने केली आहे. युरोपातील आर्थिक पेचप्रसंग आटोक्यात न येण्याची दिसत असलेली चिन्हे, जास्मिन रेव्होल्युशनच्या निमित्ताने मध्य-पूर्वेत...
  March 16, 11:12 PM
 • 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या गोपी सिनेमात दिलीपकुमार यांच्यावर चित्रित करण्यात आलेले एक भजन अतिशय गाजले होते. रामचंद्र कह गये सिया से ऐसा कलयुग आयेगा, हंस चुगेगा दाना दुनका, कौआ मोती खाएगा. भारताच्या राजकीय-सामाजिक भवितव्याचा इतका चपखलपणे वेध घेणा-या या कवीला खरे तर भारताचा नॉस्ट्रडॅमस म्हणून संघ परिवाराने जाहीर करून टाकण्यास हरकत नाही. कारण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत पसरलेल्या या विशाल देशावर नवी दिल्लीतील ज्या साऊथ ब्लॉकमधून राज्य केले जाते, त्या...
  March 16, 12:38 AM
 • रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी रेल्वे अर्थसंकल्पात भाडेवाढ जाहीर केल्याने तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या स्वभावाला अनुसरून रौद्र रूप घेतले आहे. तृणमूल कॉँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहातच या दरवाढीला विरोध करून त्रिवेदी यांना घरचा आहेर दिला. असे असले तरी रेल्वेमंत्री मात्र भाडेवाढीच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी आपण देशहिताचा विचार करून हा निर्णय घेतला आहे, पक्षाचे हित दुय्यम आहे, अशी ठाम भूमिका घेतल्याने ममता विरुद्ध त्रिवेदी असा संघर्ष उभा...
  March 14, 11:04 PM
 • क्रिकेटमधील मॅच फिक्सिंग ऊर्फ निकाल निश्चितीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ब्रिटनमधील एका दैनिकाने बॉलीवूडमधील तारकांच्या आधाराचा उल्लेख करून भ्रष्टाचाराच्या या नव्या अंगावर प्रकाशझोत टाकला आहे. खरे तर क्रिकेटपटू आणि चित्रपटतारकांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांची चर्चा याआधीही व्हायची. अगदी सर गारफिल्ड सोबर्स यांच्या गळाला अंजू महेंद्रू ही नटी लागल्यापासून कालपरवापर्यंतच्या झहीर खान-ईशा शर्वानी संबंधांपर्यंतची रसभरित वर्णने वाचायला मिळतात. मात्र या संबंधांना आता निकाल...
  March 13, 10:57 PM
 • अलीकडेच पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांत कॉँग्रेसच्या पदरी आलेली घोर निराशा तसेच प्रादेशिक पक्षांची वाढलेली ताकद या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक होणार हे अपरिहार्य आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी संयुक्त सभागृहापुढे केलेल्या भाषणात आजवर केलेली कामे व सरकारपुढील शिल्लक राहिलेल्या काळातील कामाचा अजेंडा मांडला. प्रतिभातार्इंचा कार्यकाल येत्या जुलैमध्ये संपत असल्याने आणि त्यांना पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा संधी...
  March 12, 11:11 PM
 • उत्तर प्रदेशचे आजवरचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादव हे येत्या 15 मार्च रोजी शपथ घेतील. समाजवादी पक्षाला 403 जागांच्या उत्तर प्रदेश विधानसभेत तब्बल 224 जागा मिळवून देणा-या अखिलेश यांच्या मार्गातील दोन प्रमुख अडथळे असलेल्या आझम खान यांनी पक्षाच्या बैठकीत त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवले आणि अखिलेश यांचे सख्खे काका शिवपाल यादव यांनी त्याला अनुमोदन दिले. परदेशात शिकलेल्या अखिलेश यांनी समाजवादी पक्षाची धुरा तीन वर्षांपासून खांद्यावर घेतली आहे. गेली तीन वर्षे त्यांच्या...
  March 11, 11:09 PM
 • नुकत्याच झालेल्या निवडणुकांत काँग्रेसची निराशाजनक कामगिरी झाली आहे. त्यामुळे सरकारची कामगिरी आणि विश्वासार्हतेवर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे सरकारचा परफॉर्मन्स तपासण्यासाठी म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीच्या ध्वजांकित कार्यक्रमांवर नजर राखण्यासाठी काँग्रेसकडून नियुक्त करण्यात आलेले सरचिटणीस विलास मुत्तेमवार यांची मते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला नुकत्याच झालेल्या निवडणुकांत अपेक्षित यश मिळाले नाही याची कारणे काय असावीत?उत्तर :...
  March 11, 06:11 AM
 • क्रिकेटमधील एका सदगृहस्थाने बॅट खाली ठेवली. राहुल द्रविड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. क्रिकेटचा जसजसा प्रसार होत गेला तसतसे त्यामध्ये अपप्रवृत्ती आणि असंस्कृतपणाही वाढीस लागला. सभ्य गृहस्थांचा खेळ अशी मूळ ओळख असलेल्या क्रिकेटमध्ये बदललेल्या वातावरणातही विशुद्ध खेळाडूच्या चारित्र्याची पताका त्याने सदैव फडकत ठेवली. फलंदाज, कप्तान, क्षेत्ररक्षक आणि यष्टिरक्षणाच्या दालनात त्याला सदैव मान होता. एखाद्या निस्सीम कर्मयोग्याप्रमाणे फळाची अपेक्षा न ठेवता त्याने भारतीय...
  March 9, 11:09 PM
 • मुंबई आणि पुणे या दोन्ही महानगरांशी असलेली नाशिकची कनेक्टिव्हिटी सक्षम होऊ शकेल असे दोन निर्णय एकाच दिवशी जाहीर झाले असून, प्रथमत: त्याचे स्वागतच करावे लागेल. मुंबईला सकाळी पोहचण्यासाठी राज्यराणी एक्स्प्रेसच्या रूपाने नाशिककरांना आणखी एका रेल्वेगाडीची सुविधा रविवारपासून मिळणार आहे. त्याचबरोबर नाशिक-पुणे या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या उभारणी खर्चाचा अर्धा भार उचलण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारल्यामुळे वर्षानुवर्षे लोंबकळत पडलेला प्रश्न सुटण्याच्या दिशेने एक पाऊल...
  March 9, 03:34 AM
 • पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल मंगळवारी स्पष्ट झाले. काँग्रेसची सत्ता या पाचपैकी मणिपूर या ईशान्येकडील छोट्या राज्यात येणार आहे. उर्वरित चारही राज्यांत काँग्रेसची उतरती भाजणी आहे. काँग्रेससोबतच भाजपचीही उतरतीच भाजणी या चारही राज्यांमध्ये दिसून येते आहे. मात्र इतिहासचक्र उलटे फिरवत शिरोमणी अकाली दलाने आपली सत्ता पंजाबमध्ये राखली. तसेच प्रकाशसिंग बादल व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात अनंत भ्रष्टाचाराची प्रकरणे असूनही निर्विवाद विजय प्राप्त केल्याने अकाली दलाचे ज्युनियर...
  March 6, 11:44 PM
 • जर केंद्र सरकारची नौका वादळात सापडून महाकाय लाटांवर आदळत नसती तर उत्तर प्रदेशातील निवडणुकांना इतके अतोनात महत्त्व प्राप्त झाले नसते. त्याचप्रमाणे राहुल गांधींनी उत्तर प्रदेशचे कुरुक्षेत्र करण्याचा असा जंगी प्रयत्न केला नसता, तरीही या निवडणुकीला असे 3-डी चित्रपटाचे आणि अल्ट्रा-सुपर साउंड सिस्टिम असलेले सनसनाटी रूप प्राप्त झाले नसते. सुमारे 20 कोटी लोकसंख्या (म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या एकषष्ठांश) असलेल्या उत्तर प्रदेशचे तसे विशेष महत्त्व आहेच. लोकसंख्येच्या भाषेत उत्तर...
  March 5, 11:06 PM
 • मराठी भाषा दिन साजरा होऊन पाच दिवस उलटत असताना नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेच्या एका आकडेवारीत मराठी भाषकांसाठी चिंता करायला लावणारी एक बातमी आहे. या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मराठी माध्यमात शिकणा-या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली असून मराठी पालकांचा पर्यायाने मुलांचा कल इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याकडे वाढत आहे. ही बाब केवळ मराठी भाषेकरिता दु:खदायक आहे असे नाही तर देशातील इतर राज्यातील पालकही आपल्या...
  March 5, 03:46 AM
 • रस्त्यांवरील वाढते अपघात रोखण्याच्या उद्देशाने अस्तित्वात असलेल्या मोटार वाहन कायद्यांमध्ये दंडात्मक पातळीवर दुरुस्त्या सुचवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा या कृतीचे स्वत:च्या सोयीपुरते वेगवेगळे अर्थ लावताना समाजातील वाढत चाललेल्या निर्ढावलेपणाचा विसर पडू न देणे हे केव्हाही शहाणपणाचे ठरावे. बेदरकार वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे वा सीट बेल्ट न लावणे, मद्यधुंद अवस्थेत गाडी...
  March 3, 02:25 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात